शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Thursday, January 11, 2024

कळत नकळत जुळले हे बंध भाग २८

 कळत नकळत जुळले हे बंध भाग २८


Day. Morning. Outer  राधानगरी

सकाळी आपले आवरून अण्विका हॉस्पिटलला निघालेली असते. तेव्हा तिला ईशान बाईक घेऊन निघालेला दिसतो. त्याच्या बाईक वर एक मुलगी असते. आण्विका त्यांना जाताना पाहते. व चिडते.

तिच्या मनात,

काय वाटतं नसेल याला. इकडे मी याने प्रपोज करावे म्हणून झुरतेय. व हा कुशाल मुलींना गाडीवर घेऊन फिरतोय.

ती तशीच हॉस्पिटलला जाते. दुपारपर्यंत आपली ड्युटी करून विश्रांतीसाठी आपल्या विश्रांती रुमकडे निघालेली असते. इतक्यात ईशान आपली बाईक घेऊन येतो. व तडक तो गाडी पार्क करून हॉस्पिटल मध्ये येतो.

आण्विका विश्रांतीरुमकडे निघालेली असते.

तो पाठीमागुन येतो.

ईशान, नमस्कार डॉ. मॅडम.

ती मागे वळते. ईशान असतो.

आण्विका, बोला काय हवंय.

ईशान, तुझा मोकळा वेळ.

आण्विका, आता नाही, मी बिझी आहे.

ईशान, संध्याकाळी तरी, ड्युटी संपल्यावर.

आण्विका, कशाला, काय काम आहे.

ईशान, काम असल्यावरच भेटाव का?

आण्विका, तुम्ही काय हिरो, रोज एका मुलीला बाईक वरून फिरवता. लग्नात तर कित्येक ललना तुमच्या मागे लागलेल्या असतात. तुम्ही तर कृष्णाचेच अवतार. माझ्यासारख्या सामान्य डॉक्टर कडे काय काम असणार.

ईशान, मी कुठल्या मुलींना घेऊन फिरत ही नाही. अन् लग्नात नटून आलेलो. होतो ते फक्त एकाच व्यक्तीसाठी.

आण्विका, हो का?

ईशान, बर राग सोडा मॅडम , आज जाऊया का जेवायला संध्याकाळी.

आण्विका, चालेल, पण ड्युटी.

ईशान, उगाच काही सांगू नको. मी चौकशी केली आहे. संध्याकाळी तू फ्री आहेस.

आण्विका, बर, ठीक आहे जाऊया.

ईशान, किती वाजता येवू इथे.

आण्विका, इथे नको. तू रूमवर ये. हा घे पत्ता.

ईशान , संध्याकाळी ७.३० वाजता.

आण्विका, ठीक आहे.

तो निघून जातो.

आण्विका आपल्या विश्रांती कक्षात येते.

…. …… …… …….

Night. Outer. ७.३० p.m.

राधानगरी

संध्याकाळी आपली ड्युटी आवरून अण्विका आपल्या रूमवर येते. मस्त आपले आवरते. छान ड्रेस घालते. व आपला थोडा श्रृंगार करते.

ईशान ही आपले आवरून छान ड्रेस घालून त्यावर परफ्यूम मारून आपली बाईक घेऊन अण्विकाच्या रूमवर येतो. बाहेर गाडी उभा करतो.

व अण्विकेला आपल्या मोबाईल वरुन कॉल करतो.

आण्विका, फोन उचलते.

ईशान, काय आवरलं की नाही. बाहेर आलोय मी.

आण्विका, थांब आलेच.

आण्विका आपले आवरते. व बाहेर येते.

ती बाहेर निघालेली असते. आपल्या रुमला कुलूप लावून ती बाहेर येते. व ईशानच्या गाडीवर बसते.

त्यांना जाताना वाटेत. डबा देणारी आजी भेटते.

आण्विका, जरा गाडी थांबावं,

ईशान, का?

आण्विका, त्या आजीना आज डबा नको म्हणून सांगते.

ईशान, ठीक आहे.

आण्विका, हो मावशी,

आजी, बोला मॅडम, काय कुठे दौरा वाटत.

आण्विका, हो. दौराच आहे. जरा बाहेर जातेय. जेवण करूनच येईन. आज नको डबा.

आजी, बर बर.

ती निघतात.

पुढे एका ठिकाणी तो एका शांत परिसरात तिला घेऊन येतो. जिथे आजूबाजूला कोणी नाही. व छान लाईट आहे. तिथे जवळ एक मंदिर आहे. त्या बाहेर प्रांगणात एका बाजूला बसायला बाक होता. त्या बाकावर ती दोघे येवून बसतात.

गाडी थांबवून

आण्विका, गाडी का थांबवलीस

ईशान, तुझ्यासवे गप्पा मारायला.

आण्विका, हो का?

ईशान, चल त्या मंदिरात थोडा वेळ घालवू.

ते तिथे जातात . दर्शन घेतात. मंदिरा बाहेर असणाऱ्या बागेत फिरत तो

ईशान, चल तिकडे बसू.

आण्विका, हा.

ती दोघे त्या ठिकाणी बसतात.

ईशान, मनात ( कशी सुरवात करू.)

आण्विका, हा बोल.

ईशान, मंदिर मस्त आहे ना.

आण्विका, हो आहे की.

ईशान, खूप जुने आहे.

आण्विका, हा.

ईशान, खूप मोठी यात्रा भरते इथे.

आण्विका, हो काय बर.

ईशान, आ..

आण्विका, हे सांगायला इथे थांबलोय का आपण.

ईशान, नाही,मी तुझ्याशी काही तरी माझ्या मनातल बोलणार आहे.

आण्विका, बोल की.

ईशान, अनु तू इथे आलीस. साधं कळवले पण नाहीस, मी इतका वाईट आहे का?

आण्विका, नाही तू वाईट नाहीस. मीच आहे थोडी हट्टी.

ईशान, तू माझ्यावर सारखी रागवतेस का?

आण्विका, तू साधं माझा कॉल घेत नाहीस. की रिप्लाय साधा देत नाहीस.मग काय करू. असशिल कुणाच्यातरी प्रेमात पडलेला. मी कशाला उगाच तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू.

ईशान, हे बघ माझ्या आयुष्यात अस कोण नाहीये. व लग्नाचं म्हणत असशील तर मला एक मुलगी आवडते. पण तिला मी आवडतो की नाही हे मला माहीत नाही.

आण्विका, विचारून बघ. तिला.

ईशान, ती जरा जास्तच शिकलेली आहे. व गोरी आहे मी सावळा तिला आवडेल की नाही कुणास ठावूक.

आण्विका, तुझं तूच ठरवतो आहेस. विचारून बघ तरी.

ईशान, अन् ती नाही म्हणाली तर…

आण्विका, बोलून तरी बघ…. (मनात)बोल की साधं प्रेमाचा इजहार करायला एवढा वेळ. अनु बाई लई स्लो प्रेम तुमचं.

ईशान, अस म्हणतेस.

आण्विका, हो बघ विचारून.

एका तेथील झाडाचं फुल तोडून तिच्या समोर धरून.

ईशान, बर…. अनु तू मला आवडतेस. व

आय लव यू.

आण्विका, हसते. काय रे, एवढे तीन शब्द बोलायला चार महिने घालवलेस तू.

ईशान, म्हणजे.

आण्विका, म्हणजे वाघाचे पंजे.

ईशान, म्हणजे मी तुला पसंत आहे.

आण्विका, हो. खरंच माजही तुझ्यावर प्रेम आहे.

ईशान खुश होतो. अरे म्हणजे मी उगाच घाबरून होतो. खरंच अनु आय डोन्ट बिलिव्ह धीस.

आण्विका, हो, माझं ही तुझ्यावर प्रेम आहे.

तो आनंदाने तिला मिठी मारून उचलून धरतो.

ते खूप गप्पा मारतात.

ईशान, (घड्याळात बघत )

चल खूप वेळ होतोय. जेवायला जाऊ.

आण्विका, अस वाटतंय की असच बोलत बसावं.

ईशान, मॅडम रात्र खूप होतेय. चला नाहीतर उपाशी झोपाव लागेल.

आण्विका, बर….

ती बाईक वर बसून निघतात.

…… ……. ……. ……

Night. ९.०० o’clock. हॉटेल राधानगरी. Inter

ते हॉटेलमध्ये जातात.

ईशान, बोल काय खाणार.

आण्विका, तूच सांग तुझ्या आवडीच.

ईशान, मेनू कार्ड पाहू लागतो.

इतक्यात वेटर येतो.

वेटर, बोला सर, काय ऑर्डर आहे.

ईशान, हे बघ नॉनव्हेज मटण करी थाळी दोन दे.

वेटर ऑर्डर घेऊन निघून जातो.

ईशान, बर आणखी काय हवय डॉ. मॅडम.

आण्विका, मॅडम कशाला म्हणतोस. अनु म्हणत जा. ते दवाखान्यात असल्यासारखं वाटत.

ईशान, बर, अनु. अनु सांग कशी आहे आमची राधानगरी.

आण्विका, मस्त आहे. एकदम थंडगार.

ईशान, हो आहेच राधानगरी कोल्हापूरच हिलस्टेशन. व शीतगृह सुद्धा.

इतक्यात जेवण येते.

जेवत.

आण्विका, शीतगृह म्हणजे.

ईशान, हे बघ कोल्हापुरात काम करून त्रासलेले लोक, जे जास्त गरम होतात. त्यांना थंड करण्यासाठी .

आण्विका, हो का, मग तू ही कोल्हापुरातीलच आहेस. माहित आहे ना.

ईशान, हो.

ईशान, तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे ना.

आण्विका, हो. का.

ईशान, नाही विचारलं. सहज.

आण्विका, त्यासाठी काय परीक्षा वगैरे घेणार आहेस का.

ईशान, नाही. तुला सांगू, आज माझ्या जीवनातील अत्यंत लकी दिवस आहे.

आण्विका, हो का.

ईशान, तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केलेला दिवस.

आण्विका, उगाच हरबऱ्याच्या झाडावर चढवू नकोस.

ईशान, नाही खरंच. मला तू शाळेत असल्यापासूनच आवडत होतीस.

आण्विका, हो म्हणूनच फुटबॉल मारला होतास का?

ईशान, ते चुकून झालं होत. खर सांगायचं म्हणजे तुझ्यापेक्षा मी भरपूर दुःखी होतो. त्यावेळी.त्या प्रसंगाने आपण दुरावलो.

आण्विका, हो.

त्यांच्यात खूप चर्चा चालते

तिथे काही कॉलेजच्या मुली जेवणासाठी आलेल्या असतात. ज्या कृषी विभागा तर्फे सर्वे करायला आलेल्या असतात.

त्या जेवण करून निघालेल्या असतात.

त्यातील ज्योती, एखदासा झाला बाई प्रोजेक्ट पूर्ण.

श्याल्मली, हो तर त्या फॉरेस्ट खात्यातील सरांनी मदत केली म्हणून बर.

वैशाली, अग, ते बघ, तेच सर ना.

ज्योती, अग ,हो तेच की ईशान सर.

मयुरी, अग त्यासोबत कोणतरी आहे.

श्याल्मली, अग मघाशी त्याच्याशी बोलण जास्त झालं नाही. फोटो पण घेतला नाही.

वैशाली, अग, मग बघताय काय चला.

त्या ईशान व अण्विका जवळ येतात.

ज्योती, अहो, ईशान सर तुम्ही. पुन्हा भेटून आनंद झाला.

ईशान, तुम्ही इकडे.

ज्योती, प्रोजेक्ट पूर्ण झाला म्हणून छोटीशी पार्टी करत होतो.

ईशान, हा.

वैशाली, सर तुमच्या मुळेच आमचा प्रोजेक्ट पूर्ण झाला.

श्याल्मली, तुम्ही छान औषधी दुर्मिळ वनस्पतीची माहिती आम्हाला दिली.

मयुरी, सर एक छानसा सेल्फी घेऊया.

ईशान, हा का नाही.

ईशान त्यांच्या सोबत शेल्फी घेतो.

त्या बाय करून निघतात. अनु चिडलेली असते. ती जेवण आटोपते व बाहेर येते. ईशान बिल पेड करून आपल्या गाडीजवळ येतो.

अनु रागावून आल्याचे जाणवते.

ईशान, काय झालं.

रागाने अनु

त्यांसोबत शेल्फ काढायला वेळ मिळतो, माझ्यासोबत साधा फोटो शेअर करायला वेळ नाही मिळत. साधा फोन रिसिव्ह करत नाहीस

ईशान, अग , मेसेज पाठवतो की मी.

आण्विका, हो का, काय ते मेसेज तेच तेच मेसेज वाचून विट आलाय नुसता. अभयारण्य एक सहल, या राधानगरीत एकदा, आणखी काय तर हा, हा पाहा रम्य धबधबा.

तुला दुसर काही येत नाही का? तेच तेच मेसेज .

ईशान, अग छान आहेत, म्हणून पाठवतो. जंगल प्राणी वगैरे.

आण्विका, तू अन् तुझे प्राणी ठेव बाजूला. मी कधी तुला एवढी डॉक्टर आहे म्हणून कधी टॅबलेटचे व औषधांचे फोटो पाठवले का?

एखादी मुलगी आपले मॅसेज वाचणार म्हटल तर काहीतरी अस प्रफुल्लित काहीतरी प्रेमाचं वगैरे पाठवायचे. का ते माकडांचे फोटो, गव्याचे फोटो.

ईशान, अग एवढं तापायला काय झालं.

आण्विका, तापू नाहीतर काय करू. माझ्या सोबत एक फोटो तरी आहे का. त्या कोकणात देखील तसच.

ईशान, हे बघ शांत हो. इथून पुढे फक्त तुझ्या बरोबरच फोटो घेईन म्हणजे झालं. अन् वाटलाच फोटो काढायचा तर तुला विचारल्या शिवाय काढत नाही. म्हणजे तर झालं.

आण्विका, हा असच झालं पाहिजे.

