शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Tuesday, November 28, 2023

कळत नकळत जुळले हे बंध भाग १०

कळत नकळत जुळले हे बंध भाग १०

क्रमशः पुढे चालू......

 Evening. ७.००o’ clock. Outer.

संध्याकाळ झालेली असते. सूर्य अस्ताला गेलेला होता.

रेवती, अग, सूर्य मावळला की.

आण्विका, अग हो, आजचा दिवस कितक्यात गेला हे कळलंच नाही बघ.

स्वप्नील, पण खूप मज्जा आली.

रवी, हो मला ही. माझ्या जीवनातील हा एक अप्रतिम क्षण आहे. यासाठी मी तुमचा आभारी आहे ईशान सर.

ईशान, त्यात कसले अभार मानायचे सर.

सर्व गाडीत बसतात.

ईशान, बोला आता कूठे दौरा न्यायचा.

आण्विका, आता खूप झाली मौज. चला आता घरी.

ईशान, बरं मॅडम.

आण्विका, स्वप्नील काय झालं मघाच.

स्वप्नील, हा ते होय. जाताना वाटेत गाव आहे. मित्रांच. तिथून जाऊ की.

ईशान गाडी चालवतो. थोड्या वेळात गाडी त्या ठिकाणी येते.

स्वप्नील, ( ईशानला) गाडी आतील बाजूस वळव.

ईशान , स्वप्नील सांगेल त्या दिशेला गाडी चालवतो. थोड्याच वेळात ते इच्छित स्थळी पोहोचले. त्या मित्राकडून संपूर्ण माहिती घेतात. व निघतात.

…… ……. …… …… ….. …

नाईट. ८.०० o’ clock. Outer inter.

गाडी अलीबाग रोडला चालवू लागतो.

आण्विका, स्वप्नील इथ जवळ जेवणाची सोय आणखी कुठे आहे.

स्वप्नील, आहे की एक मस्त गावरान हॉटेल.

आण्विका, मग गाडी घ्या तिकडे. जेवून जाऊ.

स्वप्नील रस्ता सांगतो. ईशान तिकडे गाडी घेतो. ते रेस्टॉरंट मध्ये जातात. ते एक गावरान हॉटेल असते. गावरान जेवण थेट चुलीवर केलेलं असतं.

जेवण होत.

ईशान, (वेटरला) बिल किती झालं.

आण्विका, थांब, मी देणार आहे बिल.

ईशान, मी देतो.

आण्विका, सकाळपासून सगळा खर्च तूच करत आहेस. ते काही नाही मी देणार.

आण्विका वेटरला बिल आणण्यास सांगते.

ती बिल देते.

ती निघतात.

….. …… …..

Night. गाडीमध्ये. ९.००. O’clock

ईशान गाडी चालवत असतो.

अलिबाग जवळ येत असताना.

रेवा अन्विकेस इशारा करून गप्प राहण्यास सांगते.

 रेवती, काय दीदी काल फोन आला होता ना.

आण्विका, काय ग कुणाचा.

रेवती, आईला आलता ना मावशीचा तुला पाहायला येणार आहेत म्हणे.

रेवाचे बोलणे ऐकूण ईशान साईडला गाडी लावतो.

ईशान, काय? अण्विकाच लग्न ठरतंय.

रेवती, लग्न अजून काय ठरल नाही. पण पाहायला येणार आहेत म्हणे, गडहिंग्लज कडील स्थळ आहे. मुलगा एम. बी. बी. एस. झालेला आहे. चांगला जोडा शोभेल अशी मावशी म्हणत होती

ईशान ही बातमी कळताच नाराज झाला. व त्याने मान वळवली व गाडी चालवू लागला.

स्वप्नील, काय हे अनु दीदी लपवतेस होय.

रेवती, अरे, बघायला येणार आहेत तिला, अजून काय ठरल नाही. काल रात्री फोन आला होता. बघ मावशीचा तेव्हा आईलां सांगत होती.

