शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Monday, August 11, 2025

फ्रेंडशिप एक् साहस भाग १९

 फ्रेंडशिप एक् साहस भाग १९

 Night / inter/ loj

प्राजक्ता व श्वेता रीसेप्सनिस्ट जवळ येतात.

प्राजक्ता :

 इथे जेवणाची सोय.

रिसप्सनिस्ट :

 पुढे कॉर्नरला आहे.

( प्राजक्ता फोन वाजतो. ती पहाते. आईचा असतो. कानाला लावत.)

प्राजक्ता :

 बोल,

 सावित्रीबाई :

 अग, केव्हापासून ट्राय करते. लागत नव्हता फोन. कुठं ठेवला होतास.

प्राजक्ता :

 अगं, घाटात असताना रेंज नसते. कसा लागेल?

सावित्री बाई :

 पोहोचल्यासा नीट.

प्राजक्ता :

 आलोय पोलादपूरला.

 सावित्रीबाई :

 कूठे थांबलाय.

प्राजक्ता :

 आहे एका लॉजवर.

सावित्रीबाई :

 अग, लॉजवर राहण्यापेक्षा पपांच्या मित्राचा फार्म हाऊस होता ना तिथे जवळच.

प्राजक्ता :

तुझ झालं सुरू, अग.. इथ ठीक आहे. दुसरीकडे मुक्कामाचं असत तर ….

 सावित्री बाई :

 पण आपली सोय असताना..

प्राजक्ता :

हे बघ, इकडे सर्व व्यवस्थित आहे. गाडी, ड्रायव्हर काका, सुमा, मी मैत्रिणी सगळ नीट आहे. काळजी करू नकोस. बर ठेवते. जरा जेवणाच बघतो.

सावित्री :

 चांगल्या हॉटेलात जा, अन् हा अक्वाचं पाणी पी काय.? मागे डिग्गित बाटल्या ठेवल्यात बघ.

प्राजक्ता :

 बरं बाई … जातो. आजीला तेवढं सांग. नाहीतर काळजी करत बसायची.

सावित्रीबाई :

 सांगाय लागत नाही, बातमी पोहोचली.

प्राजक्ता :

 म्हणजे स्पीकर ऑन ठेवून बोलत होतीस तर.

सावित्री बाई :

 मग काय, सगळे काम ठेवून बसलेत.

प्राजक्ता :

 मग त्यांना सांग जेवा आणि झोपा. प्राजक्ता आहे खंबीर.

( कॉल कट करते. )

श्वेता :

 काय घरून फोन का?

प्राजक्ता :

 हो, उगाच काळजी करत बसायचं, यांच्या काळजीने आमची कुकुली बाळ व्हायची पाळी आलेय. बर त्यांना बोलावं वेळ होईल, जेवा य जाऊ.

Cut to ……

…… …… ……. ….

Night / inter /prajkta home

( फोन ठेवल्यावर )

सयाजीराव :

काही म्हणा, पोरगी धीट झालीय 

आजी :

 मग नात कुणाची आहे?

 सयाजीराव :

 होय बाई तुझीच आहे.

आर, आठवण झाली. आलोच ….

सावित्रीबाई :

 आता तुम्ही अन् कुठे निघालाय. की जाताय पोलादपूरला,

सयाजीराव :

 मला जायची गरज नाही. माझी लेक मोठी झालेय आता.

Cut to ……

…… ….. …..

Night / inter / prajkta home gyalari

सयाजीराव फोन लावतात.

पलीकडून

मल्हारराव :

हॅलो ,...काय, एवढ्या रात्री.

प्रतापराव :

 कन्या कोकणात आहे. पोलादपूरला जरा लक्ष ठेवा.

मल्हारराव :

  चांगल आहे की, काळजी करू नका. पाठवून देतो.

सयाजीराव :

 पण जरा लांबूनच हा, नाहीतर मॅडम चीडायच्या.

मल्हारराव :

 लोकेशन कुठे?

सयाजीराव :

 थांबा पाठवतो, ड्रायव्हर कडून अताच घेतलंय.

( सयाजीराव लोकेशन सेंड करतात. मल्हारराव ते पाहतात.)

Cut to …… …

….. ….. ……..

Night / outer / gova - Mumbai road

( प्राजक्ता व मैत्रिणी बाहेर पडतात.)

श्वेता :

 ये चला लवकर

अनुजा :

 माझ्या तर पोटात कावळ्यांनी धुडगूस घातलाय. केव्हा एकदाची जेवते असं झालंय.

