शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Wednesday, October 29, 2025

वीरगळ भाग ९

 वीरगळ भाग ९

Day / inter / kitchan room / Ashvin ajoba home Village

जेवण खोलीत सुमा जेवण वाढत आहे. आजी जवळ बसली आहे.

सावित्री आई :

अरे, घे की आणखी एक पोळी.

अश्विन :

 नको,

सावित्री आई :

 नको काय नको, घे गप्प तुझ्या सारख्या मुलांनी भरपूर खायला हवं.

अश्विन :

 अग, दोन खाल्ल्या की.

सावित्री :

 तुझे आजोबा चार चार खातात अजून, तुला काय झालं खायला. सुमा वाढ ग त्याला.

अश्विन :

 नको न भरलय पोट माझं.

( एक पोळी वाढली जाते. तो ती खात. )

अश्विन :

 आजोबा वीरगळ म्हणजे काय?

 आजोबा :

 हे बघ आधी जेव, त्यानंतर वरील माझ्या रूममध्ये एक कपाट आहे. त्या कपाटात आहे पुस्तक . त्यामध्ये तुला कळेल सगळं. मात्र पुस्तक नीट लावलेली आहेत. विस्कटायची नाहीत. काय?

अश्विन :

 हा.

( अश्विन जेवू लागतो. )

Cut to …..

…. …… …… …

Day /Inter / home Village

( अश्विन जीना चढून वर जातो. खोलीचे दार ढकलतो. आत जाऊन कपाटातील पुस्तक शोधतो. त्याला सापडत नसते.)

अश्विन :

आजोबा, कुठे आहे ते पुस्तक? इथे तर भरपूर पुस्तके आहेत.

आजोबा :

 मधल्या कप्यात तिसऱ्या ओळीत असेल बघ कुठेतरी.

अश्विन :

हा

( अश्विन पाहू लागतो. )

अश्विन :

 अ …. मधला कप्पा …अ…… हा तिसरी ओळ …… अ… हा सापडले. इथ आहे होय. चला पुस्तक तर मिळाले. चला उघडून पाहू.

( अश्विन तिथे असलेल्या टेबल खुर्ची जवळ जाऊन बसतो. व पुस्तक वाचू लागतो. )

अश्विन :

 वीरगळ

वीरगळ म्हणजे शूर वीरांचे स्मृतिचिन्ह.

( खाली चित्रे पाहत तो पान परततो. आतील पानावर गोरक्षक वीरगळ असे लिहिलेले असते. त्या खालील वाचत असताना त्याचे डोळे विस्पारतात. तो बारकाईने पाहतो. )

Flash back ( तो स्वप्न स्फूर्तीत हरवतो.

Cut to ……

……. ……. ……

Day / outer / morning / Village area road

डोक्यावर पाण्याची मातीची कळशी काखेत कळशी घेऊन मुली निघालेल्या आहेत. अंगावर त्यांच्या पारंपरिक दागिने वाकी, कंठा घातलेल्या आहेत. चिंचेच्या झाडाखालून जाताना पायात चिंचा पडतात. पाठीमागे असलेली कोयनली डोक्याची घागर सावरत चिंच उचलण्याचा प्रयत्न करत असते. तिला जमत नाही. ती खट्टू मनाने पुढे जात असते. इतक्यात एक काळ सावळा युवक झाडावरून खाली उतरतो. मागून हाक मारतो.

अंगत :

 कोयनली, कोयनली,

कोयनली थांबते. तो समोर पसा करतो. त्याच्या हातात चिंचा असतात.

अंगत :

 घे , तुला आवडतात ना,

कोयनली :

 नको मला.

अंगत :

 तुला आवडतात ना.

कोयनली :

नको मला.

अंगत :

 उगाच ताकाला जाऊन भांडे लपवू नये. माणसानं.

कोयनली :

 शिकाकाई मागितली होती ती का आणली नाहीस.

अंगत :

 या दिवसात नसते ती, फुलोरा उठलाय झाडाला.

पण मागे मी दिली होती की तुमच्या घरी.

कोयनली :

 ती होय संपली… आईनं माहेरी पाठवली.

अंगत :

झाडाला लागली की देईन आणून.

बर, या घे चिंचा, मला राखोळीला जायचंय.

( कोयनली इकडे तिकडे पाहत चिंचा घेते. व आपल्या पलकराच्या खिशात ठेवते. )

Cut to ……

….. ……. …

Day / inter / koynali HOME.

कोयनली आपल्या वाड्यात येते. पाण्याची घागर स्वयंपाक घरात घेऊन जाते. जोत्यावर तिचे वडील मालाधर वैद्य रोग्यांना औषध देत आहेत. आई स्वयंपाक करत आहे. चुलीवर गाडग्यात भात शिजत असतो. कोयनली घागर ठेवते.

आई जोग आंबा :

खूप वेळ झाला.

कोयनली :

कळशी जड झाली म्हणून वाटेतील झाडाखाली थोडी विसावले.

जोग आंबा :

कळशी जड झाली की झाडावरील चिंचाणी खुणावले.

कोयनली :

 छे.. छे .. या तर अंगतने दिल्या.

जोग आंबा :

 तुला कितीदा सांगितलं आहे. की त्या मुलाशी बोलचाल नको म्हणून.

कोयनली :

 त्यात काय झाले, लहानपणी आम्ही खेळत होतो की.

जोग आंबा :

 लहानपणीच लहानपणी, तू आता मोठी झाली आहेस. समाजात चालत नाही आपल्या.

कोयनली :

 स्वार्थी समाजाच तू बोलूच नकोस.

जोग आंबा :

 जगाची चाल रीत पाळावी आपण, नाहीतर.

कोयनली :

 नाहीतर काय?

जोगआंबा :

 समाज वाळीत टाकेल .

कोयनली :

 पण आपले बाबा नाही न टाकणार.

जोग आंबा :

 ते ही टाकतील.

कोयनली :

 मग जंगली औषध कोण देईल?

जोग आंबा :

 समाजात आहेत बरेच लोक ते आणून देतील.

कोयनली आपले तोंड फिरवते व मुरका मारते.

कोयनली :

 हूं …

Cut to ……..

…… …… …….

Day / evening / village road

अंगत गावातून बासरी वाजवत जात आहे. त्याच्या पुढे जनावरे ज्याच्या त्याच्या घरी गोठ्यात जात आहेत.

प्रत्येक दारात बासरी ऐकून स्त्रिया बाहेर येऊन त्याच्या घोंगडीत भाकर चटणी भाजी देत आहेत. तो ती घेऊन जात आहे.

Cut to :

……. ……. ……..

Day / outer / gayran village

अंगत एका दगडावर बसलेला आहे. त्याच्या अंगावर कांबळी आहे. दंडात अंगाऱ्याचा ताईत बांधलेला आहे. त्याच्या शेजारी त्याची काठी आहे. शेजारी गाई चारत आहेत. एक वासरू त्याच्या जवळ येऊन खेळत आहे. तो त्याच्या अंगावरून हात फिरवत माया करत आहे. वासरू त्याला चाटत आहे.

Cut to …....

. ….. …. …..


Sunday, October 19, 2025

वीरगळ भाग ८

 वीरगळ भाग ८

Inter / Day / ashvinchya ajobanche ghar / pargav

केस पुसत तानाजीराव व अश्विन हॉल मध्ये येतात.

सावित्री आई भाजी कुडत असते. त्यांना पाहून

सावित्री आई :

 सुमे ए सुमे, दुध अन नाष्टा दे ग.

सुमा :

हा देते.

सावित्री आई :

( अश्विनला )

 काय झाली का रपेट. कस वाटलं गाव. बदललेय ना.

अश्विन :

 मस्त.

