शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Sunday, December 15, 2024

फ्रेंडशिप एक साहस भाग १

 फ्रेंडशिप एक साहस भाग १

लेखक : निशिकांत हारुगले.

Inter- outer/   Panaji City/ Nighti  

(गोवा शहरात एका कॉल सेंटर वर काम करणारी मुग्धा परांजपे आपले काम करत सारखी आपल्या हातातील घड्याळाकडे पहात आहे. तिची ड्युटीची वेळ संपली होती. तिच्या जागी कामाला येणारा दुसरा मेंबर यायला वेळ झाला होता. तो थोडया वेळाने तिथे हजर झाला. तशी मुग्धा आपल्या हातातील घड्याळाकडे पहात)

मुग्धा :

 ओ सिट, खूप वेळ झालाय, साडे नऊ वाजलेत.

(वेळाने आलेल्या रॉकी कडे पाहत)

मुग्धा :

“ काय, कळत की नाही तुला? तुझं हे कायमचंच आहे. आजचं हे शेवटचंच कोऑपरेट करतेय मी तुला, परत मी नाही ऍडजेस्ट करणार,”

(तो शांतपणे ऐकत आहे )

(शेजारील शर्वरी कडे पहात)

मुग्धा :

“ चल येते ग.”

मुग्धा बाहेर पडली. ती लगबगीने स्टॉपकडे निघाली. तिचे कार्यालय असणारा रोड अत्यंत सामसूम ऐरियात होता. ती लगबगीने आपली पर्स अडकवून घरी निघाली. इतक्यात तिच्या फोन वर क्वाल आला. तिने तो उचलला. तो तिच्या आईचा होता.

मुग्धा :

“ हॅलो, बोल आई,”

आई :

“ अग्, निघालीस की नाही अजुन, बस मिळाली का?”

मुग्धा :

“ अग, निघालेय,थोड्याच वेळात पोहोचतेय स्टॉपवर, मिळेल एखादी बस नाहीतर काहीतरी क्याब वगैरे.”

आई :

“ बरं.. ये लवकर वाट पाहतेय.”

मुग्धा :

“ हा .”

मुग्धा लगबगीने बस स्टॉपकडे निघालेली असते. इतक्यात मागून एक स्कॉर्पिओ वेगाने येते. व तिच्याजवळ थांबते. दरवाजा उघडला जातो. मुग्धाला कोणतरी वेगाने आतमध्ये खेचते. या गडबडीत तिच्या हातातील फोन खाली पडतो. गाडीचा दरवाजा बंद होतो. गाडी वेगाने निघून जाते.

              Cut to …..

……. ….. ….. …

Outer /   Night /   Bus stop road/ in  fore wheller,

गाडीमध्ये खेचल्यावर मुग्धाच्या तोंडाला रुमाल लावला जातो. त्यावर असणाऱ्या औषधाच्या गुंगीने मुग्धा बेशुध्द होऊ लागते. तिला एक राक्षसी हास्य फक्त ऐकू येते. तिचे डोळे धुंद होतात. डोळ्यासमोर चार अस्पष्ट धुंद पुरुषी चेहरे दिसतात. ती गुंगीत जाते. समोर फक्त अस्पष्ट अंधार …

Cut to…..

…….. ….. ….. …..

प्रसंग दुसरा

inter  / college / afternoon 

कोल्हापूर शहरातील एका मेडिकल कॉलेजच्या आवारात दुपारचे तिन वाजलेत. काही मुली पट्टी गोळा करत आहेत. त्यामधे प्राजक्ता पाटील, श्वेता भोसले, माधवी गडकर, रेवा परांजपे, वेदिका काटकर अन् अनुजा पाटील या एकत्र जमलेल्या आहेत.

वेदिका :

 अग, आपल लास्ट सेमीस्टर आहे ना.

श्वेता :

मग काय?

वेदिका :

आपण शिवजयंती साजरी करूयात का?

माधवी :

पण प्राचार्य परवानगी देतील काय?

अनुजा :

त्यापेक्षा हॉस्टेल वर करूया की.

रेवा :

 अग पण त्यासाठी डेकोरेशन व बाकीच्या गोष्टी लागतील. शिवाय स्पीकर ही भाड्याने अणावा लागेल.

वेदिका :

 ते करूया ग. पण माझं मत अस आहे की उद्या तशी सुट्टी आहे. तेव्हा जेवणही करूयात. की सगळ्या मुली तेच तेच मेसचे जेवून कंटाळल्यात.

श्वेता :

 बरं चालेल. योजना चांगली आहे तुमची, पण त्यासाठी खर्च आहे, त्याच काय करायचं.

वेदिका :

 ते तर आहेच.

 माधवी :

 आपणं सर्वांनी पट्टी काढली तर,

अनुजा :

ही आयडिया चांगली आहे.

(इतक्यात तिथे आपली गाडी पार्क करून प्राजक्ता येते. तिला पाहून.)

श्वेता :

बरं झालं आलीस, आम्ही शिवजयंती साजरी करायची ठरवलेय.त्यासाठी पट्टी काढायची. व कॉलेज मधून कोण कोण मदत करत का ते पाहू.

प्राजक्ता, खूप चांगली योजना आहे. चला मग लागा कामाला,

(त्या सर्व जणी आपल्या कपाळाला लाल रिबीन बांधतात त्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय अस लिहिलेलं असत. एक छोटासा डब्बा घेवून कॉलेज मधील व्हारांड्यातून त्या फिरत प्रत्येक मुलीकडून पैसे गोळा करत आहेत. अनेक मुले त्यात पैसे टाकत आहेत. पट्टी गोळा करत त्या अरोही गोडांबे जवळ येतात.)

(आरोही गोडांबे ही कॉलेजची टॉप मुलगी, मध्यमवर्गीय  कुटुंबातील . तिचे बाबा नाहीयेत. फक्त आई व लहान भाऊ आहे. जो दहावीत शिकतोय. तिच्या घरी खर्चाची ओढाताण असल्याने तिच्या शिक्षणासाठी तिचा मामा मदत करतोय. त्याला ती व तिची आई खूप घाबरते. अशा या आरोही जवळ येत.)

श्वेता :

आरोही म्याम शिवजयंतीची पट्टी,

( आरोही आपली पर्स उघडते व त्या मधील शंभर रुपये काढून डब्यात टाकताना)

रेवा :

 ओ मॅडम, जरा पाचशे तरी टाका. शंभरात काय येत.

आरोही :

(आपल्या डोळ्यांवरील चष्मा सावरत) 

 देतोय ते घ्या, नाहीतर व्हा पुढे.

वेदिका :

 पुढे व्हा काय पुढे, तुला आम्ही काय भिकारी वाटलो.

 आरोही :

 छे, मला नाही तस वाटत, तो भिकार्यांचा अपमान होईल.

माधवी :

 आरे, मर्यादा सोडतेस तू, तुझे नकोत पैसे आम्हाला,

आरोही :

 द्या मग परत, अन् जावा गावभर भीक मागत.”

श्वेता :

 थोबाड फोडीन तुझं.

( ती हात उचलते)

(प्राजक्ता तिचा हात धरते.)

प्राजक्ता :

नको दंगा, आपणं शिवजयंती साजरी करतोय, चला पुढे.

(त्या पुढे जाऊ लागतात. तेव्हा आरोही मागून चुटकी वाजवत.)

आरोही :

ए….

(त्या सर्वजणी मागे फिरतात. आरोही प्राजक्ताच्या पुढे येत.)

आरोही :

 सर्वांची बॉस होऊन फिरतेस व अभ्यास, करिअर सोडून या हॉस्टेलच्या मुलींना सण उत्सवात घालतेस. काय यांचं भविष्य, तुझी गुलामीच करायची ना, फॉक्स ब्रेन लेडी, पक्की राजकारणी आहेस बघ.

श्वेता :

आरे,

(प्राजक्ता आपला हातवर करून स्वेतास शांत राहण्यास सांगण्याचा इशारा देत.)

प्राजक्ता :

 हे बघ, तू उगाच मनाचे मनोरे रचू नकोस, आम्ही काय या कॉलेजात आल्यापासून कधी गौरीची गाणी म्हटली नाहीत की कधी हादगा घातला नाही. साधं संक्रांतीला तिळगुळ सुद्धा वाटल नाही. फक्त अंतर्मनातून वाटल की शेवटचे चार महिने आहेत. आपल्या राजांची जयंती साजरी करावी. म्हणून हा उपद्व्याप करतोय येवढच.

आरोही :

( हसते)

 काय तर म्हणे, राजांची जयंती साजरी करतोय. राजमुद्रा तरी पाठ आहे का मॅडम?

 की विसरली,

 शाळेत शिकवली नाही वाटत.

 ( मुले हासतात)

प्राजक्ता :

 राजमुद्रा ना मग एक तर,

 प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्व वंदिता शाह सूनो…

(प्राजक्ता थांबते )

आरोही :

अरेरे, साधी राजमुद्रा पाठ नाही,

बरं ते सोड, ही नाजूक पावले एखादा गड तरी चढलेत का? तुझ्यासारख्या मऊ, मुलायम बिछान्यावर लोळणाऱ्याना काय माहित डोंगर, दर्या, जरा सापा किर्ड्यातून रानवाटा चाल म्हणजे शिवराय व त्यांचं स्वराज्य कळेल. असं लोकांकडून जबरदस्ती पैसे उकळून जर तू ही जयंती साजरी करत असशील तर ते राजानाही आवडणार नाही. कुणा मुलाकडे किती रुपये आहेत, नाहीत, त्याची परिस्थिती काय आहे. याचा जराही विचार नाही,

या कॉलेजमध्ये फक्त आलिशान बंगल्यात रहाणाऱ्यांचीच मुले शिकत नाहीत. तर सर्व सामान्यांची मुलेही शिकतात. अशी बिदागी गोळाकरून शिवजयंतीच्या नावावर चैन करण्यापेक्षा शेतात जाऊन कष्ट करून मिळवा पैसे व मग खुशाल करा जयंती.

प्राजक्ता :

 हे बघ तू जास्तच बोलतेस ह, कष्टाचं म्हणत असशील तर आहे माझ्या नशिबात सुख, त्यात काय, हे बघ एकटी घालू शकते मी शिवजयंती, पण या मुलींनी ठरवल म्हणून नाहीतर ….

आरोही :

 नाहीतर काय नाहीतर, लई मोठं बोलतेस, म्हणे, मी एकटी घालू शकते शिवजयंती, बापाच्या पैशावर मिजास आणखी काय? हिंमत असेल तर स्वतः कमव, नंतर बोल,

अन् एवढं वाटत असेल तर शिवजयंती करण्याआधी एखादा गड चढ व एखाद्या गरीब मावळ्यांच्या घरची भाकर चुलीवर भाजून दाखव, म्हणजे कळलं स्वराज्य कसं निर्मित ते, सोन्याचा चमचा घेवून जन्माला आलेल्यांनी लई गप्पा मारू नयेत.

प्राजक्ता :

स्वीकारलं चॅलेंज तुझं, दुसरा तिसरा नाही तर रायगडच चढून दाखवीन,तेव्हाच तुझी मिजास उतरवीन,

(आवाज चढवून)

पोरीनो, द्या ते पैसे परत ज्याचे त्याला, या वर्षी आपण शिवजयंती करायची नाही, पुढील वर्षीच साजरी करायची. ती ही रायगडावरच,

आरोही :

 बघ बाई आधी विचार करून नाहीतर गड चढायला जायचीस अन् पाचव्या पायरीवरच माटकन बसायचीस.

(आजू बाजूला असणारी मुले हसू लागतात. अरोहीचे बोलणे प्राजक्ताला चांगलेच झोंबते. ती आपल्या ग्रुप मधिल मुलींना घेवून बाजूला व्हारांड्याच्या एका कोपऱ्यात जाते.)

Cut to 

....... ..... ...... ......


Day / Afternoon/ Inter/ College

कॉलेजच्या व्हरांड्यात कोपऱ्यात सर्वजणी एका कट्ट्यावर जाऊन बसलेल्या आहेत. प्राजक्ताच्या कानात आरोहीचे बोलणे एकसारखे घुमत असते. सर्व नाराज असतात.

माधवी :

 तुला काय कळतय का? ती म्हणाली, अन् लावली हिने पैज, साधं पार्क मध्ये फिरायला जाताना गाडी घेवून जाणारी तू, गड कसा चढशील?

श्वेता :

 त्या अरोहीकडे जाऊन चूकच झाली, नसत्या झमेल्यात पडलो, पनवती कुठली.

वेदिका :

मला तर तिचा तो चश्मा फोडावा असा राग आला होता.

माधवी गडकर :

 ही तरी कधी चढलीय का कुठला गड, दुसऱ्याला उपदेश करायला, साधं शाळेतील एखाद स्पर्धेत जिंकलेलं पारितोषक तरी आहे का हिच्याकडे.

अनुजा :

 तिला जिन्यावरून जाताना पाय आडवा घालून पडायला पाहिजे. जाईल गडगडत भोपळ्यासारखी .