स्वप्नील, म्हणजे या सुट्टीत बार उडणार म्हणा.

रेवती, अरे, अजून पाहायला येणार आहेत. ठरायला लांब आहे.

स्वप्नील, त्याला काय वेळ लागतोय होय. पसंती झाली की झालं. व आमची ताई काय कमी आहे होय. न आवडायला. काय ईशान सर.

 ईशान, ते आहेच, पण लगेच लग्न, अनुला काय हवंय ते तरी विचारा. तिची आवड निवड.

रेवती, तस पाहायला गेलं. तर अनु दिदीला तुझ्या सारखा जोडीदार मिळायला हवा. पण काय करणार तिच क्षेत्र पाहून घरची लोक ठरवणार.

स्वप्नील, ते शेवटी आलंच. नाहीतर काका आमचे कोल्हापूरचे भारी कडक बुवा.

रेवती, ते तर आहेच. काय अणू दीदी काय चालेल का डॉक्टर की बघुया दुसरा.

आण्विका, गप ग थट्टा पुरे.

ईशान, अण्विकाची आवड निवड काय आहे.

रेवती, तिने आजुन नव्हरा पाहायचा आहे. काळा की गोरा ते. तस पाहता ती गोरी आहे. पण लग्नात डाव उजव चालत. शिवाय नव्हरा एम बी बी एस म्हंटल्यावर केवढी मोठी डिग्री ती. मग काय मॅडम हो म्हणतीलच.

आण्विका, रेवा बाई उगाच इमल्यावर इमले चढवू नका.

गाडी शासकीय निवासस्थानी आली.

सर्वजण गाडीतून उतरले. एकमेकांना हस्तांदोलन करत.

निरोप घेतला. ईशान थोडा नाराज होता.हे जाणवलजाणवलं.

त्याने ही हस्तांदोलन केले.

हस्तांदोलन करताना त्याने अण्विकाच्या हात हातात घेतल्यावर जोरात दाबला. व

पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

दिली.

इतक्यात रेवा व स्वप्नीलने आपली गाडी पार्किंग मधून काढली.

ईशान अण्विका जवळ उभा होता. तो

ईशान, बघू पुन्हा कधी भेट होते ते.

आण्विका, आता फोन नंबर आहे म्हंटल्यावर होईलच की.

 स्वप्नीलने गाडी काढली. आण्विका त्यावर बसली. त्यांनी पुन्हा निरोप घेतला. व ती निघाली.

कितीतरी उशीर तो त्यांना पाहत होता. दिसेनाशी होईपर्यंत.

 इतकयात फोन वाजतो.

बबलू, साहेब आला काय?

ईशान, हो, आलोय. ये गाडी घेऊन जा.

बबलू येतो. ईशान त्यास गाडीची चावी देतो.

ईशान विचारत असतो.

बबलू. साहेब पैसे. (बबलू दोन तीन वेळा बोलतो)

ईशान, (विचारातून जागा होऊन) हा हे घे.

तो पैसे देतो.

व रवी देखील निरोप घेऊन आपल्या रूमकडे जातो.

 ईशान आपल्या रुमकडे जातो.

….. ……. ……. ……

Night मावशी चे घर inter. Night. १०.०० o’ clock

स्वप्नील, अण्विका, रेवती गाडीवरून येतात. गाडी पार्क करून ते घरात येतात.

मावशी,(रेवतीची आई) काय कशी झाली ट्रिप.

रेवती, मस्त.

मावशी, काय अनु कसं वाटल.

आण्विक, मस्त मजा आली.

मावशी, मग काय आहेच हा कोकणचा स्वर्ग.

आई, जेवणार का?

रेवती, नाही बाई. खूप जेवलो आज.

आई, स्वप्नील, अनु तू तरी जेवणार आहेस का?

स्वप्नील, अनु, नाही .