( सुमा नाष्टा घेऊन येते. अश्विन दूध गडबडीने पिऊ लागतो. )

सावित्री आई :

 अरे, हळू गडबड कसली लागलीय.

( इतक्यात तात्या आजोबा येऊन बसतात. )

सुमा :

 बाईसाहेब, डाळ संपलीय.

सावित्री आई :

 अग, कालच आणली होती ना.

सुमा :

 अहो, पोळ्यांची डाळ म्हणते.

सावित्री आई :

 पोळ्यांची होय.

सुमा :

 अहो, उद्या अक्षय तृतीया ना.

 सावित्री आई :

 काय उद्या, माझ्या लक्षातच नव्हत ग.

सावित्री आई :

 अहो, उद्या नेवैद्य द्यायला हवा, काळूबाईला नवस बोलले होते. की अश्विनला बरं वाटलं की नेवैद्य देईन म्हणून.

सावित्री आई : ( सुमनला )

हे बघ उद्या लवकर ये, मी पोळ्या करते. तू बाकीचं आवर , उद्या खांद्याच्या वाडीला नैवेद्य द्यायला हवा.

अश्विन :

 खांद्याचवाडी, कुठे आली ही.

सावित्री आई :

 आहे जवळच, तू पण जा उद्या आजोबांसोबत. तुला पण माहिती पाहिजे बाबा आपल्या कुलदेवते बद्दल.

अश्विन :

कुलदेवता म्हणजे काय ग आजी?

सावित्री आई :

अरे, प्रत्येक घरातील लोकांची नितांत श्रद्धा एखाद्या देवतेवर असते. ती आपलं प्रत्येक संकटातून रक्षण करते. आपली काळूबाई ही कुलदेवता आहे. उद्या जा आजोबांसोबत, कळेल सगळ.

(भाजीचे ताट सुमनकडे देत. )

तुला पण माहिती हवी बाबा.

सावित्री आई :

अहो घेऊन जा त्याला पण सोबत.

तात्या आजोबा ( तानाजीराव ) :

( दूध घेत. )

 हा चालेल, नेईन त्याला पण.

( अश्विन हसतो. )

Cut to ….

….. …… …..

Day / outer – Inter / khandyachi vadi gramdevta mandir

मंदिर आवारात गाडी पोहोचते. अश्विन व आजोबा गाडीवरून उतरतात. देवळात जातात. अश्विन घंटा वाजवतो. नैवेद्य पुजाऱ्याकडे देतो. नैवेद्य दाखविल्यावर बाहेर आल्यावर.

आजोबा एका वाटेला जाताना

आजोबा :

 हा चल अश्विन.

अश्विन :

 नैवेद्य दाखवला ना, आता आणखीन कुठे?

आजोबा :

 चल, अजून दोन ठिकाणी दाखवायचा आहे.

( आजोबा व अश्विन रानातील मारुतीस नेवैद्य दाखवतात. व रानातील वीरगळ असणाऱ्या ठिकाणी येतात. तेथील एका वीरगळीची पूजा करून नैवेद्य दाखवतात. )

अश्विन :

 हा आणखी कोणता देव?

तात्या आजोबा :

 अरे हा देव वीरगळ आहे.

अश्विन :

 वीरगळ म्हणजे काय?

 आजोबा :

 वीर पुरुष मेल्यावर उभारलेला स्तंभ म्हणजे वीरगळ.

अश्विन :

 म्हणजे थडगेच ना.

आजोबा :

 नाही रे.

अश्विन :

 मग काय असते वीरगळ?

आजोबा :

 तिकडे बघ काय आहे?

अश्विन :

( त्या दिशेला पहात. )

 तो तर एक किल्ला आहे ना?

 आजोबा :

 हे बघ, पूर्वी या ठिकाणी आपले पूर्वज राजाची चाकरी करत असत. त्या वेळी लढाया होत असत. आपली ही जन्मभूमी वाचवताना त्यावेळी शत्रूशी लढताना मरण पावणाऱ्या शूर वीरास वीरमरण आले. तर त्याची स्मृती व बलीदान आपल्या लक्षात राहावे म्हणून एक दगडी स्तंभ उभारला जायचा. ती आहे वीरगळ. रक्षण करणारा तो देव. म्हणून आपण या वीरगळींना पुजतो. आपल्या पूर्वजांनी सुद्धा बलिदान दिलेय हा

अश्विन :

 अशा वीरगळ प्रत्येक ठिकाणी असतात का?

आजोबा :

 हो, आणखीन सांगायच म्हणजे यामधे देखील प्रकार आहेत.

 अश्विन :

 ते कोणते आजोबा?

आजोबा :

 ते तुला मी घरी गेल्यावर सांगेन.

चल, आता नमस्कार कर बघू.

( अश्विन नमस्कार करतो. व ते निघतात. त्यावेळी गीत वाजू लागते. ‘ वीरगळ, विरकल्लू नमो नम: हा नमो नम:.

 तुझं देवरूपराया नमो नम:,

रक्षण धर्म, गो स्त्री संपत्ती जीव रे,

तू देव राया रे. देवराया.

जय जय विरकल्लू नमन तुझं देवा रे .. )

Cut to ……

…… ….. ……


Friday, October 17, 2025

वीरगळ भाग ७


वीरगळ भाग ७

 Day / External / in car / village road

जयवंत कार चालवत आहे. अश्विन खिडकीतून बाहेरील शेतीचे निरीक्षण करत आहे. ( सुंदर म्युझिक वाजत आहे.

Cut to ……

….. ….. …..

गाडी कच्च्या रस्त्याने गावात शिरते. व एका बंगल्याच्या आवारात येते. जयवंत हॉर्न वाजवतो. कोणी येत नाही. तेव्हा.

जयवंत :

 अश्विन गेट उघड जा.

( अश्विन खाली उतरतो. व जाऊन गेट उघडतो. जयवंत कार आत घेतो. व आश्विन गेट लावतो. गाडी आत आल्यावर जयवंत हॉर्न वाजवतो. तात्या आजोबा व सावित्री आई बाहेर येतात. अश्विन आजोबांना पळत जाऊन मिठी मारतो. )

अश्विन :

 तात्या आजोबा, सरप्राईज

तात्या आजोबा :

  आलास, पेपर कसे गेले.

अश्विन :

 सोपे.

चला, रानात जाऊया.

सावित्री :

 अरे, हो हो, एवढी काय घाई लागलीय. फ्रेश तरी हो. काहीतरी खा आधी.

आजोबा :

 चल आत…

( ते आत येतात. जयवंत डिग्गीतुन साहित्य बाहेर काढतो. आत आल्यावर )

सावित्री :

 फ्रेश हो, मी तुझ्या आवडीचे बटाटे वडे केलेत.

अश्विन :

 तुला कसं कळलं. मी येणार आहे ते.

सावित्री आई :

 सरप्राईज का तुलाच फक्त देता येत. आम्हालाही येतं की.

Cut to ……

…… …… …..

Day / inter / dayning holl

( सावित्री चपाती, बटाटेवडे व चहा आणून टेबलवर ठेवते. व प्रत्येकास देते. अश्विन गडबड करत खात असतो. )

सावित्री आई :

 अरे, हळू हळू गडबड कसली करतोयस, हळू खा. काही कुत्र वगैरे पाठी लागलंय का?

जयवंत :

 अश्विन आजोबांना व आजीला अजिबात त्रास द्यायचा नाही काय? व रानात फिरताना जपून,

अश्विन :

 हो,

सावित्री आई :

 अरे, काय हे सुरु झालं, तुझं. किती सूचना देशील. सुट्टी तरी मजेत घालवू दे त्याला.

तात्या आजोबा :

 आज थांबणार ना.

जयवंत :

 नाही,

 सावित्री आई :

का रे, आज सुट्टी होती ना तुला.

