क्रमशः पुढे चालू ......
Day morning ८.०० o’clock. Inter
आण्विका, पेपर वाचत आहे. काका टी व्ही पाहत आहेत.
इतक्यातच मावशी आतल्या खोलीतून तिथे येते. तिच्या हातात तांदूळ असतात. ते नीट करत.
मावशी, काय ग अनु त्या मुलाचं नाव काय?
आण्विका, कोणत्या ग.
मावशी, काल तुम्ही फिरायला गेलेल्या
आण्विका, तो होय. हा तो ईशान.
मावशी, त्याला चहापानाला तरी बोलवायचं ना.
आण्विका, अग ,बोलवणार आहे. पण काकांना तरी विचार की.
मावशी, त्यात काय विचारायचं. तरी पण थांब मी विचारते.
अहो, अनुच्या मित्राला बोलवूया का चहाला.
काका, चहाला नुसतं कसलं बोलवतेस. त्यापेक्षा जेवण करूया.
मावशी, हे अगदी बर. अनु तू विचार त्याला कधी सवड आहे. व बोलावं जेवायला. लाव फोन.
आण्विका, थांब लावते. आण्विका फोन लावते. रिंग वाजू लागते. पण ईशान फोन उचलत नाही.
आण्विका, अग तो उचलत नाहीये. काहीतरी कामात असेल
नंतर करते.
आण्विका एक सुदंर गुड मॉर्निंग संदेश पाठवते.
….. ……. …….. ….
Day. Morning. Outer. Inter. अलिबाग.
ईशान उठतो. रनींग करुन येतो, अंघोळ करतो. व क्यांटीनमध्ये चहा प्यायला येतो.
तिथे टेबलवर बसल्यावर त्याला अण्विकाची आठवण येते. व एक छोटीशी कळ हृदयात येते. त्याला वारंवार अण्विकाची आठवण येवू लागते. रनिंग, अंघोळ करताना नाष्टा करताना.
ईशान, (मनाशी) हे अस का होतंय मला. सारखी तिची आठवण का येते. तिला आलेलं स्थळ. काय करू. जाऊ का सरळ तिला विचारू, माझ्याशी लग्न करशील का? विचारू. काय म्हणेल ती. माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल का? अन् तिने नकार दिला तर. काय करू, अन् बोलायचं बंधच केलं तर. तशी ती श्रीमंत कुटुंबातील. एक डॉक्टर. मी एक वनखात्यात असणारा तिच्यापुढे मी सर्वसाधारण , तिच्यापेक्षा आपली परिस्थिती अजूनही कमीच आहे. माझ्यामुळे तिला झालेली दुखापत व त्रास. तिच्या मनात काय चालले असेल ती स्वीकार करेल का माझा. की देईल मला झिडकारून, काहीच सुचत नाही.
असे विचार करत असताना.
रवी चहा आणून ठेवतो. व
रवी हाका मारतो.
ईशान, ईशान.
विचाराच्या तंद्रीतून ईशान बाहेर येतो.
रवी, काय कसल्या विचारात आहेस.
ईशान, काही नाही.
रवी, काही नाही कसं. काल संध्याकाळ पासून पाहतोय तुला. काहीतरी विचारात आहेस. बोल की, काय झालं.
ईशान, काय सांगू सर. कालची ती बातमी ऐकल्यापासून मला काही सुचतच नाही.
रवी, कोणती बातमी. कसली बातमी.
ईशान, अन्वीकाच्या लग्नाची.
रवी, का काय झालं अण्विकाला.
ईशान, काय झालं नाही हो. तिच लग्नाचं बघताहेत.
रवी, ते तर आहेच.
ईशान, पण माझं तिच्यावर प्रेम आहे. व मला तिच्याशी लग्न करायचं आहे.
रवी, हातेच्या एवढंच ना.
अहो साहेब, सरळ मागणी का घालत नाही तुम्ही.
ईशान, नाही, ती रागावली तर.
रवी, असं काही होणार नाही. मी काल जवळून पाहिलेय मॅडमला. चांगल्या स्वभावाच्या आहेत. मात्र तिची ती पाहुनी जरा चॅप्टर वाटली.
ईशान, तुम्हाला काय वाटत.
रवी, बघा विचारून. जमलं तर जमलं
ईशान, नाहीतर
रवी, नाहीतर बघायचं दुसर.
ईशान, नको नको दुसर काही. मला तिचं हवीय जीवनसाथी म्हणून
रवी, आता चहा घ्या. थंड होतोय. नंतर बघा काय करायचं ते. विचारायचं की नाही.
ईशान, हा.
ते दोघे चहा घेतात.
