Night / INTER / 8 .00p.m./ IN HOSTEL/ ROOM
(वेदिका लॅपटॉप घेऊन सर्च करत आहे. व नोंदी घेत आहे.)
रेवा :
काय वेदे काय करतेस.
वेदिका :
रिसर्च
रेवा :
कसला रिसर्च.
वेदिका :
रानभाज्यांची माहिती शोधतेय.
रेवा :
त्या कशाला हव्यात?
वेदिका :
ट्रेकवर गेल्यावर माहिती घ्यायला.
व शिजवून खायला.
माधवी :
( अंथरुणावर उठत)
काय रानभाज्या खायच्या.
वेदिका :
हो, त्यात काय एवढं?
माधवी :
एवढं चालल्यावर त्या चिमुटभर भाज्यांची पोट तरी भरेल का? त्यापेक्षा जरा काहीतरी चटपटीत, झणझणीत हवं. चिकन मटन वगैरे.
वेदिका :
मॅडम आपणं गड फिरायला निघालोय. पिकनिकला नाही.
व तुझं चिकण मटण टिकेल का दोन दिवस.
माधवी :
हे बघ मिठात शिजवल की राहील ना.
वेदिका :
मॅडम आपला खर्च यावर्षी इतका झालाय की घरच्यांना तुम्हाला पॉकेट मनी देखील देणं अवघड झालंय. अन् प्रवासाचा खर्च म्हणत असशील ना, तो प्राजक्ता करतेय. एखाद्याला लुटायचं म्हणजे किती? म्हणून मी व श्वेता ने ठरवलं आहे कि जेवणाच आपणं बघायचं.
रेवा :
बरोबर आहे तुमचं, माझ्याकडे पण पाचं हजार फक्त आहेत. ते ही मला फॉर्म फी साठी हवेत.
वेदिका :
हे बघ रेवा, फारतर पाचशे रुपये काढा. बाकीची जोडणी आम्ही लावतो.
अनुजा :
तुम्ही जोडणी लावताय, खर, कशी लावणार.
वेदिका :
हे बघ इथून तांदूळ, चटणी, मीठ अन् थोडे कांदे,बटाटे, डाळ अन् बेसनाच पीठ घेऊ. तुझं मटण चिकन जमणार नाही. व जास्त वाटल तर फार तर पॅक बंद डब्यातून थोडे झिंगे, बांगडे घेऊ. तिथं जवळपास मिळाली तर अंडी …ते ही मिळाली तर घेऊ काय, जास्त अपेक्षा ठेवू नकोस. कळतंय ना.
माधवी :
मग तर मला पाळणा करूनच आता, इतकं रोज व्यायाम करते, किती ऊर्जा खर्च होते माझी, जरा पोटाला तरी घाला.
वेदिका :
ये तिथं जेवढं देऊ तेवढंच घ्यायचं काय?
रेवा :
वेदे आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा उन्हाळा आहे. पावसाळा नाही, उगाच काय पण सांगू नकोस ह… गवत मिळेल तुला ते ही सुकलेले.
आम्ही काय म्हसी नाही आहोत. वैरण खायला. तुझी रानभाजी म्हणतेस ना बस उडकत रानात.
फेब्रुवारीत ...कोणती सापडते ती.
वेदिका :
बर झालं आठवण केलीस ते, आता तुला गवताचेच पदार्थ घालणार. गवताची भाजी, गवताची आमटी..
रेवा :
तुला गायर वाटलो का आम्ही,
वेदिका :
गायर कच्ची खातात. आपण तिखट मिठ लाऊन खाऊ.
रेवा :
काय तुझ्या सुपीक डोक्यात नको नको त्या कल्पना येतात नाही.
एवढ्यावरच थांब, नाहीतर नऊवारी साडी नेसून अंबाडा बांधून तलवार कमरेला लावून गड चढायला लावाल.
वेदिका :
आयड्या मस्त आहे.
रेवा :
मला माहित आहे गम्मत करतेस तू.
प्राजक्ता तुझं हे नखरे चालूच देणार नाही.
वेदिका :
( अनुजाला डोळा मारत.)
खरचं साडी नेसून जाऊया काय?
रेवा :
अग बायाओ आवरा हिला. हीचं डोकं लई चाललय,
(त्या गुदगुल्या करू लागतात, हसू लागतात.)
Cut to …….
…… …
DAY / OUTER -INTER /HOSTEL
एक फोर व्हिलर हॉस्टेलच्या दारात येऊन थांबते. त्यातून तिघे उतरतात. कार्यालयात कमला शिरसाठ बसल्या आहेत.
रवी :
नमस्कार मॅडम.
मॅडम :
नमस्कार आपली ओळख.
अरोहीचा मामा :
काय मॅडम, ओळखल नाहीत काय, मी अरोहीचा मामा. न्यायला आलोय तिला.