जयवंत :

 हो, पण मघाशी बोरिवली क्लाइंटचा फोन आला होता. मला जायला हवं.

सावित्री आई :

 परत कधी येणार?

जयवंत :

 महिना अखेरला येईन सुट्टी घेऊन.

सावित्री आई :

 कशाला हव्यात असल्या नोकऱ्या. धड आराम नाही. की स्वास्थ्य. कशाला हवं ते. देवाच्या कृपेनं काय कमी आहे आपल्याला. उगाच नुसती धावपळ

जयवंत :

अग, अस का म्हणतेस. मी काय हौस म्हणून करत नाही.

बर ते सोड, चहा दे पटकन.

सावित्री आई :

 हा देते.

( ती चहा कपात ओतते. )

 Cut to ……..

…… ….. ….. ……

Day / inter – outer / Ashvin villege home

जयवंत निघालेला असतो. अश्विन हसून पाहत असतो.

जयवंत :

 काय रे, असा हसतोस काय?

 अश्विन :

 मघाशी आजी तुम्हाला जादा वडे देत होती. अन् तुम्ही नको नको म्हणतं होता.

जयवंत :

 त्यात काय एवढं, माझी आई आहे ती. माझे लाड करणारच. तुझी मम्मी नाही करत तुझे लाड.

अश्विन :

 इतक नाही करत.

 जयवंत :

गप, सांगू का?

 अश्विन :

 सांगा, पण आजी तुमचे जास्तच लाड करते.

जयवंत :

 मग आई कोणाची आहे?

 बर, ते सोड, नीट रहा, आजोबा, आजीला अजिबात त्रास द्यायचा नाही.

अश्विन :

हा.

( बोलत बाहेर येतो. तात्या आजोबा व सावित्री आईच्या पाया पडत. )

जयवंत :

 येतो आई बाबा.

 सावित्री आई :

 नीट जा रे, उगाच गाडी पळवू नकोस. अन् हो पोहोचल्यावर फोन कर काय.

जयवंत :

 हो हो, करतो. जातो आता.

सावित्री आई :

 जातो म्हणू नये बाळा येतो म्हणावं.

जयवंत :

 हो माझे आई, येतो.

( जयवंत कार मध्ये बसतो. कार निघते. कार गेल्यावर)

तात्या आजोबा :

 काय मग काय ठरलं. आल्या का सूचना ध्यानात.

( अश्विन तिरकस पहात हसतो. )

तात्या आजोबा :

 चल, थोडा वेळ आराम कर, नंतर ठरवू आपले नियोजन.

अश्विन :

हा चला,

Cut to …..

…… …… …..

Morning / inter – external / village / 6.00 o’ clock

गजर वाजतो , आजोबा अश्विनला उठवतात.

तात्या आजोबा :

 अश्विन ये अश्विन

( अश्विन उठतो. )

आजोबा :

 चल रपेटला.

( अश्विन उठतो. आपले तोंड धुतो व आवरतो. गावाकडील डोंगर वाटेला ते धावत जातात. उंच टेकडीवर सुर्य उगवत आहे. ते धावत जातात. अश्विन दमून गवतावर पहुडतो. आजोबा जवळ येतात. )

 अश्विन :

 हरवल की नाही.

तात्या आजोबा :

 असा जोश रोज राहु दे म्हणजे झालं.

अश्विन :

 नातू कुणाचा आहे.

 तात्या आजोबा :

 चल थोडी एक्सर साईज करु.

( ते व्यायाम करू लागतात. )

Cut to …

…… ……. …….


Wednesday, October 15, 2025

विरगळ भाग ६

विरगळ भाग ६

 Day / inter / afternoon / hospital

हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आश्विनचे बॅन्डेज काढून टाकतो.

डॉक्टर :

( हाताने तपासत )

 दुखतंय का,

 अश्विन :

 नाही.

 डॉक्टर :

 इथं.

 अश्विन :

 नाही.

डॉक्टर :

 आता इथे.

 अश्विन :

 थोडं थोडं.

डॉक्टर :

तेवढं दुखणारच.

 डॉक्टर :

( नर्सेला )

 एक्स रे आण इकडे.

( नर्स एक्स रे देते. )

डॉक्टर :

( एक्स रे पहात. )

हा आहे आता नीट. अन् सूज ही उतरलीये.

जयवंत :

 डॉक्टर काही घाबरूण्या सारखं.

डॉक्टर :

 छे नाही .

जयवंत :

 नाही म्हणजे भरती वेळी मेडिकल प्रॉब्लेम वगैरे.

डॉक्टर :

छे हो, झालंय नीट, एवढ्या गोळ्या लिहून देतोय त्या कंटिन्यू करा म्हणजे झालं.

जयवंत :

 हा.

डॉक्टर :

 उतर बाळ खाली आता.

( अश्विन उतरून चालू लागतो. तो नाजूक पाऊल टाकताना पाहून )

 डॉक्टर :

 चल भर भर. काय होत नाही

(अश्विन तरीदेखील हळू हळू चालू लागतो. )

Cut to …..

……. …… …… …..

Day / outer / morning / Ashvin HOME/ out side

( आजोबा निघालेले असतात. )

अश्विन :

 आजोबा जाऊ नका ना.

 तात्या आजोबा :

 हे बघ घाबरायचं नाही. आज पासून बाबा तुला रोज नेऊन सोडतील. व आपला काशी मामा आणेल तुला.

 अश्विन :

 पण तुम्ही थांबा ना,

 तात्या आजोबा :

 अरे, अस कसं थांबून चालेल. तिकडे कामं पडलेत. व तुझी आजीही एकटी आहे.

 अश्विन :

 तरी पण .

 आजोबा :

 असा हट्ट नाही करायचा काय, अन् सुट्टी पडली की थेट गावी यायचं. मग आपण धम्माल करू, काय?

अश्विन :

हा.

 Cut to …… …..

…… …. …… …..

Day / outer / school morning

 अश्विनचे बाबा त्याला शाळेत सोडतात.

 दुपारी शाळेतून इकडे तिकडे जाताना आरिफ, जोसेफ, समीर त्याकडे रागाने पाहत असतात.

Day / evening / school /outer

 संध्याकाळी शाळा सुटल्यावर आश्विन स्कूल बाहेर आल्यावर ते तिघे एकमेकांना इशारा करत असतात. अश्विन बाजूला उभा असतो. समीर रागाने त्याच्याकडे जातो. इतक्यात पाठीमागून एक हवालदार येऊन त्याला पकडतो.

 काशिनाथ :

 या पकडला. काय रे, काय करतोस.

 समीर :

 काही नाही, मी तब्येत कशी आहे विचारत होतो.

काशिनाथ :

 मला माहितीये तुझं विचारणं, आई शपथ सांगतो. हा हाथ बघितलास का? एका चापटीत लोळवेण समजलं का?

इथून पुढे अश्विन पासून शंभर फूट लांब राहायचं.

काय म्हणत होतास त्याला घाटी?

 एक बसलीना सगळ्या कानात घाट्या वाजाय लागतील.

चल सट्क इथून.

( काशिनाथ पोलिसाला पाहून ते तिघे काढता पाय घेतात. काशिनाथ अश्विनच्या खांद्यावर हात ठेवून चालू लागतो. )

 काशिनाथ :

 हे बघ अश्विन, अस घाबरायच नाही, दुसऱ्याला घाबरवून सोडायचं समजल काय?

अश्विन :

 हा

काशिनाथ हवालदार :

 अन् हे काय, खातोस की नाही, कसा हडक्या दिसत आहेस बघ. जरा खात जा, माझ्यासारखा होशील.

चल तुला चौपाटीवर गोल गप्पे खायला देतो.

( ते रस्त्याने चालू लागतात. )

 Cut to …..

