शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

रविवार, १२ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ७

 अस्तित्व पटकथा भाग ७


अस्तित्व पटकथा भाग ७,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू .....

उमेच्या गावापासून थोडं दक्षिणेत घाटी भागातील एक गाव सुर्यगाव, तेथे पाटीलवाडा, वाड्याला लागूनच तालीम होती. सदाशिवराव पाटील व लक्ष्मीबाई सद्गुणी कुटुंब. त्यांना तीन मुले. थोरला प्रतापराव त्याची पत्नी पार्वती. दुसरा जयसिंगराव त्याची पत्नी लक्ष्मी, तिसरा मल्हारी अविवाहित होता. जयसिंगरावस दोन मुले एक येसाजी दुसरा तानाजी, तर प्रतापरावास एक मुलगा कार्तिक व मुलगी अवंतिका व वासवी.

तालमीत मल्हारराव व त्यांच्या बरोबर तानाजी, येसाजी व कार्तिक व्यायाम करत होती. जोर काढून सूर्यनमस्कार घालत होती. गोठ्यात शांताबाई धार काढत होती. इतक्यात तिथे लक्ष्मीबाई आली.

लक्ष्मीबाई, “शांता… ये शांता… झाली का धार काढून?”

शांताबाई, “ हो झाली. आलेच. “

शांताबाई दूध घेऊन लक्ष्मीबाई जवळ आली. लक्ष्मीबाईंनी मुलांना हाक मारली.

लक्ष्मीबाई, “ मल्हारी, यारे सारे दूध आलेय.”

सर्वजण तिथे आले. लक्ष्मीबाईने दूध दिले. दूध पिऊन तोंडावर आलेल्या मिशा पुसत ते. “ वाह..” म्हणाले.

 लक्ष्मीबाई, “मल्हारी, काल विचारलेल्या प्रश्नाचं काय झालं.”

मल्हारी, “कोणता प्रश्न?”

 लक्ष्मीबाई, “ तुझ्या लग्नाचा?”

मल्हारी, “अजून मी तयार नाही त्यासाठी. “

लक्ष्मीबाई, “मग काय म्हातारा झाल्यावर घोडीवर बसणार का?”

मल्हारी, “ सांगतो नंतर. “

 त्याने गडबडीने कपडे घातली व तो बाहेर निघाला.

लक्ष्मीबाई, “मल्हारी ये एक की ……काय करायचं या पोराला.”

येसाजी, “आजी काका जर तयार नसतील तर माझं लावा की लग्न.”

 लक्ष्मीबाई, ( कानाचा गड्डा पिळंगाळत तो आई गं असा आवाज काढून)

अजून नाळ वाळलाय का? म्हणे माझं लग्न करा. चला पळा काकांबरोबर जा अंघोळीला.”

ते सर्वजण काकांमागे जात

सर्वजण,

“ काका थांबा,….. काका थांबा, …

असे ओरडत पळाले.

…….. …… …… ….. …..

नदीच्या वाटेला लागली. थोड्या वेळात नदीच्या बंधाऱ्यावर आल्यावर तिथे आपली कपडे ठेवून मल्हारीने पाण्यात उडी टाकली. व तो पोहू लागला. त्यापाठोपाठ इतर मुलांनीही उड्या टाकल्या. ती सुद्धा स्पर्धेत पोहू लागली. पोहत थोड्या अंतरावर असलेल्या बांबूच्या बेटास शिवून ते परतले. व दुसऱ्या बाजूच्या उंच आंब्यापाशी पोहोचले. तेथील आंबे तोडून घेऊन परत पुलावर आले. तिथे आणलेल्या पिशवीत आंबे ठेवले. पुन्हा उडी मारून पोहून स्नान केले. व पुन्हा कठड्यावर बंधाऱ्याच्या येऊन बसले.

तानाजी, “ आज तरी पूर्ण होतील का?”

येसाजी, “दोनशे झाले असतील.”

कार्तिक, “लोणचे जबरदस्त होईल ना?”

 मल्हारी, “हो “

मल्हारी, “हा आंबा खरा लोणच्याचा आहे. आजीला याचे आंबे खूप आवडायचे? आजोबा कायम पोहत जाऊन आणायचे.”