रेवती, चल झोपायला. दीदी. खूप कंटाळा आलाय.

त्या दोघी बाथरूम मध्ये जातात. फ्रेश होऊन रेवतीच्या रूम मध्ये जातात.

….. ……. …… ……..

Night. रेवती रूम. Inter. १०.३०

रेवती व अण्विका अंथरुणावर पहुडल्या आहेत.

आण्विका, हे काय ग मला लग्नासाठी स्थळ आलय अस का सांगितलस तू.

रेवती, अग, हीच तर खरी गंमत आहे.

आण्विका, कसली गंमत.

रेवती, मला जाणून घ्यायचं होत.

की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे का?

आण्विका, मग काय वाटत तुला.

रेवती, मला वाटत त्याच शंभर टक्के प्रेम तुझ्यावर आहे. पण… तुझं नाहीये ना.

आण्विका, म्हणे तुझं नाहीये.

रेवती, पण बिचारा, काही म्हण, आज रात्री झोपणार नाही ग, गुड नाईट तरी सांग. पण बाकी काय सांगू नकोस हं.

आण्विका ईशानला फोन करते.

ईशान फोन उचलतो.

ईशान, हा बोल.

आण्विका, काही नाही सहज केला होता. काय झोपला काय?

ईशान, नाही आजुन. झोपच येत नाही.

आण्विका, इकडे रेवा बघ लागलीय घोरायला.

ईशान, ( हळू आवाजात) ती काय झोपणारच माझी झोप उडवून.

आण्विका, काय म्हणालास.

ईशान, काही नाही. तू काय करतेस.

आण्विका, झोपायची तयारी.

ईशान, आता काय तुझं लग्न होणार.

आण्विका, ते काय सगळ्यांचं होत. पण अजून लांब आहे. का?

ईशान, तस नाही, आता आपण बोलतोय तस बोलता येणार नाही.

अण्विका, तस काय नाही.

ईशान, आता बोलतो तस बोलता येणार नाही. फ्री मध्ये.

आण्विका, अजून लांब आहे ते. अन् मला कोण पसंत करणार.

ईशान, का, करेल की. अन् तस पाहायला गेले तर तुझ्या घरचे कुणा आयर्या गैर्याला का देतील.

आण्विका, बघू ज्या त्या वेळी.


ईशान, तुझी आवड काय?

आण्विका, माझी …. आ….. हा तो दिसायला हँडसम हवा. रंगानं

ईशान, हा बोल रंगानं.

आण्विका, गोरा. आ ..

ईशान, का काळा चालत नाही.

आण्विका, तस काय नाही. सावळा असला तरी चालेल.

अन्…

ईशान, आणखी काय हवं.

आण्विका, आणखी स्वतः कमावता पाहिजे. आईवडलांवर अवलंबून नको. बाकी

ईशान, हा बोल ना.

आण्विका, मला समजून घेणारा हवा. कामाचं म्हणत असशील तर..

ईशान, बोल.

आण्विका, नोकरीला असो वा बिजनेसमन असो. पण निर्व्यसनी हवा. पण लफडेबाज अजिबात नको.

ईशान, हा… थ्यांक्स गॉड.

आण्विका, काय ,

ईशान, काही नाही. तुझी आवड विचारली. डॉक्टर नसला तरी चालेल ना.

आण्विका, तस काय नाही. पण दुसऱ्या फिल्डचा असला तरी चालेल. पण समजूतदार हवा. एवढंच.

काय एखाद स्थळ आहे का?

ईशान, स्थळ आहे पण तुला पसंत येत की नाही कुणास ठावूक.

आण्विका, पहिल्यावर ठरवू. बर ठेवते आता. गुड नाईट.

ईशान, गुड नाईट.

रेवती, (फोन ठेवल्यावर) काय ग मी घोरतेय होय. आणि म्हटल होत ना.लागला की नाही बाण निशाण्याला.