…… ……. …….

Inter / school exam day / १२ o’ clock /afternoon

बेल वाजते, स्कूल मध्ये परीक्षा चालू आहे. पर्यवेक्षक पेपर देत आहेत. अश्विन पेपर लिहित आहे. समीर, आरिफ, जोसेफ यांना नीट पेपर लिहिता येत नाही. ते कॉपी करत आहेत. बेल वाजते. पेपर सुटतो.

मुले शाळेतून बाहेर पडतात. अश्विनचे बाबा गाडी घेऊन येतात. अश्विन गाडीमध्ये जाऊन बसतो. गाडी निघते.

गाडीमध्ये.

जयवंत :

झाला पेपर

 अश्विन :

 हो

जयवंत :

कसा गेला?

अश्विन :

 सोपा. काशिनाथ काका आले नाहीत.

जयवंत :

 त्याच काम निघालं अचानक. म्हणून आला नाही तो.

अश्विन :

 उद्या पासून सुट्टी. मला भेळपुरी खायची आहे. तो नेणार होता.

जयवंत :

 नको, वेळ होतोय जाऊया

अश्विन :

 ते काही माहीत नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजेच.

जयवंत :

 ठीक आहे. चल..

Cut to …..

…… …… …….

Inter / Ashvin HOME / evening

 अश्विनची आई जेवण खोलीत कपाटात डबे ठेवत असते. दरवाजाची बेल वाजते. ती जाऊन दार उघडते. अश्विन आईसक्रीम खात आत येतो.

अश्विन :

 आई.

माधवी :

 काय रे हे, आईसक्रीम , अरे, घसा बसेल की.

काय हो तुम्हाला पण कळत नाही का?

जयवंत :

 गप ग, खाऊ देत. किती बंधनात ठेवायचं त्याला.

माधवी :

 अहो, पण …

(मागे वळून)

आश्विन… अश्विन …

( अश्विन जवळ जातो. )

अश्विन :

 आज आम्ही धम्माल केली. चौपाटीवर गेलो. पाणीपुरी खाल्ली, भेळ खाल्ली. अन् हे बघ आईसक्रीम.

माधवी :

अरे, तुला कितीदा सांगितलेय. की उघड्यावरच काय खाऊ नकोस म्हणून.

अश्विन :

 त्याला काय होतं, सगळे लोक खातात. ते नाही आजारी पडत, मी तेवढा पडतो. बर ते सोड माझं पॅकिंग कर.

माधवी :

( आश्चर्य चकित होऊन )

 का?

अश्विन :

 मी सुट्टीला गावी जाणार?

 माधवी :

 अरे, सानेबाईंचा श्री समर कॅम्पला जाणार आहे. तू पण जा की.

अश्विन :

 ते काही नाही, मी गावी जाणार आहे.

माधवी :

 अरे, क्लासेस तुझे,

 अश्विन :

ते काही नाही, मी गावी जाणार म्हणजे जाणारच.

आजोबांना मी प्रॉमिस केलंय ,

( बाबांकडे पहात )

बाबा मला नेऊन सोडा, नाहीतर गाडीत बसवा. जाईन मी.

माधवी :

 गावी जाऊन काय करणार. त्यापेक्षा इथच काहीतरी कर.

अश्विन :

 ते काही नाही. मी जाणारच.

बाबा, मला सोडा.

जयवंत :

हे बघ …आज नाही, उद्या माझं महत्वाचं काम आहे. परवा सोडेन.

अश्विन :

 चालेल. हे….हे….

( अश्विन नाचू लागतो. व आतील खोलीत जातो. टिव्ही पहायला. )

माधवी :

 तुम्ही पण, काय हे ,

जयवंत :

जाऊ देत, तू गप्प बस, मला पण जाणवू लागलंय. की आपण त्याचे पंख कापत आहोत. मला पण तो गावी जावा अस वाटतंय.

माधवी :

 ठीक आहे 

( मान हलवते.)

Cut to …....

. ……. …… …. …….


Sunday, October 12, 2025

वीरगळ भाग ५

वीरगळ भाग ५

 Day / evening / Mumbai City / chaupati

(आजोबा गाडी पार्क करतात. )

अश्विन :

आजोबा, इथे कशाला थांबलोय?

आजोबा :

 चल इथे थोडं चहा पाणी करू.

अश्विन :

 चला घरी, नकोय मला, उघड्यावरच खाऊ नका असे आई म्हणते.

आजोबा :

 ये गप्प, उगाच ट्याव ट्याव करू नको. उतर खाली, तुझ्या या नाजुकते मुळेच तुझं असं शोकेशच बावल झालेय. गप चल तिथे, झाडाखाली बाकावर गुपचुप बस. मला शिकवतोय.

( अश्विन शांतपणे तिथे बाकावर जाऊन बसतो. आजोबा मिसळ पाव घेऊन येतात. पुढ्यात ठेवत.)

आजोबा :

घे सुरु कर.

अश्विन :

नको मला, माझा घसा दुखेल. तब्येत बिघडेल माझी.

आजोबा :

 गप खा, म्हणे तब्येत बिघडेल , मला तुझ्यापेक्षा ती मुलेच जास्त स्ट्राँग वाटलीत.

अश्विन :

 उगाच काहीपण बोलू नका, मी फुटबॉल चॅम्पियन आहे.

आजोबा :

 ते दिसतंय मला, उगाच मोठ्या वल्गना करू नकोस.

चॅम्पियन म्हणे, पायावर ठीक उभारता तरी येतं का?

आज पाहिलेय शाळेत एखाद्या भिजलेल्या उंदरासारखा उभा होतास.

( अश्विन रडू लागतो. )

 आजोबा :

 हेच वागणं पसंत नाही मला, त्या जयाला सांगितलं की गावाकडे ठेव म्हणून, ऐकतो कुठे माझं? म्हणे अँडव्हान्स शिक्षण देतो. हे तुझं अँडव्हान्स शिक्षण होय. माझ्याकडे बघ जरा मी कसा स्ट्राँग आहे. अरे मी या वयात एवढा फिट्ट आहे. तू बघ तुझ्या स्वतःकडे

( अश्विन स्वतःकडे पहातो. नंतर आजोबांकडे पाहतो. )

 आजोबा :

 मी एवढी फौजेची नोकरी केली. प्रसंगी झाडाची पाने पण खाल्ली, कीडे मकोडे देखील खायची पाळी आली. कुठलं ही पाणी प्यायलो. काय झालं, आहे ना ठणठणीत, तू बघ तुझ्या स्वतःकडे. काय तुझी हालत झालेय बघ जरा. स्ट्राँग व्हायचं असेल तर निसर्गात जगायला शिक,

अश्विन :

 पण आईला कळलं तर.

आजोबा :

 कळेलच कसं, तू सांगितल्याशिवाय. माझ्या काय तोंडाला कुलूपच, अन् एवढे लोक खात आहेत. त्यांना नसेल का स्वतःची काळजी?

( अश्विन एक स्माइल करतो. व मिसळ खाऊ लागतो. )

Cut to …..

... …. …. …..

Next day / morning / 6’o’clock inter

मोबाईल गजर वाजतो. आजोबा उठतात. अश्विनच्या रूममध्ये येतात. अश्विन झोपलेला असतो.

आजोबा :

 अश्विन ये अश्विन

( अश्विन डोळे चोळत उठतो. )

 आजोबा :

 चल पार्क मध्ये.

अश्विन पण आजोबा.

आजोबा :

 अरे सकाळच्या ताज्या हवेत फिरलं की बर वाटेल तुला.

( अश्विन उठतो. )

Cut to. …..

…… …… …….

Morning / ६.३० o’ CLOCK /outer / Park

अश्विन एका पार्क मध्ये एका बाकड्यावर बसलेला आहे. आजोबा एक रपेट मारून येतात. व त्याजवळ बसतात.