ईशान, बर, खूप वेळ होतोय. निघुया का?

आण्विका, हा चला.

ते निघतात.

त्याच वेळी घोंगडी घेऊन काही तस्कर जेवायला तिथे आलेले असतात. त्यांना ईशान अण्विका सोबत निघताना दिसतो.

त्यातील एक, हा फॉरेस्ट ऑफिसर ना.

दुसरा, हो.

पहिला, लक्ष ठेवा.

दुसरा, जी .

पहिला, चला आता,

 जेवायला. ते जातात.

….. ….. …… …..



कळत नकळत जुळले हे बंध भाग २७

 कळत नकळत जुळले हे बंध भाग २७


Day. afternoon. २.०० o’clock.

डॉ. श्वेता व अण्विका या मार्केटमध्ये काहीतरी विकत घेत असतात. त्यावेळी ईशान सुट्टीचा दिवस असल्याने घरचे काही साहित्य भरण्यासाठी तिथे आलेला असतो. आण्विकेला तिथे पाहतो. व डॉक्टर मॅडम सोबत असल्याचे त्याला दिसते.

ईशान जवळ जातो.

ईशान, नमस्कार डॉक्टर मॅडम.

डॉक्टर श्वेता, अरे ईशान सर, काय , कसे आहात. आज सुट्टी का.

ईशान, हो. खरेदी जोरात चाललेय.

डॉ, श्वेता, हो थोडे पाहुणे येणार आहेत. त्यामुळे घरात लागणारे रोजचे सामान घेते.

बर तुझी ओळख करून देते. हा या नवीन डॉक्टर आहेत. इंटरशिप साठी जॉईन झाल्यात कोल्हापूरच्या आहेत. अन् बर का मॅडम हे ईशान सर. फॉरेस्ट खात्यात असतात.

ईशान, माहित आहे यांच्याबद्दल.

 तो रागाने अन्विकेकडे पाहतो.

ईशान, बर मॅडम येतो. असे सांगून तो जाताना मॅडम साहित्य घेताना पाहून अन्विकाकडे पुन्हा नजर टाकतो. व आपले बिल भरून निघून बाहेर पडतो.

आण्विका त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागते.

ईशान बाहेर पडतो व आपली गाडी स्टार्ट करतो. त्याला इतकं चीडलेल तिने पहिल्यांदाच पाहिलं होत. तिला खूप वाईट वाटत होत.

इतक्यात मॅडम, हा डॉ. आण्विका म्याम बघा साहित्य नीट आहे का?

आण्विका भानावर येते. व साहित्य पाहू लागते.

Cut. To ……

……. ……. ……. …….. ……..

Day evening ४.०० o’ clock

ईशान आपल्या रूमवर आल्यावर रागाने आपल्या शासकीय निवासस्थानी आल्यावर गाडी पार्क करतो. व रागाने साहित्य आपल्या आतील टेबलवर ठेवतो. व लगेच फोन स्वप्नीलला करतो.

स्वप्नील फोन उचलतो.

हा बोल ईशान,

ईशान, काय बोलू, तू सगळ नीट करतो म्हणालास. अन् तिकडे पळालास.

स्वप्नील, काय झालं एवढ चिडलायस का?

ईशान, मॅडम इकडे राधानगरीला आलेत. इथे इंटरशिप करताहेत.

स्वप्नील, मग भारीच आहे की. कधी जॉईन झाली. मला माहित पण नाही.

ईशान, छान म्हणजे घरातील माणूस कुठे आहे. याची जराही कल्पना नाही म्हण की. उद्या लग्न करेल कुणाशी व मग म्हणशील मला कळलेच नाही काय.

स्वप्नील, अरे खरंच नाही माहित. पण जरा ऐक चिडू नकोस. अरे उलट बरच आहे की. ती तिथे आहे. भेटशील की तिला. फ्री मध्ये

ईशान, अरे मला साधं कळवाव देखील वाटल नाही का? अस का करतेय ती. का मला टळतेय

स्वप्नील, हे बघ बघतो मी. होईल नीट, खूपच ताणलेय हे.

ईशान, मला काही सुचेनासे झालंय. काहीतरी कर. मघाशी तिला पहिल्यापासून वेड लागायची पाळी आलेय.

स्वप्नील, ठीक आहे बघतो काहीतरी. लई टेंशन घेऊ नकोस.

ईशान, नको, आतापर्यंत तुझ्याच भरोषावर होतो. आता नाही राहणार. मीच बघतो.

व तो फोन ठेवतो.

…… …… ….. …

Night. डॉ. वाघवेर यांच्या घरी. Inter डायनिंग टेबलवर. त्यांची फॅमिली जेवत असते.

त्यांची पत्नी जेवण वाढत असते.

डॉ. वाघवेकर यांचे वडील, वा.. मस्त झालेय जेवण. कोणी बनवले.

श्वेता डॉक्टर, मी व डॉक्टर अण्विका मॅडमनी.

वडील, मस्त जादू आहे हातात.

श्वेता, आवडल.

वडील, हो. कुठे आहेत त्या.

श्वेता डॉक्टर, त्या होय. गेल्या मघाशी.

सासू, अग जेवायला थांबवायचं नाही.

श्वेता, किती मिनत्या केल्या. ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी डबा दिला.

डॉ. वाघवेकर: अग जाऊ द्यायचं नाहीस तस.

श्वेता वाघवेकर्, काही नाही. ती जरा डोके दुखतेय म्हणाली. व विश्रांती हवीय. म्हणून. व सारं आटपून निघाली होती. मी मग जबरदस्ती डबा भरून दिला.

व त्या गेल्या.

Cut to…..

……. …..... ……, …….

Night. inter ९, o’ clock

आण्विका जेवण करते. जेवतेवेळी

 तिचे लक्ष लागत नव्हते. ती आपले कसेबसे आटपते. व आपल्या अंथरुणावर झोपायला जाते.

अंथरुणावर पडल्यावर तिच्या मनात अनेक प्रश्न उमटतात.

आण्विका, माझं काही चुकतय का? की मी उगाच टाळतेय त्याला? की रुसलोय. काय करू. तो चिडला तर नसेल ना.

आण्विका रेवाला फोन लावते.

रेवती, हा बोला मॅडम.

आण्विका, झोपलीस काय?

रेवती, नाही अजुन थोड काम आहे. लिखाणाचं ते करतेय. का ग.

आण्विका, काय सांगू असे म्हणून ती सर्व हकीकत सांगते. तिचे बोलणे झाल्यावर

रेवती, अग त्याने कित्येक मेसेज केले. तू त्याला रिप्लाय दिला नाहीस. लग्नात पण वेदीच्या काही जास्त बोलचाल केली नाहीस. वरती रुसून बसलीस तूच. मग काय ठरवलेस तू की दुसर स्थळ बघुया.

आण्विका, माझं मलाच कळत नाही. काय करावे ते. त्याला एकदा पण माझं प्रेम दिसत नाही. काय झालंय प्रपोज करायला.

रेवती, अग सगळी माणसं तशी नसतात. मग तुला काय झालंय विचारायला. तो सरळ चांगला मुलगा. उगाच तू जास्त ताणू नकोस. आता बघ एक दिवस भेटून काय म्हणतो ते.

आण्विका, स्वारी जास्तच चिडलेय.

रेवती, मग काढ की समजूत.

आण्विका, बर.

ती फोन ठेवते. लाईट ऑफ होते.

……. …….. ……


कळत नकळत जुळले हे बंध भाग २६

 कळत नकळत जुळले हे बंध भाग २६

Night. राधानगरी क्वाटर. ९.३०

आण्विका जेवलेला डबा धुवून ठेवत असताना.

तिच्या रूममध्ये जाधव नर्स येतात.

जाधव नर्स, अण्विका मॅडम ओ अण्विका मॅडम.

आण्विका, काय हो जाधव बाई.

जाधव मॅडम, काही नाही जेवला काय.

आण्विका, हो आताच जेवले, डब्बा धुतेय.

जाधव नर्स, आज वेळ झाला.

आण्विका, अचानक एक पेशंट आला. सर पण नव्हते. त्यामुळे जरा वेळ झाला.

जाधव नर्स, त्या दुसऱ्या डॉक्टराना थांबाय सांगायचं.

आण्विका, ते त्यांना सलाईन तरी नीट लावता येत का? उगाच रिस्क कशाला?

जाधव नर्स, शायनींग मारायला येते की मस्त.

आण्विका, त्यासाठी काय बुद्धी लागते.

जाधव नर्स, ते पण खरंच की. तुम्हाला सांगू.

आण्विका, बोला की.

जाधव नर्स, आजवर मी कित्येक डॉक्टर पाहिले. पण तुमचा स्वभाव अत्यंत मस्त आहे. पहिल्या पहिल्यांदा वाटल. की तुम्ही एक असाल साधारण डॉक्टर. पण तुम्ही आठ दहा दिवसात संपूर्ण स्टाफ मध्ये एक वेगळीच जागा निर्माण केलीय. मोठे डॉक्टर तुमचे कौतुक करत असतात.

आण्विका, काय म्हणतात.

जाधव नर्स, की तुम्ही किती हुशार आहात. ही मुलगी एक सर्जन होण्याच्या पात्रतेची आहे. वगैरे. वगैरे.

आण्विका , हो का?

जाधव नर्स, हो खरंच सांगतेय.

त्यांनी तुमचे कसब परवा ऑपरेशनच्या वेळी पाहिले होते.

आण्विका, बर.

जाधव नर्स, मॅडम लग्नाचं काही चालू आहे का?

आण्विका, का हो.

जाधव नर्स, तस नाही, जर का असेल तर एखाद स्थळ बघायला.

आण्विका, नाही अजून.

जाधव नर्स, नाही तरी काय अपेक्षा आहेत.

आण्विका, तस काही नाही.

जाधव नर्स, एक स्थळ आहे.

आण्विका, काय.

जाधव नर्स, अहो ते जोगळेकर डॉक्टर आहेत ना. त्यांनी मला विचारलं होत. की मॅडमना माझ्या विषयी विचार म्हणून.

आण्विका, काय?

जाधव नर्स, हेच की लग्नाच.

आण्विका, तो खिडमिडित ना.

जाधव नर्स, हो.

आण्विका, अहो, त्याला साधंसुध मेडिकल मधल म जमत नाही. परवा तर त्या एका पेशंटला ओवर डोस इंजेक्शनचा दिला होता. मी ऐनवेळी पाहिलं व त्यावर उपचार बदलले म्हणून बर. नाहीतर ती बाई गेली असती ढगात. अन् लग्नाचं सोडा. जवळ तरी कोण उभा करून घेईल का त्याला? कसा वागतो तो. पाहिलंय ना? वेंधळाच आहे. तरी म्हटल हा सारखा माझ्यापुढे केसातून हात का फिरवत असतो सारखा. असं आहे होय.

जाधव नर्स, बोलशीला त्याला.

अण्विका, छे.

जाधव नर्स, मग कोण आहे का मनात.

आण्विका, तिला सांगणार इतक्यात आपल्या मनात,

आपल प्रेम अस उघड्यावर सांगणं योग्य नाही. नाहीतर नाहक बदनामी पदरात पडायची.

आण्विका, तस काही नाही. व लग्नाचा विचार तूर्त तरी नाही माझ्या मनात.

इतक्यात कोणाची तरी हाक येते.

जाधव नर्स, आले आले.

नर्स बाहेर पाहते. तिचा मुलगा हाक मारत असतो. ती निरोप घेते.

नर्सबाई गेल्यावर अनु आपल्या अंथरुणावर पहुडत. व मोबाईल मध्ये पाहत व्हॉट्स अँप डी पी पाहू लागते. ईशानचा फोटो पाहत.

आण्विका, काय माझी आठवण येत नाही तुला. किती छळतोस मला. किती दिवस झाले साधा फोन करत नाहीस. की मेसेज नाही

 का रागवलास माझ्यावर. अस काय किती आणि तडफवणार.

असे ती बोलू लागते.

Cut to…

…… ……. …… ….....

दोन दिवस नंतर

Evening. डॉक्टर वाघवेकर यांची केबिन.

डॉक्टर वाघवेकार यांना फोन येतो. त्यांच्या घरी पाहुणे येणार असतात.

त्यांच्या वडिलांनी फोन केलेला असतो.

डॉ वाघवेकर, बोला बाबा,

बाबा, अरे संजू उद्या येतोय आम्ही संध्याकाळी. तिकडे. जरा तिची पण हवापालट होईल. डॉक्टरनी सांगितलय. जरा बाहेर फिरवून आणा म्हणून. तर आम्ही येतोय.

डॉ. वाघवेकर, हा चालेल की.

ते फोन ठेवतात. व आपल्या बायकोला जी याच ठिकाणी डॉक्टर असते तिला बोलवायला नर्सेला सांगतात.

डॉक्टर, पाटकरबाई जरा श्वेता मॅडम ना बोलवा.

पाटकर बाई जाऊन निरोप देते.

श्वेता मॅडम येतात.

कशाला बोलावलंय.

डॉ, वाघवेकर, काही नाही फक्त तुमचे सासरे येणार आहेत. त्यांना तुमच्या हातच्या चवी रवीच खायची इच्छा झाली आहे. तेव्हा उद्यापासून स्वयंपाक नीट असावा.

श्वेता वाघवेकर, बापरे, अहो आधी नाही का सांगायचं. मी स्वयंपाक वालीला दोन दिवस सुट्टी दिलीय. आता कसं करायचं.

डॉ. वाघवेकर, बघ आता काय ते. आम्ही काही मदत करू शकत नाही. हा उद्या जरा मस्त बेत होऊ दे. बघ कोणतरी दोन दिवसासाठी.

डॉ. वाघवेकर, तुम्ही पण आधी सांगायला काय होत तुम्हाला. आता येणं वेळी कामवाली कुठून मिळायची. हे काय कोल्हापूर आहे. जे पार्सल आणून कामे चालवायला.

त्या डोक्याला हात लावून बसतात

इतक्यात राऊंड वरून अण्विका तिथे येते.