प्राजक्ता :

(त्रासून)

 गप्प बसा आता, उगाच काथ्याकूट नको, आता घेतलय ना चॅलेंज. अन् ती काही चुकीचं बोलत नाहीये, आपणं आता स्वीकारलंय ना चॅलेंज. मग थोड कष्ट घ्यायचं.

वेदिका :

ये बाई साधं अर्धा किलोमीटर चालल्यावर थोडी विश्रांती घेणाऱ्या आपण, एवढा गड कशा चढायच्या.

प्राजक्ता, एक तर गड चढा ,नाहीतर आरोही गोडांबेच पाय धरा. काय करायचं ते ठरवा. नाहीतर तसं पाहायला गेलं तर मी चॅलेंज दिलंय. तुम्ही नाही.

श्वेता :

 अस काय म्हणतेस, अन् त्या नकचडीचं पाय धरण्यापेक्षा गड चढून पाय मोडले तरी चालतील मला.

अनुजा :

 आम्ही काय कच्या आहोत काय?

रेवा :

 तो गोडांबा नाही, कच्चा अंबा आहे. लोणच्याचा किडका. त्या किडक्याचे पाय धरण्यापेक्षा गड चढलेला बरा.

माधवी :

तो गड चढूच पण आता परीक्षा आलेय त्याच काय.

श्वेता :

 हे आता बोलायलाच हवं का. उगाच टेंशन.

प्राजक्ता :

तिचं काही चुकलं नाही आपण आता यावर जरा प्रॅक्टिकली विचार करायला हवा. माझं काय मला आहे बापाचा पैसा, पण तो ही लग्नानंतर असेल का माझा, अन् तुमचं भविष्य काय? ते काही नाही उद्या टाईम टेबल लावते. त्यानुसार सर्व करायचं. अभ्यास, कसरत, सर्व काही. उद्यापासून पाचला उठायचं. व दिलेलं वेळापत्रक फॉलो करायचं.

सर्व मुली :

बर.. बर….

(इतक्यात बेल वाजते)

श्वेता :

ह चला आता क्लासला

Cut to…...

....... ....... ....... ........ ....

Inter/    College /afternoon

(कॉलेजमध्ये क्लास वेळी प्राजक्ता अपसेट असते. राहून राहून तिच्या मनात विचार येतात. ती क्लास सुटल्यावर)

प्राजक्ता :

 श्वेता चल मी निघते.

श्वेता :

 अगं, अजून लेक्चर आहे ना?

प्राजक्ता :

 नाही, नको ..जाते मी माझा मूड हाफ झालाय, जाते मी घरला.

श्वेता :

 नीट जाशील ना? की पोहोचवायला येवू.

प्राजक्ता  :

नको, जाईन मी

(प्राजक्ता पार्किंग मध्ये लावलेली स्कूटी घेवून निघते.)

             Cut to

…… …… ……… ……

Inter - outer/   Ajinkytara  Bangla / evening

(बंगल्याच्या पार्किंग मध्ये स्कूटी लावली जाते. प्राजक्ता बंगल्यात प्रवेश करते. येताना दरवाजा झटकन लावला जातो. ती घरात प्रवेश करते. वेगाने जिना चढून खोलीकडे आपल्या निघालेली असते. स्वयंपाक घरातील तिची आई दरवाजाचा आवाज एकून बाहेर येते. मोलकरीण सरू भांडी घासत असते.)

सावित्री :

 ( प्राजक्ताची आई)

 काय ग सरू, मॅडम आज लवकर आल्यात.

सरू :

स्वारी तापलेली दिसतेय.

        सावित्री :

झाली असेल कुणाशी तरी तू तू मैं मैं.

सरू :

 जाऊन बघून तरी या काय झालंय ते.

सावित्री :

 कशाला बोलणी खायला, येईल थोडया वेळाने खाली, अन सांगेल तीच तिचं गार्हाण.

( प्राजक्ता रुम मध्ये जाते. व आपली पर्स बेडवर टाकते. व बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होते. थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करते. मूड न लागल्याने पुन्हा खाली येवून येरझाऱ्या घालू लागते)

सावित्री :

काय ग अशा फेऱ्या का मारतेस?

प्राजक्ता :

आज माझा जरा मुड हाफ झालाय.

सावित्री :

सकाळी तर वेगात सुटली होतीस. गीतांजली एक्स्प्रेस सारखी ,अचानक काय झालं.

प्राजक्ता :

आहे एक कॉलेजात बिनडोक तिनं डोकं खाल्ल माझं.

पैज लावतेय माझ्याशी.

सावित्री :

काय बडबडतेस, कसली पैज, स्पष्ट काही सांगशील की नाही.

प्राजक्ता :

ती आहे ना आरोही….

( ती बडबडून सांगू लागते.)(No vc)

सावित्री :

अग, जरा हळूहळू, काय कुत्र पाठीमागं लागल्यासारखी अस काय.

सावित्री :

तू आधी शांत हो बघू, आणि इथे आधी खाली बस.

( डायनिंग टेबलजवळ खुर्चीवर बसवत)

सावित्री :

हा पाणी घे आधी,

( ती थोड पाणी घेते.)

सावित्री :

हा बोल आता.

प्राजक्ता :

अग, कॉलेजमधल्या मुलींनी शिवजयंती करायची ठरवली म्हणून आम्ही थोडे पैसे गोळा करत होतो. पण त्या नकचडी आरोहिने पैसे तर दिले नाहीत तर आम्हाला नको नको ते बोलली.

( प्राजक्ता सर्व वृत्तान्त सांगते. इतक्यात सरू चहा आणून देते. सावित्री चहा प्राजक्ताला देते, व स्वतः पिऊ लागते.)

प्राजक्ता,

अन्, म्हणते कशी की हिम्मत असेल तर गड चढून दाखव,

 सावित्री :

मग काय झालं ?

प्राजक्ता :

मी पण घाबरते काय मी पण स्वीकारलं चॅलेंज, तसं मला म्हटली की गड चढायला जाशील अन् माटकन बसशील. केवढा अपमान केला तीन सगळ्या कॉलेजच्या मुलांसमोर. मला खूप स्याड वाटलं माहितेय.

सावित्री :

मग तू काही बोललीस का?

प्राजक्ता :

मी पण ठणकावून सांगितल, साधा सुधा नाही तर रायगड चढून दाखवीन म्हणून.

(सावित्री चहा घेत असते. तिला रायगड चढणार हे ऐकून ठसका लागतो. ती हसू लागते. तशी सरू पण हसू लागते.)

प्राजक्ता :

हसा तुम्ही पण , तिच्यासारखेच.

(सरूकडे पाहून)

प्राजक्ता :

तू पण हास काय?

सरू :

आवो, तुम्ही हसण्यासारखच बोलला, मग काय करू.

प्राजक्ता :

म्हणजे तुम्हाला पण असच वाटत ना की मी तो गड चढू शकणार नाही.

सावित्री :

हे बघ असं आम्हावर रागावून वड्याच तेल वांग्यावर काढू नकोस.

अन् तस् हसण्यासारखच बोलतेस तू.

प्राजक्ता :

म्हणजे, काय म्हणायचं आहे तुला.

सावित्री :

 हे बघ सरळ साधं गणित आहे. साधं कोपर्यावरून आईस्क्रिम आणण्यासाठी तुला गाडी लागते. एखाद्या छोट्याशा इमारतीत जाताना तुला जिना नको, तर काय,….. लिफ्ट हवी.

( तिच्या खांद्यावर हात ठेवत.)

अन् एवढं मोठं चॅलेंज देवून आलीस. ते ही रायगड पायी चढायचं, हसण्यासारखंच आहे हे.

प्राजक्ता :

 म्हणजे तू ही मला नेभळट समजतेस.

सावित्री :

 अग, अशी रागावू नकोस, जरा शांत होऊन विचार कर. आपण कधीही भावनेच्या भरात अशी आव्हाने स्वीकारू नये. 

( सरूकडे पाहून डोळे मिचकावत )

प्राजक्ता :

 हे बघ तुला जर मला प्रमोट करायला जमत नसेल तर डिमोट तरी करू नकोस.

 सावित्री :

हे बघ तुला रायगडला किती पायऱ्या आहेत ते माहीत तरी आहे का? काही चुकीचं बोलली नाही ती मुलगी, सात वाजेपर्यंत झोपणाऱ्याने अशा पैजा लावू नयेत. उगाच माणसं खुळ्यात काढतील.

प्राजक्ता :

एवढं काही वेळानं उठत नाही हा मी,

सावित्री :

काय ग सरू, मॅडम परवा किती वाजता उठल्या.

सरू, परवा होय नऊ वाजता.

सावित्री :

  आता तूच सांग नऊला उठून आवरायला अकरा तरी वाजणार अन् गड कधी चढणार बाराला उनाच,

अन्… आरोही म्हणाल्या प्रमाण काय…..

सरू :

पाचव्या पायरीवर मटकन बसणार.

(सरू हसू लागते.)

प्राजक्ता :

 हसा तुम्ही मला आणखी खुळ्यात काढा.

मी तुमची तक्रार आजीकडेच करते.

सावित्री :

जा,.. करजा तक्रार आम्ही काय घाबरतो तुझ्या आजीला.

प्राजक्ता :

 माहेरी पाठवाय सांगेन

सावित्री :

 एका पायावर तयार आहे मी. मला पण तेवढंच बरं. मग बसा आजी व नात दोघी मिळून जेवण करत.

प्राजक्ता :

तू गेलीस म्हणजे आम्ही काय उपाशी राहणार नाही. सरू आहे की.

सावित्री :

 हो का मग जा की तुझ्या हायकोर्टाकडे.

प्राजक्ता :

 आजी घरात नाही वाटत. म्हणूनच एवढं बोलतेस.

सावित्री :

 या वेळी घरात कुठं असते.

प्राजक्ता :

 देवळात गेली असेल. म्हणूनच बोलतेस.

सावित्री :

आणखी कुठे जाणार, बसली असेल आपला वृद्ध समूह घेवून चकाट्या पिटत.

प्राजक्ता :

 हिंमत असेल तर तिच्या पुढ्यात बोल की.

सावित्री :

घाबरतो काय मी?

प्राजक्ता :

 आजी आली वाटत.

सावित्री :

 आली, कुठं आली,

अग , सरे भांडी आटप जा लवकर उगाच बोलणी खाशील.

प्राजक्ता :

का ग वाघिणीचा भित्रा ससा झाला वाटत. घाबरत नाहीस ना.

सावित्री :

 ह… गप्प पी तो चहा, थंड होतोय.

प्राजक्ता :

( चहा घेत)

काही म्हण तुझ्या हाताला ना वेगळीच चव आहे. म्हणूनच तुला स्वयंपाक करायला लावतात बघ.

सावित्री :

मग तूझ्या व तुझ्या आजीच्या हातात पण असेल की चव. मग एक दिवस तुम्ही पण करा की,

माझ्या माहेरी कस होत. मी अगदी सुखात होते. इथ आल्यापासून मोलकरीण झालेय माझी.

प्राजक्ता :

 ये गप हं एवढं काही नाही काय, तुला कोणी जबरदस्ती नाही करत. तूच ती जबाबदारी स्वीकारलीस काय.

सावित्री :

 म्हणून सगळं नीट चाललंय. नाहीतर कुठली पत पाळतात. जा ती कपबशी ठेव जा. थोडा अभ्यास कर जा.

प्राजक्ता :

बर बाई जाते.

( प्राजक्ता रुमकडे जाते. सरू व सावित्री आपल्या कामाला लागतात.)

Cut to …..

…… …… …… ….

Inter – outer / Prajakta home /evening

(प्राजक्ता विश्रांती घेण्याचा प्रयत्न करते. पण तिचे लक्ष लागत नाही तिच्या मनात अनेक वेळा आरोहीचे बोलणे आठवू लागते. ती तिथून टेरेसवर जाते. व फेऱ्या मारू लागते. आजी खालून वर आपली गोधडी न्यायला वरील टेरेसकडे येते.)

आजी दुर्गाबाई :

राम कृष्ण हरी

(टेरेसवर प्राजक्ताला पाहून)

आजी :

सोनू बाळ, काय झालं? ..अशी का उभी आहेस?

प्राजक्ता :

कोण आजी? तू कधी आलीस?

आजी :

तू विचारात होतीस तेव्हा, कसला एवढा विचार चाललाय?

(प्राजक्ता संपूर्ण घटना सांगते.)( No oc)

 आजी :

अस आहे का?

प्राजक्ता :

हो बघ ना आजी, कसं नको तस, बोलली ती, माझा चार मुलांमध्ये अपमान केला तिने.

(प्राजक्ता व आजी एका कठड्यावर बसतात.)

आजी :

हे बघ, तुला वाटत ती चुकीची, व तिला वाटत तू चुकीचं वागतेस. तस सांगायचं झालं तर तुम्ही दोघी सुद्धा आपापल्या ठिकाणी योग्य आहात .

प्राजक्ता :

असं कसं?.. ती पण बरोबर अन् मी पण..