आजोबा :

 बोल, कसं वाटतंय.

अश्विन :

 मस्त, एकदम फ्रेश

आजोबा :

 तू रोज का येत नाहीस?

अश्विन :

 कोणासोबत येणार?

 आजोबा :

बाबांसोबत तुझ्या.

अश्विन :

 ते तर कामावरून उशिरा येतात. व सकाळी आठ नंतर उठतात. त्यासोबत काय नऊ वाजता येऊ?

आजोबा :

 मग मित्रांसोबत का येत नाहीस?

अश्विन :

 मग झालं, हे काय गाव नाही, हाक मारले की सारे गोळा व्हायला.

आजोबा :

 काय खरं नाही बुवा तुझं!

अश्विन :

 अस काही म्हणू नका ना, तुम्हीच काहीतरी सुचवा की.

आजोबा :

 बर, सुट्टी कधी पडणार तुला?

अश्विन :

 मे महिन्यात.

आजोबा :

 सुट्टी लागली रे लागली की ये माझ्याकडे गावी, बघ तुला कसा रफ आणि टफ बनवतो ते.

अश्विन :

 आता नेणार नाही.

आजोबा :

 तुझी शाळा आहे ना,

अश्विन :

 मला तिथे जाऊस वाटत नाही.

आजोबा :

 का?

अश्विन :

 मला ती मुले पुन्हा मारतील. त्या दिवशी सुदैवाने वाचलो.

आजोबा :

 अरे, पण अस घाबरून कस चालेल. व आता अर्ध वर्ष आहे अजून, असा आधी मधी दाखला काढणं म्हणजे तुझं नुकसान नाही का होणार?

अश्विन :

 मरण्यापेक्षा ते नुकसान झालेल बरं

आजोबा :

 म्हणजे तू ही त्या मंगेश सारखं हार मानून पलायन करणार तर?

 अश्विन :

 प्रतिकूल प्रसंग असल्यावर माघार घेण्यातच शहाणपणा नाही का?

आजोबा :

 लढायच्या आधीच हार मानलीस म्हण.

अश्विन :

 जर ते तिघे एक एकटे आले असते. तर गोष्ट निराळी होती, पण ते एखाद्या तरसा सारखं टोळी करून आल्यावर एकट्याचे काय चालणार? बोला

आजोबा :

 समस्या गंभीर आहे, विचार करून मार्ग काढायला हवा.

बर चल घरी, काढू काहीतरी मार्ग.

( ते निघतात. अश्विन लंगडत चालत आहे.)

Cut to ….

….. ….. …… …

Day / afternoon / inter / dayning holl Ashvin HOME Mumbai

( गंभीर वातावरण, सर्वजण आजोबा, जयवंत, माधवी जेवत आहेत. अश्विन आपल्या रूममध्ये आहे. )

 तात्या आजोबा :

 मला वाटत, यावर काहीतरी उपाय करायला हवा.

जयवंत :

 आपण पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर.

 तात्या आजोबा :

 त्याने काय होईल, त्या मुलांचे नुकसानच ना, व आपला मुलगा कधी स्ट्राँग होणार?

 माधवी :

 मला तरी काही सुचत नाही.

तात्या आजोबा :

 हे चार - पाच महिने त्याला सुरक्षित सोडणे व आणण्यासाठी वेळ काढला पाहिजे.

जयवंत :

 मी केलं असतं, पण माझं ऑफीस टायमिंग व अंतर पाहता ते अशक्य आहे. मी जाताना सोडू शकतो. येताना कस करायचं?

तू का नाही जात.

माधवी :

 माझं आवरुन जायला. मला खूप वेळ लागेल. तोपर्यंत.

जयवंत :

समीरला सांग की. त्याची बदली इथेच झालेय ना?

माधवी :

 नको, त्याला नको, उगाच आयुष्यभर टोमणे कोण खाणार त्याच्या बायकोचे?

तात्या आजोबा :

 हा आहे एक माझ्या ओळखीचा गावातील एक पोलिस इथेच असतो. तो आणेल ना रोज सांगतो मी.

जयवंत :

 कोण काशिनाथ,

 तात्या आजोबा :

 हा, काशिनाथ.

जयवंत :

 हा त्याला जमेल. आणेल तो.

Cut to .

…… ….. ….. ……


Saturday, October 11, 2025

वीरगळ भाग ४

वीरगळ भाग ४

 Night / Ashvin HOME Mumbai / inter / room

तात्या आजोबा आत रुम मध्ये आले. अश्विन तिथे बेडवर झोपलेला आहे. अश्विन उठून अंथरुणावर बसतो. आजोबा शेजारी बसतात. माधवी आत येते.

माधवी :

 अश्विन गोळ्या घे. उद्या चेकपला जायचं आहे. तिथून शाळेत जरा मुख्याध्यापकांनी बोलावले आहे.

( अश्विन गोळ्या घेतो. आजोबांच्या हातावर हात ठेवत. )

अश्विन :

 आजोबा तुम्ही पण येणार ना.

आजोबा :

 हो येईन.

( माधवी आतील खोलीत जाते. )

आजोबा :

 उद्या बोलू आपण मुख्याध्यापकांशी

अश्विन :

 नको नको, ते त्यांना शिक्षा करतील. व पुन्हा मला ती मुले त्रास देतील.

आजोबा :

 भित्रट घाबरतोस कसला? भीड भिकेची बहीण.

अश्विन :

 ते खूप तगडे आहेत.

आजोबा :

 मग त्यात काय एका हातात लोळवायचं त्यांना.

अश्विन :

 नको, मला भीती वाटते त्यांची.

( आजोबांनी अश्विनकडे पाहिले. तो अत्यंत बारीक दिसत होता. चार भिंतीत राहिलेल्या कबुतरासारखी गत त्याची झाली होती. )

आजोबा : ( मनात )

आता मलाच काहीतरी केलं पाहिजे.

बर, चल मी येतोय.

Cut to ….

…… …… …..

 Day / afternoon ३ o’ clock / school

मुख्याध्यापकांच्या केबिन बाहेर एका बाजूला ते तिघे समीर, आरिफ, जोसेफ उभा आहेत. अश्विन व आजोबा तिथे येतात. त्याकडे पहात मनात

जोसेफ : ( मनात )

 एवढं लागलं तरी याची जिरली नाही. ते तक्रार करतोय.

आरिफ : (मनात )

वरून पडून देखील पांगळा नाही झाला.

समीर : ( मनात )

 एका बुक्कीत टेंगुळ काढीन

( आश्विन आजोबांच्या हाताला घट्ट पकडतो. आजोबा आपली करारी नजर त्या तिघांकडे टाकतात. त्यांना पाहून ते तिघे मान खाली घालून उभे राहतात. )

( शिपाई केबिन मध्ये जातो. व एक लेटर देतो. )

शिपाई :

 सर बाहेर अश्विन व त्याचे आजोबा आलेत.

मुख्याध्यापक :

 पाठवून दे त्यांना आत.

( शिपाई बाहेर जातो. )

शिपाई :

 आत बोलावलंय तुम्हाला.

( आजोबा व अश्विन आतमध्ये जातात. ते आत आल्यावर)

मुख्याध्यापक :

त्या तिघांना पण पाठव आत.

( शिपाई बाहेर जातो. त्या तिघांना )

शिपाई :

 चला आत .

( ते तिघे आत येतात. )

मुख्याध्यापक :

 केशव ही फाईल सिंत्रे सराना नेऊन दे. व पी. इ. च्या रगडे सरांना लाऊन दे.