आण्विका, हो लागला. पण काही विपरीत नाही ना करायचा.

रेवती, काय करेल, करुन करून फक्त नेईल पळवून तुला. आमचा खर्च तर वाचेल ना, लग्नाचा.

आण्विका, शहाणी आहेस बघ.

रेवती, आठवलं, थांब जरा गंमत करते.

रेवा आपले फेसबुक अकाऊंट ओपण करते. त्यावरून ईशानला हाय पाठवते.

ईशान झोप येत नसल्यान अण्विका फोन वर बोलल्यानंतर पहुडलेला असतो.

मेसेज वाजल्यावर त्याचे लक्ष तिकडे जाते.

तो मेसेज पाठवतो.

ईशान, काय,

रेवती, (फेक अकाउंट) मला तुम्ही आवडता.

ईशान, मग काय करू.

रेवती, माझ्याशी लग्न,

ईशान, इथ माझ्या लग्नाचा पिक्चर व्हायची वेळ आलीय. तुझ रामायण नको.

रेवती, कोणता पिक्चर.

ईशान, माझं लग्न ठरण्याआधीच मोडतय.

रेवती, कोणाशी ठरल होत.

ईशान, ठरल नव्हत.

रेवती, मग काय झालं. ठरायच्या आधी मोडेल कस काय झालं.

ईशान, झालं सगळंच.

रेवती, कोण होती ती.

ईशान, माझी मैत्रिण क्लासमेंट.

रेवती, अरे, मग मी आहे ना.

ईशान, कशाला तू, तू मला आवडत नाहीस. ती आवडते.

रेवती, मी पण खुश ठेवीन.

ईशान, नको,

रेवती, मग काय हवंय तुला.

ईशान, ती मिळावी.

रेवती, तिच्यापेक्षा मी सुंदर आहे.

ईशान, तरी नको.

रेवती, तिचं नाव काय?

ईशान, अण्विका.

हा मेसेज रेवती अण्विकेस दाखवत. रेवती, (अण्विकेस) बघ दीदी सापडला की नाही चोर.

आण्विका, अग. खरंच की ग तो माझ्यावर प्रेम करतोय.

रेवा पुढें चॅटिंग चालू ठेवते.

रेवती, कोण अण्विका,

ईशान, माझी प्रेयसी.

रेवती, ब्रेक अप झालाय ना.

ईशान, नाही.

रेवती, मग.

ईशान, तिला पाहायला येणार आहेत.

रेवती, एवढंच ना.

ईशान, एवढंच काय एवढंच, लग्न ठरेल ना.

रेवती, येवढं सोपे नाहीय. तू प्रपोज केलास का तिला.

ईशान, नाही.

रेवती, मग कर ना.

ईशान, तिला डॉक्टर स्थळ आलंय. ती काय मला निवडते मग. मी साधा फॉरेस्ट ऑफिसर.

रेवती, पण हँडसम आहेस ना.

ईशान, त्यानं काय होतंय. तिच्या मनातल कळायला नको.

जाऊ दे. बघेन मी.

मी तुझ्याशी काय बोलत बसलोय. बाय.

तो ऑफलाईन जातो. व अंथरुणावर पहुडतो.

रेवती हसू लागते.

आण्विका,(रेवतीस) गप्प ग उगाच तेला छळू नकोस. बस आता.

रेवती, का राग आला वाटत मॅडमला.

आण्विका, मग, येणारच की.

रेवती लगेच हुरळून जावू नको.

आता गाडी हळूहळू कूठे रुळावर आणायची. अन् मग उडवायचा बार.

आण्विका, ये मला तर भीती वाटते. त्याला कळलं तर.

रेवती, गप्प त्याला कळलं तर म्हणे. झोप आता. बघू उद्या काय करायचं ते.

लाईट ऑफ होते.

…… …… ……. ……

क्रमशः पुढे.....



No comments:

Post a Comment

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...