आजी :

 अग, सोप आहे, तुझी परिस्थिती आहे म्हणून तू वाट्टेल तेवढे पैसे देवू शकतेस. तस प्रत्येकाचं नसत बाळ, प्रत्येकाच्या परिस्थितीचा विचार करायला हवा.

प्राजक्ता :

म्हणून का तिने नको ते बोलावं.

मी बिघडवते म्हणे मुलींना, मी काय देते ग त्यांना, घरापासून लांब आहेत. हॉस्टेलच आळणी जेवणं मिळत त्यांना. थोड चेंज म्हणून कधीतरी नाष्टा देते एवढच.

व मला सांग, शिवजयंती साजरी करण्याचा व गड चढण्याचा काय संबंध, मला सरळ म्हणते गड चध,

आजी :

 अग, शांत हो आधी, एक माझं, त्या मुलीने काही चुकीचं बोललं नाही, अग तिचं खरी तुझी हितचिंतक आहे. तिने आरसा दाखवला तुला.

प्राजक्ता :

म्हणजे,

आजी :

तू त्या मुलींना मदत करतेस. त्याने त्या तुझ्यावर अवलंबून राहतात. तु म्हणेल ते करायला तयार होतात. तू तुझ्या व त्या मुलींच्या भविष्याचा विचार केलास का कधी? कधी त्यांच्या घरची परिस्थिती जाणून घेतलीस का? अग, पेपरात सुद्धा उत्तर सांगून कॉफी पुरवल्यासारख करतेस. यासाठी तुमची मार्कलिस्ट पाहा, ती आरोही नेहमी मार्कात एक दोन अंकांनी तुझ्या पुढे असते. तुझ्या मैत्रिणी मात्र तुझ्यासारख्या आळसी आठ वाजेपर्यंत झोपणाऱ्या. नेहमी सेकंड क्लास मध्ये मार्कात येणाऱ्या, कशी होईल प्रगती तुमची?.. सांग ना.

प्राजक्ता :

 एवढं, पण आळशी नाही काय आम्ही.

 अभ्यास करते ना मी, अन् तस मला काय गरज आहे याची. पपांनी कमवून ठेवलंय ना.

आजी :

 हेच चुकीचं आहे, परवलंबन कधी ही वाईट, जर तुमच्यात शिस्त, स्वावलंबन, व स्वतःचे संरक्षण व उदरनिर्वाह करण्याइतपत बळ नसेल. तर तुम्ही गुलाम आहात व तुमचं जीवन व्यर्थ आहे. महाराष्ट्रात जन्म घेवून तुमचं जगणं व्यर्थ आहे 

प्राजक्ता :

म्हणजे तुला ही आमचं जगणं व्यर्थ वाटत तर.

आजी :

हो, आहे, व्यर्थ,

माझं ऐकशील तर अजूनही तू हे चित्र बदलू शकतेस, व त्या अरोहिस दाखवून देवू शकतेस. की तू एक राजहंस आहेस बदक नाहीस.

अन् या संपत्तीचं म्हणत असशील तर ही तुझ्या बापानं खूप हलाखीतून गरिबीचे चटके सोसून मिळवली आहे. सहज साध्य नाही हे वैभवं. कष्टा शिवाय फळ नाही.

प्राजक्ता :

मग मी आता काय करायला हवं.

आजी :

 नियोजन, तुझ्या प्रत्येक दिवसाचं, उठणं, झोपणे, व्यायाम जे काही मिळवायचं आहे त्या सर्वांचं नियोजन.

प्राजक्ता विचारमग्न होते. आजी खाली जिना उतरुन जाते.

प्राजक्ता :

(मनात)

 खरच आपण नियोजन करायला हवं. जसं शाळेचं वेळापत्रक तस आपल्या इतर सर्व दिवसाचं व आपल्या टार्गेटचही.

                        Cut to……

…… …… ……. …..

Inter/…. In Room/Night

प्राजक्ता रुम मध्ये बसून कॅलेंडर पहाते. नोटबुक व पेन घेवून नियोजन करून एक टाईम टेबल तयार करुन लावते. घड्याळात पाचचा गजर लावते. झोपी जाते.

Cut to….

….. ….. ….. ….

Inter -outer/  Ajinkytara Bangla / Morning/5.00 o’clock

(मोबाईलचा गजर वाजतो. प्राजक्ता उठते. आवरते, जॉगिंगला जाते. परत येते. मोकळ्या जागेत बागेत कसरत करते. प्राणायाम, योगा करते

 अंघोळ करून खाली येते. सरू नोकरांनी ब्रेकफास्ट तयार करत आहे. वडील व भाऊ डायनिंग टेबलवर बसलेले आहेत. आजी देवपूजा करत असते.

ती मंत्र पुटपुटत असते.)

सरू :

(मॉर्निंग ब्रेकफास्ट आणून देत )

हा घ्या गरमागरम

(सावित्री दुसरा चहाचा ट्रे आणून ठेवते. व वाढू लागते.)

(प्राजक्ता देखील येते.)

प्राजक्ता :

आई मला पण दे.

सावित्री :

हा

प्रमोद :

आई आज सकाळी माकडं आली होती का बागेत ?

सावित्री :

नाही , का रे.

प्रमोद :

अग, लई उड्या मारत असलेला आवाज ऐत होता. म्हणून वाटलं पेरु खायला आली असतील.

(आई व सरू हसतात.प्राजक्ता मोठे डोळे करून पहाते.)

 प्रमोद :

तुला काय झालं असं बघायला.

सावित्री :

बघेल नाहीतर काय करील, तू म्हणतोस ते माकड हेच की.

प्रमोद :

ही छे, ही काय येवढ्या सकाळी उठते. पडली असेल घोरत.

प्राजक्ता :

ये लई बोलू नकोस हा. मी एक्सरसाइज करत होते.

प्रमोद :

असं लवकर उठून, अचानक कसं काय ठरलं.

सावित्री :

मॅडमनी शपथ घेतलीये. गड चढण्याची , त्याचा सराव चाललाय.

प्रमोद :

काय, प्राजक्ता अन् गड छे, काहीतरी ऐकायला चुकली असशील. ही साधी कोपऱ्यावर अर्धा किलोमीटर जाताना गाडी नेते. अन् गड चढणार.

प्राजक्ता :

ए उगाच लई तारे तोडू नकोस, काय. ज्योतिबाला जाताना चालले होते हा

प्रमोद :

माहीत आहे हा, गाडी पंक्चर झाली होती तेव्हा, दहा वेळा वाटेत बसली होतीस.

प्राजक्ता :

तरी चार किलोमीटर चालले होते.

प्रमोद :

उगाच काय पण बोलू नकोस हा,

त्या रस्त्यावरील उलट्या पाटीवरले आकडे सांगू नकोस. फक्त एक किलोमीटर वर गॅरेज होत.

बर ते जाऊदे कोणता गड चढतेस. कलिंगड का,

सावित्री :

 कलिंगड नाही हं रायगड,

प्रमोद :

स्वप्नात असणार.

प्राजक्ता :

हे बघ एवढी पण मी काही नाजूक नाही. एकदिवस तूच बघशील माझी पॉवर.

प्रमोद :

 पॉवर बघशील म्हणे.

वडील सयाजीराव :

ह… गप्प बसा, करा नाष्टा,

अन् प्राजक्ता हे गड चढाई राहू दे. अभ्यासाकडे लक्ष दे. नाहीतर उगाच हेकाड्या सारखं काहीतरी करायला जाशील अन् तोंडघशी पडशील. माझं ऐकलं असतीस अन् सायन्स घेण्यापेक्षा कॉमर्स घेतली असतीस तर ….

प्राजक्ता :

आता तुम्ही सुरू करू नका. मला नाही पसंत तुमचं कॉमर्स. दादाने केलंय ना. रडत कडत. सांभाळेल की बिझनेस.

सयाजीराव :

अन् तू काय करणार आहेस.

प्राजक्ता :

फार्मसी झाल्यावर सांगेन.

सयाजीराव :

अग, आपण बिझनेस केलेला चांगला. हे गोळ्या औषधाच दुकान, यातून किती इन्कम मिळणार तुला. मला काही जास्त प्रोग्रेस नाही दिसत यात तुझी.

प्राजक्ता :

असं तुम्हाला वाटतयं. पण मी ही तुमचीच मुलगी आहे. एवढं शिकतेय म्हंटल तर काही ना काही तरी अर्थशास्त्र ठरवलं असेलच मी.

प्रमोद :

काय पण, पतंग उडवू नकोस.

प्राजक्ता :

हे बघ तुला वाटत असेल, मी पतंग उडवते म्हणून. पण कोणत्या ही क्षेत्रातून पैसे कसे मिळवायचे ते मला कळतात.

सयाजीराव :

 तिचं सोड तू कधी जॉईन होतोस ऑफिसला.

प्रमोद :

झालीय परीक्षा माझी उद्याचा दिवस सोडा. परवा पासून येईन मी ऑफिसला.

सयाजीराव :

हा ठीक आहे.

Cut to……

…… ……. ……. …….


Monday, January 22, 2024

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३६

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३६

 दोन दिवसांनी रेवती व स्वप्नील येतात.

आण्विका, व रेवा घराच्या वरील गच्ची मध्ये एकत्र उभ्या असतात.

आण्विका, हे काय ग झाल अस. काय करू मला तर बाई काहीच सुचत नाही. बाबा काय ऐकायला तयार नाहीत.

रेवती, अग एवढी मोठी घटना घडल्यावर कोणते पालक शांत राहतील. त्यात पेपरात बातमी छापून आल्यामुळे तर गावभर बभ्रा झालाय. मी मगाशी आल्यावर बोलले होते मावशीला. पण ऐकायच्या मनस्थितीत नाहीत काका.

आण्विका, फोन दे

आण्विका फोन घेऊन ईशानला फोन करते. तेव्हा ईशानची बहिण फोन उचलते.

आण्विका, हॅलो ईशान, ईशान आहे का.?

ईशानची बहिण, आहे पण कामात आहे तो.

आण्विक, तुम्ही कोण?

ईशानची बहिण, मी कोण म्हणजे, मी त्याची बहीण बोलतोय. आपण कोण?

आण्विका, मी अण्विका , फोन केला होता म्हणून सांग.

बहिण ईशानची, हा सांगते.

ती ठेवते.

आण्विकेची हालत अत्यंत रडवेली झालेली असते.

….. …… …..

इकडे ईशानला देखील घरच्यांनी स्थळ काढलेले असते. व ते देखील मुलगी पाहायला त्याला नेणार असतात.

ईशान घरी आलेला असतो. तो अनूच्या फोनवर कॉल करतो. पण स्विच ऑफ लागत असतो.

तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. पण कॉल लागत नसतो.

त्याची बहीण त्याला चहा द्यायला येते.

तो बहिणीला, काय मुला तू खूप हुशार आहेस ना.

बहिण, काय दादा.

ईशान, हे बघ माझी लाडकी बहिण आहेस ना.

बहिण, म्हणूनच रोज माझ्याशी भांडतोस ना.

ईशान, माझं एक काम केलस की तुला या दीपावलीला चांगल गिफ्ट देईन.

बहिण, तू देणार मला.

ईशान, हो खरंच देणार.

बहिण, आधी काम बोल.

ईशान, हे बघ आई बाबा मला जे स्थळ बघणार त्यात तू खोडा काढायचा. व मोडायच.

बहिण, शहाणा आहेस. माझं कोण ऐकणार इथे. नाही बाबा, बाबांचा काव मी खाऊ. नको तुझं गिफ्ट.

ईशान, अस काय आपल्या भावासाठी येवढं पण नाही करणार.

बहिण, बर बघते.

पण मला जर चांगली वाटली वहिनी तर मी काय नाही मोडणार

ईशान, जा लई शहाणी आहेस. तू मी सांगतो तस कर मग बघ. मस्त वहिनी आणतो तुला.

बहिण, हा बरं. ठीक आहे.

ती चहाचा ट्रे घेते अन् आट जाते.

व जाताना खुदकन हसते.

अन् म्हणते, वेडा रे वेडा.

….. …… ….. ……

 दोन दिवस नंतर. रविवार सकाळी ९.३०. वाजता.

आण्विकेच घरी

ती तिच्या रुममध्ये असते.

आई, कपाटातून उघडुन एक छान साडी काढून तिच्यासमोर ठेवते.

आई, हं घे नेस ही. अन् झटकन आटप. उगाच तोंड पाडून बसू नकोस. मस्त मुलगा शोधलाय तुला त्यांनी. आज जायचय शरद काकांकडे तिकडेच बोलणी करून आजच जमल तर ठरवू. व सुपारी फोडू. आटप लवकर.

आण्विका, आई तू तरी समजून घे.

आई, तुला समजून घेतल तर मलाच बाहेर काढतील घरातून.

बाहेरून बाबा,

अवरल काय नाही अजून.

आई, हा आवरतेय.

बाबा, आटपा उशीर होतोय.

आई, उगाच नखरे करू नकोस आटप नेस ही साडी.

रेवा मदत कर तिला.

आई खालील खोलीत जाते.

आण्विका, रेवा तू तरी सांग. समजावून.