आण्विका, काय झालं मॅडम.

श्वेता वाघवेकर मॅडम, काय सांगू तुम्हाला मॅडम, ही डॉक्टरकीची जबाबदारी पार पाडत घर सांभाळन एक तारेवरची कसरत आहे. उद्या अचानक सासू व सासरे येत आहेत. त्यांची उस्तवारी करताना मला एवढा त्रास होतो मॅडम. त्यात मला जास्त जेवणातल जमत नाही. व सासरे व सासू बाहेरचं काही खात नाहीत. दोन दिवस त्या कामवालीला सुट्टी दिलीये. आता हे दोन दिवस कसे काढायचे याचंच टेन्शन आलंय. त्यात साधं चपाती भाजी असत तर चालले असते. पण साहेबांनी लगेच ऑर्डर खास जेवणाची दिलीये. व काही करून जेवण करायलाच हवं. काय करू. दोन दिवसात अशी सुगरण कोण मिळेल.

आण्विका, एखाद्या नर्स बाईना सांगा की.

डॉ. श्वेता वाघवेकर, नको बाई, त्यांचे नखरे पाहिलेत मी. काम कमी अन् उसाभर जास्त. व त्यांना सांगणं देखील ओक्कवर्ड वाटत.

आण्विका, बर कधी येणार आहेत.

श्वेता मॅडम, उद्या संध्याकाळी.

आण्विका, ते व्हेज आहेत का?

श्वेता मॅडम, नाहीत. म्हणजे दोन्ही मासाहार करतात ते.

आण्विका, मग उद्याच्या फक्त जेवणासाठी मी करेन मदत. परवाच तुमचं तुम्ही बघून घ्या.

श्वेता, खरंच. देव पावला म्हणायचं.

आण्विका, चपात्या तरी जमतील ना.

श्वेता, ते तू सोड माझ्यावर.

आण्विका, किती जण जेवायला असतील.

श्वेता असतील आठ नऊ लोक. म्हणजे सगळे धरून हा?

आण्विका, मग मी सांगते ते साहित्य आणा.

थांबा टिपण देते.

आण्विका टिपण काढून देते.

श्वेता वाघवेकर, चालेल. त्यापेक्षा उद्या या वेळी जाऊ की आपण दोघी. तशी उद्या सुट्टीच आहे ना.

आण्विका, चालेल. या मग रूमवर तुम्ही.

श्वेता वाघवेकर, चालेल. लई भारी , सुटल्यासारख वाटल. पण तुला जमेल ना.

आण्विका, अहो कोल्हापूरची आहे मी कोणत्याही कामात उजवीच असणार.

श्वेता , मग आज माझ्याकडून ट्रीट तुम्हाला.

आण्विका, काय.

श्वेता, थांबा आताच आणते मी नाष्टा.

व ती निघते.

त्या गेल्यावर

पाटकर नर्स, मॅडम जमेल ना, कारण तिची सासू लई खास्ट आहे.

आण्विका, तू बघच तिची सासू दोन दिवस बिर्याणीत लोळेल त्या.

पाटकर नर्स, बोलाय ऐकत नाही तुम्ही.

त्या दोघी हसू लागतात.

…… …… …

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


कळत नकळत जुळले हे बंध भाग २५

 

कळत नकळत जुळले हे बंध भाग २५


Day evening. कॅफे हाऊस

आण्विका व संयोगिता दोघी कॅफे हाऊस मध्ये एका टेबलवर बसून कॉफी घेत आहेत.

संयोगिता, तुझी काही हरकत नसेल तर एक विचारू.

आण्विका, विचार. ( पुढ्यात कॉफित चमचा फिरवत.)

संयोगिता, माझ्यापासुन तू काही गोष्टी लपवल्या आहेस. अस मला वाटत.

आण्विका, काय लपवलेय.

संयोगिता, ईशान तुझ्या एवढा क्लोज कसा.

आण्विका, काही नाही. बोलतो आम्ही त्यात काय नवीन.

संयोगिता, शाळेत असताना साधं बोलण देखील नव्हत तुमच्यात. अन् ..

आण्विका, अन् काय..

संयोगिता, आज मी पाहिलं एखाद्या प्रियकरा सारखं त्याच वागणं मला जाणवलं.

तुझं व त्याच प्रेम वगैरे नाही ना.

आण्विका, अस काही सांगता येत नाही मला. माझं मलाच काही कळेनास झालंय.

संयोगिता, तुझी व त्याची मुलाखात कशी झाली? इतक्या क्लोज कसे काय आलाय तुम्ही.

आण्विका सगळी हिस्ट्री सांगते. ते कसे भेटले वगैरे.

आण्विका, अस आहे बघ, त्याने मला विचारायला हवं. खर सांगायचं तर मला आवडतो तो. पण प्रपोज करत नाही तो मला.

संयोगिता, हे बघ तू आहेस डॉक्टर, व तो फॉरेस्ट खात्यात. तस तुमचं क्षेत्र जरी भिन्न असल. तरी जुळवून घेतल पाहिजे. तस पाहता तो तुझ्यासाठी योग्य वर आहे. अस मला वाटत. मी त्याला लहानपणापासून पाहत आलेय. तो खूप कष्टाळू, प्रामाणिक, जिद्दी व धाडशी मुलगा आहे. रंगानं सावळा जरी असला तरी स्मार्ट व देखणा आहे. शिवाय नोकरी पण चांगली आहे. माझं मत आहे की तू हा चान्स सोडू नकोस. लग्न कर त्याच्याशी.

की कुठला डॉक्टर बघुया?

आण्विका, नाही नको, मला तोच हवा. पण घरात कसं सांगू.

संयोगिता, हे बघ तुझं आधी ठरव. तळ्यात मळ्यात असं काही नको. आण्विका, मी स्टेडी आहे ग. पण त्याने मला प्रपोज करायला नको काय?

संयोगिता, अग तो धाडशी असला. तरी या बाबत शंभर पावले मागे आहे. अन् तो येईल प्रपोज करेल याची वाट पाहत राहिलीस तर झालं लग्न.

मग बस म्हातारी होईपर्यंत वाट पाहत.

आण्विका, हा,.. मी बसते, बघच तू.

संयोगिता, ए लई तानू नकोस तुटेल.

आण्विका, ही सोन्याची तार आहे. ताणली तरी तुटायची नाही. काय?

संयोगिता, तोपर्यंत दुसरी कोणतरी येवून तार तोडायची व घेऊन जायची त्याला.

मगाशी ध्यानात आलं नाही का?

आण्विका, काय.

संयोगिता, आजू बाजूला पाहिले नाहीस, करवल्या कशा मिरवत होत्या.त्याच्या बाजूला, अन् ते एड बांबू त्याच्या ध्यानात नाही आलं. तू जशी तसाच तो. एक दुजे के लिये.

आण्विका, एकदा त्याने प्रपोज करू दे. बस मला.

संयोगिता, हे बघ, तुला मी हे प्रकरण जुळवायला तीन महिने मुदत देते. यात जर तुझं व त्याचं जुळल नाही. तर मी स्वतः साखर घेऊन जाईन तुझ्या बाजूने बोलणी करायला. कळलं काय?

आण्विका, हो बाई कळलं, चला कॉफी घ्या, थंड होईल.

त्या कॉफी घेतात व निघतात.

….. ….. ….. ……

काही दिवसानंतर

Day. राधानगरी ग्रामीण रूग्णालय. Outer inter

आण्विका आपल्या भावासोबत राधानगरी रुग्णालय आवारात टू व्हीलर वरून येते.

तिथे ती दोघे रुग्णालयात जातात. आत गेल्यावर

 आण्विका, (तेथील एका नर्सेला)

संजय वाघवेकर यांची केबिन कुठे आहे?

नर्स, हा तिकडे जा त्या बाजूला गेल्यावर लेफ्ट वळा तिथून पाच नंबर केबिन. तिथे पाटी आहे.

आण्विका, थ्यांकस.

आण्विका रुमजवळ जाते.

आत ते एक पेशंट तपासणी करत असतात.

आण्विका, थोडा वेळ बाजूला थांबते. व आत जाणाऱ्या नर्सकडे एक लेटर देते.

आण्विका, हे येवढं सरांना द्या.

नर्स आत जाते.

डॉक्टर पेशंट चेक करून आपल्या जागेवर येतात.

पेशंटचे सोबत आलेल्या मेंबरला.

काही जास्त काळजी करायचं काम नाही. औषध लिहून देतो. ती वेळेवर घ्या.

बाई वय काय तुमचं.

पेशंट, असल की पस्तीस चाळीस.

डॉक्टर, मसेरी लावता ना.

बाई, व्हय.

डॉक्टर, मग बंद करा ती. नाहीतर पोटात ढेप होईल.

बाई, काय करू मग साहेब. मला इंग्लिश पेस्ट आवडत नाही.

डॉक्टर, आवडत नसेल तर आवड निर्माण करा. व ते जमत नसेल तर आयुर्वेदिक पावडर मिळते की. बाजारात ती लावत जा.

बाई, माग आणली व्हती मालकानं तांबडी पावडर. खर तोंड लई जळत तेन.

डॉक्टर, मग सॉफ्ट पावडर लावा.

तिच्या नवर्याला, हे बघा मिस्री लावण चांगल नाही. मी एक पावडर लिहून देतोय ती घ्या.

पेशंटचा नवरा, बर.

डॉक्टर औषध लिहून देतात. ती चीठ्ठी घेऊन ती दोघे निघतात. तोपर्यंत नर्स लिफाफा देते.

तो घेऊन

डॉक्टर, तो लीफाफा खोलून वाचतात.

डॉक्टर, (नर्सेला) मॅडमना आत लावून दे.

नर्स जाऊन बोलावते.

नर्स मॅडम आपल्याला बोलावलं आहे.

आण्विका आत जाते.

आण्विका, गुड मॉर्निंग सर.

डॉक्टर, या बसा. मला प्राचार्य सरांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलय तुमच्या बद्दल. चालेल कधी जोईन होताय.

आण्विका, उद्या पासून होते. बर राहण्याची सोय कुठे होईल.

डॉक्टर, तशी सोय नाहीये पण एक रूम अड जेस्ट होईल. इथे जवळच एक नर्स जॉईन झालीय. तिच्या क्वाटरमध्ये अडज्येष्ट होईल.

डॉक्टर, (एका वार्ड बॉयला) अरे , जरा जाधव नर्स बाईना बोलावं.

तो जातो थोड्याच वेळात जाधव नर्स येते.

जाधव नर्स, बोला सर.

डॉक्टर, जाधव बाई तुमच्या क्वार्टर च्या मागील बाजूची रूम या मॅडम ना द्या. या आपल्या इथे नवीन टेम्पररी डॉक्टर म्हणून रुजू झाल्या आहेत.

त्यांची राहण्याची सोय पण होईल. व तुमच्या शेजारी असल्याने तुम्हाला सोबत देखील होईल. बर त्यांना रूम दाखवा.

जाधव नर्स, चला मी दाखवते.

जाधव मॅडम त्यांना रूम दाखवणेस नेते.

आण्विका रूम पाहते.

बाथरूम हे सेपरेट असल्याने त्या दोघींना सोईचे असते.

जाधव बाई, केव्हा जॉईन होणार.

आण्विका उद्या होईन.

जाधव मॅडम, बर विचारायचं म्हणजे, जेवणाच काय करणार.

आण्विका, म्हणजे,

जाधव मॅडम,बनवून खाणार की डबा लावणार.

आण्विका, डबा लावेन, कारण एकट्या साठी करण्यात वेळ जाऊ शकतो. व तोच वेळ मी माझ्या इतर कामासाठी वापर करू शकेन, म्हणजे अभ्यास इतर प्रोजेक्ट.

जाधव नर्स, मग आहे इथे एक मेस. एक आजीबाई चालवतात. त्या देतात डब्बा, चांगली आहे, मस्त घरगुती जेवण मिळत तिथे. एका महिन्याला दीड हजार द्यावे लागतील.

आण्विका, चालेल.

आण्विकेचा भाऊ, भेटून घेऊया का?

आण्विका, दाखवा कुठे आहे ती.

नर्स खाणावळ दाखवते.

तिथे एका आजीचे शेजारीच घर असते. आजी जेवण बनवत असते.

जाधव नर्स, मावशी अहो मुकता मावशी,

मुक्ता मावशी, कोण आहे.

त्या बाहेर दरवाजा जवळ येतात.

आजी, कोण जाधव बाई, बोला काय काम होत. डबा हवाय काय.

जाधव नर्स, मला नको आज डबा, मावशी या नवीन डॉक्टर मॅडम आहेत. यांना जेवणाचा डबा लावायचा आहे.

आजी, एका महिन्याला पंधराशे घेते. मी, घरगुती जेवण असत.

आण्विका, काय काय मेनू असतो?

आजी, रोजचंच, चपाती भाजी भात आमटी, गुरुवारी गोड खीर देते. रविवारी फक्त मसालेभात असतो.

जेवण पाहणार असाल तर बघा.

आण्विका आत जाते, तेथे एक डबा भरलेला असतो. आजी डबा खोलून जेवण दाखवते. अनुला आवडते. ती लगेच खाणावळ ठरवते.

तिथली आजी, कधी पासून डबा द्यायचा.

आण्विका, उद्या संध्याकाळ पासून द्या.

आजी, चालेल.

आण्विका तिथून निघते.

….. ……. ….

Next day. राधानगरी रुग्णालय,. Inter

आण्विका कामावर रुजू होते. ती प्रत्येक वार्ड नीट व्यवस्था लावत असते. तिथे काही तरुण डॉक्टर असतात.

एक डॉक्टर, मॅडम जास्त धडाडीच्या दिसतात.

दुसरा डॉक्टर, नवीन आहेत. तोपर्यंत.

पहिला डॉक्टर, पण नियोजन भारी करते.

दुसरा, तिच्याकडे एक डायरी आहे. काय नोंदवते ती.