रवी घड्याळात पाहतो
रवी, चला लवकर वेळ होतोय. ट्रेनिंग सेंटरवर पोहोचायला हवे.
ईशान, चहा घेतो.
याच वेळी अण्विका फोन करत असते. पण सायलेंट मोडवर असल्याने इशानल ऐकु येत नाही. व ट्रेनिंग सेंटरवर जाण्याच्या गडबडीने तो मोबाईल न पाहताच निघतो.
.... ….. ….. …… …..
Evening ६.०० o’clock outer
दिवसभर ट्रेनिंग झालेले असते. ट्रेनिंग चालू असताना मोबाईल स्विच ऑफ ठेवल्याने ईशानला अण्विकाचा मेसेज व फोन आल्याचे लक्षात येत नाही.
संध्याकाळी ट्रेनिंग संपल्यानंतर.
ईशान, मोबाईल स्विच ऑन करतो. तेव्हा अनुचा मिस्कॉल दिसतो. तो लगेच कॉल करतो.
ईशान, हॅलो अण्विका ,
आण्विका, अरे कुठे आहेस तू. सकाळी मी कॉल केला होता.
ईशान, अग सायलेंट मोडवर होता. त्यानंतर माझ ट्रेनिंग चालू होते. त्यावेळी स्विच ऑफ मोबाईल करावा लागतो. तो दबक्या आवाजात बोलतो.
आण्विका, असा आवाज दबलेला का रे.
ईशान, काही नाही. वातावरणाने थोडा घसा बसलाय.
आण्विका, औषध घे.
ईशान, हो
आण्विका, त्यापेक्षा आज आमच्याकडे जेवायला यायला जमेल का?
ईशान, मला बर वाटल असत. यायला. पण माझं भरपूर काम आहे. त्यामुळे दोन चार दिवस माझं सेड्युल बिझी असणार आहे. दोन-चार दिवसात सेमिनार व ट्रेनिंग पूर्ण करायचं आहे चार दिवसांनी असेन फ्री तेव्हा बघू.
आण्विका, चालेल. मी सांगते मावशीला.
ईशान, हो बर ठेवतो. मला आता खूप काम आहे. चार दिवसांनी सुट्टी आहे तेव्हा सांगतो कॉल करून
आण्विका, आठवणीने ह.
ईशान, नक्की सांगतो.
ईशान फोन ठेवतो.
ईशान फोन ठेवल्यावर.
ईशान, (मनात) किती गोड आहे. अनु. आपल्याला आवडते. पण मी तिला आवडतो की नाही देव जाणे. पण या प्रेमाच्या प्रपोजलमुळे आमच्यात दुरावा यायला नको. मित्र म्हणून तरी राहिलं ना. तस ती डॉक्टर , तिच करियर ती आपल्याला साजेसाच नव्हरा शोधणार.
ईशानच्या लक्षात येत
अरे आपल भरपूर काम आहे.
चला आपल काम करू.
तो निघतो.
….. …… ……. ……. …… ……
आण्विका रोज एखादा मेसेज पाठवत होती. पण रिप्लाय येत नव्हता.
ती नाराज होत असे. ती सुद्धा अस्वस्थ होत असे. फोन केला की स्विच ऑफ लागत असे. त्याला ही मेसेज पाठवायला वेळ मिळत नसे. दिवसभर काम करून रात्री त्यास कधी झोप लागेल असे वाटत असे.
आण्विका बेचैन पाहून.
रेवती, अग कामात असेल तो. म्हणून स्वीच ऑफ असेल मोबाईल.
आण्विका, पण दिवसभरात एकदापण ऑन करत नसेल का. त्याला माझा मिस कॉल पण दिसला नसेल.
रेवती, अग, करेल तो. काळजी नको करुस. काल तूच म्हणत होतीस ना त्याला चार दिवस सवड नाही म्हणून.
आण्विका, अस म्हणतेस. तरी पण एखादा कॉल पण करायचा नाही का.
रेवती, अग, पाहिल्यावर करेल तो.
अण्विका, असं म्हणतेस मग ठीक आहे.
Cut to …. …..
मंगळवारी सुरू झालेलं ट्रेनिंग शनिवारी संपल.
….
Day. Evening. ट्रेनिंग सेंटर बाहेर outer
शनिवारी ट्रेनिंग संपल्यावर
बाहेर आल्यावर
रवी, एखदास संपल.
ईशान, अजून बाकीची कामे आहेत की.
रवी, पण मेंन काम संपल.
ईशान, ते तर आहेच की.
रवी, मग आज काय एन्जॉय , जाऊया का सिनेमाला.
ईशान, त्यापेक्षा समुद्र किनाऱ्यावर जाऊया.