रेवती, मी कालपासून थकलेय समजावून हे बघ आता ही वेळ मारून नेवू नंतर बघू आपण काय करायचं ते.

स्वप्नील, हे बघ स्थळ पाहायचा कार्यक्रम होऊ देत मग बघू नंतर घरी चर्चा करून.

आण्विका, बर.

…… …… …….

Day afternoon १.०० o’clock. आण्विकाच्या वडलांच्या मित्राच्या शरद चौगलेच्या घरी.

आतील रूममध्ये अन्विकेला तयार करत असतात. ती नाराज असते.

इतक्यात एक चारचाकी येवून बंगल्याच्या आवारात थांबते. त्यातून पाहुणे खाली उतरतात. आण्विकाच्या बाबांचे मित्र शरद चौगले जाऊन त्यांना पाणी देतात. ते आत येतात.

शरद चौगले,

घर शोधायला काही त्रास नाही ना झाला.

पाहुणे, नाही. सापडलं लगेच.

शरद चौगले, बर या बसा.

अग जरा पाणीआनण.

शरद चौगले यांची पत्नी तारा पाणी घेऊन येते.

पाहुण्यांना पाणी दिले जाते.

बसल्यावर पाहुणे मुलगीला बोलविण्यास सांगतात.

अणुची आई व बाबा आत असतात. अन्विकेला,

उगाच नखरे नकोत. गुमान चल बाहेर पोहे घेऊन.

रेवती पोह्यांची प्लेट देते.

आण्विका नाखुशिनेच ती प्लेट घेऊन जाते.

पोहे सर्व करू लागते. तिची नजर खाली असते. मुलगाही खाली मान घालून बसलेला असतो.

ती नवर्या मुलाला पोह्याची प्लेट देवू लागते.

इतक्यात तिच्या कानावर आवाज येतो.

अग पोहे देतेस. मुलग्याचा चेहरा तरी बघ.

आवाज ओळखीचा वाटल्याने ती साइडला पाहते. तर तिथे संयोगिता असते. ती समोर पाहते. तिच्या समोर ईशान असतो.

आण्विका, आश्चर्याने तू.

ईशान, वर तोंड करत अनु तू.

लगेच ईशानचे बाबा, बघ बाबा पसंत आहे का ते. नाहीतर दुसरी बघायला बर.

आण्विकेची आई, बघ तुला ही पसंत आहे का?

आण्विका, काय हे बाबा. अस कधी करतात काय.

राहुल, मग काय तुझ्यासारख लपत छपत करायचं काय.

आण्विका इकडे तिकडे पाहते. तेव्हा रेवा व संयोगिता दोघी एकमेकींना टाळ्या देत असतात.

संयोगिता, काय रे ईशान तुला तरी आहे का पसंत. बघ बाबा नाहीतर नंतर नावे ठेवायचास

ईशान, हसत असतो. त्याच्या डोळ्यातून पानी पडत असत. तो, काय हे किती टेन्शन देता. अस कधी करतात का?

स्वप्नील, मग काय पळून जावून करतात.

असच करतात.

आण्विका बाबाजवळ जाते.

तिचे डोळे पाणावलेले असतात.

थॅन्क्स बाबा, खरंच आज तुम्ही मला जगातील सर्वात मोठं अन् माझ्या आवडीच गिफ्ट दिलेत.

अणुचे बाबा, अग तुला नाराज करून काय करू. शेवटी तुला आयुष्य काढायचं आहे. तुझ्या मावशीने आम्हाला सगळ सांगितलं होत. व मी पण संपूर्ण माहिती काढली होती. पण हा घोळ झाला. व आम्हाला पण लोक बोलू लागले. म्हणून थोडा चिडलो होतो. नाहीतर आम्ही कधीच पसंत केलं होत. फक्त तुझा दादा आढे वेढे घेत होता.. ते ही परवा दूर झाले. ज्याप्रमाणे त्याने तुझा शोध घेऊन सोडून आणले.

आण्विक, मग अस का मला अंधारात ठेवला.

बाबा, हा सगळ प्लॅन या संयोगिता, रेवा अन् स्वप्नीलचा आहे.

आण्विका, काय रेवा, स्वप्नील थांबा तुम्हाला दाखवते.असं छळतात का आपल्या ताईला.

स्वप्नील, काय दीदी कसं वाटल गिफ्ट फोडायची का सुपारी आता.

काय ईशान,

ईशान व अन्विका, फोडा की. आम्ही तयार आहोत.

सगळे जल्लोष करतात.

…… ……. ……. ……….

        समाप्त


कळत नकळत जुळले हे बंध भाग ३५

 कळत नकळत जुळले हे बंध भाग ३५

Day. राधानगरी. फॉरेस्ट ऑफिस inter

ईशान आपल्या केबिन मध्ये येतो. इतक्यात बाहेरून एक कर्मचारी त्याला एक लेटर आणून देतो.

कर्मचारी, ईशान सर तुमच्यासाठी एक लेटर आलंय पाहा.

ईशान, आपल्या खुर्चीत बसलेला असतो.

ईशान, हा आन इकडे.

कर्मचारी लेटर देतो

ईशान ते उघडतो. व पाहतो.

तो नाराज होतो.

त्याला पाहून कर्मचारी, काय झालं साहेब.

ईशान, काय होणार आणखीन. बदली झालिये माझी.

कर्मचारी, काय सर अडीच वर्षे तर झाल्यात आपल्याला अन् लगेच बदली.

ईशान, काय माहित.

कर्मचारी, कुठे पोस्टिंग झालीय.

ईशान, कोयना अभयारण्य.

कर्मचारी, चांगली जागा आहे सर. मस्त शांत परिसरात, तुम्ही जा तिकडे.

ईशान, हा बर.

इतक्यात त्याला घरून फोन येतो.

बाबा, ईशान कुठे आहेस?

ईशान, कामावर.

बाबा, घरी ये शनिवारी.

ईशान, का काही काम आहे.

बाबा, काही नाही, जरा चर्चा करायची होती.

ईशान, कशा बद्दल?

बाबा, तुझ्या लग्नाबद्दल.

ईशान, इतक्या लवकर कशाला?

बाबा, मग काय तू पळून गेल्याची बातमी पेपरात यायची वाट बघायची. अन् मग तुला विचारू का? ते काही नाही शनिवारी घरी यायचं. ते ही दोन दिवसांची सुट्टी घेऊन.

ईशान, मला एवढ्या लवकर नाही लग्न करायचय.

बाबा, मग काय म्हातारं झाल्यावर बोहल्यावर चढणार आहेस.

ईशान, थोड दोन चार महिने तरी द्या मला.

बाबा, म्हणजे कुठली तरी घेऊन यायला पोरगी. ते काही नाही. शनिवारी यायचं म्हणजे यायचं. बाकी काय आम्हाला माहीत नाही.आम्ही एक मुलगी पहिली आहे.

ईशान, मला ती पसंत नसेल तर.

बाबा, पाहायच्या आधीच कसे ठरवतोस ,ते बघू नंतर. तू जर का आला नाहीस तर मी काहीतरी बरंवाईट करून घेईन

ते फोन ठेवतात.

ईशान खूप चिडतो.

….. …… ……. ……

Day. आण्विकेच्या घरी inter

आईने जेवण वाढलेले असते. बाबा , भाऊ जेवायला येतात.

बाबा, अनु कुठे आहे.

आई, आणखी कुठे असणार, असेल तिच्या खोलीत.

बाबा , जेवली का?

आई, नाही.

बाबा, का?

आई, हे बघा तिच्या मनात तो असेल तर.

बाबा, अग पण तिने आपल्याला आधी सांगायचं नाही का?

आता बघ सगळीकडे बदनामी चालू झालीय.

बाबा, ( हाक मारतात) अनु ये अनु.

आण्विका, आपल्या खोली बाहेर येते. काय बाबा,

बाबा, चटकन जेवायला ये .

आण्विका, भूक नाही.

बाबा, बाहेरच हॉटेलचे जेवायची सवय लागलीय ना. घरचं कसं गोड लागेल. चल झटकन ये.

आण्विका, खाली येते. व जेवायला बसते.

बाबा, वाढ तिला.

आई जेवायला वाढते.

जेवत असताना थोड जेवण झाल्यानंतर.

आपल्या बायकोला,

बाबा, एक छानशी साडी काढून ठेव. दोन दिवसांनी रविवारी एके ठिकाणी आपण स्थळ बघायला जाणार आहोत.

आण्विका, मी फक्त ईशान संगे लग्न करेन.

बाबा, येवढ्या मोठ्या संकटातून वाचलीस तरी देखील डोळे उघडले नाहीत.

आण्विका, वाचवली कुणी त्यानेच ना.

बाबा, हो वाचवली पण बदनामी आमची झाली त्याच काय?

आण्विका, मग तुमची ही बदनाम मुलगी कुणा दुसऱ्याच्या गळ्यात घालण्यापेक्षा त्याच्याच गळ्यात घाला.

बाबा, ते बघू आमचं आम्ही काय करायचं ते. तू लग्नाला उभी राहायचं बघ. स्थळ मी बघितलंय.

आण्विका, मी इशांनसोडून दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही.

आई, अनु एवढी उद्धट बोलायला कुठून शिकलीस. माझी अनु अशी नव्हती. शांत सोज्वळ माझी अनु आज इतकी उद्दट कशी?

आण्विका, माफ कर आई मला. पण तुम्हाला माझ्या भविष्याची काळजी नाही. मला तो आवडतो. व प्लीज मला त्याच्यापासून वेगळ करू नका.

बाबा, ते बघू काय करायचं ते. तू परवा रेडी रहा.

आण्विक रडू लागते.

ती उठते व आपल्या रूममधे जाते.

आई, अहो आयका की बघ नाहीतर करू तिच्या मनासारखं. मला पण मुलगा पसंत आहे. चांगला वाटतोय.

बाबा, बघू विचार करून.

….. …… …. …..


कळतं नकळत जुळले हे बंध भाग ३४

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग ३४

Night. कोल्हापूर बस. राधानगरी बस स्टॉप ८.०० o’clock.

कोकणातून कणकवली सांगली बस निघालेली आहे. ती बस अण्विकाचे कुटुंब पकडते.

आण्विका व आई एका शिटवर बसलेल्या आहेत बसमध्ये. तिचा भाऊ राहुल शेजारील सिटला धरून उभा आहे. वडील पुढील बाकावर बसले आहेत.

बस कोल्हापूरच्या दिशेने निघालेली आहे.

तिचे बाबा तिच्याकडे पाहत आहेत.

तिचा नाराज चेहरा त्यांना सर्व काही सांगत आहे.

अनुच्या मनात अनेक विचार चालू आहेत.

आपल कसं होणार? या प्रसंगाने घरची आपल्या लग्नाला परवानगी देतील काय? असे प्रश्न तिच्या मनात येत आहेत.

तिला राधानगरी पोलिस स्टेशन मधील सर्व घटना आठवू लागते.

फ्लॅश बॅक

राधानगरी पोलिस स्टेशन

इन्स्पेक्टर राजवीर, आता सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे. आपण जाऊ शकता. आपली मुलगी आपणास मिळालेली आहे.

ईशान अन्विकाकडे पाहत असतो.

पोलिस स्टेशनच्या बाहेर आल्यावर

ईशान, ती उपाशी असेल आपण इथे जवळ कुठेतरी जेवण करूया का?

आण्विकाचे बाबा, काही नको. झाली तेवढी मदत पुरे. आता आमचं आम्ही बघतो. या आता तुम्ही.

ईशान, आता सापडली ना अनु. मग.

आण्विकाचे बाबा, हो सर सापडली. पण बदनामी ही झाली आमची, त्याच काय? संकटात झालीच तुझ्याच मुळें सापडली होती. आता दूर राहा तिच्यापासून…

आण्विका, अस काय म्हणताय बाबा.

बाबा, तू तर काहीच बोलू नकोस. तुला तर घरी गेल्यावर पाहतो.

चला आता शेवटची गाडी भेटते का पाहू.

ते निघालेले असतात. ईशान एका गरीब मुलासारखा अगतिक चेहरा करून तिच्याकडे पाहू लागतो. ती सुद्धा रडत निघालेली असते.ती सुद्धा मागे वळून त्याच्याकडे पाहू लागते.

आण्विकाची आई तिच्या हाताला धरून ओढत असते.

ब्रेक लागतो, बस थांबते.

आण्विका आपल्या विचार चक्रातून बाहेर येते.

आण्विकेची आई, ह चल आता आपला थांबा आला.

ती खाली उतरतात.

बस पुढे सी बी एस ला जाते.

Cut. To….

…… …… ……. ……..

Night. ईशानची शासकीय निवास रूम. Inter

ईशान आपल्या रूमवर येतो. शांतपणे तो आपल्या बेडरूममध्ये जातो.जाताना त्याला तेथील कर्मचारी, सर जेवण लावू.

ईशान, नाही नको. भूक नाही.

ईशान आपल्या रूम मध्ये जाऊन रडत आपल्या बेडवर बसतो.त्याला डोळ्यापुढे अण्विका दिसत असते.

… …… ……. …… …….