( केशव जातो. आठवीच्या वर्गाबाहेरून सिंत्रे सरांना हाक मारून फाईल देतो. सर ती घेतात. केशव पुढे ग्राऊंडवर जातो. व तिथे रगडे सर पाचवीच्या मुलांना लेझिम शिकवत असतात. तेथे जाऊन )

केशव शिपाई :

 रगडे सर तुम्हाला घरपणकर सरांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले आहे.

 रगडे सर :

( सिटी वाजवून थांबवतात व सुशांतला जवळ बोलावून)

सुशांत, इकडे ये.

( सुशांत येतो. )

रगडे सर :

मघापासून मी शिकवलेल्या स्टेप्सचा सराव घे. मी आलोच इतक्यात.

रगडे सर निघतात.

Cut to …

…….. …… …..

Inter / mukhadyapak Kebin / day

समीर, आरीफ, जोसेफ एका बाजूला उभे आहेत. बाजूला अश्विन व त्याचे आजोबा बाजूला बसलेले आहेत.

रगडे सर दाराजवळ येतात.

घरपणकर सर ( मुख्याध्यापक ) :

नालायक आहात तुम्ही तिघे. अभ्यासाच्या नावानं बोंब, कुठे खेळात नाही, स्पर्धेत नाही. व शाळेत इतर विद्यार्थ्यांना पण शिकू देत नाही.

समीर :

 एवढं काय केलंय आम्ही सर.

घरपणकर सर :

काय केलंय, थांबा दाखवतोच तुम्हाला, लाल शेरा दिला म्हणजे समजेल.

( रगडे सर आत येण्याची परवानगी मागतात. )

रगडे सर :

 सर आत येऊ का?

घरपणकर सर :

 या

( रगडे सर आत येतात. )

रगडे सर :

 सर आपण बोलावलंत.

 घरपणकर सर :

 हो, सर, मला सांगा त्या दिवशी आश्विन संगे हा जो अपघात झाला त्यासाठी हे तिघे दोषी आहेत. असे मला वाटते.

जोसेफ :

 आम्ही काय केलंय. तो तर अपघात झालाय. कुठेतरी रस्त्यावर त्यासाठी आम्ही दोषी कसे?

घरपणकर सर :

सर तुम्ही अश्विनला ओळखता की नाही.

रगडे सर :

 हो सर, खूप हुशार व प्रामाणिक मुलगा आहे तो.

घरपणकर सर :

 त्या दिवशी खेळाच्या मैदानावर काय घडलं.

रगडे सर :

 काही नाही, थोड खेळताना मुलांमध्ये बाचाबाची झाली. थोडस पडल्याने लागलं अश्विनला.

घरपणकर सर :

सर, तुम्ही तिथे असून देखील तिथे काय घडलं हे माहित नाही तुम्हाला.

रगडे सर :

सर मला समजलं नाही, आपल्याला काय म्हणायचं आहे ते.

घरपणकर :

 सर फक्त बाचाबाची झाली नाही. या तिघांनी जाणून बुजून आश्विनशी त्यावेळी भांडण काढलं. व अश्विनला पाडलं. व त्याच्याशी हुज्जत घातली.

रगडे सर :

माझं लक्ष होतं सर

घरपणकर सर :

 सर तुमच्या लक्षात नाही आलं त्या दिवशी काय घडलं ते. हे बघा, सी सी टिव्ही कॅमेऱ्यात सगळ दिसत आहे. हे तिघे काय काय कारस्थान करत होते ते. व मला वाटत, याच भांडणाचे उट्टे यांनी बाहेर शाळा सुटल्यावर काढले.

( सर सी सी टिव्ही कॅमेऱ्यात असलेला सीन दाखवतात. )

रगडे सर :

 सर खेळताना धक्का लागलाय फक्त.

घरपणकर सर :

सर पुढील फुटेज पहा. तुम्ही सर्व त्याला उठवत असताना हे तिघे हसत एकमेकांना टाळ्या देत आहेत.

( सर सीन पाहतात व त्या तिघांकडे डोळे वटारून पाहतात. )

घरपणकर सर :

 सर ही तिनं मूल म्हणजे आपल्या शाळेला कलंक आहेत. यांच्यामुळेच गेल्यावर्षी तो हुशार मंगेश शाळा सोडून गेला. हे फक्त मैदानावरच प्रताप करत नाहीत. पहा या फुटेज

( सर्व फुटेज पाहतात. एके ठिकाणी आरीफ मुलांच्या पायाखाली काचेच्या गोठ्या टाकताना दिसतो. तर जोसेफ पिशवीतून आणलेले कबूतर घेऊन मुलींवर उडवताना दिसतो. )

घरपणकर सर :

 मला खात्री आहे. अश्विनच्या अपघातमाग यांचाच हात असावा. काय आश्विन बोल. तू फक्त एक तक्रार कर. लगेच यांच्यावर कारवाई करतो.

( अश्विन काही न बोलता खाली मान घालून रडू लागतो. तो काही बोलत नाही.)

घरपणकर :

 तू फक्त एक तक्रार दे. बाकी आम्ही पाहतो.

( अश्विनला ते मारत असलेला सीन आठवतो. व तो शांत होतो. व आजोबांकडे नंतर त्यांकडे व मग खाली पाहू लागतो. )

अश्विन :

 माझी काही तक्रार नाही सर.

( अश्विन बाहेर पडतो व चालू लागतो. )

तात्या आजोबा :

 सर, अपघाताने त्याच्या मनावर आघात झालेला आहे. समजून घ्या. बर मी येतो.

( आजोबा त्या मुलांकडे एक नजर टाकतात. नंतर ते ही लगेच मागोमाग त्यांच्या जातात. )

आजोबा :

 अश्विन… अश्विन ….

( पाठीमागून जाऊन अश्विनचा हात धरून घेऊन जातात. )

Cut to ……

… ….. .


Thursday, October 9, 2025

वीरगळ भाग ३

वीरगळ भाग ३


 तानाजीराव ( तात्या आजोबा) :

 थांब मी जातो. त्याच्याकडे

( तात्या आजोबा गॅलरीत जातात. आजोबाना पाहून )

आश्विन :

 कोण तात्या आजोबा

( अश्विन वाकून नमस्कार करतो. )

तात्या आजोबा :

 राहू दे रे, बघू तुझा पाय.

अश्विन :

आहे आता बरा, थोड अवघडल्या सारख वाटतंय. उद्या बोलावलंय डॉक्टरांनी चेकपला निघेल स्टेपिंग

तात्या आजोबा :

 पण असा कसा पडलास तू?

 ( आश्विन रडू लागला. )

तात्या आजोबा :

अरे, अस काय हे अपघात होतच असतात. त्याने अस खचून नाही जायचं बाळ.

अश्विन :

 अपघात घडला असता तर मी मान्य केलं असतं. पण .

 तात्या आजोबा :

 पण काय आणखीन.

अश्विन :

 माझ्या शाळेत तिनं खोडकर मुले आहेत. नेहमी मला काही ना काही चिडवत असतात. घाट्या, बाट्या अस काही न काही बोलतात. त्या दिवशी फूटबॉल खेळताना तर मुद्दाम भांडण उकरून काढले. मी पण चिडून त्याशी वाद घातला. तेव्हा शाळा सुटल्यावर दाखवतो म्हणाले.

तात्या आजोबा :

 मग काय झालं?

आश्विन :

 त्या दिवशी मी व शेजारील कॉलनीतील गणेश शाळेतून येत असताना ते आपले गुंड मित्र घेऊन आले. मला मारायला. मी तेथून गणेशकडे दफ्तर देऊन पळालो त्यांनी मला एका बोळात गाठलं. व बेदम मारलं. मी कसा बसा त्यांच्या तावडीतून निसटलो. व पुलाकडे पळालो. ते ही माझ्या मागे लागले. शेवटी मी पुलावरून उडी टाकली. कसा बसा पोहत काठाला आलो. मात्र या सगळ्यात माझा पाय दुखावला.