पहिला, काय माहित, काय तरी असेल. बघू कळेलच थोड्या दिवसात.

….. ……. …

nishmarathishortfilmskrift1983


Tuesday, January 2, 2024

कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४

 

कळतं नकळत जुळले हे बंध भाग २४


Day outer inter मॅरेज हॉल. कोल्हापूर

ईशान व स्वप्नील बुलेट वरून मॅरेज हॉल वर येतात. त्यांना पाहून अनेकजण त्याकडे पाहत असतात.

स्वप्नील आपले व त्याची भेटवस्तू घेऊन गाडीवरून उतरतो. ईशान ही उतरतो. व ते आतमध्ये हॉलकडे निघालेले असतात.

त्यांना पाहून

तिथे असणाऱ्या मुली त्यांना पाहून पुढ्यातून नखरे करत असतात.

ते हॉलमध्ये आल्यावर संयोगिताच्या जवळ जातात.

स्वप्नील, काय झाली की नाही तयारी.

संयोगिता, हो आलेय आटपत.

स्वप्नील, ताई कुठे आहे.

संयोगिता, कोण अनु

स्वप्नील, हो.

संयोगिता, आहे आतील बाजूस वेदांगीला नटवत आहे.

संयोगिता, काय ईशान आज लई चमकतोयास. काय बेत आहे.

ईशान, तुझं आपल कायतरी असते. साधा शर्ट तर घातलाय.

थोड्याच वेळात नवरा- नवरी मंडपात आणली जातात. अनुचे आई बाबा देखील येतात.

आण्विका तेथून जरा बाजूला संयोगिता जवळ येते.

आण्विका, काय बाई खूप उकडतंय नाही.

स्वप्नील, काय ताई नवरी पेक्षा तूच जास्त नटलीयास.

आण्विक, साधी साडी नेसलेय मी.

इतक्यात तिचे लक्ष इशानकडे जाते. तिच्याकडे पाहत तो हसू लागतो.

पण संयोगिता असल्याने ती डोळे मोठे करते.

थोड्या वेळाने अक्षता टाकू लागतात. गर्दी होते. अक्षता संपतात. गर्दी झालेली असते. त्याचा फायदा घेत ईशान आण्विकेच्या जवळ येतो.

ईशान, काय कशी आहेस.

आण्विका, आहे की बरी.

ईशान, मेसेज नाही , फोन उचलत नाहीस का? लग्न ठरल वाटत.

असे ईशान बोलताच ती चिडते.

आण्विका, हो पुढील म्होतुर माझाच आहे. माहित नाही. साधा फोन उचलत नाहीस. कोकणातून आलास साधं एका शब्दाने सांगितलं नाहीस. पोहोचलो म्हणून देखील फोन केला नाहीस. अन् म्हणे मी फोन उचलत नाही, मेसेज करत नाही.

ईशान, अग, तस नाही गावी गेलो तिथली कामे आटपून मग सुट्टीवर हजर झालो. तिथे कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचे काम यात व्यस्त होतो.

आण्विका, कारणे मस्त जमतात सांगायला. रात्रीच पण ट्रेनिंग असत वाटत.

ईशान, समजून घे मी कॉल केला होता. तुला.तूच उचलला नाहीस.

आण्विका, हो मी पण कामातच होते.

ईशान, बर ते सोड कशी आहेस.

आण्विका, कशी दिसते.

इतक्यात स्वप्नील तिथे येतो.

स्वप्नील, काय दीदी काय चाललय, ईशान लग्नाचं बघतोस की नाही.बघ आता या घोळक्यात कुठली करवली पसंत येते का ते.

ईशान त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतो. व गप्प राहण्यास खुणावत असतो.

तरी पण स्वप्नील जास्तच चेवाने,

आता बुलेट आणलीयास, निवड एखादी अन् जा घेऊन अंबाबाईच्या देवळात अक्षता टाकायला.

मी जाईन अणू दीदी बरोबर घरी.

हो की नाही दीदी.

आण्विका, हो जा की म्हणतोय ना तो शोध जा एखादी परी.

ते ऐकताच अनु चिडते. त्यात एक मुलगी तिथे लग्नाला आलेली आपल्या मैत्रिणी सोबत उभी असते. जी केव्हा पासून ईशानकडे पाहत असते. एक छानसा गुलाब घेऊन एका लहान मुलाला पाठवते. तो मुलगा तो गुलाब आणून ईशानला देतो.

ईशान, काय बाळ,

मुलगा, दादा त्या मावशीने हे तुम्हाला दिलेय.

तो तिकडे पाहतो. ती मुलगी हाय करते.

आण्विका ते पाहून चिडते. व रागाने तिथून निघते.

स्वप्नील तवा गरम झाला वाटत.

ईशान, तुला कळतच नाही. आधीच ती चिडलीय तिला शांत करत होतो. अन् तू ओतलास आगीत तेल. उडाला भडका.

स्वप्नील, रुसू देत रुसली तर, जात नाही कुठे? तू फक्त करवल्यांवर नजर फिरव म्हणजे तिकडे आणखीन जाळ होईल.

ईशान, नाही नको मला दुसर कोणी, मला फक्त तिच हवी. मी फक्त तिचाच.

स्वप्नील, वा, रे प्रभू रामचंद्रच ना तुम्ही, माझ्यासारखं राहा श्री कृष्णा सारखं. सगळ्या गोपिकांना खेळवून शेवटी ब्रह्मचारी.

ईशान अन्विकेच्या मागे मागे जाऊ लागतो. पण ती त्याला टाळत होती. तिला राग आला होता.

त्याला तिच्या मागे जाताना पाहून वेदांगीचे पाहूणे त्याला बाजूला बोलावून घेतात.

आकाश, काय रे लग्नाला आलास की पोरी पटवायला.

संग्राम, तुला काय आम्ही इथं नखरे करू देणार नाही.

सुयोग, काय रे काय चाललय तुझं.

ईशान, कुठे काय चाललय.

राजेश, तुला काय वेड वाटलाव काय.

ईशान, म्हणजे,

आकाश, तू त्या मुलीला का छेडतो आहेस.

ईशान, मी छेडत नाही, ती ओळखीची आहे माझ्या.

संग्राम, ये नाटक नकोत. लग्नाला आलास ना, जेव अन् सटक, तिच्याकडे बघू नकोस.

ईशान, ये तू वट, मागे जायचं की पुढे ते मी बघतो.

ते हमरी तुमारीवर येतात.

इतक्यात स्वप्नील तिथे येतो. त्यांना थांबवून बाजूला घेतो. शांत करून

स्वप्निल त्या पाहुण्यास, ये माझी बहीण आहे ती, अन् हा होणारा दाजी. काय हा आमच्या घरचा म्याटर आहे. आम्ही बघू. तू पाहूणा आहेस काय.

संग्राम, घरचा म्याटर घरात ठेवायचा इकडे कशाला आणायचा. चला रे.

ती निघतात.

ईशान, मी सरळ विचारतो तिला.

स्वप्नील, हे बघ शांत हो. मी बोलेन वेळ आल्यावर. जरा दम धर. लगेच गडबड नको.

मी सगळं सुरळीत लावीन.

चल ते गिफ्ट देवू अन् जेवून निघू.

ते जावून गिफ्ट देतात. व जेवायला जातात. जेवून तो पुन्हा वधू व वराना भेटून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. देतो.

 वेदांगी त्याकडे पाहते. व आपल्या मनात, खरंच हा आपल्या अनुसाठी योग्य वर आहे. व ती देवाला, परमेश्वरा ही जोडी अखंड राहू दे.

निरोप घेतल्यावर तो स्टेजवरून खाली येतो. आण्विकाकडे एक नजर टाकतो. तिची व त्याची पुन्हा नजरा नजर होते. व तो निघतो.

ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहते. ती अस्वस्थ होते.

त्यांचे हे चाललेले दृश्य संयोगिता पाहते. ती अन्विकेजवळ येते. चल गिफ्ट देवू व जेवायला जाऊ. त्या दोघी स्टेज वर जाऊन गिफ्ट देते. वेदांगी आपल्या मालकांशी ओळख करून देते. ती अनुला जेवण झाल्यावर थांबायला सांगते. थोड्या वेळाने संयोगिता अन्विकास जेवायला नेते.

तिथे तिचे जेवणात लक्ष नसते.

संयोगिता, काय ग लक्ष कुठे आहे तुझे.

आण्विका, काही नाही.

 संयोगिता, मग जेव की.

आण्विका, जेवू लागते. पण तिचे लक्ष नसते.

…… ……. ……

 Day evening. Outer लग्न हॉल

गाडी सजवलेली दारात येते. नवरा व नवरीला निरोप देतात. ती गेल्यावर संयोगिताचा नवरा गाडी घेऊन येतो. व तिला चलणेस सांगतो. ती मुलाना घेऊन जा. माझं जरा अनुकडे काम आहे. आम्ही दोघी येतो.

तो निघतो.

संयोगिता व अण्विका वेदांगीच्या घरच्यांचा निरोप घेतात.

संयोगिता, चल अनु मला घरी सोड.

आण्विका, बर चल.

त्या गाडीवर बसून निघतात.

…. …,. ……. …… ……

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


कळत नकळत जुळले हे बंध भाग २३

 कळत नकळत जुळले हे बंध भाग २३


Day morning अनविकाच्या घरी.

आण्विका स्वप्नीलसाठी नाष्टा घेऊन येते. ती नाष्टा त्याला देत.

आण्विका, तू आता येणार वेदांगीकडे.

स्वप्नील, आता येऊन काय करू. त्यापेक्षा मी थोडावेळ दादा सोबत राहतो. नंतर येईन अक्षताच्या वेळी. तोपर्यंत ईशान पण येईल. आम्ही दोघे मिळून येवू.

आण्विका, मला तर जायलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत. मगापासून फोनवर फोन येत आहेत मॅडमचे.

आण्विका,(मनात) याच्यासंगे बोलायला वेळ आहे. मी केलेला साधा फोन देखील उचलत नाही. नुसता भेटू देत.

इतक्यात ईशान अण्विकेस फोन करू लागतो. ती स्वप्निल असल्याने फोन घेत नाही.

स्वप्नीलला नाष्टा पाणी देऊन अन्विका आतील आपल्या खोलीत येते. फोन चेक करते. त्यावर इशानचा मिस कॉल आलेला दिसतो. (अण्विका मनात) आता आठवण झाली काय? भेट लग्नात बघतेच मी.

इतक्यात वेदांगीचा फोन येतो.

अग कुठे आहेस. ये की लवकर.

आण्विका, हा आले मॅडम.

आण्विका मस्त गुलाबी साडी नेसते. सुंदर पेहराव करून ती सर्वांना टाटा बाय करून आपली स्कूटी घेऊन निघते.

…… ……

Day. Outer कोल्हापूर सिटी मॉर्निंग ९.०० o’clock

एका चौकात संयोगिता वाट पाहत असते.

आण्विका स्कूटी घेऊन तिच्याजवळ येते.

संयोगिता, काय ग किती वेळ ?

आण्विका, काय करणार नाष्टा पाणी करून निघायला वेळ होणारच. अजून आहे भरपूर वेळ. चल.

संयोगिता, आधी गिफ्ट घेऊया.

आण्विका, मुले कुठे आहेत.

संयोगिता, क्लासला गेलेत. नंतर येतील पपांबरोबर लग्नाच्या वेळी.

बर आपण कुठे जायचे.

आण्विका, कुठे म्हणजे हॉल वर.

संयोगिता, वेदी चिढायची नाही.

आण्विका, तिला कालच कल्पना दिलीये मी. व आतापर्यंत पोहोचली देखील असेल.

चल बघू पुढल्या कॉर्नरला एखाद छानस गिफ्ट. त्यापुढे निघतात.

…… ……… ….

Day. Morning. Outer inter

त्या दोघी एका दुकानात जातात.

दुकानदार, बोला मॅडम काय घेणार.

आण्विका, एक छान गिफ्ट दाखवा.

तो वेगवेगळी गिफ्ट दाखवतो. डिनर सेट, टी सेट, अशी वेगवेगळी गिफ्ट दाखवतो.

त्या त्यातील एक गिफ्ट सिलेक्ट करतात.

संयोगिता, हा तो द्या. मस्त आहे. त्या दोघी खरेदी करून पॅकिंग करण्याआधी अण्विका थांबा म्हणते. व एकच मिनिट असे म्हणून बाहेर जाते.

पाच सहा मिनिटात ती परत येते. व त्या सेट मध्ये एक ड्रेस लहान मुलांचा, एक खेळणे, एक चोकन अन मनगटी लहान मुलांची एवढं घालून,

आण्विका, हा आता पॅक करा.

तो दुकानदार हसू लागतो. त्यासोबत संयोगिता देखील हसू लागते.

आण्विका, का, काय झालं एवढं हसायला.

संयोगिता, हे बघ जेव्हा हा संसार सेट उघडेल तेव्हा यामध्ये असणारे हे चोकण नवऱ्याला द्यायचं की नवरीला.

आण्विका, अग पुढल्या जोडणीची तयारी आहे ही. अँडव्हान्स मध्ये पुढे बारशाला जायला नको.

संयोगिता, वेदीचा चेहरा मात्र बघण्यासारखा असेल नाही.

आण्विका, हो बघण्यासारखा असेलच. चल थोडी गंमत करू.

त्या दोघी सेट खरेदी करून पॅकिंग करून बाहेर पडल्या. व संयोगिता तो सेट आपल्या पायात घेऊन निघाली. थोड्याच वेळात त्या लग्नमंडपात हॉल वर पोहोचल्या.

बाहेर स्वागत करण्यासाठी वधू व वराचे मामा उभारलेले होते. त्या थेट तिथून वेदांगी असणाऱ्या हॉल मधील रूम कडे निघाल्या.

….. ….. ……. ……..

Day. Inter कोल्हापूर ईशानच्या घरी

ईशान बाथरूम मध्ये जातो. स्नान करतो. आपले आवरतो मेकप करतो.