Next day, ईशान आपल्या घरी.

ईशान फोन करतो.

आण्विकेच्या मोबाईल वर.

तिकडे तिची आई फोन उचलते.

आण्विकेची आई, हॅलो कोण.

ईशान, अनुं कशी आहे.

आण्विकेची आई, आपण कोण?

ईशान, मी ईशान,

आण्विकेची आई, ठेवा फोन परत फोन करू नका. व ती ठेवते.

ईशान हॅलो हॅलो करत राहतो.

ईशान पुन्ह फोन लावतो. फोन कट केला जातो.

ईशानला काही सुचत नसते.

ईशान, स्वप्नीलला फोन करतो.

रिंग वाजू लागते.

स्वप्नील फोन उचलतो. ईशान त्याच्याशी संवाद साधतो. व घडलेली हकीकत सांगतो.

स्वप्नील, हे बघ टेन्शन घेऊ नकोस. होईल नीट. जरा शांत रहा.

इतक्यात तिथे रेवती येते.

रेवती, कुणाचा फोन आहे.

स्वप्नील, ईशानचा.

रेवती, काय म्हणत होता.

स्वप्नील रेवाला सगळ घटना सांगतो.

रेवती, आपल्याला जायला हवं.

स्वप्नील, हो. पण आधी कॉल तरी दिदिला कर.

रेवती लगेच फोन लावते.पण फोन बंद असतो.

तेव्हा ती मावशी म्हणजे अणुच्या आईच्या फोनवर कॉल करते.

आण्विकेची आई फोन उचलते.

अणुची आई, हॅलो.

रेवती, मावशी कशी आहेस.

अणुची आई, आहे बरी.तू कशी आहेस.

रेवती, आहे ठीक.अनु दीदी कुठे आहे? तिचा फोन लागत नाही.

अन्विकाची आई, आहे इथे तिच्या रुममध्ये.

 रेवती, जरा तिच्याकडे दे.

आण्विकेची आई, हा देते.

आण्विकेची आई तिच्या रुमकडे जाते. आण्विक शांत बसलेली असते.

आई, हा घे फोन, रेवाचा आहे. आण्विका जवळ फोन ठेवून ती खाली जेवण खोलीकडे जाते.

आण्विका फोन घेते. व रडू लागते.

रेवती, अग अस रडायला काय झालेय. सुटका झाली ना तुझी. अग एवढी धाडशी तू अन् कशी काय अडकलीस.

आण्विका, काय सांगू, अग अचानक त्यांनी हल्ला केला. मला कळलंच नाही.

आण्विका, अग, पण आई बाबा चिडलेत. मला सगळ अवघड वाटतंय. आता वाटत नाही मला की ते लग्नाला परवानगी देतील आमच्या.

रेवती, अस कस देणार नाहीत. बघते मी.दोन दिवस थांब माझे शेवटचे दोन पेपर देते व येते.

आण्विक, लवकर ये.

रेवती, हा बाई येते.

….. ….. ….. …..

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


Sunday, January 21, 2024

कळतं नकळत जुळले हे बंध भाग ३२

 

कळतं नकळत जुळले हे बंध भाग ३२


Night. Inter ईशानच्या वनविभागाच्या निवासस्थानावरील रूम मध्ये

 ईशान आपल्या रूमवर जाऊन इकडे तिकडे फिरत विचार करत असतो. थोडा विसावलेला असतो.

त्याला एक स्वप्न पडते.

ईशान पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्याच्या पुढ्यात राजवीर सातवेकर फौजदारांना एक फोन कॉल आलेला आहे.

एक इसम, सर इकडे राधानगरी फोंडा रोडवर घाटात एके ठिकाणी कुबट वास येत आहे. व खाली दरीत पाहिल्यावर एक मानवी प्रेत दिसत आहे.

पोलिस, कुठे आहे.

इसम, कणकवली रोडवर फोंडा घाटात. तरी लवकर या.

ते लगेच जीप मधून निघतात. ईशान ही त्यासोबत असतो. घाटात एका कॉर्नरला गाडी थांबते. तिथे अनेक लोक जमलेले असतात. येणा - जाणारी वाहने थांबून पाहत असतात.

पोलिस जीप थांबते. तो इसम जवळ येतो.

राजवीर सातवेकर, तुम्हीच फोन केला होता का?

तो इसम, हो. मी केला होता

पोलिस, प्रथम कोणी पाहिलं.

तो इसम, मी पाहिलं साहेब. मी कणकवलीला निघालो होतो. वाटेत बाथरूमसाठी थांबलो. तेव्हा मला खालील बाजूस दिसलं व वास सुद्धा येत आहे.

ईशान, लगबगीनं पुढे जातो. व पाहतो. तिथे एक प्रेत पडलेले व त्यावर भयंकर माशा घोंगावत असतात. व ते पाहून तो जोरात रडू लागतो.

व बाजूला येवून उलट्या करू लागतो.

इतक्यात राजवीर सातवेकर फौजदार पोलिसांना ते प्रेत काढायला सांगतो.

ईशान , मोठ्याने रडू लागतो.

प्रेत काढले जाते.

राजवीर सातवेकरांजवळ येवून, ईशान आवरा स्वतःला. ते अण्विकाचे प्रेत नाही.

ईशान, अस कस म्हणताय,

राजवीर, अहो ते एक पुरुष प्रेत आहे. आवरा स्वतला. तुमच्या सारख्या धाडशी विरांनी अस घाबरायच नसत सर, तुम्ही उलट यामध्ये माझ्या सोबत कामाला लागल पाहिजे.

इतक्यात ईशान जागा होतो. त्याला दरदरून घाम फुटलेला असतो.

त्याला अन्विका आठवू लागते. तिच्या आठवणीने तो रडू लागतो.

…… ……. …….

Next day. Morning. राधानगरी पोलिस स्टेशन inter

   पोलिस स्टेशन मध्ये ईशान जातो.

ईशान, सर काही लागला का तपास.

राजवीर सातवेकर फौजदार, नाही सर. आम्ही चौकशी केली, पण पांढर्या रंगाची गाडी शहरातून बाहेर जाताना कुठेही सी सी टी वी मध्ये दिसून आली नाही. फक्त त्या मुलानेच पहिली. येवढच. बाकी त्या मुलीच्या घरी आम्ही चौकशी केली आहे. तिच्या घरातील लोक आलेत. इकडे बाहेर आहेत.

इतक्यात अन्विकाचे आई वडील तिथे येतात.

आई , अनु बाळ कुठे आहेस तू. ती रडू लागली

पोलिस , अहो गप्प बसा. शांत रहा आपण, उगाच दंगा करू नका.

अण्विकाचे बाबा, उगाच दंगा करू नका म्हणजे काय, आमची मुलगी गेलीय. हरवली आहे.

इतक्यात ईशानला पाहून अन्विकेचा भाऊ, तूच का तो ईशान, सांग माझी बहीण कुठे आहे. सांग नाहीतर तुलाच संपवतो.

तो त्याची गळपट धरायला लागतो.पोलिस कॉन्स्टेबल त्यांची गळपट सोडवतात.

तरी पण अन्विकेचा भाऊ , सोडणार नाही तुला जर माझी बहिण सापडली नाही तर. याद राख.

पोलिस स्टेशन फौजदार राजवीर, ईशानला बाजूला घेतात. हे पहा सर मी प्रयत्न करतोय. पण जर का दोन दिवसात त्यांचा पत्ता लागला नाही तर तुम्हाला अटक करावी लागेल. कारण तस पाहायला गेलं तर शक तुमच्याकडेच जातो.

तुमच्या कुठल्या शत्रूने तर नाही ना केलं हे कांड.

ईशान, माझे शत्रू. हा ते तस्कर ज्यांचा माल मी पकडला तेच असणार.

राजवीर सातवेकर, कॉस्टेबल ती तस्कर केस फाईल काढा बघू.

कॉन्स्टेबल उठून आतील खोलीत जातो. व तिथून कपाटातून शोधून त्यातील फाईल काढून घेऊन येतो. ती राजवीर सातवेकर फौजदार खोलून पाहतात. व ईशानला ते फोटोत दाखवतात.

राजवीर, हे का ते?

ईशान, मान हलवून हो असे सांगतो.

राजवीर, ईशान सर, जोपर्यंत मॅडमांचा तपास लागत नाही तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून बाहेर जाऊ शकत नाही.

ईशान, बर.

ईशान निघतो.

….. …… …… …

Day. Morning. Outer.

राधानगरी स्थानिक परिसर एक टपरी चहाची , तिथे एक स्थानीक वार्ताहर गेलेला असतो तो.

वार्ताहर, सिगारेट दे.

टपरीवाला, बातमी कळली काय?

वार्ताहर, कोणती,

तेव्हा तो टपरी वाला संपूर्ण हकीकत सांगतो.

……. …… ……..

Next day. Paper mil

पेपर मिल मध्ये बातमी छापली जाते.

पेपर सर्व घरी पोहोचतो. त्यातील बातमी लोक वाचू लागतात. पेपर मधील हेडलाईन्स असते, राधानगरी येथून डॉक्टरचे अपहरण.

सगळीकडे चर्चा सुरू होते.

ईशान देखील सर्वत्र शोधत असतो. आण्विकेचा काहीच पत्ता लागत नसतो.

तो आपल्या रुमकडे जाताना लोक त्याच्याकडे पाहून कुजबुजत असतात.

एक बाई, काय बाई दिवस आलेत. चांगल चांगल म्हणता पोर किती बिघडलेत. आता खून अपहरण व खंडणी वसूल करू लागलेत.

ईशानच्या कानावर ती बातमी पडते.

तो आपल्या खोलीत जाऊन एका बाजूला बसतो. शांत.थोडावेळ तो वॉश बेसिन जवळ जाऊन खूप रडतो. नंतर तो तोंडावर पाणी मारून तोंड पुसतो.

व कपडे चेंज करून आपली गाडी घेऊन तो पोलीस स्टेशनवर जातो. तिथे बाजूला बाकावर अन्विकाचे आई व बाबा बसलेले असतात. त्यांजावळ जाऊन.

तो खाली बसतो. व अन्विकाच्या बाबांना,

ईशान, मला माहित आहे. तुम्हाला खूप राग आला आहे. माझा, पण मी खरंच सांगतो. माझं अनुवर खूप प्रेम आहे. अन् तीच माझ्यावर. माझ्यावर विश्वास ठेवा मी शोधून काढेन. तुम्ही आता माझ्या रूमवर चला. विश्वास ठेवा माझ्यावर.

आण्विकाची आई काही बोलणार इतक्यात तिचे बाबा तिला थांबवतात. व चल

ते दोघे बाजूला जातात ईशान त्यांना संपूर्ण हकीकत सांगतो.

ते येतात.

व चला,

आण्विकेची आई , कुठे जायचं.

आण्विकेचे बाबा, चला बसा गाडीवर नंतर बोलू.

ते सर्व निघतात व ईशानच्या शासकीय निवासस्थानी रूमवर येतात.

तिथे आल्यावर.

आण्विकाचे बाबा, हे बघ राहुल व तू दोघे शोध घ्या. राहुल तू जा बरोबर. मी ही माझ्या गाडिवरुन शोधतो.

ईशान, थँक्स,

आण्विकाचे बाबा, कशाबद्दल,

ईशान, आपण माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल.

राहुल, बाबा तुम्ही असा कसा विश्वास ठेवता.

आण्विकाचे बाबा, शांत रहा. आपली अनु हरवली आहे. तिला शोधणं महत्वाच आहे.

ईशान व तू दोघे मिळून शोधा.

ईशान राहुलला घेऊन आपल्या ऑफिसमध्ये गाडीवरून जातो. तेथील नकाशे. घेऊन तो त्यावर रिसर्च सुरू करतो.

लगेच तो राजवीर सराना फोन करून कोणत्या ठिकाणचे सी सी टी वी तपासले त्यांची नोंद घेतो.

नंतर ते एरिये सोडून अन्य शहरा बाहेर जाणारे मार्ग इंटर नेट वरून सर्च करतो.

त्या मार्गांची नोंद घेतो. व नंतर राहुलला घेऊन तो सर्च करायला निघतो.

तेव्हा त्याच्या लक्षात येते की कच्च्या मार्गावर सी सी टी वी नाहीत.

तो विचार करतो. त्याच्या लक्षात येते. की आपण अरण्यात गुप्त कॅमेरे लावलेले आहेत. तो आपल्या मुख्यालयात जाऊन तिथे असणाऱे कॅमेरे ऑनलाईन चेक करतो. तेव्हा त्याला तिथे एका कॅमेऱ्यात एक व्हाईट मारुती जाताना अरण्यातील एका कच्च्या मार्गाने दिसते. तो ती डिटेल पाहतो. तेव्हा त्याला तिच्यावर मशालीचे चित्र दिसते.

तो त्या मार्गाची लोकेशन पाहतो. नंतर आणखी चेक केल्यावर त्याला थोड्या वेळानी एक लाल रंगाची मारुती परत येताना पाहायला मिळते. तो तिला बारकाईन न्याहाळून.