तात्या आजोबा :

 बाबांना सांगितलं नाहीस.

अश्विन :

 त्यांना सांगून काय उपयोग ते तर आपल्याच कामात दंग असतात. मागे मी त्यांना सांगितले होते. पण त्यांनी त्या मुलांपासून दूर रहा एवढेच सांगितले.

तात्या आजोबा :

 शाळेतील शिक्षकांना सांगायचं नाहीस.

अश्विन :

 इथे घरचे लक्ष देईनात. तिथे शाळेतील शिक्षक काय लक्ष देणारं. हे काय गावाकडील शाळा आहे, शिक्षकांना रिस्पेक्ट द्यायला. इथली मुले जरा काही बिनसले की लगेच हाणामारी सुरू करतात.

तात्या आजोबा :

पुढे काय करणार आहेस?

 अश्विन :

 तेच काही सूचत नाहीये. प्रत्येक वेळी त्यांच्या तावडीतून सुटेनच असे नाही. व असे वाटते की नको हे, बास करावे सगळे.

तात्या आजोबा :

 शाळेचं काय करायचं ठरवलं आहेस?

 अश्विन :

 काय माहित.

( इतक्यात माधवी चहा घेऊन येते. व तात्या आजोबांना देत. )

 माधवी :

 तात्या चहा घ्या. जेवणाच बघते.

तात्या आजोबा :

 तू घेणार आहेस का चहा?

 अश्विन :

 नाही, … नको ….. तुम्ही घ्या.

( तात्या चहा पिऊ लागतात. )

Cut to ……

 …...... …… ….

Day / Ashvin HOME / dayning holl

( फोन वाजतो. जयवंत फोन उचलतो. अश्विनच्या शाळेतून असतो.)

 जयवंत :

 हॅलो सर , बोला

मुख्याध्यापक :

मी घाटपांडे सर न्यू हायस्कूल.

 जयवंत :

हा बोला, सर

मुख्याध्यापक :

अश्विनची तब्येत कशी आहे.

जयवंत :

 आता आहे बरी, उद्या चेकपला जाणार आहे.

मुख्याध्यापक :

 थोड येऊन जाताय का उद्या?

जयवंत :

 उद्या … आ… उद्या महत्त्वाची मिटिंग आहे माझी सर, मला नाही येता येणार. काही महत्वाचं असेल तर त्याच्या आजोबांना लाऊन देऊ का ?

मुख्याध्यापक :

 हो चालेल. तसेच अश्विनला ही पाठवा, जमत असेल तर.

जयवंत :

 उद्या चेकअप झालं की पाठवेन तसेच आजोबा सोबत येईल तो.

मुख्याध्यापक :

 ठीक आहे.

Cut to

…. …… …… ……

Day that time/ Ashvin HOME/ dayning holl

माधवी :

( टेबलवरील ग्लास मध्ये पाणी ओतत.)

काय म्हणत होते सर.

जयवंत :

 काय म्हणतील, अश्विन कसा आहे विचारत होते? उद्या शाळेत यायला जमेल का ?

माधवी :

 मग काय ठरलं.

जयवंत :

उद्या चेकपला नेतोय. तसंच शाळेत जाऊन या, उद्या गाडी ठेवून जातो. बाबांना सांगतो मी? माझी उद्या महत्त्वाची मिटिंग आहे. आधीच चार दिवस दांडी पडली आहे. उगाचच बॉस वाजवत बसेल.

माधवी :

 बर चालेल.

( ती नाष्ट्याची भांडी उचलून आत नेते. )

Cut to …..

…. …. …… ….


मराठी पटकथा : वीरगळ भाग २

मराठी पटकथा : वीरगळ भाग २

 ( माधवी फोन जवळ जाते. फोन घेते. फोन वर तिची सासू असते. )

सावित्री आई :

 हॅलो माधवी का?

माधवी :

 हो आई बोलतेय.

सावित्री आई :

 अग, काल जयवंत येणार होता ना.

माधवी :

 हो येणार होते पण ….

सावित्री आई :

 पण काय आणखीन.

( माधवी रडू लागते. )

सावित्री आई :

 रडायला काय झाले ग …

माधवी :

 काल आश्विन शाळेतून येताना काय माहित काय झालं. समुद्रकिनारी काही कोळ्यांना जखमी सापडला. देवी आईची कृपा म्हणून वाचला.

सावित्री आई :

 काय सांगतेस, असा कसा गेला तो व समुद्र किनारी गेला मग. जखमी झाला म्हणजे काय? आता कसा आहे तो?

माधवी :

 उपचार चालू आहेत. जरा पायाला मार लागलाय. मी विचारले परंतु काहीच सांगत नाही. व घाबरलेला आहे. दफ्तर कुठे आहे ते ही बोलत नाही. उगाचच आक्रस्ताळेपणा करतोय.

सावित्री आई :

 तू काल का फोन केला नाहीस. आम्ही आलो असतो ना? माझ्या पण ध्यानात नाही आलं. मला वाटलं ऑफिसच काम असेल म्हणून आला नसेल जयवंत.

माधवी :

 मी करत होते. पण फोन लागत नव्हता. व मग सगळी उस्तवारी करत वेळ गेला.

सावित्री आई :

 आता कसा आहे तो?

माधवी :

 आहे इथे बेडवर बसलाय टी व्ही पाहत.

सावित्री आई :

 जरा दे त्याच्याकडे.

माधवी :

 हा देते,

( माधवी फोन अश्विनला देऊ लागते. )

( आश्विन इशारा करून कोणाचा विचारतो. )

माधवी :

 आहे, सावित्री आईचा.

आश्विन :

( फोन घेऊन सुस्कारा टाकत )

हा बोल आज्जी.

सावित्री आई :

काय रे कसा आहेस ? तिकडे समुद्र किनाऱ्यावर कशाला गेला होतास ? व जास्त लागलंय का?

( आश्विन सुस्कारे देत रडू लागतो. )

सावित्री आई :

 काय रे काय झालं रडायला. बोल ना,

आश्विन :

 तू व तात्या आजोबा कधी येणार. या की प्लीज,

सावित्री आई :

 अरे , रडतोस कशाला? हे बघ आम्ही येतोय उद्याला.

काळजी करू नकोस.

आश्विन :

 हा, आईकडे देऊ.

सावित्री आई :

 हा दे.

( आश्विन आईकडे फोन देतो. )

सावित्री आई :

 हे बघ आम्ही येतोय उद्या तिकडे.

माधवी :

 हा

Cut to …..

…… ….. ..

Day /Morning / Ashvin HOME / inter

बेल वाजते. अश्विनची आई दरवाजा उघडते. दारात लहान मुलगा उभा असतो.

माधवी :

 काय रे,

मुलगा :

काय नाही, हे आशू दादाचं दप्तर द्यायला आलो होतो.

माधवी :

 तुझ्याकडे कसं काय?

 मुलगा :

 काल आम्ही शाळेतून येताना आश्विन दादाच्या मागे काही मुले लागली होती. तेव्हा त्याने आपलं दप्तर माझ्याकडे दिलं. व तो पळाला. त्याच्या मागे पाच सहा मुले मारायला पाठी लागली होती.

माधवी :

 काय? मग काय झालं.

मुलगा :

 मी अश्विन दादाला पुलाकडे जाताना पाहिलं. व ते पण त्याच्या मागे लागले होते.

माधवी :

 मग काय झालं?

 मुलगा :

 मी घाबरलो व घरी पळत आलो. मला काय सुचत नव्हते. आज आई म्हणाली कुणाच दप्तर आणलास, नेऊन द्यायचं नाही का?

 म्हणून मी ते द्यायला आलो. दादा कुठे आहे.

