Day / morning / gad
केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.
कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भाकर अन् तिळकूट देते. बुट्टीतल्या भाकरी संपतात.
मल्हारी :
अन तुम्हाला.
कनकाई :
आम्ही ठेवल्यात आत. काळजी नका करू.
केदार :
कशाला खोटं बोलतेस कनकाई, मला काय ठाव नाय. अंबरखान्याची हालत. ही घे भाकर दोघी खावा. तुमचा पण जीव हायच की.
कनकाई :
नको, नको तुम्ही खावा. माझा आज देवीचा उपास हाय.
केदार :
कनकाई आज शनिवार हाय. खोट पण बोलता येत नाही बघ तुला.
मल्हारी :
ही घे, खावा दोघी.
कनकाई :
अव पण,
मल्हारी :
गप ग,
( मल्हारी आपली भाकर थाबड्यात ठेवतो. केदार आपली भाकर मोडून देतो. )
मल्हारी :
नको, तू खा.
केदार :
आर, राखोळीत भाकर वाटून खाणार आपण, अन् अशावेळी माग का रहावं. घे, ही घे.
मल्हारी :
अस म्हणतोस, तर दे कोरभर.
केदार :
( भाकर हातात घेत. )
गड्यांनो अस भी मराणं आणि तस भी मराण, आता हटायच नाही. या कोरभर भाकरीच्या जोरावर हजारच्यावर गनिम एकेकानं कापून काढायचा. मरण आलं तरी बेहत्तर.
Cut to …..
…., …… ……..
Night / ganim tal / outer
अचानक हल्ला केला जातो. जोरदार हातघाई सुरू होते. पुष्कळ शत्रू कापून काढले जातात. या गडबडीत केदार व त्याचे साथीदार. मारले जातात. शत्रूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
Day / morning / outer.
अनेक शव पडले आहेत. शत्रूचे शव एका ठिकाणी खड्यात टाकले जात आहेत. सरदार येतो. केदारी व त्याचे सहकारी यांचे प्रेत पाहून हळहळतो. चिता पेटत आहेत.
सरदार वाकून मुजरा करतो.
सरदार :
तुमचं बलिदान व्यर्थ नाही जाऊ देणार.
Cut to …….
…….. …… …….
Night / Shatru tal / outer
जोरदार हल्ला चढवला जातो. अनेक शत्रू कापून काढले जातात.
Cut to …..
…… …… …….
Day / outer / Yudh sthal
वीरगळ उभा केली जाते. तिची आरती केली जात आहे.
Cut to …..
…. …… …..
Day / evening / Ashvin villege home
अश्विन स्वप्न चक्रातून बाहेर येतो. आजोबा बाजूला पुजाऱ्याशी बोलत असतात. ते जवळ येतात.
आजोबा :
चला आता वेळ होतोय. घरी जायला हवं.
( ते निघतात.)
Cut to …..
….. …… …….
Day / evening / inter / home
संध्याकाळची वेळ अश्विन हॉलमध्ये बसलेला होता. आजी आतील खोलीतून
आजी :
अश्विन …. अश्विन …..
अश्विन :
काय आजी.
आजी :
अरे, देवाजवळ दिवा लाव.
अश्विन :
हो आजी, हा लावतो.
( अश्विन उठतो. देवाजवळ दिवा लावतो. नमस्कार करतो. स्वयंपाकघरात येतो. आजी कामात असते. तो तिच्या मागे उभा राहतो. त्याला पाहून )
आजी :
काय रे , अस काय बघतोस. काय हवंय का?
अश्विन :
काही नाही. मला एक विचारायचं होतं.
आजी :
काय रे.
अश्विन :
अग, मी काल देवीला गेलो होतो. तिथं मला वीरगळ पाहायला मिळाली. आज ही मी तशीच वीरगळ पाहिली. पण या गोष्टी आहेत. की सत्य.
आजी :
अरे, गोष्ट काल्पनिक असते. ती आपल्या मनाचा विरंगुळा घालवण्यासाठी बनवलेली असते.