आपले कपड्यांचे कपाट उघडतो. मस्त एक ड्रेस निवडतो. व तो परिधान करतो. व त्यावर सुरेख सेंट मारून तो निघतो. आपली सुरेख बुलेट घेऊन तो निघतो.

गाडीवर असताना त्याला फोन कॉल येतो.

ईशान, (फोन उचलून) हा बोल की.

स्वप्नील, साहेब आवरलं की नाही.

ईशान, निघालोय गाडीवर आहे. कुठे आहेस.

स्वप्नील, मावशीकडे, मिनस अनु दीदीच्या घरी. इकडेच ये की.

ईशान, बर येतो.

थोड्याच वेळात ईशान अण्विकेच्या बंगल्याच्या आवारात येतो. तो आल्याचे पाहून स्वप्नील बाहेर येतो.

तो गाडीवरून,

चल की.

स्वप्नील, आधी घरात तरी ये. काय लाजतोस.

ईशान, बर,

स्वप्नील, साहेब एवढे नटून आलाय म्हणजे काय बेत आहे तुमचा?

ईशान, काय बेत म्हणजे, माणसाने काय अप टू डेट राहू नये काय.

स्वप्नील, पण मला तर वेगळच वाटतंय.

ईशान, ( हळू आवाजात) अनु आहे का?

स्वप्नील, ती लग्नाला गेली आहे. काही काम होत.

ईशान, नाही विचारलं.

स्वप्नील, दारातूनच काय चौकशी करताय. घरात तरी या.

स्वप्नीलचा आवाज ऐकून आतील खोलीतून अण्विकेची आई, स्वप्नील कोण आहे रे?

स्वप्नील, काही नाही पाहुणे आलेत. म्हणजे अनु दीदीचे मित्र.

ईशान, आतमध्ये येतो.

अनूची आई, बाहेर येत

कोण आहे.

ईशान, मी ईशान अनुचा मित्र. लग्नाला आलोय. वेदांगीच्या.

अण्विकेची आई, अनु आताच गेली लग्नाला थोडाच वेळ झाला.

बर चहा करते. बसा.

ईशान, नको कशाला उगाच

स्वप्नील, मावशी तू कर जा चहा.

अनुची आई आत चहा करायला जाते.

स्वप्नील, (हळूच) जावयाने लाजू नये सासुरवाडीत.

ईशान, अरे तिला फोन केला होता. तिने उचलला नाही.

स्वप्नील, कशी उचलेल. तू संपर्कात आहेस की नाही.

ईशान, अरे कामातून वेळ मिळेना. ड्युटी करून यायला उशीर होतो. कधी बोलणार. आजपासून थोडा फ्री आहे.

व त्यात मध्ये मोबाईल हरवला. काय करणार.

स्वप्नील, आजचा दिवस आहे तुला. बघ प्रयत्न करून.

इतक्यात ण्विकेची आई चहा घेऊन येते.

ती दोघे चहा घेतात.

अण्विकेची आई, तुझं गाव कोणत?

ईशान, मी कोल्हापूरचाच आहे. अनु माझी क्लासमेट.

अणुची आई, बर काय करतोस,

ईशान, फॉरेस्ट खात्यात आहे कामाला.

अणुची आई, आमची अनु पण आता डॉक्टर झालेय.

स्वप्नील, तसा मुलगा भरपूर शिकलाय. नोकरी पण आहे. बघा एखाद स्थळ तुमच्या ओळखीन.

स्वप्नीलकडे ईशान बघतो. स्वप्नील पाय मारतो पायावर.

अणुची आई, स्थळ होय. बघुया की. पण अपेक्षा काय आहेत.

स्वप्नील, तशा काही जास्त अपेक्षा नाहीत. पण असावी मुलगी साधी सरळ, शिकलेली व जेवणखाण जमणारी. घरात काय एक दोन माणसे. आई बाबा , व एक बहिण व हा सगळ्यांना सांभाळणारी असली तर उत्तमच काय ?

स्वप्नील त्याकडे डोळे मिचकावत बघतो.

आण्विकेची आई, बघुया एखादे मिळाले तर स्थळ.

स्वप्नील, बर मी मावशी जातो पुढे. तू काका सोबत येणार ना. की येतेस आमच्या बरोबर.

आण्विकेची आई, नको जावा तुम्ही आम्ही येतो. जरा घरातील पण पसारा आटपते.

स्वप्नील, बर निघू मग मी.

आण्विकेची आई, चल पुढे ते येतीलच एवढ्यात मी आवरते.

ते निघतात.

बाहेर पडताना गाडीवर बसताना

ईशान, काय राव तुम्ही, चांगलाच पोपट करता राव. मी मागतोय काय अन् तुम्ही दाखवता काय.

स्वप्नील, साहेब तुम्हाला जे पाहिजे ते इथे नाही चला तिकडे लग्नात इथे जुळून काय करणार. तिकडे जुळायला हवं ना.

ईशान, आज रागवणार माझ्यावर , सांभाळून घे.

स्वप्नील, आधी इथंन पाय तरी काढा. पुढे बघू.

ते निघतात.

वाटेत एखादे गिफ्ट घेतात व जातात.

……. …… ….


कळतं नकळत जुळले हे बंध भाग २२

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग २२

Evening      outer.   Day.   

ईशान रपेटला जंगलात गेलेला असतो. तिथे त्याचा मोबाईल फोन पडतो.

कामावरून परत आल्यावर जीप मधून उतरताना. त्याला जाणवते की त्याचा फोन हरवला आहे.

त्यामुळे सकाळी शोधायचे तो ठरवतो. व आपल्या क्वाटर वर जातो. व झोपतो.

Day morning राधानगरी फॉरेस्ट outer

भिवा, या फॉरेस्ट ऑफिसरच काहीतरी करायलाच पाहिजे.

किशा, तर काय हा आल्याने आमचं सगळ काम ठप्प झालय.

, चला बघू सापडेलच. हातातील बिडी पायात विझवत प्रमुख बोलला.

ते घोंगडी पांघरून निघतात.

सकाळच्या वेळी मोबाईल शोधण्यासाठी ईशान छोटी टू व्हीलर घेऊन येतो. तेव्हा तो आपल्या रपेट केलेल्या वाटेवरून शोधत जात असतो. तेव्हा हे टोळके वेषांतर करून त्यावर हल्ला करते. तो त्यासंगे फाईट करतो. शेवटी त्याचा कोल्हापुरी दणका पाहून सगळे पळून जातात. तो परत येतो.

आपल्या ऑफिसवर आल्यावर

बाकीचे कर्मचारी त्याकडे पाहतात. व त्याच्या शेजारी येऊन त्याची चौकशी करू लागतात.

एक जण, काय झालं साहेब.

ईशान, काही नाही लांडग्यांनी हल्ला केला होता. तो निपटला.

तोपर्यंत दुसरा कर्मचारी, काही लागफल तर नाही ना.

ईशान, नाही, फक्त ड्रेस जरा उसवला.

Cut to….

…… …… ….

हल्ला करून पळून गेलेले

भिवा, जरा वाचलो नाहीतर त्याने सपवलच असत.

तुका, ताकदिचा गडी हाय. असा सहज नाही सापडायचा.

किशा, याच्यासाठी काहीतरी वेगळीच युक्ती करायला हवी.

भिवा, चला आता. उगीच शंका नको. तोंड धुवा ती नाल्यात.

ती सर्व आपली तोंडे नाल्यात धुतात. व निघतात.

…… …… ……. …… …… …….

Day afternoon राधानगरी मोबाईल शॉप.

ईशान मोबाईल शॉप मध्ये येतो.

कर्मचारी, बोला साहेब काय हवंय.

ईशान, मोबाईल दाखवा एखादा छान सा.

 तो दाखवतो, ईशान मोबाईल खरेदी करतो. त्यानंतर तो सिमकार्ड घ्यायला जातो. व नवीन मोबाईल सिम विकत घेतो. व कंपनी कडून जुना नंबर मागून घेतो.

….. ……

Day.   Inter.   Outer ईशानची रूम राधानगरी व  सी बी एस कोल्हापूर

कोल्हापूर बस स्थानकावर आल्यावर स्वप्नील ईशानला फोन करतो.

ईशान फोन उचलून.

हॅलो कोण,

स्वप्नील, काय राव कोल्हापूरास आल्यापासून विसरला की काय.

ईशान, अरे , स्वप्नील ना.

स्वप्नील,  नाव तरी राहिलय म्हणायचं ध्यानात.

ईशान,  अरे तस नाही. फोन हरवला  माझा रपेटच्या वेळी, सापडलाच नाही. तेव्हा नवीन घेतला. त्यामुळे कॉन्टॅक्ट डिलीट झालेत, अनूचा फोन ही. 

स्वप्नील, झालं म्हणजे कॉन्टॅक्ट नाही म्हणा. मग हा नंबर.

ईशान, अरे कंपनी कडून परत तोच नंबर मागून घेतला. अजून अपडेट करून नंबर देखील घ्यायचे आहेत.

स्वप्नील, ते ठीक आहे रे. तू लग्नाला येणार आहेस ना.

ईशान, कुणाच्या.

स्वप्नील, कुणाच्या म्हणजे वेदांगी दिदीच्या.

ईशान, हो बोलावलंय तिने. येणार आहे. बर तू कधी येतोयस.

स्वप्नील, आलोय मी कोल्हापूर मध्ये.

ईशान, कधी, कुठे आहेस.

स्वप्नील, आहे सी बी एसला.

ईशान, मग ये की राधानगरीला,  उद्या जाऊ आपण दोघे.

स्वप्नील, नको, जरा जोतिबाला जाणार आहे. त्यामुळे नाही येता येणार.

 ईशान, मी येईन आज रात्री कोल्हापूरला.

स्वप्नील, उद्या भेटू मग लग्नात.

ईशान, चालेल की, अरे हो जरा अनुचा फोन नंबर पाठव.

स्वप्नील, माझ्याकडे नाही रे.

ईशान, हे बघ चेष्टा करू नकोस. दे रे. 

स्वप्नील, फोन नंबर सेंट करून.

स्वप्नील, पाठवलाय बघ.

ईशान फोन नंबर सेव्ह करतो.

स्वप्नील, बर चल ठेवतो बाय.

ईशान, बाय.

स्वप्नील बस पकडतो.

….. …… …… ..

 Day inter अण्विकाच्या  घरी

आण्विका घरी येते. ती घरात स्कूटी लावून जाते. तिथे तिला सोफासेटवर स्वप्नील बसलेला दिसतो.

त्याला पाहून,

आण्विका, काय रे, तू केव्हा आलास.

स्वप्नील, थोडा वेळ झाला.

आण्विका, कळवायच नाहीस का? मी आले असते न्यायला. मावशी, काका व रेवा कशी आहेत.

स्वप्नील, सीबी एस ला पोहोचताच बस मिळाली. त्यामुळे कळवल नाही. बाकी ठीक आहेत. तुझी आठवण काढत असतात.

आण्विका, थांब चहा टाकते.

स्वप्नील, नको ,झालंय नाष्टा पाणी. एव्हाना जेवलोय म्हणायला हरकत नाही.

अण्विकाची आई, थोडच खाल्लय ग. पोहे नुसते.

स्वप्नील, थोडेच, अग चांगल ताटभर दिले होते. तेवढे खायला लावले हिने.

आण्विकाची आई, त्यात काय वाळलास किती बघ, आणि तुझ्या सारख्या मुलानं भरपूर खायला पाहिजे.

स्वप्नील, बहिणी बहिणी सारख्याच आहात दोघी.

आण्विका, चहा करते की थोडा.

स्वप्नील, नको, मला तेवढी दादाच्या गाडीची किल्ली दे.

आण्विका, अरे, आत्ताच आलास ना आता कुठे आणखीन फिरायला जाणार.

स्वप्नील, थोड जोतिबा, पन्हाळा करून येतो.

आण्विका, अरे आता चार वाजलेत. इतक्या वेळाने कुठे जातोस.

स्वप्नील, वेळ कुठे झालाय. जातो. संध्याकाळी आठ वाजेपर्यंत येतो.

आण्विका शोकेश मध्ये ठेवलेली किल्ली काढून देते.

तो निघतो.

आई, काय ग कसा झाला साखरपुडा.

आण्विका, झाला नीट,

आई, नवरा कसा आहे?

आण्विका, आहे की छान.

आई, झालं ना नीट सगळ काही.

आण्विका, झालं की.

 …… …… …….. …….. ……

नाईट अण्विकाच्या घरी रुम मध्ये. Inter

 सर्वांची जेवणे झाली, अंथरूण पडली.

आण्विका ,(मनात) काय हे हा फोन का करत नसेल. की कंटाळला मला. की दुसऱ्या लफड्यात पडला.

फोन करून बघते.

ती ईशानला फोन लावते.  तो उचलत  नाही.

आण्विका, काय झालंय कोण जाणे. उचलत नाही.

इकडे तो फोन उचलत नाही म्हणून अण्विका खूप चिडते. व फोन अंथरुणावर आपटते. व नाराज होऊन अंथरुणावर पहुडते. त्यावेळी तो ऑफिस मीटिंग मध्ये असतो. ती एक नाईट गुप्त बैठक असते.

….. …… …… ….

Night. राधानगरी फॉरेस्ट ऑफिस. एक रुम. अनेक कोल्हापूर विभागातील ऑफिसर तिथे आलेले होते. त्यामधे चर्चा चालू होते. फोन त्यांनी सायलेंट मोडवर ठेवलेले असतात.

मुख्य अधिकारी, हल्ली प्राण्यांचे दात त्यांचे केस , हाडे यांची तस्करी तसेच जंगली आयुर्वेदिक वनस्पती यांची अवैध संपत्तीची तस्करी चाललेली आहे. ती थांबायला हवी.

दुसरा अधिकारी, काय करणार साहेब, आम्ही जीवाचे रान करून तस्कर पकडले तरी काळ्याकोटातील वकील खर्याच खोटं व खोट्याच खर करून सोडवतात. काय करणार.