ईशान, राहुल चल.

Cut to…..

…… …… ….. ….. …..

राधानगरी अरण्य एक वस्ती, outer inter day

पोलिस जीप थांबते. पोलिस लगेच बाहेर पडतात व पकडापकडी सुरू होते. सदा घरात शांत बसलेला असतो. तो टिव्ही पाहत असतो. इतक्यात पोलिस घरात येतात. त्याला उचलतात.

सदा, सोडा मला, मी काय केलंय.

पोलिस, चल दाखवतो तू काय केलंय ते.

दुसरे पोलिस तुकाच्या घरात शिरतात. तुका जेवत असतो. त्याच्या घरी जाऊन त्याला ही पकडतात. तसेच

भिवा जो घरातील मोरीत हातपाय धूत असतो. त्यालाही पोलिस पकडतात. त्यांच्या बायका मोठ मोठ्या न रडत असतात.

किशा आपला रानातून येत असतो. गावातील त्याला कालवा ऐकु येतो. कीशाला पोलिस पकडुन न्यायला आल्याची बातमी गावात जाताना एका मुलाने दिल्यामुळे तो लगेच पळून जातो.

पोलिस भिवा तुका व सदाला घेऊन जातात व कस्टडी मध्ये घेताना

सदा, साहेब काय करताय? काय चाललय? मोगलाई लागली काय?

कॉन्स्टेबल, मोगलाई नाही लोकशाही हाय. तुझा सत्कार करायचाय. लोकांच्या पोरी बाळी पळवता काय.

चल.

सदा, आम्ही एक वेळ चोरी करू पण असल वंगाळ काम नाय करत.

कॉन्स्टेबल, ते बघू आत गेल्यावर.

ते त्यांना आत कस्टडीत नेतात. व चांगली धुलाई करतात.

तरी देखील ते एक जात कबूल करत नाहीत.

…… ….. ….. ….


कळत नकळत जुळले हे बंध भाग ३३

 

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३३

Day. Afternoon inter outer

ईशान आपला पेहराव करतो. पायात बूट. अंगात ज्याकेट. तसेच इतर सामग्री घेऊन, एक नकाशाचा फोटो मोबाईल मध्ये घेऊन बाहेर पडतो. आपली बाईक घेऊन तो राहुलला सोबत घेऊन जातो. त्या वाटेवर आल्यावर त्यांना ओळखीच्या खुणा दिसतात. तेथून त्याद्वारे ती दोघे पुढे अरण्यात वाटेने जातात. पुढे गाडीच्या चाकाचे माग पाहत गेल्यावर एके ठिकाणी एक काहीतरी पेटवलेली जागा दिसते.

ईशान थांबतो.

राहुल, काय झालं. इथे का थांबलोय?

ईशान बोट दाखवत इशारा करतो.

ते दोघे गाडीवरून उतरतात. त्यांना एका बाजूला एक कापडी पुठ्ठा अर्धवट जळलेल्या दिसतो.

ईशान, गाडीच्या वरील रंगाचा अंदाज बांधतो.

ईशान, ( राहुलला) चल.

ते गाडी नेतात. पुढे गेल्यावर एक अरण्य निबीड वाट संपलेली लागते. तिथे आल्यावर ईशान एके ठिकाणी जाळीत कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने आपली गाडी लावतो.

 व तेथील झाडावर चढून अंदाज घेतो.

व पुढे अरण्याच्या सिमेने शेतवडीतून तो जातो.

राहुल, इकडे काय असेल का.

ईशान ,शांत रहा. ईशान आपल चालतच गुगल मॅप उघडतो. व त्यावरून तेथे लपण्यासाठी कोणती जागा आहे का ते पाहतो.

तेथून तीन चार फॉर्म हाऊस त्याला नकाशात दिसतात. तो एकामागून एक फॉर्म हाऊस पाहत. जातो. शेवटी तो अन्वीकेला लपवून ठेवलेल्या फॉर्म हाऊस वर येतो. त्याला किशा गडबडीने जाताना दिसतो.

……. ……. …… …….

एका रानातील एका फॉर्म हाऊस मध्ये evening outer inter

एका बंद खोलीत अन्विकेला बांधून कोंडून ठेवले होते. बाहेरील बाजूस एकजण पहारा देत असतो.

अन्विकेला जरा गुंगितून शुद्ध येते. तिच्या लक्षात येते की तिला तिथे कोंडून ठेवले आहे. इतक्यात किशा तिथे येतो.

बाहेर दोघे जण बोलत असतात.

किशा गडबडीने आल्याचे पाहून

एकजण, काय झालं. एवढ्या गडबडीने यायला.

किशा, गावात गडबड झाली. सदा व तुक्याला पकडुन नेलय. पोलिसांना संशय आलाय.

दुसरा, मग बरच हाय की. सदा जाईल तुरुंगात.

किशा, अरे पण आपल्या प्लॅन प्रमाणे नाही ना झालं. ही बाई अजून.

पहिला, अरे होय, हीच काय करायचं.

किशा, काय करायचे म्हणजे मारून टाकायची. लांब दरीत.

पोलीस पकडतील सदाला, सदा जेलात. व फारिस्ट ऑफिसर कोमात.

एका दगडात दोन पक्षी मारायचे.

चला लवकर आटपून जाऊ.

ते अन्विकेला ठेवलेल्या त्या पाठीमागील फॉर्म हाऊसच्या रूमकडे निघतात.

ईशानने देखील त्यांचे बोलणे एकलेले असते.

तो देखील झाडीतून लपत छपत त्यामागे जातो. तत्पूर्वी आपले लोकेशन पाठवून राजवीर फौजदार यांना कळवतो. व एक कॉल टाकतो.

व मोबाईल सायलेंट मोडवर टाकून तो पुढे सरकतो.

….. ….

Eveningi. ६.०० o’ clock. Inter outer.

ते तिघे त्या फॉर्म हाऊसच्या मागील खोलीकडे जातात. खोलीचे दार धाडकन उघडले जाते. आण्विकेस शुद्ध आलेली असते.

आण्विका , कोण आहात तुम्ही मला का पकडलेय तुम्ही.

किशा,काय करणार बाई, तू तर सापळा आमचा, माफ कर हा. काही म्हण फारीस्टची आवड मात्र भारी हाय.

दुसरा, काही म्हण किशा पाखरू कुस्करून टाकूया का. नाहीतर मरणारच हाय.

पहिला, लई शहाणा आहेस. अन् नंतर सापडलो म्हणजे या प्रकरणाने.

दुसरा, त्याची सोय केली आहे मी.

किशा, लई कामिनी आहीसा तुम्ही

दुसरा, उचल तिला.

आण्विका ते पकडायला येतात. तोपर्यंत त्यांना ढकलून दोन-चार लाथा मारुन पळून जाऊ लागते.

इतक्यात त्यातील एकजण तिला पकडुन धरतो.

किशा तिला चाकू काढून मारणार इतक्यात ईशान तिथे येतो. व त्यांना मारतो. राहुल देखील त्यांना बडवतो.

इतक्यात पोलीस तिथे येतात. त्यांना हे तिघे. बांधलेले खांबाला आढळतात. ते त्यांना पकडुन घेऊन जातात. ईशान व राहुल अन्वीकेला घेऊन येतात.

….. ……. ……. ……

Night. Police station. राधानगरी inter

किशाला आणून तिथे तुरुंगात टाकले जाते.

त्याला टाकताना एक पोलीस, आता बस खडी फोडत.

त्याकडे पाहून सदा, व तुका रागाने लालबुंद होऊन पाहत असतात.

नंतर पोलिस त्यांना एकत्र एका खोलीत घेऊन येतात.

पोलिस फौजदार राजवीर सातवेकर, आता खर सांगा मॅडमच अपहरण का केले होते.

सदा व तुका, साहेब आम्हाला यातलं काय बी माहित नाही. आम्ही काय यामध्ये नव्हतो.

पोलिस आपला मोर्चा किशाकडे वळवतात.

त्याला राऊंडात घेताच तो पोपटा सारखा बोलू लागतो.

किशा, साहेब एकदा मी बाहेरून येत असताना मी घराजवळ आलो. त्यावेळी मी आतून आवाज ऐकला. हा हरामखोर सदान माझ्या बायकोला आपल्या जाळ्यात ओढल, अन् नाशीवल . व तिच्या संगे याचे घाणेरडे संबंध होते. हे कळल्यावर मला राग आला. माझी तळपायाची आग मस्तकात गेली. व तेव्हाच मी ठरवलं याचा काटा काढायचा. यासाठी मी खूप प्रयत्न केलं. पोलिसांना आमच्या गुप्त साठ्याचा पत्ता मीच त्या टपरीवाल्या द्वारे कळवला होता. बऱ्याच वेळा हा माझ्या तावडीतुन वाचला. शेवटी मी एकदा फारिस्टला जेव्हा रात्रीच मॅडम सोबत पाहिलं. तेव्हा माझ्या डोक्यात कल्पना सुचली. मी मॅडमला पळवून नेऊन त्यांना ठार मारायचे व संपूर्ण आळ सदावर ढकलायचा प्लॅन केला . पण तो त्या नर्सबाईमुळे उघड झाला.त्या रात्री ती योजना नीट झाली नाही.. त्यात आम्ही नंतर तिथे पडलेले साहित्य व माझे देवाचे लॉकेट आणायला गेलो. त्यावेळी पोलिस पाहून आम्ही परतलो.

व फॉरेस्ट ऑफिसरला आम्ही सापडलो. पण एक चांगल झालं. यात त्या निर्दोष बाईची हत्या आमच्याकडुन झाली नाही. व एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय या सदाला ठार मारता आलं नाही.

तो रागाने सदाकडे पाहत असतो.

Cut to …....

……. ……. ……. ……. …….


nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३१

 कळत नकळत जुळले हे बंध भाग ३१

Night. राधानगरी outer.

ईशानच्या लक्षात येते. आण्विका कुठल्यातरी संकटात आहे. तेव्हा ईशान आपला फोन काढतो. व कॉल करतो.

ईशान, हॅलो.

थोड्याच वेळात तिथे एक पोलिस गाडी येते. पोलिस गाडीतून एक अधिकारी खाली उतरतो.

राजवीर सातवेकर, बोल ईशान काय झालंय.

ईशान, थोड्या वेळापूर्वी मी माझी मैत्रिण अन्विकेला इथे सोडून गेलो होतो. व थोड्याच वेळात जाधव मॅडम यांचा कॉल आला, की त्यांना वाटेत अनूची पर्स व मोबाईल सापडला. व त्यांनी मला लगेच काँन्ट्याक्ट केला. व इथे येऊन मी पाहिलं. व लगेच तुम्हाला कान्ट्याक्ट केला.

 राजवीर सातवेकर, कॉन्स्टेबल बघा जरा इकडे तिकडे.

लगेच कॉन्स्टेबल इकडे तिकडे शोधू लागतात. तेव्हा त्यांना तिथे मारुती कारच्या टायरीच्या खुणा सापडतात. तसेच त्यांना झाडीत एक लोकेट सापडते.

कॉन्स्टेबल, सर इथे पहा, गाडीच्या खुणा आहेत.

लगेच दुसरा कॉन्स्टेबल, सर हे एक लोकेट सापडले आहे.

राजवीर सातवेकर, आण इकडे, ते बारकाईने पाहतात, व आजू बाजूला चौकशी करा. तेव्हा पोलीस आणखी चौकशी करू लागतात.

ईशानला काही सुचत नसते. तो डोक्याला हात लावून बसलेला असतो.

राजवीर सातवेकर , लगेच फोन करून सगळीकडे नाकाबंदीचे आदेश देतो.

व ईशान जवळ येतो,

राजवीर सातवेकर, काळजी करू नकोस, सापडतील त्या.

ईशान, त्या तर इथे नविनच आहेत. त्यांचा कोण शत्रू असणार.

इतक्यात तिथे एक पोलिस कॉन्स्टेबल येतो.

कॉन्स्टेबल सोबत एक मुलगा असतो.

कॉन्स्टेबल, सर, हा मुलगा इकडील जवळच टपरीवर काम करतो. याने एक व्हाइट कलरची मारुती जाताना पहिलीय थोड्या वेळापूर्वी.

राजवीर सातवेकर, काय रे तू पाहिलीस का?

मुलगा, हो सर , थोड्या वेळापूर्वी.

राजवीर सातवेकर, तिचा नंबर वगैरे काही माहीत आहे का तुला.

राजवीर सातवेकर, काही लिहिलं वगैरे होत का गाडीवर.

मुलगा, हो सर त्यावर एका कोपऱ्यात स्मशालीचे चित्र होते. व खालील बाजूस मनापासून मनापर्यंत असे लिहिले होते.

राजवीर, चालवणार्यास काही पाहिलस का? इन म्हणजे त्याचा चेहरा वगैरे.

मुलगा, नाही सर.

राजवीर सातवेकर, कॉन्स्टेबल या मुलाचा जबाब घ्या. व बाकीचे पुरावे शोधा.

राजवीर, हे पहा ईशान सर , तुम्ही कंप्लेंट द्या रीतसर, म्हणजे आम्हाला काम करायला बर.