अश्विन :
आणि वीरगळ.
आजी :
अरे वीरगळ ही लोकांनी उभारलेली असते. ती एक देवत्व प्राप्त व्यक्तीची असते. शुराची असते.
अश्विन :
आजी खरोखर त्या व्यक्तींनी लढाई केलेली असते का? की काल्पनिक आहे.
आजी :
अरे हो, अरे साधं गणित आहे. तू दिल्ली येथील अमर ज्योत पाहिलीस ना , टिव्ही मध्ये, ती कशासाठी उभारली गेली. ज्यांनी देशासाठी लढताना बलिदान दिले. त्यांसाठीच ना. तसेच पूर्वी आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमरुपी बलिदानाचे प्रतीक म्हणजेच या वीरगळी होत.
अश्विन :
खरंच त्यांनी तलवारीचे घाव झेलले असतील.
आजी :
अरे वारच काय? रक्ताचे पाट वाहिलेत कित्येकांच्या, तेव्हा कुठे हे स्वराज्य झाले. व या वीरगळी त्या वीरांच्या शौर्याचे प्रतिक आहेत.
अश्विन :
मला जमेल का त्या वीरांसारखं शौर्यवान बनायला. वाढेल का माझं पण धाडस.
आजी :
का नाही. प्रयत्न केल्यास आपणास ही यश मिळते. तू अस का करत नाहीस?
अश्विन :
काय?
आजी :
जात जा की सकाळी सकाळी आजोबांबरोबर व्यायामला. तू ही होशील स्ट्राँग.
अश्विन :
हा….
Cut to ……
……. ………
Next day / morning / outer
सूर्य उगवत आहे. अश्विन व आजोबा एकत्र धावत आहेत. ते टेकडीवर येतात. शांतपणे एका ठिकाणी बसल्यावर.
आजोबा :
काय अश्विन कसं वाटतंय.
अश्विन :
मस्त, अगदी फ्रेश.
आजोबा :
मग काय ठरलं. घ्यायचं का ट्रेनिंग.
अश्विन :
हो, मला तुमच्यासारख व त्या वीर पुरुषांसारखं व्हायचंय अगदी स्ट्राँग.
( अश्विन रोज लवकर उठून व्यायाम, धावणे, पूलप्स काढणे. लाठी काठी, व इतर प्रशिक्षण घेतो. सेल्फ डिफेन्स शिकतो. तसेच पुढील शिक्षण देखील पुण्याला पूर्ण करतो. स्पर्धापरीक्षा देतो .दोन चार वर्षात एक मोठा पोलिस ऑफिसर होतो. त्याचे बाबा येतात. तो आजोबा आजीचा आशीर्वाद घेऊन बाबांच्या गाडीत बसून निघतो. )
Cut to ….
……. …… ……
Day / Mumbai / Ashvin HOME inter – outer /
अश्विन डायनिंग टेबलवर बसलेला आहे. आई त्यास नाष्टा आणून देते. तो नाष्टा करतो. आई आत ट्रे नेऊन ठेवून येते. इतक्यात तो आपले कपडे चढवतो. बुट घालत असतो.
आई :
काय रे आता कुठे निघालास?
अश्विन :
थांब आलोच इतक्यात. आहे एक काम. ड्युटीचा पहिला दिवस आहे ना इकडे. त्या आधी जुना हिशेब चुकता करतो.
( अश्विन निघतो. )
Cut to …..
…… …… ……
Day / morning / outer / vasti rod.
गल्लीत पैसे लाऊन जुगार खेळणाऱ्या आरिफ, जोसेफ व समीर यांच्या मागे लागतो. त्यांना आपल्या पोलीसी खाक्या दणका देत. खूप चोपतो. बडवतो. ते घाबरतात.
अश्विन :
परत माझ्या नादाला लागायचं नाय. घाटी म्हणत्यात मला. समजलं काय.
( तो मागे फिरतो. गॉगल डोळ्यावर लावून निघतो. )
समाप्त