कार्तिक, “ व आता आपण आणतो.”

मल्हारी , “चला पोहणे झालं. जाऊया. “

ते आवरून जात असतात. इतक्यात त्यांना आवाज ऐकू आला.

एक स्त्री, “वाचवा वाचवा, माझ्या बाळाला वाचवा.“

ती सर्व आवाजाच्या दिशेने गेलीत. तिथे एक जंगली लहान कोल्ह्याने एका मुलावर हल्ला केला होता. त्याचे बाबा त्या कोल्ह्यास मारत होते. ती शेताला निघाली होती. ती मुलाचा पाय जो कोल्ह्याने धरला होता. तो सोडवण्याचा प्रयत्न करत होती. मल्हारीने एक दगड उचलला. व त्यास मारला. तस ते बाजूला रानात पळालं. ती तिथे गेली. त्या मुलाच्या पायाला दात लागले होते. त्यांची सुटका केल्यावर.

तानाजी, “कस केकटत पळालं. “

येसाजी, “ आपल्या काकांचा नेम आहेच भारी.”

स्त्री, “अगदी देवासारखं धावून आलात. नाहीतर काय खर नव्हतं.”

मल्हारी, “ काहीतरी हत्यार घेऊन यायचं. जवळ जंगल आहे. माहिती आहे ना.”

स्त्री, “ शेतात काम होत. म्हणून निघालो होतो. घरी कोण नाही . म्हणून सोबत आणलं याला. तर हे संकट पुढे वाढून ठेवलं होतं.”

मल्हारी, “ ते काम राहु दे. आधी त्याला दवाखान्यात न्यायला हवं.”

त्या मुलास घेऊन दवाखान्यात नेण्यात आले.

…… ….. …… ……..

मल्हारीच्या घरी जेवणखोलीत सर्व जेवायला बसले होते. जेवण वाढले जात होते. लक्ष्मीबाई जवळ बसलेल्या होत्या. जेवताना

कार्तिक , “ आजी काकांनी एक दगड मारताच पळालं बघ ते.”

लक्ष्मीबाई, “ हो का? तू काय केलंस मग?”

कार्तिक, “ मी त्या मुलाला उठवलं. त्याला कोल्हानं चावलं होत.”

लक्ष्मीबाई, “ अरेरे, खूप वाईट झालं. मग काय केलं.”

कार्तिक, “ त्याला दवाखान्यात नेलं. अन् डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन केलं बघ.”

लक्ष्मीबाई, “ तुला नाही केलं?”

कार्तिक, “ मला कशाला टोचतील?”

लक्ष्मीबाई, “ जास्त बोलतोस म्हणून.”

मल्हारी, “ बरं, आता कौतुक पुरे, जेवा आता.” “ आई , बाबा कुठे आहेत?”

 लक्ष्मीबाई, “ ते होय, गेल्यात महादेव कोळ्याच्या पोरीच्या लग्नाला. “

ते जेवू लागले.

…… …… ……..

वस्तीवर एका घराच्या दारात मांडव होता. अनेक लोक जमले होते. अक्षता टाकल्या. लग्न झाले. सदाशिवराव नवरीच्या बाबाला भेटून बोलत होते. वधू वराने त्यांचा आशीर्वाद घेतला.

महादेव, “लई कृपा झाली. आज तुम्ही होता म्हणून हे लग्न झालं. नाहीतर माझ्या गरिबाच्या पोरीला कुणी करून नेलं असतं.”

सदाशिवराव, “ त्यात काय एवढं, तुम्ही लोक श्रीमंती व पैसा पाहून मुलगी देण्याचा प्रयत्न करता. मुलगा जर कर्तबगार असेल तर तो पैसा कमावतोच. अन् नालायक असेल तर दवडतो, आपण चांगली पारख करुन घ्यावी. माझं ऐकलास म्हणून बरं, नाहीतर धोखा खाल्ला असतास. आता बघ मुलगी राहिली ना नजरेसमोर, अन् मुलगाही चांगला मिळाला. बरं निघतो मी राम राम…”

 महादेव, “राम राम …..”