ईशान, ठीक आहे.

…… ……. ….. …..

Night राधानगरी पोलीस स्टेशन. Inter.

ईशान अण्विकेची मिसींगची कंप्लेंट देतो.

जाधव मॅडम, देखील त्यांनी पाहिलेली सगळी घटना सांगतात.

राजवीर, (ईशानला नाराज पाहून)

आम्ही काढू शोधून पण तुम्हाला जर कुणावर शंका असेल तर सांगा.

ईशान, वाटल तस काही कळवतो.

जाधव मॅडमना घरी सोडण्यासाठी ईशान जातो.

….. …….. …..

राजवीर ऑफिसर सगळीकडे शोधाशोध घेतो. परिसरातील सी सी टी वी चेक करतो. पण काही सापडत नाही.

…… …… …… ….. …

नाईट. १२ o’ clock राधानगरी अभयारण्य एक रोड संपूर्ण कच्ची सडक. एका ठिकाणी गाडी थांबते. त्यातून दोघे खाली उतरतात.मागील बाजूचे दार उघडले जाते. आतील बाजूस हात पाय बांधून बेशुद्ध केलेली अण्विका. तिला घेऊन ते दोघे चालत काही अंतरावर एक फॉर्म हाऊस असते तिथे नेतात. ती एकदम सामसूम जागा असते. जे खूप लांब जंगलाला लागून असणाऱ्या काजूच्या व आंब्याच्या बागेत असते.

तिथे कुणी सहसा येत नसते. अशा ठिकाणी ते तिला घेऊन येतात. या फॉर्म हाऊसच्या मागील बाजूस एक स्टोअर रुम असते. तिचे दार उघडुन अन्विकेला तिथे ठेवलं जाते. ती दोघे बाहेर येतात.

त्यांनी तोंडावर एक नकाब घातलेला असतो.

बाहेर आल्यावर,

एकजण, काय करायचं हीच.

दुसरा, दोन दिवस ठेवायचं, अन् नंतर टाकायचं मारून व फेकायची दरीत . अन्

पहिला, अन् काय?

दुसरा, नंतरच नंतर. चल आधी गाडी ठीकाण्यास लावू.

ते दोघे निघतात.

….. …… …… ……


कळत नकळत जुळले हे बंध भाग ३०

 

कळत नकळत जुळले हे बंध भाग ३०

Night. Inter. ईशानच्या घरी. ६.०० o’clock

ईशानच्या घरी त्याच्या खात्यातून फोन जातो. त्याचे वडील फोन उचलतात.

ईशानचे वडील, हॅलो बोला.

वन कर्मचारी, ईशान सर जखमी झाले आहेत. त्यांना आताच राधानगरी ग्रामीण रुग्णालयात अडमिट केलेय.

ईशानचे वडील, कसा आहे तो.

वन कर्मचारी, आता आहेत नीट. हाताला लागलेय त्यांच्या, तुम्ही या लवकर.

ईशानचे बाबा, आम्ही निघतोय.

फोन ठेवल्यावर

ईशानची आई, काय झालं ईशानला बोला की. काय झालं माझ्या लेकराला.

ईशानचे बाबा, काही नाही झालं. फक्त जरा अपघात झालाय. हाताला लागलंय वनसफरी वेळी. चल जाऊ.

आई, काय घाबरण्यासारखं नाही ना. चला लवकर मला तेला पाहिल्या शिवाय चैन नाही पडणार. ती रडू लागते.

ईशानचे वडील, अग, रडू नकोस. चल जाऊ. बघुया काय झालय.

बहिण, बाबा काय झालंय दादाला.

ईशानचे बाबा, काही नाही बाळ जरा वन सफरी वेळी लागलंय.

ईशानची बहिण, मी पण येतो.

बाबा, कशाला उगाच, तू थांब घरी. आम्ही जाऊन येतो.

ते निघतात.

…… ……. …… …..

Night. Inter. राधानगरी रुग्णालय ८.००

ईशानचे आई व बाबा आपल्या गाडीवरून राधानगरी रुग्णालयात पोहोचतात.

पोहोचल्यावर.

तेथे असणाऱ्या वन कर्मचाऱ्यास

ईशानचे वडील, कुठे आहे ईशान, ठीक तर आहे ना?

वन कर्मचारी, आत आहे रूम मध्ये उपचार चालू आहेत.

आतून नर्स येते.

ईशानचे वडील , कसा आहे आमचा ईशान.

नर्स, दंडाला लागलंय. ब्लड गेलय.. टाके मॅडम घालत आहेत.

ईशानचे वडील, काही भीतीच नाही ना.

नर्स, थोड्या वेळाने सांगते. जरा बाजूला व्हा.

दुसरी नर्स काही औषधे व इतर साहित्य घेऊन येते. ते घेऊन त्या दोघी आत जातात.

ईशानचे बाबा हॉस्पिटल मधील व्हरांड्यातून फेऱ्या मारू लागतात

थोड्याच वेळात अण्विका सर्व उपचार करते. व त्याला नीट करते. पण भुल दिल्याने तो बेशुद्ध असतो.

थोड्या वेळात डॉक्टर येतात.

व आतमध्ये जातात. तोपर्यंत अण्विकाने सर्व उपचार केलेलं असतात.

डॉक्टर, चेक करतात. व अण्विकाकडे पहात. काय सीचुयेशन.

आण्विका संपूर्ण माहिती देते.

खूप हुशार आहात. मस्त. वेल डन.

थोड्या वेळाने डॉक्टर व डॉक्टर अण्विका बाहेर येतात.

ईशानचे वडील, कसा आहे ईशान. घाबरण्यासारखं काही नाही ना?

डॉक्टर, आहे आता नीट. येईल थोड्या वेळाने शुद्धित, काळजी करू नका.

ईशानची आई, आम्ही बघू शकतो का?

डॉक्टर, हो पाहू शकता पण बोलू किंवा डिस्टर्ब करू नका. आराम करू द्या.

डॉक्टर निघून जातात.

…… ….. …… …

आण्विका रात्रभर फेऱ्या मारत असते.

 पहाटे ईशानला थोडी शुद्धा येऊ लागते. तेव्हा तिला बरे वाटते.

ती त्याला शुद्ध आल्यावर. थोड पुन्हा चेकप करते.

आण्विका, हा ठीक आहे.

ईशान उठण्याचा प्रयत्न करत असतो.

तेव्हा अन्विका , साहेब हळू, झोपा गप्प थोडावेळ.

तो पडून राहतो.

नर्स, मॅडम तुम्ही जरा विश्रांती घ्या जावा. रात्रभर जाग्या आहात.

ईशान अन्विकाकडे एकटक पाहू लागतो.

आण्विका थोडी विश्रांती घ्यायला जाते.

…… …… ……

Morning. Inter. Hospital राधानगरी. ७.०० o’clock.

ईशानला शुद्ध आलेली असते

त्याची आई त्याला फळे चिरून देत असते.

तो आता आपल्या बेडवर बसलेला असतो.

आण्विका चेकअप करायला येते.

त्याचे ब्लडप्रेशर, व इतर टेस्ट तपासत.

नॉर्मल वाटल्यावर.

आण्विका, येवढं कळत नाही. येवढ्या संध्याकाळी कशाला गेला होतास. स्वतःला काय बाहुबली समजतोस काय? कायतरी झालं असत म्हणजे?

ईशान, काही झालं तर नाही ना? अन् झालं तर तुम्ही आहात की.

आई, शहाणा आहेस. काल मॅडम नसत्या तर काय झालं असत.

आण्विका, साहेबाना याच काहीच नाही, हा काही साधा सुधा वार नव्हता. ते लोक खालच्या पातळीचे असतात. मी पण कुणाला सांगतेय.

ईशान, काय झालंय, थोड तर खरचटलय. होईल ठीक.

आण्विका, थोडस खरचटले म्हणे मी ड्रेसिंग केलय. चांगले दहा टाके पडलेत. जरा वार चुकलं असता तर जीवावर बेतल असत. अशा ठिकाणी फौजफाटा घेऊन जाता येत नाही. चार शिपाई घेऊन गेलास. ते ही विनाशस्त्रांचे.

ईशान, बर मॅडम पुन्हा अस घडणार नाही ह. नॉर्मल रपेट होती ती.

तो उठू लागतो.

आण्विका, काय चाललय. जखम ओली आहे. उगाच गडबड नको. हळुवार.

आई, काय करायला निघालास.

ईशान, आलो बाथरूमला जाऊन.

आई, अहो न्या धरून तुम्ही.

ईशानचे बाबा. त्याला नेहून आणतात.

ईशान, होईल ठीक लवकर.

आण्विका, दोन दिवस अजून सुट्टी नाही इथून.

ईशान, बर बर. चालेल मला.

….. ….. ….

इकडे वस्तीवर सदा, भिवा, तुका, हे एका बाजूला निर्मनुष्य ठिकाणी उभा असतात. त्यांमध्ये चर्चा चालू असते.

किशा बातमी घेऊन येतो.

सदा , काय झालं र.

किशा, फारिस्ट ऑफिसर वाचला.

तुका, जरा वाचला. थोडक्यात चुकलं.

भिवा, लई शहाणं हाईसा. सरकारी अधिकार्यावर हल्ला केल्यासा. येवढं सोप नाही. पोलिस चौकशी करायला लागलेत.

सदा, मग काय गप्प राहावं. सगळा माल पकडला.

सदा, आता थोड दिवस दडी मारा. बघू नंतर काय करायचं ते.

सगळी, जी.

…… ……. ……. …

काही दिवसानंतर.

बरेच दिवस भेटून झालेले असतात. ईशान आपल्या खात्यातील कामे निपटतो. थोडी विश्रांती घेऊन फ्रेश व्हावं असं वाटू लागते. त्याला अन्विकाची आठवण येवू लागते. फिरायला जायचे त्याच्या मनात ठरवतो.

……. …….. ….

Day. Afternoon १२, ०० inter

आण्विका आपल्या कामात वॉर्डमध्ये असते. जवळच जाधव नर्स पेशंटला लागणारे सलाईन बदलत असते. इतक्यात तिला फोन येतो.

ईशानला सुट्टी असते. ईशान अन्विकाला फोन करतो.

ईशान, हॅलो, अन्विका.

आण्विका, बोल.

ईशान, आज फ्री आहेस.

आण्विका, दुपार नंतर आहे. का ?

ईशान, मग जाऊया का फिरायला.

आण्विका, हो चालेल की.

ईशान, मग तयार रहा. येईन मी न्यायला.

आण्विका, हो,चालेल.

फोन ठेवल्यावर

जाधव नर्स, काय मॅडम आज दौरा वाटत.

आण्विका, हो जरा जाणार आहे फिरायला.

जाधव नर्स, साहेब मस्त आहेत. पण कसकाय जुळले तुमचं काही कळलंच नाही आम्हाला.

आण्विका, आम्ही एकाच वर्गातील आहोत. वर्ग पार्टनर

जाधव नर्स, म्हणजे लहानपणापासून आहात संपर्कात म्हणा. मग लग्नाचे लाडू कधी देताय.

आण्विका, देवू की लवकरच.

जाधव नर्स, आजचा डबा क्यांसल सांगू ना काकूंना.

आण्विका, सांगेन मी फोन करून नंतर.

जाधव नर्स, रात्री किती वाजता परत याल.

आण्विका, येईन की आठ पर्यंत.

का हो?

जाधव बाई, नाही लाईट बंद करायला बर बाहेरील.

आण्विका, नाही जास्त वेळ राहणार, लगेच परतू, साडे नऊ पर्यंत येईन.

जाधव नर्स, हा बर. तेवढच फ्रेश व्हाल.

…… …… ……. ….

ईशान दुपारी अण्विका सोबत घेऊन निघतो. ते दोघे खूप फिरून

रात्री बाहेर जेवण करतात. व नंतर

एके ठिकाणी जाऊन बसतात.

आण्विका, किती दिवसांनी भेटलो नाही.

ईशान, हा.

आण्विका, माझी आठवण येत नाही.

ईशान, तुझी आठवण नाही असा एकपण दिवस जात नाही.

आण्विका, खोटं. उगाच माझं मन राखण्यासाठी बोलतोस ना.

ईशान, नाही. खर सांगू मला तू लहान असल्यापासून खूप आवडतेस. शाळेत असल्यापासून मी तुला कायम चोरुन पाहत असे.

आण्विका, हो का मग बोलला का नाहीस.

ईशान, धाडसच होत नव्हत. त्यात तू ही माझ्यावर चिडून असायचीस.

आण्विका, माझच चुकलं. आता नाही चिडणार.

ईशान, खरंच.

आण्विका, खरंच.

ईशान, बर चल निघू खूप वेळ झालाय.

आण्विका, काय हे. दिवस लवकर का संपतो.

ईशान, मॅडम रात्र आहे.

आण्विका, तेच मला म्हणायचं होत.

ईशान, वाटल्यास उद्या परत भेटू.

आण्विका, खरं

ईशान, खरं चला आता जाऊ.

ते निघतात.