तिसरा ऑफिसर, यासाठी काहीतरी खास योजना करायला हवी.

ईशान सर तुमचं मत काय?

त्यावेळी अनु फोन करते. ईशान कट करतो. व 

ईशान आपल्याकडील फाईल घेऊन समोर येतो.

ईशान, सर आपण मागील जर घटना पहिल्या तर आपल्या जंगलातील वनस्पतीचा व त्यामधील प्राण्यांचा मी अत्यंत बारकाईने अभ्यास केला. तेव्हा अस लक्षात आले की या ठिकाणी जी काही शिकार होते. ती थोडीफार किळकोळ पार्टी लक्षात घेऊन जंगली रानकोंबडे यांची शिकार केली जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे जंगली वनस्पती ज्यामध्ये आयुर्वेदिक घटक जास्त असणाऱ्या वनस्पती. यांची संख्या आपणास (तो नकाशात निशाण दाखवत) या भागात जास्त आढळून येतात. व त्याच प्रदेशातून चोरी होते. अन् मागील आपणास सापडलेला साठा पाहता. त्यातील माल व त्याची क्वालिटी पाहता तो शरद ऋतूत कलेक्ट केल्याचे दिसून येते. म्हणजे पावसाळा संपताच,

 यावरून आपण या एरियात सूर्य प्लॅनेट लाईट व त्याअंतर्गत कॅमेरे बसवले तर अत्यंत बरे पडेल. लोकांना बाहेर दाखवायचं की ती फक्त लाईटसाठी आहे. पण प्रत्यक्ष त्या आधारे आपण अंतर्गत फोटो व शूटिंग करायचे. मग किती दिवस लपून राहतील. सदर तस्करांना मदत करणारे हे स्थानिक लोक असल्याशिवाय हे शक्य नाही. आपण या प्रदेशातील गावातून खबर काढली पाहिजे. की यांना कोण मदत करते. तसेच त्यांवर पाळत देखील ठेवली पाहिजे. पण हे एवढं सोपं काम नाही. यासाठी आपले मनुष्यबळ कमी पडते. यावर मी सांगितलेले कॅमेरे ते ही गुप्त बसवलेले बरे. त्याबाबत माहिती आपल्या रेंजर्सना देखील असता कामा नये. संपूर्णत गुप्त रित्या हे केले पाहिजे.

अशी तेथे बराच वेळ चर्चा होते. व शेवटी ठरवतात.

पहिला अधिकारी, वेल डन सर.

दुसरा अधिकारी, खरंच चांगली योजना आहे.

ते सगळे हस्तांदोलन करतात. व ही योजना गुप्त ठेवण्याचे ठरवतात.

मीटिंग संपल्यावर

एक ऑफिसर, सर उद्या सुट्टी हवी होती ना तुम्हाला.

ईशान, हो एका लग्नाला जायचं आहे.

ऑफिसर, किती दिवस लोकांच्या लग्नाला जाणार. तुमचं पण बघा आता.

ईशान, चाललय सर.

ते हसतात.

व मीटिंग संपते.

Cut. To. …..

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


Thursday, December 28, 2023

कळत नकळत जुळले हे बंध भाग २१

 

कळतं नकळत जुळले हे बंध भाग २१

दोन दिवसांनी inter outer अण्विका व संयोगिताच्या घरी.

अण्विका आवरत असते. आज वेदांगीचा साखरपुडा असतो. तो छोट्याशा स्वरूपात घ्यायचं ठरलेलं असत.

वेदांगी, फोन करते.

वेदांगी, काय ग कुठे आहेस. इकडे ये की लवकर. एवढा कार्यक्रम नीट पार पडू दे.

आण्विका, होईल नीट तू कशाला काळजी करतेस.

वेदांगी, ती संयोगिता पण कधी येते कुणास ठावूक. मगापासून फोन करतेय. उचलतच नाही.

आण्विका, मॅडम घेऊन येते मी.

वेदांगी, ये की लवकर.

आण्विका, अग, फोन ठवलास तर येईन ना . ठेव आधी.

ती फोन ठेवते.

वेदांगीच्या घरी लग्नाची गडबड चाललेली असते.

आण्विका छान साडी नेसते. व आपली स्कूटी घेऊन संयोगिताकडे निघते.

जाताना फोन करते. संयोगिताचा लहान मुलगा फोन उचलतो.

संयोगिताचा मुलगा,

हॅलो कोण बोलतंय.

आण्विका, कोण म्हणजे अनु मावशी.

जरा मम्मी कडे दे.

मुलगा, ती साडी नेसतेय.

मुलगा फोन देत, अनु मावशीचा आहे.

संयोगिता, (फोन कानाला लावत) काय ग.निघलीस

आण्विका, आवर लवकर. मी निघालेय.

संयोगिता, आवरते, ये लवकर.

अण्विका फोन ठेवते. व निघते.

 थोड्या वेळात ती संयोगिताच्या घरी पोहोचते.

 संयोगिता आपली स्कूटी काढते. आपल्या स्कुटीवर मुलग्याला व अण्विकाच्या स्कुटीवर मुलीला बसवून निघतात.

पुढे एका चौकात गेल्यावर संयोगिता अण्विकाला हाक मारत

संयोगिता , अनु जरा थांब.

आण्विका, (थांबून) का ग इथे काय काम आहे.

संयोगिता गाडी जवळ आणत, चल तिकडे कोर्नरला मागून.

त्या गाडी एका झाडाजवळ येतात. तिथे गाडी लावत.

संयोगिता, चल थोड नाष्टा पाणी करू.

आण्विका, अग तिकडे होईल की. सकाळपासून वेदिन पिडलय फोन करून करून.

संयोगिता, चल गप, लगीन घरात कधी लवकर काय भेटतय.

 वेळ लागतो जेवणावळीला.

त्या दोघी जवळील हॉटेल मध्ये जातात.

आण्विका, ( मागून जाताना) तुझं आपल कायतरी असतय. वेळ होईल ना.

संयोगिता, चल गप्प.

त्या होटेलात जातात. संयोगिता चार मिसळ पावची ऑर्डर देते.

संयोगिता, शुक शुक, ओ काका, चार मिसळ द्या.

काका, हा.

मिसळ थोड्या वेळात एक जण आणून ठेवतो.

संयोगिता, हा करा सुरू.

मिसळ खाताना,

संयोगिता, पिंटू, बबली यातलं एक अवाक्षर देखील घरी सांगायचं नाही.

ती दोघे, कळलं.

संयोगिता, कळलं ना नाहीतर रवी दादाच्या लग्नासारखे कराल.

बबली, नाही ग सांगत माहित आहे आम्हाला.

आण्विका, बबली काय झालं ग रवी मामाच्या लग्नाच्या दिवशी.

बबली, काय नाही ग, आम्हाला आईस्क्रीम हवं होत. व आईने दिलं. व हा चोमडा पिंट्या घरी सांगत गेला आजीला. आजी दोन दिवस उठता बसता टोमणे मारत होती आईला. काय तर म्हणे सूनच राज आलय. पुढे माझ्या पोराला बघतील की नाही, आम्ही कुत्र्यासारखे घर राखतो. ही बाहेर जाऊन चैनी करतात.

आण्विका मग काय झालं,

बबली, मग आईन मोठा आईस्क्रीमचा पॅक आणून दिला आजोबा अन् आजीला.

आण्विका, मग तर झाली ना शांत.

पिंटू बोलू लागला, शांत , कुठली शांत

पाच – सहा जणांच आईस्क्रीम दोघांनी हादडल व बसला घसा, बोलायचं येईना.

आण्विका, मग काय झालं.

पिंट्या, मग पुन्हा बाबांच्या शिव्या मामीला खाव्या लागल्या. तुला कळत की नाही. म्हातारपणी असल खायला देतात का? सरसर प्यायचं वय आहे त्यांचं. बिनडोक असल्यासारखं आइस्क्रीम काय देतेस खायला त्यांना.

आई म्हणाली की त्यांना हवं होत.

तेव्हा बाबा म्हणाले, ते काय पण मागतील, तुझी अक्कल काय गवत खायला गेलती काय.

आण्विका, मग तुम्ही काय ठरवलंय.

बबली, आम्ही ठरवलंय, मम्मीन दिलेलं खायचं, पण कुठेही काय खाल्ल म्हणून ओकायच नाही. व जर पोटात गुपित थांबेना झालं की शाळेला जाताना आम्हाला वाटेत एक भलं मोठ्ठं वडाच झाड लागत. त्याला जाऊन सांगायचं. ते काही कुणाला सांगणारच नाही. कारण ते बोलतच नाही ना.

आण्विका, वा शाब्बास, बरेच हुशार झालाय आईच्या तालमीत.

पिंटू, मग व्हायलाच पाहिजे, बाबांच्या मंडळाच्या तालमीत शरीर तंदुरुस्त होते. व ममीच्या तालमीत मेंदू तल्लख करायचा.

संयोगिता, बर चला आता अटपल असेल तर नाहीतर वेदी मावशी फोन सारखे करून कानाच्या पडद्यांना भगदाड पाडायची.

ते सगळे निघतात.

…… …… ……

Day outer inter वेदांगीच्या घरी

आण्विका व संयोगिता आपापल्या स्कूटी वरून वेदांगीच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचतात. तिथे आल्यावर.

 स्कुटी त्यानी पार्क केली.

आण्विकेस पाहून कालची मुले.

आकाश, अरे, ती आलेय. मस्त ड्रेस घातलाय.

राजेश, चल बघुया.

ती एका गॅलरीत येतात. वर पायऱ्या चढून येणाऱ्या आण्विका व संयोगिताकडे पाहत.

सुजित, काय मस्त दिसते राव.

संग्राम, मस्त आहे पण आपल्याला नाय भेटणार.

राजेश, तर काय.

आकाश, अरे, डॉक्टर आहे ना ती.

सुजित, हो यार, आपण बारावी पास. मव्हर पकडणार. अन् ही कोल्हापुरी मिरची. कसं जुळणार.

राजेश, वेदांगी अक्कान काय सांगितलय माहित आहे ना.

संग्राम, ती सांगते म्हणून काय झालं. प्रयत्न तरी करूया. कुणाला कटली तर काटली.

आकाश, तर काय, माव्हर पकडतो म्हणून काय झालं. आपण आपल्या एरियात दादा आहोत.

राजेश, चला मग प्रयत्न तरी करू.

सगळे, चला चला…

आण्विका व संयोगिता वर वेदांगीच्या घरात येतात.

तिचे बाबा शांत विचार करत असतात. कारण बरेच प्रयत्न करून देखील साखरपुड्याच्या कामाचे नियोजन लागत नसते. आचारी ऐनवेळी लेट झालेला असतो.

ते फोन करतात.

तेव्हा त्याची गाडी पंक्चर झालेली असते. हे कळतं.

आण्विका, (त्यांजवळ जात) काय काका शांत का?

काका, काय सांगू बाळ अजून कामाचे काही नियोजन लागेना झालेय. तीन तासांनी साखरपुडा आहे.

त्यांचे सगळे ऐकूण घेऊन

आण्विका, थांबा मी लावते.

आण्विका, संयो तू आतमध्ये जा. व वेदूला तयार कर जा. मी पाहते इकडे.

संयोगिता वेदुच्या रूममधे आपल्या मुलांना घेऊन जाते.

आण्विका, पाहुण्याच्या असणाऱ्या सर्व तरुण मुला मुलींना बोलावते. त्यांना वेगवेगळी कामे निवडून देते. कुणी रांगोळी काढायची, कुणी सतरंजी अंथरायची. यासाठी वरील टेरेसवर छोटं मंडप घालायला. गणपती मंडळातील मुलांना सांगते. काही मुलींना रांगोळी घालायला लावते.

तर वेदूच्या आई व आजीला साहित्याची जबाबदारी देते. शेजारील काकूंना वेगवेगळ्या जेवणातील घटक वाटून देवून त्याच्या मदतीला पाहुण्यातील इतर स्त्रियांना लावून देते.

वेदीच्या भावाला व पाहुण्यातील मुलांना राहिलेलं साहित्य आणायला लावून देते. थोड्याच वेळात जय्यत तयारी होते.

नवरदेव येतो. व साखरपुड्याचा विधी चालू होतो. त्यावेळी आण्विका वेदूचं आवरायला जाते.

संयोगिता तिथे तीच आवरत असते.

आण्विका, काय ग आवरलं की नाही.

संयोगिता, अग चाललय.

 आण्विका, आवर लवकर, तिकडे भट बोलावतोय.

संयोगिता, झालंच.

आण्विका, चला एक काम झालं.

संयोगिता कुठल ग.

आण्विका, कुठल म्हणजे बाईसाहेबांच्या लग्नाचं.

संयोगिता, आता तुझं बघायच राहिलय.

आण्विका, हे बघ आधी या बाईचं आवरुया मग बघू माझं काय करायचं ते.

वेदांगी, मला घालवायलाच बसलाय जणू. इतक्या लवकर कंटाळल्यासा,

आण्विका, आम्ही कुठे कंटाळलोय. तूच कंटाळलीस म्हणून हा खटाटोप चाललाय.

वेदांगी, ये गप कायपण बोलतेस. मला रडू येतय.

आण्विका, तू अन् रडणार, गप मगरीच रडू ते, बसत असशील रात्रभर नवऱ्याशी गप्पा मारत फोनवर.

वेदांगी, मग मारायला नकोत.

तू मारत असशील की

आण्विका, माझं अजून ठरलं नाही.

संयोगिता, काय ग कुणाशी प्रेमबिम आहे का?

आण्विका मोठे डोळे करून, जाऊ का मी घरी, काय वेदू,

वेदू, नको मी गप्प बसते.

संयोगिता, काय ग काय लपवत आहात.

वेदू, काही नाही ग.

इतक्यात बाहेरून मुलगी येते.

 ताई भटजी काका बोलवत आहेत.

संयोगिता, हा झालं आलोच.

अग, चला लवकर.

त्या दोघी वेदांगीला साखरपुडा चालू असलेल्या ठिकाणी नेवून सोडतात.