तेथून गाडीवर बसून आपली टू व्हीलर घेऊन जाताना वाटेत एक तार खेचल्याने गाडीवरून तोल गेला. इतक्यात तिथे चार काळेशार माणसे आली. एकजण, “चल काढ ती अंगठ्या व चेन.”

दुसरा, “बटवा पण दे.”

सदाशिवराव सावरत उभे राहिले. दोघेजण त्यांना पकडून तिसरा, त्यांचे चेन, अंगठी, बटवा काढून घेतो. इतक्यात एक शीळ ऐकू आली. त्यातील एकजण, “चला रे. कोणतरी येईल.”

सदाशिवराव अंदाज घेऊन त्यांच्याशी प्रतिकार करायचे थांबवून त्यांना.

सदाशिवराव, “ सर्व घ्या, पण ती चेन तेवढी द्या.”

लुटारू, “ ऐ चल, देत नाही जा.”

सदाशिवरावांना ढकलून ते झाडीतून लपून बाजूला गेले. दिसेनासे झाले. सदाशिवराव अडखळत उठले. इतक्यात तिथून गाडीवरून निघालेला एका पांथस्थाने सावरण्यास मदत केली. ते आपली गाडी घेऊन निघाले.

…… ……. ….

वाड्याच्या आवारात गाडी लावून सोफासेटवर बसले. त्यांचा अवतार पाहून लक्ष्मीबाई जवळ येऊन

लक्ष्मीबाई, “ काय झालं. “

सदाशिवराव, “ काही नाही, वाटेत काही भुरट्या चोरांनी हल्ला केला. व अंगठ्या, चैन, पैसे सर्व लुटून नेले.”

लक्ष्मीबाई , “ अरे देवा, ते आणखी कुठून उलतले.”

इतक्यात एका गड्याच्या पोराने ही बातमी ऐकली व ते धावत पळत बाहेर सर्वांना सांगायला गेले.

गड्याचे पोर, “ अरे , समजलं काय, थोरल्या पाटलांवर हल्ला झाला. त्यांना लुटलं. सोन नाण सगळं घेतलं.”

 गल्लीतल्या एका जणाने ही बातमी ऐकली. व तो धावत कट्ट्यावर गेला. जिथे मल्हारी बसला होता. तिथे तो सांगत गेला.

एकजण , “अरे मल्हारी, ऐकलस का? तुझ्या बाबांवर हल्ला झाला वस्तीवरुन येताना अचानक काही लुटारूंनी लुटलं म्हणे, त्यांकडीला सर्व सोन नाणे काढून घेतलं म्हणे.”

मल्हारी, “काय?”

 दुसरा एकजण, “आजकाल सारखं चाललंय. वाटेला वाटमारी होतेय.”

तिसरा व्यक्ती, “ ते आलेत ना, जंगलात राहिलेले भटके त्यांचेच काम असणार.”

मल्हारी, “ च्या मायला, दाखवतोच इसका.”

मल्हारी व मित्र मल्हारीच्या घरी आले. सोफासेटवर बसलेल्या सदाशिवरावांना वारा घालत होते. त्यांना पाणी आणून दिले गेले. काळजीने.

लक्ष्मी, “सगळं ठीक आहे ना? असा कसा हल्ला केला त्यांनी. सांगत असते एकटे जात जाऊ नका म्हणून वय झालंय आपलं.”

सदाशिवराव, “ लूटमार झाली त्याचं काही वाटत नाही. ते काय पोटासाठीच करतात. पण आपली परंपरागत वंशावळीची चेन काढून नेली. त्याचं वाईट वाटतं. मी अडवलं , पण ऐकलं नाही त्यांनी. पूर्वजांची निशाणी होती ती.”

 मल्हारी रागाने उठून बाहेर गेला.

सदाशिवराव, “आडवा तेला, गरम डोक्याचं पोर, काहीतरी भलतंच करील.”

लक्ष्मीबाई, “मल्हारी, मल्हारी,”

मल्हारी बाहेर पडला व आपल्या मित्रांना इशारा केला. सर्व आपल्या गाड्या काढून निघाले. त्यांनी खंजीर, चाकू, छोटी बंदूक घेतली होती. ते घटना स्थळावर आले.

