Morning /Outer / Village road nandgav /
एक भिकारी वेशात करमा गावातून भिक्षा मागत फिरत आहे. प्रत्येक घराची पाहणी करत आहे.
करमा :
दे वो अण्णाव दे व माय गरिबाला अन्नाचं दान दे
( एक बाई बाहेर येऊन त्याच्या वाडग्यात भाकरीचा तुकडा टाकते. )
करमा :
कल्याण ववू दे ग माय.
(गावातून जाताना एकजण त्याला हाकलतो. )
करमा :
बाबा दे र काय तरी.
व्यक्ती :
चांगला हट्टा कट्टा दिसतोस की अन भीक मागायला काय झालंय. चल हट्ट इथून …
( करमा पुढे जातो. गावातून भीक मागत तो वैद्य बुवांच्या दारात येतो. )
करमा :
ओ माय अन्न दे गो माय, तुझं घर सोन्या, नाण्यांन भरू दे ग माय.
( जोग आंबा स्वयंपाक घरात जेवत असते. ती घास घेणार इतक्यात भिकाऱ्याचा आवाज ऐकून ती बाहेर येते. )
जोग आंबा :
आला बाई, जेवायच्या वक्ताला.
( ती एक भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर येते. भाकर पाहून )
करमा :
काय माय कोरभरच, कालवण तरी दे थोडं.
जोग आंबा :
घ्यायचं तर घे, नायतर गऊला घालते.
करमा :
दे माय, खाईन कसं तरी.
( करमा वाडगा पूढे करतो. ती भाकर वाढते. तो तिच्या हातातील दागिन्याकडे पहातो. त्याचे डोळे विस्फारतात. )
Cut to …..
……. …… …….
Day / outer / Patil home Village
वाड्याच्या आतील दालनात एक स्त्री विव्हळत आहे. बाहेरील जोत्यावर पाटील इकडे तिकडे फिरत आहेत.
पाटील :
काय रे शिवण्णा वैद्यबुवांना सांगून आलास का?
शिवाण्णा :
हो येतीलच इतक्यात.
( वैद्य बुवा मालाधर येतात. )
शिवाण्णा :
हे काय आलेच, ते बघा.
पाटील :
बुवा लवकर चला अव्वाच्या पोटात दुखतंय.
वैद्य बुवा :
चला.
( आत जाऊन वैद्यबुवा अव्वाची नाडी परीक्षण करतात. व आपली पिशवी पाहतात. व विचार करू लागतात. कुठे दुखत आहे याची पाहणी करतात.)
पाटील :
काही घाबरण्या सारखं
वैद्य बुवा :
तितकस नाही, पण काळजी घ्यायला हवी. पण…
पाटील :
पण काय आणखीन.
वैद्य बुवा :
एक औषधी नाही माझ्याकडे, ती आणायाला हवी.
पाटील :
बर, कुठं मिळलं.
वैद्य बुवा :
लांब जंगलात मध्य अरण्यात जावं लागलं.
पाटील :
मग आता.
वैद्य बुवा :
दोन माणसांना धाडाल का मी सांगतो तिथे.
पाटील :
पण एवढ्या अरण्यात जाण्यासाठी कोण तयार होईल.
वैद्य बुवा :
राखोळी करणाऱ्या अंगतला पाठवा. तो आणेल. पण राखोळी कोण करणार?
पाटील :
ते बघतो मी, लावून देतो, एखाद्या गड्याला.
वैद्य बुवा :
मग झालं तर.
पाटील :
शिवाण्णा दोन गडी घे अन् जा वैद्य बुवांच्या बरोबर, सांगतात तिकडं.
( वैद्यबुवा व ते शिवाण्णा अन तिघे गडी निघतात. )
Cut to …..
…… ….. …
Day /Outer / village road
( वैद्यबुवा वाटेनं जाताना गावात )
वैद्यबुवा :
शिवा अंगत गायरानात राखोळी करत असेल. तिथे जा व त्याला सांग मागील गुरुवारी आणून दिलेली औषधी वैद्य बुवांनी आणायला सांगितली आहे.
शिवाण्णा :
जी
( तो व दोन गडी गायरानात जातो. व वैद्यबुवा आपल्या घराच्या दिशेने निघतात. )
Cut to …..
…… ….. ……
Day / Outer / village gayran /
( अंगत रानात गुरे चारत असतो. शिवण्णा लांबून त्यास हाक देतो. )
शिवण्णा :
अंगत ये अंगत ये…. ऊ ..
अंगत :
ओ …. काय अण्णावो…
शिवण्णा :
वैद्य बुवांनी पाठवलंया. सांगितलंय पोटातील मुरुडेवर औषधं घेऊन आणायला.
अंगत :
पण राखोळी करतोय जी. नंतर जाईन.
शिवण्णा :
सदबा व जम्बू करील, तू जा. पाटलाच् काम हाय?
अंगत :
अस म्हणता, बर
( शिवण्णा जवळ जात. सदबाला )
अंगत :
हा सदबा त्या तांबड्या गाई जवळ जाऊ नकोस. तिचं ती काय चरती ते चरू देत. अन् ते करड खोंड लई द्वांड हाय. लोडकंन हाय गळ्यात तेवढं लक्ष ठिव बाकीच्याना सांभाळाय लागत नाही. बस मी येतोच दोन घटकात.
सदबा :
जी.
अंगत :
( शिवाण्णाला )
चला…
( शिवण्णा, अंगत व एक गडी असे एकत्र निघतात. )
Cut to …
….. ….. ….
Day / outer / jangal
ते तिघे रानातून जात आहेत. वाटेत एक विषारी साप आडवा जातो. ते पुढे जातात. रातकिडे कीर कीर करत आहेत. अंगत कड्या जवळील दरीत असलेल्या एका झाडावर चढतो. व तेथील वेलीचा एक भाग तोडून घेतो. व त्यांजवळ घेऊन येतो.
अंगत :
हा चला.. मिळालं वशिद…
Cut to …….
……. …… …….