 ईशान अण्विकेला आपल्या रूम जवळ आणून सोडतो.

व रिटर्न निघतो. तो थोड्या अंतरावर गेल्यावर इकडे एक मारुती गाडी येते. व त्यातून दोघे खाली उतरतात. व अन्विकेला जी आपल्या रुमकडे निघालेली असते. तिला पाठीमागून येत पकडतात. थोडी झटापट होते. ते अन्विकेला बेशुद्ध करून अपहरण करून पकडुन घेऊन जातात. या वेळी अन्विका व त्या अपहरण कर्त्याची झटापट होते. त्यातील एकाचा शर्ट फाटतो. व त्याच्या गळ्यातून एक लोकेट तुटते. ते तिच्याकडून बाजूला एका झुडपात पडते तिचा फोन व पर्स खाली पडते. ते गुंड तिला घेऊन एका छोट्या मारुती गाडीतून घेऊन जातात.

ईशान आपल्या रूमवर येतो.

….. ….. …..,

Night. आण्विकेची व जाधव नर्स क्वाटर

जाधव नर्स जेवण जेवते. व आपली भांडी घासून धुवून ठेवते.

जेवण झाल्यावर

जाधव नर्स, थोडी शतपावले करून येवू.

ती बाहेर पडते. तेव्हा ती अन्विकेच्या खोलीकडे तिचे लक्ष जाते.

जाधव नर्स, (मनात) अजून कशा आल्या नाहीत डॉक्टर मॅडम, चला जरा फिरून येवू.

ती थोड्या अंतरावर चालत जाते. तेव्हा तिला पर्स दिसते.

अग बाई ही पर्स कुणाची. अरे ही तर ओळखीची दिसते. ही तर अन्विका मॅडमची आहे. दरवाजा तर बंद आहे रुमचा, अन् पर्स इथे.

फोन तरी करून बघुया.

जाधव नर्स फोन लावते. तेव्हा तिला जवळील झुडपातून फोनच्या रिंगचा आवाज ऐकू येतो.

ती जाऊन बघते. तर अन्विकेचा फोन असतो. ती फोन उचलून

फोन इथे, पर्स रस्त्यावर पडलेली, दरवाजा बंद मॅडम कुठे आहेत? काहीतरी गडबड आहे.

लगेच जाधव नर्स अन्विकेचा फोन घेते. त्यावर कोड असतो. ती इमर्जंशी कॉल निवडते. व त्यावरून ईशानला फोन करते.

ईशान गाडीवरून जात असतो. तो फोन उचलतो.

हॅलो बोल अनु.

जाधव नर्स, अहो ईशान सर, मॅडम तुमच्या सोबत आहेत का?

ईशान, नाही. मी तर आताच सोडून आलो रूमपासून काही अंतरावर. का हो?

जाधव नर्स, काहीतरी गडबड आहे सर, मॅडमची पर्स इथे रस्त्यावर पडलेली आहे. व फोन झाडीत सापडला. व रूम पण बंद आहे. तुम्ही याल काय लवकर इकडे. मला खूप भीती वाटतेय. आण्विका मॅडम नाहीत इथे कुठे?

ईशान, काय , थांबा आलोच मी.

ईशान लागलीच आपली गाडी वळवतो व त्या ठिकाणी येतो.

तिथे आल्यावर.

ईशान, मॅडम अन्विका कुठे आहे?

जाधव नर्स, तुमच्या सोबतच गेल्या होत्या ना.

ईशान, हो, पण मी आताच इथे सोडून गेलो.

ईशान, इकडे तिकडे पाहतो.

व लगेच आपल्या ओळखीच्या पोलीस मित्राला फोन करतो.

थोड्याच वेळात त्याचा पोलीस मित्र तिथे हजार होतो.जो राधानगरी येथे फौजदार असतो.

…….. …… ……. …..



कळतं नकळत जुळले हे बंध भाग २९

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग २९


ईशान व अण्विका वारंवार भेटत असतं. कधी ते काळम्मावाडी धरण फिरायला जात. तर कधी सनसेट पॉइंट, कधी राधानगरी ड्याम तर कधी बाहेर शांत परिसरात ते फिरायला जात असत.

….. …… …… …..

राधानगरी अभयारण्य परिसरातील एक गाव तेथील एका वस्तीवर असणाऱ्या एका घरात. जोत्यावर एका कोपऱ्यात एक शेकोटी पेटवली आहे. तिथे घोंगडी खांद्यावर टाकून चारजण बसले आहेत.

सदा, अताचा ऑफिसर लईच द्वांण्ड आहे. सारखी गरुडासारखी नजर असती त्याची.

भिवा, कुठून येतो अन् धाड टाकतो हे देखील कळत नाही बघ. सगळीच पंचाईत करून ठेवलीय.

तुकाराम, याच कायतरी केलं पाहिजे. नाही नपत केला तर.

किशा, तेला नाही नपत कर अन् तुरुंगात जायचो आपण. अन् ही मागली पोर कुणी पोसायची.

सदा, त्याला धडा तर शिकवलाच पाहिजे.

तुका, ते पण हाय. साप मारावा पण काठी देखील तुटता कामा नये.

किशा, बाहेरून कोणतरी आणायला पाहिजे.

सदा, कळम्या जीवाला बोलवूया काय.

तुका, ही आईड्या चांगली हाय.

किशा कळम्या जीवाला बोलावून आण.

कीशा, जी जातो की आताच आणतो.

सदा, थांब ,

सदा आत् जातो व काही रक्कम फडक्यात बांधून आणून देतो.

ती किशाकडे फेकतो. तो झेलून घेऊन तो निघतो.

Cut to …..

…… …… …… …..

कर्नाटक राज्य हद्द पश्चिम जंगल एरियात गाव. Day. Outer

किशा गावातील एका लांब बाजूला असणाऱ्या घरात जातो.

तिथे एक स्त्री भाकरी थापत असते.

किशा तिथे जातो.

जीवादा अरे जीवादा.

आतून भाकरी थापत.

कळम्या जीवाचीबायको, कोण हाय ते.

किशा, मी आहे. दाजीपूरकडला किशाप्पा. मला सदा दादानं पाठवलं हाय.

कळम्या जीवाची बायको, या

किशा आत येतो. ती गूळ पाणी देते.

तिथे जवळच पोर गोट्यानी खेळत असतात.

कळम्याची बायको, ये पांड्या जा तुझ्या बाला बोलावून आन जा.

 ते पोरग हातातील खेळ टाकून पळत गल्लीतून जाते. पुढे गावाबाहेर रानात वाटेने पळत. एका ठिकाणी येते.

जिथे त्याचा बाप कळम्या जीवा लाकडे फोडत असतो. काळसावळा, दिसायला रांगडा. हातात कड.

तो पोरग्याला,

काय र काय झालय.

पोरग, कोण आलंय घरला. बा तुला बोलावलंय. आईनं.

तो काम ठेवून लागलीच येतो.

घरा बाहेर आल्यावर, तो किशाला पाहून सगळे ओळखतो.

बाहेरील मोरीत आपले हातपाय धुतो . त्याची बायको टॉवेल देते.

तो जेवायला वाढ.

…. ….. .

Inter जेवण खोलीत

कळम्या जीवा व कुशा दोघे जेवायला बसतात. त्यांच्या ताटात भाकरी, कांदा, ठेचा व पिठले असते. ते जेवत.

कळम्या जीवा, काय काम काढलं.

किशा, एक माणूस हाय. त्याचा काटा काढायचा आहे.

कळम्या जीवा, कोण आहे.

किशा, फारिस्ट खात्यात हाय. मागली खेप त्यानेच पकडली. लई डोईजड झालाय.

कळम्या जीवा, जोखमीचे काम हाय. व तो तर सरकारी अधिकारी. जायबंदी करीन, जास्त तर. पण मला रक्कम पण मोठी हवी.

किशा, केवढी द्यावी लागेल.

कळम्या जीवा , तीन लाख घेईन.

किशा, घे हा सस्कर पन्नास हजार.

कळम्या जीवा , हा.

आपल्या बायकोला इशारा करतो. ती ते पैसे घेते.

 किशा, मग चलायचं ना.

कळम्या जीवा, थांब आवरतो.

ती निघतात.

….. ….. ….. …..

Day. राधानगरी अभयारण्य परिसरातील. एक घनदाट अरण्य भाग तिथे काही तस्कर एकत्र बसले आहेत.

किशा व कळम्या जीवा तिथे येतात. ते जाताना एक जण मोठ्याने पक्षाचा आवाज काढून इशारा करतो.

थोड्याच वेळात ते निश्चित स्थळी पोहोचतात.

तुकाराम, (त्यांना पाहून) इशारा करतो.

सदा, (मागे वळून हसतो) या या तुमचीच वाट बघत व्हताव.

कळम्या जीवा, खूप दिवसांनी आठवण काढली.

सदा, काय सांगू. आजकाल सगळ काम ठप्प आहे. हा नवीन ऑफिसर आल्यापासून कुठलच होईना झालंय. त्याचा तेवढा बंदोबस्त करायला हवा.

कळम्या जीवा , मी आलोय ना बघू. पण रक्कम पण मोठी हवी.

सदा, मिळेल पण आमचं काम केल्यावर.

कळम्या जीव, बर त्याविषयी काही माहिती.

सदा इशारा करतो.

तुका, लगेच फोटो आणून देतो. तो कळम्या जीवाला दाखवतात.

कळम्या जीवा फोटो पाहत

तुका, होईल ना नीट.

कळम्या जीवा, ते तुम्ही सोडा माझ्यावर.

याच्या येण्याजाण्याची माहिती मिळेल काय.

तुका, ती सगळी किशा सांगील. व एक मात्र काही झालं तरी या कानाच त्या कानाला कळता कामा नये.

कळम्या जीवा, हा.

…… …… ……. …….

Day. Evening. Outer. राधानगरी अभयारण्य

ईशान आपल्या रेंजर्सना घेऊन अरण्यातील आपल्या रपेटीसाठी निघालेला असतो. त्याची गाडी अरण्यातील दूरच्या भागातून जाताना अचानक गाडीवर एक ओंडका वरून येवून पडतो. व बाजूने चार पाच लोग तोंडाला कालिक लावून आलेले त्यांवर हल्ला करतात. ईशान व रेंजर्स त्यांच्याशी दोन हात करत असतात. पण रेंजर्स जखमी होतात. ईशान बऱ्याच गुंडांशी सामना करतो. कळम्या जीवा व त्याची खूप वेळ मारामारी चालू होती. दोघेही ऐकत नसतात. कळम्याचा चाकू ईशानच्या हाताला लागतो. ईशान तरीदेखील त्यास जखमी करतो. व बुकलून काढतो. शेवटी एकजण इशार्याची खून करतो. कळम्या व सहकारी पळून जातात. एक रेंजर्स गाडी आणतो. ईशान जखमी अवस्थेत आपल्या इतर सहकाऱ्यांना घेऊन निघतो.

बाजूला आल्यावर

कळम्या आपल्या सहकाऱ्यांना, गडी पावरीचा हाय. निघायला हवं.

एकजण, आपल्या पैशाचं काय..

कळम्या, जीवा वाचला तर मिळतील नंतर. पळा आता. आपण जंगलवाटेन सटकायच आपल्या भागात.

दुसरा, चला रे.

ते निघतात.

……………. …….. …….

Evening day outer inter राधानगरी हॉस्पीटल

रेंजर्स व काही लोक तातडीने ईशानला हॉस्पीटलमध्ये घेऊन येतात.

एक रेंजर्स, डॉक्टर डॉक्टर.

नर्स, डॉक्टर बाहेर गेलेत. थांबा.त्यांना ऑपरेशन थेटरकडे न्या.

नर्स, डॉक्टरना फोन लावते.

नर्स, डॉक्टर इमर्जेंशी आहे.डॉक्टर, काय झालंय एनी सिरियस.

नर्स , आपल्याकडील एक वन ऑफिसर जखमी होऊन आलेत. त्यांच्या हातावर वार झालेला आहे.

डॉक्टर, मी निघतोय, थोडा वेळ लागेल. तरी अण्विका व इतर डॉक्टरांना तोपर्यंत हताळाय सांगा

नर्स लगेच अडमिट करून घेते. व दुसऱ्या नर्सला अण्विका मॅडम ना बोलवण्यास सांगते.

आण्विका चहा घेत असते. इतक्यात एक नर्स घाईने तिला इमर्जंशी असल्याचे सांगते.

चहाचा ग्लास तिथेच ठेवत ती वेगाने ऑपरेशन रुममध्ये जाते.

व ईशानला जखमी पाहून लगेच त्याला ईशान म्हणत आपल्या भावना आवरते. व ईशानला अडमीट करून घेते. तिचे सहकारी डॉक्टर रक्त पाहून गोंधळून जातात. पण अण्विका धिटाई दाखवत त्यावर उपचार करते. वेगाने कार्यवाही करून ती त्यास वाचवते.

तो बेशुद्ध असतो. त्याला शुद्ध येईपर्यंत ती रात्रभर जागी असते.

....... ........ .......... .....

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com

वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...