व त्या दोघी मंडपात एके जागी बाजूला थांबतात.

इतक्यात

संग्राम तिथे येतो, अण्विकेस,

हॅलो मिस,

आण्विका, काय.

संग्राम, काय नाही आपला फोन नंबर मिळेल का?

आण्विका, का कशाला,

संग्राम, (घाबरून) काही नाही. म्हटल डेकोरेशनच काम मस्त केलं तुम्ही एखादी ऑर्डर आली तर द्यायला बर.

आण्विका, मी डेकोरेशनच काम करत नाही. डॉक्टर आहे. चिरफाड करते. येतोस.

तो घाबरून जातो


संयोगिता, अग अस काय करतेस. तो सरळ सरळ विचारत होता.

आण्विका, ये बाई गप्प उगाच बाजू घेऊ नको. जेवढा वर आहे ना तो कोकणी, तेवढाच खाली आहे. काल तुला माहित नाही. एकावर एक चिठ्ठी देत होता. आपला फोन नंबर लिहून.

अन् खोटं वाटतंय तर तिकडे बघ लाईन कशी उभा आहे. गॉगल घालून.

संयोगिता, तिकडे पाहते. तिला शायनिंग मारताना चार पाच मुले दिसतात.

अग, खरंच की. ती हसू लागते.

व बघ एखादा पसंत पडतो का, कंपाऊंडर म्हणून ठेवून टाकू

आण्विका, तुझ्याच दुकानात ठेव जा.

संयोगिता, तो बघ दातक्या माव्हरा कसा दिसतोय.

आण्विका, मी जाऊ का इथून.

ती अण्विकेचा हात धरते.

आण्विका, इथे साहेब फोन उचलत माझा त्यामुळे टेन्शन आलंय अन् ही दाखवतीय मला फुलकोबी.

संयोगिता, काय म्हणालीस.

आण्विका, काही नाही, नशीब माझं म्हणाले.

संयोगिता, अग बस ग, बर सांग लग्नाचं काय ठरवलं आहेस.

आण्विका, काही नाही अजून.

संयोगिता, माझ्यापासून काही लपवू नकोस.

आण्विका, काही नाही ह. इंटरशिप झाल्यावर बघायचं आहे.

संयोगिता, कोण आहे का मनात.

आण्विका, आहे पण आणि नाही पण.

संयोगिता,आहे पण आणि नाही पण याचा अर्थ काय? सांग कोण असेल तर.

आण्विका, कळेल तुला, तुला चोरुन करणार नाही.

संयोगिता, हे बघ कोड्यात बोलू नको, मला कळेलच. सांग.

आण्विका, मॅडम आपण बोलू यावर पुन्हा कधीतरी. इथे साखरपुडा आटपूया.

 थोड्या वेळात साखर घातली जाते.

आण्विका कामाचा लेखाजोखा देवून जायच्या तयारीत असते.

वेदांगी, आज राहा की इकडे. (सारखी विनवणी असते.)

आण्विका, राहायचं येवढं बोलू नकोस बाई, लग्नाला वाटल्यास लवकर येते.

व बाय येते मी असे म्हणून ती निघते.

तिच्याबरोबर संयोगिता पण निघते.

वाटेत गाडीवर

संयोगिता आपली स्कूटी अण्विकाच्या स्कुटीजवळ आणत,

संयोगिता, का ग थांबायची होतीस.

आण्विका, ये बाई, तिथं कामापेक्षा नको तो त्रास होता. कुठ वॉशरूमला देखील जायची पंचायत होती. नुसती भुतावळ मग.

संयोगिता, मग करायचा त्यातला एक पसंत.

आण्विका, कशाला?

संयोगिता, कशाला म्हणजे लग्नाला, नेला असता की कोकणात एखाद्यानं म्हावर खायला.

आण्विका, इकडे मिळतात मासे. त्यासाठी कोकणात कशाला जायला हवे.

 संयोगिता, मग कोल्हापूर सोडत नाहीस म्हण.

आण्विका, ते बघू चल.

ती संयोगिताच्या दारात जाते. तिच्या मुलीला उतरते. इतक्यात मागून संयोगिता येते.

आण्विका, हा झालं, चल बाय मी निघते.

संयोगिता, अग, चहा तरी घेऊन जा.

आण्विका, बस पित तूच .

व ती सुसाट जाते.

संयोगिता, मॅडम काहीतर लपवत आहेत. ही अन् कुणाच्या जाळ्यात गावली. की हिने कुणाला ओढल बघायलाच पाहिजे.

Cut to …..

……. ……. ……. ……

,nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


Sunday, December 24, 2023

कळतं नकळत जुळले हे बंध भाग २०

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग २०

Day evening. वेदांगीच्या घरी. Inter

मुलांचा दंगा ऐकून वेदांगीने त्यांना गॅलरीतून पाहिले.

वेदांगी, काय रे आकाश काय चाललय.

चला वरती या काम आहे.

आकाश, ( मित्रांना) अरे दीदी न ऐकले वाटत. आता काय खर नाही.

सुयोग, तिला काय कळलं नाही. चल बघू दुसरच काम काहीतरी असेल.

बाकीचे, चल चल.

ती सगळी वरती येतात.

  वेदांगी, काय रे खाली काय चालल होत तुमचं.

आकाश, काय नाही ते.

वेदांगी, (फिरकी घेत) काय रे ती गेलेली मुलगी कशी आहे.

सुयोग, मस्तच.

बाकीचे डोळे मोठे करतात.

सुयोग, मस्त म्हणजे छान आहे.

वेदांगी, आवडली का?

सुयोग, हो तर.

वेदांगी, आवडली इथपर्यंत ठीक आहे. विचारलं नाहीस ना.

सुयोग, मी नाही पण.

वेदांगी, पण यान नंबर चित्तीवर लिहून पाठवला. (संग्रामकडे बोट दाखवत)

संग्राम घाबरून.

वेदांगी, काय रे काय चाललय.

संग्राम, काय नाही. फक्त नंबर पाठवला होता.

वेदांगी, ती कोण आहे ते माहीत आहे का?

सुजित, कोण आहे, क्याट्रर तर आहे. आली होती लग्नाचं नियोजन करायला.

वेदांगी, (त्याचा कान धरत) बाळा, ती क्याट्रर नाही. माझी मैत्रिण आहे. अन् ती एक सर्जन आहे.

राजेश, सर्जन म्हणजे.

वेदांग, सर्जन म्हणजे पोट फाडून आतील दुरुस्ती करेल तुझ्या.

आकाश, बापरे, नको रे बाबा.

संग्राम, ती डॉक्टर आहे.

वेदांगी, हो, अन् तिचा भाऊ कराटे चॅम्पियन आहे. ब्लॅक बेल्ट स्पेशल. त्याला कळलं तर तुमचं काही खर नाही बघ.

ती घाबरतात. त्यांना तिचा भाऊ त्यांची हाडे मोडत्याला दिसतो. तर ती त्यांना ऑपरेशन कक्षात झोपवून पोट फाडण्याचे लेजर घेतलेली दिसू लागते.

ती सर्व, बापरे.

इतक्यात वेदांगीच्या आजी, लेकाच्यास बारावी नाही सुटलं. अन् म्हावर पकडते. व डाक्टरची इच्छा करतय बायको म्हणून. जा माकडा ते टिपण घेऊन श्रीकांतसंगे .

कमवायची अक्कल नाही. अन् लग्नाची अपेक्षा करतय.

त्यातून आकाश धाडस करत.

आकाश, काही म्हण दीदी मला ती जाम आवडली. भले तिचा भाऊ मला मारो व हाडे मोडो. पण मी तिका प्रपोज करणार.

इतक्यात पलीकडील खोलीतून अकाशची आई, ए थोबडवेन तुका, जर पावण्याच्या गावात काही कल्ला केलास तर. दोन दिस राव अन् खा पी अन् गावची वाट धर. समजल का.. अन् काय आगळीक केलस इथ तर तूका मिरचीची धुरी देतय काय मी.

आकाश, ए आय तुका चांगली सून होवो की नको.

तसा आकाशचा बाप त्यास येवून म्हणलं, ए गढड्या तुझं स्टेटस काय, तीच काय? जा झंप्या काम कर. खादडोबा कुठला.

तुका सांगून ठेवतय म्या. उगाच पाहुण्यांच्या लग्नात बारा भानगडी करशील. दोन दिवस राहायचं खायचं प्यायच अन् गावाक सुटायच. समजल का.

आकाश, हो.

आकाशचा बाबा, जा त्या दादा सोबत जरा काम कर जा, दिदीच्या लग्नात तेवढीच मदत होईल.

तो तेथून जातो.

….. …… …….

Outer evening time.

गाडीवरून. जाताना

श्रीकांत, काय रे नाराज का आहेस.

आकाश, बाबा व आय रागावली.

श्रीकांत, का कशाबद्दल,

आकाश, त्या आलेल्या दीदींच्या फ्रेंडवर लाईन मारली म्हणून.

श्रीकांत, अरे, तिच्याकडे बघायची कुणाची हिम्मत होत नाही. अन् तू तिला प्रपोज करायला निघालास. मग काय.

आकाश, तू पण दादा.

श्रीकांत, हे बघ तिच्या वाटेला जाऊ नको. नाहीतर हातनाक मरशील.

आकाश, बर चल आता.

ती निघतात.

Cut to …...

…….. …. …..

आण्विकाच्या घरी. इंटर. Night १०.o’clock

हॉल मधील टीवी बंद करून ती आपल्या रूम मध्ये जाते. तिच्या मोबाईलची रिंग वाजते. अंथरूण नीट करत असते.

आण्विका मोबाईल उचलून पाहते. रेवा चे नाव पडलेले असते.

ती फोन उचलून

आण्विका, बोला मॅडम.

रेवती, काय अण्विका दिदी काय चाललय. कशी आहेस.

आण्विका, आहे बरी, चाललीय वेदांगीच्या लग्नाची तयारी.

 रेवती, तिच झाली , तुझं काय?

आण्विका, माझं काय असणार.

रेवती, साहेब मेसेज वगैरे करतात की नाही.

आण्विका, येतो की कधीतरी गुड नाईट शुभ सकाळचा मेसेज.

रेवती, का फोन करत नाही?

आण्विक, परवा केला होता. मी उचलला नाही.

रेवती, अग, घ्यायचा नाही का?

आण्विका, का घेऊ, एका शब्दाने सांगितल नाही, निघालोय नाहीतर पोहोचलोय ते. त्याला माझी परवा नाही तर मी तरी कशाला करू.

रेवती, परवा कशी नाही. इकडे स्वप्निलला फोन येतोय की.

फोन आला की मला चकवून बाहेर जाऊन बोलतात साहेब. पण मी सुद्धा वस्तादिन आहे. परवा चार्जिंगला लावून अंघोळीला गेल्यावर चेक केला फोन. तेव्हा ईशानचे मेसेज पाहिले. त्यामधे तुझीच जास्त चौकशी करत असल्याचे दिसून आले.

अन् हा रेडा आपला भाऊ असून आपल्याला काही सांगत नाही.

आण्विका, त्याच्याकडे चौकाशी करायला. मला फोन करता येत नाही.

रेवती, अग, अस कस म्हणतेस. त्याने केला होता व तू उचलला नाहीस. मग तो का करेल. व आता वेदांगीच्या लग्नात भेटलच की.

आण्विका, शंभर जनातील भेटन ते. त्यात कसली मज्जा, अण्विका काय कशी आहेस. याच्यावर साहेबांची गाडी गेली तर शपथ.

रेवती, अग, तो हळवा आहे. तो जास्त बोलका नाही.

आण्विका, अरे बाबा, म्हणजे आता पासूनच कड घ्यायला लागलीस काय दाजीची.

रेवती, ए काय पण होऊदे आपण तुझ्याच गोटात. पण दाजी तोच हवा.

आण्विका, बघुया पुढे कोण कोणाच्या गोटात ते.

रेवती, इथे काय लढाई करायची नाहीये. उगाच तानू नकोस. व जरा नंमत घ्याव माणसानं.

 आण्विका, बर, लग्नाला येणार आहेस काय.

रेवती,नाही मिळणार ग यायला. माझी एक एक्झाम आहे. स्वप्नील दादा येईल बघ.

आण्विका, मग स्वप्निलला सांग पोहोचल्यावर फोन कर म्हणून

रेवती, माझा फोन येईपर्यंत तो गरुड पोहोचला पण असेल. चल ठेवते.

आण्विका, बर ठीक आहे.गुड नाईट

रेवती, गुड नाईट स्वीट ड्रीम.

आण्विका, फोन ठेवते.

इतक्यात तिच्या मोबाईल वर गुड नाईट मेसेज येतो. तो ईशानचा असतो.

ती परत रिटर्न गुड नाईट मेसेज पाठवते. व ऑफलाईन जाते. व झोपी जाते.

…… …… …..



कळत नकळत जुळले हे बंध भाग १९

 

कळत नकळत जुळले हे बंध भाग १९

क्रमशः पुढे चालू .....

Day. Afternoon. वेदांगीच्या घरी. Inter

वेदांगीचे बाबा बाहेरून घरी लग्नपत्रिका घेऊन येतात.

घरातील सगळी मंडळी पत्रिका पाहू लागतात.

वेदांगीचा भाऊ, मस्त आहे. हे बघ दोघांचा फोटो पण छापलाय. मस्त आहे.

आई, बघू रे,

आजी, तारीख कधीची धरलीय.

बाबा, तेवीस जानेवारी.

आजी, दिवस चांगला आहे ना.

बाबा, अग ते सगळ पाहूनच ठरवलय.

आजी, लग्नं कुठे करणार आहेस.

बाबा, अग आपल्याकडेच घेतलय. हॉल बुक केलाय.

आई, पावण्या रावळ्यांना बोलवायला हवं.

बाबा, ते ठरलंय बोलवू आपण. फोन केले आहेत सगळ्यांना, दोन दिवसात हजर होतील सगळे.