माधवी :

 बर झालं आलास ते, बस आत आहे तो, जा जाऊन बस दादा जवळ मी सरबत आणते.

( तो मुलगा अश्विनजवळ जाऊन बसला.)

मुलगा :

 कसा आहेस?

आश्विन :

 आहे ठीक आता, ये बस, क्रिकेट बघूया.

पत्ता कसा सापडला.

मुलगा :

 वहीवर होता ना तुझ्या, त्याच्या आधारे पाहत आलो.

( माधवीने सरबत आणला. तो पिऊ लागला.)

Cut to ……

…… ….. ….

Night / 8.30p.m. / outer inter

रात्रीची वेळ तात्या आजोबा म्हणजे तानाजीराव गाडी घेऊन येतात. सावित्री त्यांची पत्नी वाट पहात असते. एक जीप दरात येऊन थांबते. तानाजीराव गाडीतून उतरतात. डबा उघडल्याचा आवाज ऐकू येतो.

सावित्री आई :

 खूप वेळ झाला यायला.

तानाजीराव :

 काय करणार मळणी आटपायला नको.

सावित्री :

 झालं ना नीट सगळं 

( तानाजीराव बाहेरील बागेतील पाण्याची पाईप चालू करून हात पाय धूत.. )

तानाजीराव :

 होय झालं. जयवंत आला नाही.

सावित्री :

 अग बाई, सांगायचं राहिलंच की. अहो आश्विन शाळेतून येताना समुद्र किनाऱ्यावर गेला. व काय माहित कोण जाणे अपघात घडला. काही कोळ्यांनी आणून सोडला दवाखान्यात. त्याच गडबडीत जयवंत होता.

तानाजीराव :

 पोराच नुसत बावल करुन ठेवलंय यांनी. गाडीतील पिशवी आण. व फोन काढून दे इकडे.

( तानाजीराव फोन करतात. जयवंत फोन उचलतो. )

 तानाजीराव :

 हॅलो जयवंत.

जयवंत :

 हा बोल बाबा, आज ..

तानाजीराव :

( बोलण तोडत )

कळलय मला, बर फ्रॅक्चर वगैरे नाही ना.

जयवंत :

 नाही पण थोड दुखावलय.

तानाजीराव :

डॉक्टर काय म्हणाले?

जयवंतराव :

फ्रॅक्चर वगैरे काही नाही, फक्त पायाच स्नायू दुखावलाय फक्त. स्टापिंग केलंय. चार दिवसांनी दाखवायला या म्हणून सांगितलंय.

 तानाजीराव :

 फ्रॅक्चर नाही ना, मग देव पावला. तुम्हाला सांगत असतो मी नेहमी व्यायाम करत जा. व्यायाम करत जा. शरीर चपळ करा, ऐकताय कुठे, जरासं पडल की तुमचे हात पाय दुखावतात. नाजूक बाहुल्यासारखे झालाय नुसते.

जयवंत :

 तस नाही बाबा, मी सांगतो नेहमी त्याला व्यायाम कर, व्यायाम कर म्हणून, पण अभ्यास असतो ना त्यामुळे

तानाजीराव :

कारण सांगायला मस्त जमतात. मुलाने आदर्श घ्यायला बाबाने आधी कसरत करायला हवी. नाही का?

( इतक्यात मागून सावित्री )

सावित्री:

 गप, बसा हो, तुमच आपलं नेहमी असत, व्यायाम करा, व्यायाम करा, करतील ते. तुम्ही काय बघायला असता तिथे.

तानाजीराव :

इथेच चुकतं तुम्हा बायकांचं मुलाच्या प्रगतीतील लोडना आहात. नुसत्या.

सावित्री :

 काही लोडना वगैरे नाही हं,  त्या शिवाय का तो लाखभर पगार घेतोय?

तानाजीराव :

त्याचा ताला माला पाहून आठवीनंतर बाहेर काढला शिक्षणाला म्हणून, नाहीतर घरातच बसला असता तुझं कुकुल बाळ होऊन.

जयवंत :

( फोन वर)

 काय हे बाबा तुमचं पुन्हा सुरू झालं.

तानाजीराव :

तुम्हाला माझ्या बोलण्याच महत्व आज नाही समजणार, कळेल पुढे.

जयवंत :

( विषय बदलतो.)

बर, ते असू दे, मळणीच काय झालं. उद्या येतो मी.

तानाजीराव :

 उद्या बीद्या काय नको, तू तिथेच रहा. मी येतो. दोन दिवसात इकडंल आटपून.

जयवंत :

 बर चालेल.

( फोन ठेवला जातो. )

सावित्री आई :

 हे आणखी काय, मी तर माधवीला उद्या येताय म्हणून सांगितलंय.

तानाजीराव :

 इकडला पसारा लावतो नीट व जातो.

सावित्री आई :

 ते पडू देत. नातवापेक्षा महत्वाचं आहे का ते.

तानाजीराव :

 उद्या सगळी व्यवस्था लावतो. व रात्रीला निघतो.

सावित्री आई :

 हा चालेल.

तानाजीराव :

चला पाने वाढा आता, खूप भूक लागलीया.

सावित्री आई :

 हा, घेते वाढायला, सुमे ऐ सुमे

नोकरांनी सुमा :

 काय सावित्री आई?

 सावित्री आई :

तो लाडू खाऊन झाला असेल तर जेवायला वाढ.

सुमा :

 म्हातारीला गरुडाच डोळ लावल्यात की काय? जेवण खोलीतील सुद्धा दिसतं.

सावित्री आई :

 जेवण खोलीतील काही दिसत नाही. मघाशी लाडवाचा डबा उघडत्याला आवाज आला, त्यावरून ओळखलं जाताना त्यातले दोन लाडू पोरांना ने, नाहीतर एकटीच खाशील.

तानाजीराव :

किती बोलखल तिला?

सावित्री आई :

मीच म्हणून तिला ठेवलीय तिच्या पोरांकडे बघून समजलं नाहीतर ….

तानाजीराव :

नाहीतर काय?

सावित्री आई :

 माधवी असती तर केव्हाच हाकलली असती. चला आता जेवायला.

Cut to …….

…. ….. ……

Day / afternoon / 11o’ clock / Mumbai / Ashvin HOME

जयवंत कामावर जायच्या गडबडीत आहे. डायनिंग टेबलवर बसून नाष्टा करत आहे. माधवी त्याचा डबा आणून देते. आश्विन गॅलरीत उभा राहून बाहेरील गाड्यांची रहदारी पाहत आहे. माधवी नाष्टा आणून ठेवते.

माधवी :

 हा घ्या.

जयवंत :

 हा, आश्विन कुठे आहे?

माधवी :

 आहे गॅलरीत बसलाय.

( इतक्यात बेल वाजते.)

माधवी दार उघडते.

माधवी :

आ तात्या तुम्ही

तात्या आजोबा ( तानाजीराव ) :

हो काय करणार, अश्विनच कळल्यावर त्याची आजी कुठे थारा करू देते.

 माधवी :

  आई नाही आल्या.

तानाजीराव :

ती तयारच होती. पण शेताकडील गड्यांना भाकरी द्यायच्या होत्या. म्हणून मी म्हटलं तू थांब मी जाऊन येतो. बर ते सोड, आधी ही पिशवी घे पाहू.

( आपल्या हातातील बॅग व पिशवी माधवीकडे देत. )

माधवी :

 काय आहे यात?

तानाजीराव :

 शेतातील भाजी व लाडवाचा डबा आहे. बर आश्विन कुठे आहे?

माधवी :

 आहे गॅलरीत उभा राहून समुद्र पाहतोय.

 माधवी :

 आश्विन .. आश्विन ….. पाहिलस का कोण आलय ते.

क्रमशः पुढे ......

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...