रवी, चालेल की.
ईशान, चला तर मग.
ईशान, फोन ऑन करतो आधी.
ईशान फोन ऑन करतो. त्याला अण्विकाचा मीस्कॉल दिसतो. व मेसेज पण.
ईशान, अनुचा मेसेज व कॉल पण आलाय. बर आता कामात असेल ती. आवरून नंतर कॉल करतो.
…… ……. ……. ……. ………
Night. अलिबाग बीच. Outer. ७.००o’ clock
रवी व ईशान दोघे बीचवर एके ठिकाणी बसलेले आहेत.
रवी, खरंच सर तुमच्या सहवासात आल्यामुळे दिवस किती मजेत जातो. खरंच तुम्ही खूप गमतीशीर आहात.
ईशान, काय पण सर.
इतक्यात अण्विका फोन करते. रिंग वाजू लागते.
ईशान फोन पाहतो. व उचलतो.
ईशान, हॅलो बोल की.
आण्विका, कुठे आहेस? काय करतोयस? काय हे गेली दोन चार दिवस मी कॉल करते. तुझा मोबाईल स्वीचं ऑफ का लागतो? एवढा कशात रमला आहेस.
ईशान, अग हो हो. किती प्रश्न विचारतेस. अग चार दिवस ट्रेनिंगला असल्याने. फोन स्विच ऑफ असायचा.
आण्विका, मग साधा मेसेज पण करायचा नाही का?
ईशान, अग, वेळच मिळाला नाही. रूमवर यायला खूप वेळ होत असे. व सकाळी पुन्हा हजर लवकर राहावे लागत असे.
आण्विका, बर ते झालं का ट्रेनिंग.
ईशान, हो झालं. थोडंसं आहे किरकोळ कामकाज आता.
आण्विका, मग तुला वेळ कधी आहे. ते तरी कळेल का?
ईशान, वेळ , आहे की उद्या फ्री. का? काही काम होत.
आण्विका, बर उद्या ये जेवायला घरी सकाळी.
ईशान, हा कुठे यायचं.
आण्विका, कूठे म्हणजे घरी आमच्या मावशीच्या आणखी कुठे?
ईशान, अग पण पत्ता तरी सांग की. काय फिरत बसू साऱ्या अलिबागभर शोधत.
आण्विका, अरे मी पण किती वेंधळी , पाठवते पत्ता मोबाईलवर. आ.. नको त्यापेक्षा मी स्वप्नीलला लावून देते. तुला पीक करायला.
ईशान, चालेल मी वाट बघतो.
आण्विका, बर चालेल. हा फोन स्विच ऑफ ठेवू नकोस. व्हायब्रेशनवर ठेव वाटल्यास.
ईशान, हा मॅडम ठेवतो.
अण्विका, बर गुड नाईट.
ईशान, हा गुड नाईट.
ईशान फोन ठेवतो.
फोन ठेवल्यावर.
रवी, काय मग उद्या मेजवानी आहे म्हणा.
ईशान, चला की तुम्ही पण.
रवी, नको तुमच्यासाठी खास मॅडमनी ठेवलेय.
ईशान , हा.
रवी, मग प्रेमाचा इजहार केला की नाही.
ईशान, नाही अजून.
रवी, अस काय राव. विचारायचं नाही का?
ईशान, नाही तिचा अंदाज घेतल्या शिवाय नाही. नाहीतर आहे ती मैत्री देखील धोक्यात यायची.
रवी, हे पहा सर तुम्हाला वाटत तितक्या मॅडम कडक नाहीत. मी पाहिलंय त्यांना. खूप हळव्या मनाच्या आहेत त्या.
ईशान, ते तर आहेच.
रवी, खर सांगायचं म्हणजे त्यांच्यासाठी तुम्ही व तुमच्यासाठी त्या एक चांगल्या जोडीदार आहेत.
ईशान, ते आहे हो. पण मला हे बंध हळुवार जपतच जोडायचे आहेत. नाहीतर उगाच दुरावा नको.
रवी, आता फोन वरून त्यांचे बोलण जाणवल नाही का?
ईशान, काय?
रवी, अहो त्या तुमच्याशी एखाद्या बायकोसारख भांडत होत्या.
ईशान, ते सहज बोलत होती ती.
रवी, अहो सहज नव्हत ते . त्या हक्क गाजवत होत्या.
ईशान, (हसतच) तस असेल तर तुमचे बोल खरे ठरोत. चला आता खूप वेळ झालाय. जाऊ रूमवर जेवून झोपू.
ते दोघे निघतात.
…. …… ……. …….. ……
क्रमशः पुढे.....
No comments:
Post a Comment