आई, अगं बाई तयारीला लागायला हवहवं.

बाबा, वेदू तुझ्या मित्र मैत्रिणींना देखील सांग.

वेदांगी, हो बाबा मी आताच तयारीला लागते.

वेदांगी आपल्या रूम मध्ये जाते. व आपल्या मित्र मैत्रिणींची यादी बनवू लागते. ती कागदावर नावे लिहू लागते.

आण्विका, संयोगिता, सात्विक, बबलू, अशी यादी करत शेवटी तिच्या लक्षात ईशान येतो.

ईशानला बोलवू काय?

हो बोलवलेच पाहिजे. त्याशिवाय अणूच्या मनात काय चाललय हे कळणारच नाही. बोलावतेच. पण फोन कसा मिळणार. अनुला विचारू. नको. ती उगाच चिडायची. त्यापेक्षा संयोगिताकडे असेल.

चला संयोगितालाच फोन करते.

ती फोन घेऊन रिंग करू लागते.

Cut to….

….. …… ……

वेदांगीच्या घरी. पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे.

सगळे कामात आहेत. जो तो कामाला लागलाय तिचे कोकणातले भाऊ व मामांची मुलेही आलेत.

वेदांगी आपली कपडे व दागिने पाहत असते. तिला काय घालू व काय नको असे झालेले असते. ती हताश होऊन.

वेदांगी, ( मनात) काय करू. कोणता घालू. काहीच सुचत नाही. त्यापेक्षा अण्विकाला बोलावते. तेच बरं होईल.

ती मोबाईल घेते व अण्विकाला फोन करते.

….. ….. ….

आण्विका आपल्या घरात आईला जेवणाचा डबा करून देण्यासाठी मदत करत असते.

वेदांगीचे फोन येतो.

आण्विका फोन उचलते.

आण्विका, बोला मॅडम काय सेवा करू.

वेदांगी, सेवा बिवा काय नको. तू कुठे आहेस. इकडे सगळा बोजवारा उडालाय. मला काही समजत नाहीये पहिली इकडे ये.

आण्विका, अग, येते थोड्या वेळाने.

वेदांगी, काही नको थोड्या वेळानं वगैरे. त्यापेक्षा अस कर. रहायलाच ये इकडे.

आण्विका, ए बाई राहायचं नाव काढू नकोस. आज जरा वेळ होईल. उद्या मात्र सकाळी सातला हजर होते.

वेदांगी, ते काय सांगू नको. ये लवकर.

आण्विका, अग, बाबांचा डबा करून देते. मग निघते की मी.

वेदांगी, लवकर ये बघू.

आण्विका, येते बाई. थोड्या वेळात हजर होते.

आण्विका फोन ठेवते.

आई, वेदूचा होता का फोन.

आण्विका, हो.

आई, मग जा तू. मी करते डबा.

आण्विका, थोडेच तर राहिलेय. ते करते अन् जाते.

आई, अग, तीच लग्न आहे ना. मग जा लवकर.

आण्विका, अग एवढ्या लवकर जाऊन काय करू. व वेळ झालाय डब्याला उगाच तुला ओरडा खावा लागेल.

बाबा बाहेर हॉल मध्ये आपले असतात.

बाबा, झाला काय डबा तयार. मला वेळ होतोय.

अनु, झाला झाला.

अनु डबा भरते. व बाबाना द्यायला जाते.

बाबा, (हसत डबा घेताना) काय अनु वेदूचं लग्न झाल्यात जमा हाय. तुझा काय विचार लग्नाचा.

आण्विका, घ्या डबा जावा उशीर होतोय. उगीच चेष्टा नको.

आण्विकाचे बाबा, चेष्टा नाही बाळ, आता तुझं ही बघायला हवं.

इतक्यात आई जेवणखोलितून तिथे येते.

आण्विका, थोडे दिवस थांबा. एवढी एंन्ट्रानशीप झाली की बघू.

बाबा, कोण बघून ठेवलास काय.

आण्विका, बागितल तर तुम्हाला सांगेन की.

बाबा, चालेल, पण विचार कर. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवा. तस तू खूप गोड अन् समजूतदार मुलगी आहेस. तुला नक्की एखादा राजकुमार भेटेल.

आण्विका, पुरे थट्टा मस्करी.

 जावा उशीर होतोय.

आई, जावा काय जावा, खरंच सांगतात ते बाळ. तुझ्यासारखी मुलगी लाभन देखील भाग्यच आमचं. एवढं शिक्षण घेतलस. तरी देखील घरातील सर्व कामात मदत करतेस. ताईच लग्न. भावाच शिक्षण व इतर उलाढाल यातील ओढाताण समजून घेतलीस. एम बी बी एस होण्याची पात्रता असून देखील घरातील ओढाताण समजून घेऊन बी एच एम एस ला अडमिशण घेतलास. तिथे ही टोपच राहिलीस. मिळेल ते खाल्ल्यास दिलं ते कपडे घातलेस कोणता हट्ट नाही का अवांतर खर्च नाही. नाहीतर शेजारी पाजारील मुलींचे नखरे बघतोय आम्ही, साधं भांड घासत नाहीत. शिक्षण कमी घेतले पण थाट नवाबी असतात. अन् तू खूप वेगळी आहेस. येवढच नाही तर भावालाही योग्य लाईन गाठून दिलीस. तुझ कौतुक करावं तितकं थोडच. अहो, काल फोनवर सुधा कौतुक करत होती. काय काय मदत केलीस मावशीला.

आण्विका, पुरे कौतुक उगाच बैला सारखं फुगवू नका. जावा आता कामावर उशीर होईल.

बाबा हसतात व डबा घेऊन जातात.

आण्विका पसारा आवरन्यास आट येते.

आई, माझ्या लेकीला देवा चांगल स्थळ भेटू दे.

आण्विका मनात ईशानचा विचार करू लागते. तिला तो दिसू लागतो.

आण्विका, ( मनात) किती दिवस झाले. माझी आठवण येत नसेल का?

 इतक्यात आई आत येते.

आण्विकाला भांडी गोळा करताना पाहून.

आई, अग ठेव ते. मी करते.

ती जेवण वाढून घेते. व खाऊ लागते. इतक्यात पुन्हा तिला वेदांगीचा फोन येतो. तो आल्यावर अनु फोन उचलते.

वेदांगी, अग कुठे आहेस अजून.

आण्विका, अग, थोड्याच वेळात हजर होते. थोड जेवते मग निघते.

वेदांगी, ते जेवण बिवन राहु दे. थेट इकडे ये सरळ. इथे ये जेवायला.

की पाठवून देवू कुणाला.

आण्विका, ये बाई येतो मी.

वेदांगी, हे बघ अर्ध्यातासात आली नाहीस तर थेट मीच येईन बघ.

आण्विका, येतोय ठेव आता.

आण्विका जेवू लागते.

….. …… …..

 Day. Morning. आण्विका घरी. Inter outer

आण्विका जेवण करून आपल्या खोलीत जाते. एक गुलाबी कलरचा ड्रेस घालते. एक छानसा सेंट मारते. आपली पर्स घेते. व छानसा गॉगल घालते. व आईला

आण्विका, आई जाते मी?

आण्विका निघते. आपली स्कूटी घेऊन

….. ……. …

Day outer inter वेदांगी अपार्टमेंट.

आण्विका वेदांगीच्या घराच्या अपार्टमेंट मध्ये येते. ती पार्कींग एरियात गाडी लावत असते. त्यावेळी तिथे बाकीची पाहुण्याची मुले क्रिकेट खेळत असतात. ते बॉल मारतात. तो बॉल अण्विकाच्या दिशेने येतो. ती तो झेलते. तेव्हा ती पाहून.

राजेश, काय र सुया पावनी कोण म्हणायची.

सुयोग, कोण का असणा, भारी हाय दिसायला.

सुजित, पण आपल्या पावण्यात तरी नाही कोण असली.

आकाश, कोण का असणा मला जाम आवडली.

सुजित, (डोक्यात राजेशच्या टपली मारून) काय रे कळत नाही. येणाजाणारी मानस बघून तरी बॉल मारायचा.?

आण्विका, ए शहाण्या घे हा बॉल.

आण्विका बॉल फेकते

 व वेदांगीच प्लॉट कडे जाते.

सुयोग, गरमच आहे म्हणायची.

सुजित, गरम नाही. लवंगी मिरचीच आहे.

आण्विका वेदांगीच्या घरी येते. घरात आल्यावर वेदांगीची आई व इतर पाहुण्या काही ना काही कामे करत असतात.

आण्विका, काय काकू येवू का आत.

वेदांगीची आई, कोण अनु होय. ये की, काय ग, किती वेळ लावायचा? जा आत लवकर मॅडमनी घर डोक्यावर घेतलय.

आण्विका आतील खोलीत जाते.

आतील पसारा पाहून.

आण्विका, काय ग हे अस काय, केवढा पसारा केलास हा.

तुला पण कळतच नाही बघ.

वेदांगी, अग मला काही सुचेना झालंय.

आण्विका, थांब लावते नीट.

आण्विका, वेदांगीच्या घरी आलेल्या पाहुण्या मुलींना बोलावते.

इतक्यात त्यांची पाहुण्यातील आजी येते.

आजी, ( पसारा पाहून) तेवढच येतय तिला. तरी मी सांगत होते. रघुला, की जरा घरकामाची सवय लाव पोरीला, काय पसारा करून ठेवलाय बघ. आज इथे आई आवरते. उद्या लग्न झाल्यावर सांग नवऱ्याला आटपायला.

आण्विका, आजी शांत हो, होईल सर्व नीट. असे म्हणत तिने पाहुण्याच्या सर्व मुलींना बोलावून कामे लावायला सुरुवात केली. तिने आपल्या पर्स मधून चिठ्ठी काढली. व त्यांना कामे वाटून दिली. त्यापूर्वी प्रत्येकाची क्षमता पहिली.

आण्विका, तुमच्यातील कुणाला छान रांगोळी काढता येते.

एक दोघी हात वर करतात. त्याकडे कोण देत संध्याकाळी मेहंदी काढायची जबाबदारी ती देते.

 काहींना मसाले तयार करायला लावते. काहींना फुले देवून गजरा करायला बसवते. काहींना वस्तू आवरायला लावते. तर आजींना व वेदांगीच्या आईला आहेराची बांधाबांध करायला एका खोलित लावते. वेदांगीच्या भावाला बोलावून जेवणाचे टिपण काढून देते. व काही मुलाना घेऊन जाऊन बाजार करायला लावते. सर्व जोडणी लावून देते. तसेच सर्व कामे आटपून घेते.

व थोडा चहा करायला सांगून वेदांगीकडे जाते.

तिचे कपडे नीट ठेवले, दागदागिने नीट लोकरला ठेवून दिले. तसेच रहिवासी पाहुण्यांच्या जेवणाचे मेनू ठरवून तिने त्याचेही नियोजन लावले.

इतक्यात वेदांगीची आई चहा घेऊन. आली. तो चहा घेत. आण्विका वेदांगीला, काय मग झालं ना मनासारखं.

वेदांगी, हो झालं, आता तुझ्या मनासारखं व्हावं असं वाटतंय.

आण्विका, काय मनासारख.

वेदांगी, तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला की झालं.

आण्विका, हो का. आवरा आता.

….. ……. …

शेजारील खोलीत. Inter evening ४.०० o’clock

वेदांगीची गावाकडली आजी, पाहिलस कसं नियोजन केलं त्या पोरीने सगळ काम मार्गी लावल. अस पाहिजे पोरीच्या जातीला असा बारकावा यावा लागतो बघ. तू फक्त शाळा शिकवलेस. ही पोरगी कशी संस्कारी आहे बघ.

वेदांगीची ममी, आई ती मुलगी कोण आहे माहित आहे काय तुला. कितवी शिकलेय?

आजी, असेल दहावी बारावी झालेली.

वेदंगीची ममी, अग ती डॉक्टर आहे. वेदुची मैत्रीन.

आजी, काय डॉक्टर आहे. मला वाटलं असेल दहावी-बारावीला. पण काय नियोजन करते मस्त मला आवडल बाय. अन् एवढं व्यावहारिक बारकावा तिला जमतो म्हंटल्यावर खूप मुरलेली पोर आहे.

इतक्यात अण्विका घरी जायला निघते.

तिला वेदांगी, त्या पेक्षा इथे रहा की.

इतक्यात वेदूच्या पाहुण्यांची पोर बराच वेळ शायनिंग मारत असतात.

त्याकडे बोट करत

आण्विका, तिकडे बघ तुझी पाहुणे मंडळी. कशी शायनिंग मारतात.

इतक्यात आजी येते,

आण्विका, बर, चालते आता मी,

आजी, कशाला जातेस रहा की इथे.

आण्विका, नाही आजी, आई घरी एकटी आहे. व बाबा पण बाहेर गावी कंपनीच्या कामानिमित्त गेले आहेत. व भाऊ पण ग्यारेजवरून वेळाने येतो.

असे बोलून ती बाहेर निघते. आपल्या स्कूटी जवळ येते. तिला ह्यांडल जवळ एक चिठ्ठी दिसते. ती पाहते त्यावर एक नंबर असतो. व खाली लिहिलेल्या ओळी असतात.

तुम्ही मला आवडलात फोन करा, असा मजकूर असतो. आण्विका ती चिठ्ठी बाजूला फेकते. व निघते.

ती गेल्यावर

संग्राम, काय काम झालं नाही बुवा.

इतक्यात मागून सुयोग टपली मारून

आम्ही सकाळपासून तिला कटवण्याचा प्रयत्न करत आहोत. अन् तुझ काय चाललय,

संग्राम, हे बघ तिला मी पटवणार.

राजेश, आम्ही काय इथे माशा मारायला आलोय का.

ते भांडण करू लागतात.

आतून आजी, काय झालं यानले भांडण करायला.

तेव्हा तिचा आवाज ऐकूण सगळे पांगतात. निघून जातात.

…… …… …

क्रमशः पुढे........ ...... ......


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...