मॅडम कमला शिरसाट :
( डोळ्यावर चष्मा नीट करत.)
मला जरा कमी दिसतंय हो. हा आलं लक्षात.
थांबा ह बोलावते.
( रिंग वाजते, शिपाई आत येतो.)
हे बघ त्या आरोही गोडांबेला बोलावं, सांग तिचा मामा आलाय म्हणून.
शिपाई :
हा मॅडम.
Cut to…..
…… …….
(शिपाई व्हरांड्यातून जातो. रुमजवळ नोक करतो.)
शिपाई :
आरोही गोडांबे तुझा मामा आलाय बघ, आवरायला सांगितलेय.
( आरोही घाबरून तन्वी मानसी या मैत्रिणी जवळ जात.)
आरोही :
काय ग, आता काय करू, शेवटी नको तेच होतंय.मामा मला त्या मेव्हणीच्या पोराच्या गळ्यात माळ घालाय लावणार, आता माझं काही खरं नाही ग.. तन्वी.
मानसी :
येवढं कशाला घाबरतेस, सांग जा स्पष्ट नाही म्हणून, मामाच आहे ना तुझा.
आरोही :
कसं सांगू, एकतच नाही तो, घरी बघतेस ना कसं आहे ते. बाबा प्यारेलीस झालेले, आई तीही साधी. भाऊ तो पण लहान, सगळ मामावर अवलंबून, त्याच्यापुढे कुणाचच काही चालतं नाही ग.
तन्वी :
राजेशला सांग मग,
आरोही :
तो घाबरलाय, मागे मामाने त्याला चांगलाच दम भरलाय.
तो तरी काय करेल.
मानसी :
कसलं डोंबलाच प्रेम करतोय. साधं धाडस नाही.
आरोही :
तो एकटा काय करेल. माग त्यानं फक्त लग्नाचं विचारलं. तर मामानं व त्याच्या मित्रांनी हाड मोडली त्याची, साधं कोण वाचवायला आलं नाही.
मानसी :
मग कर जा लग्न त्या आडदांड बिनडोकशी, दम नसेल तर प्रेम कशाला करायचं.
Cut to….
In Office
( अरोहीला यायला वेळ होतो, मामा रुमकडे जात आहे वाटेत इतर मुली कुजबुज करतं आहेत.)
एक् :
कोण असेल ग?
दुसरी :
आणखी कोण? त्या आरोहीचा मामा
एक :
अग, दिसतोय कसा बघ, ती किती सालस, खरंच मामा का.
दुसरी :
हो मामाच आहे, कसा दिसतोय बघ, लेडीज हॉस्टेल आहे, याचं भानच नाही, कसा घुसतोय बघ.
एक् :
नाहीतर काय.
Cut to …….
…… …….
Inter/ Hostel / ROOM
(दरवाजा बाहेर उभा राहून )
आरोही मामा :
काय, निरोप मिळाला नाही का?
आरोही :
( घाबरलेली आहे , बॅग भरतेय. डोळ्यात पाणी आहे)
मिळाला , बॅग भरतेय.
मामा :
बोहल्यावर चढायला निघालेस, पुढील महिन्यात म्होतुर धरलाय. अन् रडतीस काय, पूस डोळे, अन् आवर झटकन, बास झालं शिक्षण.
आरोही :
जी.
( मामाच्या मागे रवी उभा असतो. त्यास पाहून)
मामा :
एवढी कसली घाई लागलेय रवी साहेब, थोडी कळं काढा. लग्ना आधी असं बायकोला भेटन बर नव्हे, बाईल वेडा म्हणतात.
रवी : ( लाजून हसत)
काय हे काका.
मामा :
काय.. काय… पुढं आपलंच राज आहे.
( आरोही बॅग भरते, मैत्रिणीकडे पहात.)
आरोही :
येते मी.
( रवी आत जातो, बॅग उचलून बाहेर पडतो. )
मामा :
भलतीच घाई लागलेय , जरा आवरा स्वतः ला, चल आरोही, कसं हसत जायचं, कसं हसत….
मामा :
( तिरकस आरोहीच्या मैत्रिणीकडे पहात.)
मैत्रीणीना निरोप दिलास ना? नसेल तर मी देतो.
नमस्कार, पोरीनो, या आमच्या उंबरणीला पुढील महिन्यात एकवीस तारखेचा म्होतूर हाय, करवल्या पण हव्यात लग्नात, बरं या ह… राम राम
( बाहेर निघतात. आरोही मागे जाताना सारखं मागे पहात आहे. मॅडमच्या केबिनजवळ आल्यावर.)
मामा :
नमस्कार मॅडम येतो, या हं पुढील महिन्यात उंबरनीला लग्नाला, आमंत्रण आताच देतो
मॅडम :
हा
( हॉस्टेल बाहेर गाडीत बसतात, गाडी निघते.)
Cut to …..
……. ……. …..
No comments:
Post a Comment