मल्हारी, “ कुठ हल्ला झाला?”

 राकेश “ ते बघ, तिथे गाडी घसरल्याचे निशाण.”

 अजित, “ गाड्या लावा झाडीत.”

मल्हारी, “ नको, थांब तू व सुरेश वताडाच्या बाजूने गावमिरीच्या जंगलातून वर जा. तिच वाट जंगलातून बाहेर जाते. आम्ही इकडून येतो.”

मल्हारी व राकेश जंगलातील पायवाटेने पुढे चालत गेले. वेगाने पुढे गेले.

मल्हारी, “ राकेश झऱ्याचे उगमाकडे जाऊया.”

राकेश, “बरं.”

ते त्या रान वाटेने निघाले. हिरव्या झाडीतून वाट काढत जाताना जंगलातील पक्षांचा आवाज कानी पडत होता. पाय वाटेने नाला पार करुन जाताना दूर धूर दिसला.

राकेश, “ मल्हारी तिकडे.”

मल्हारीने पाहून इशारा केला. ते रानातून हळूहळू निघाले.

(सापळा लावून त्यात सापडलेली कोंबडी शिजवून ते चोर खाऊन दारू ढोसून पडले होते. मल्हारी व राकेश त्यासमोर गेले.

त्यातील एकजण लपवलेले हत्यार उचलण्यास गेला. ते उचलून घेत असताना, राकेशने बंदुकीचा बार काढला.

मल्हारी, “ ज्यादा शहाणपणा नको. मला बाकीचं काही नको. थोड्यावेळापूर्वी लुटलेलं सोनं व ती चेन तेवढी द्या. आम्ही जातो.”

एकजण, “ तुला काय येडं वाटलाव लुटीचा माल द्यायला.”

 दुसरा, “तुझ्यात जर हिंमत असेल तर या रिंगणात टाकतो माल, घेऊन दाखव.”

( त्याने एक रिंगण आखले. त्यामध्ये एका रुमालात लुटलेला माल टाकला. त्यामध्ये असलेले आभूषण ती चेन मल्हारीने ओळखली. ती घेताना त्यांच्यात हातघाई झाली. मल्हारीने त्या तिघांना लोळविले. इतक्यात त्यांचे इतर साथीदार आले. मल्हारीच्या मित्रांनी पाहून लगेच एक आपट बार काढला. तसे ते मागे सरले. मल्हारीने ते दागिने उचलले. व मागे सरत तो व मित्र निघाले.)

……….. …………..

मल्हारी गाडीवरून दारात पोहोचला.

येसाजी, “काका आला, काका आला.”

मल्हारी घरात आला. वडील सोफासेटवर बसले होते. त्यांपुढे ती चेन व अंगठ्या सादर करून.

मल्हारी, “ हा घ्या.”

सदाशिवराव, मल्हारी, विचार न करता असा जीव धोक्यात घालणं बरं नव्हे.”

मल्हारी, “बरोबर आहे, पण आपली कष्टाची कमाई असं कोणी हिरावून नेत असेल व आपण गप्प बसने ते ही योग्य नाही.”

लक्ष्मीबाई, “गेलेलं धन परत मिळवता येतं.”

मल्हारी, “ वंश परंपरागत हे आभूषण मात्र परत मिळाले असते का?”

सदाशिवराव, “ हो ते ही खरंच, तू आज आपल्या घराण्याची अस्मिता पुन्हा परत आणलीस. यावर आजपासून तुझा हक्क. मी ही जबाबदारी तुला सोपवतोय.”

सदाशिवरावांनी मल्हारीच्या गळ्यात ती चेन घातली. ते पाहून त्यांच्या इतर सुनानी तोंड काळे करुन नाक मुरडले. व आपल्या खोलीत त्या निघून गेल्या.

….. …… ……

क्रमशः पुढे......


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अस्तित्व पटकथा भाग ९

  अस्तित्व पटकथा भाग ९ अस्तित्व पटकथा भाग ९ मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film, क्रमशः पुढे चालू ........ उमाचा रिझल्ट ला...