सर्वजणी :

 चला …चला…

(प्राजक्ता मागे आहे. )

श्वेता :

 प्राजक्ता चल..

प्राजक्ता :

 अग, ड्रायव्हर काकांना बोलावते.

(प्राजक्ता गाडीजवळ जाते.)

प्राजक्ता :

काका चला जेवायला.

 ( सर्व गेटबाहेर जाताना, स्कोरपिओ मागे जाते. )

ड्रायव्हर :

 गाडी काढू का?

 प्राजक्ता :

 नको, इथं जवळच तर जायचं आहे. तेवढीच शतपावलं.

रेवा :

 मस्त , किती फ्रेश वाटतंय नाही का?

माधवी :

तो अभ्यासाचा कामाचा ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतंय.

अनुजा :

 हो ना, रोज रोज ती जाडी , जाडी पुस्तक बघुन भोवळ येईल.

प्राजक्ता :

 नोकरी , व्यवसाय करण्यासाठी तीच जाडी पुस्तकं उपयोगी पडतील. , काय मॅडम.

रेवा :

 हा पडतील, पण आत्ता तरी त्याची चर्चा नको.

( कॉर्नर येतो, हॉटेल पाटी दिसते.)

प्राजक्ता :

 चला पेट पूजा करायची जागा आली.

( त्या आतमध्ये जातात.)

Cut to …..

….

Night/ inter /hotel

(त्या हॉटेलमध्ये बसल्या आहेत.)

वेटर :

 बोला काय देऊ.

वेदिका :

( मेनू कार्ड पहात )

आठ शाकाहारी थाळी द्या.

(वेटर निघून जातो.)

रेवा :

महोदया, आपणं अप्रांत देश म्हणजे कोकणात आलो आहोत. एखादी फिशकरी अथवा एखादा साधा बंगडा तरी मागवा, या आत्म्यास बरं वाटेल.

वेदिका :

 आपली इच्छा पुर्ण होईल, पण …

रेवा :

पण काय देवी …

वेदिका :

 आपणं गड रोहन व अवरोहन करा, त्या पश्चात आपली इच्छा पुर्ण होईल. समजलं का?

रेवा :

 हो समजलं समजलं…..

( वेटर येतो, जेवणं सर्व करतो.)

श्वेता :

 ( जेवण पाहून )

काय राव ही सोलकढी केवढी पातळ , पाणी वाढवलेलं दिसतंय. व ही काय डाळ आहे.

( वेटर संकोचतो व आत जातो.)

प्राजक्ता :

 कोल्हापूर नव्हे हे. जेव गप्प.

श्वेता :

गप काय गप, पैसे घेतात, तसं द्यायला नको का?

प्राजक्ता :

 तुमच्या सारख्या सुपीक जमनी नाहीत इकडे.

( श्वेता शांत होते. व गप्प जेवू लागते. )

Cut to …..

…… ….. ……

( स्कॉर्पिओ हॉटेल आवारात थांबते. सादिक व सहकारी आत येतात. व जेवणाची ऑर्डर देतात. व वेटर ऑर्डर आणून देतो, ते जेवू लागतात. जेवताना मुलींकडे यांचे लक्ष असते.)

माधवी :

पुढील मुक्काम कूठे करूया? गडावर का?

श्वेता :

 गडावर नाही, गडाखाली पाचाडला.

अनुजा :

 गडावर जाऊया की राहायला.

वेदिका :

 नको, तिथं गर्दी असेल.शिवजयंती निमित्त, त्यापेक्षा पाचडला राहायचं. व आपल ठरलंय ना की गड चढून जायचं.

रेवा :

 मग उद्याचं जाऊ की, म्हणजे परवा सोईस्कर होईल.

 प्राजक्ता :

 ते काही नाही, उद्याची रात्र पाचाडला, राजमाता जिजाऊच्या सहवासात. घालवायची. व परवा गड चढून उतरायचे समजलं.

रेवा :

बर …

श्वेता :

जेव आता, उगाच इथे चर्चा नको.

( सादिक आपल्या साथीदारांना नजरेने खुणावतो.)

Cut to ……

……. …… …..

Night / outer / hotel road

( ते जेवून बाहेर पडतात.)

अमजद :

 दिखने मे लडकीयां बहुत ही कमाल है l लेकीन जरा तिखी है l

आसिफ :

हात मे असानीसे नहीं आयेगी l

सहकारी :

  रायगड जानेवाली है l अब क्या करे?

आसिफ :

 इन को पकडना है l तो बहुत सावधानी बरतनी पडेगी l

अमजद :

वही तो है l लेकीन पकडेंगे कहा l ये तो एकसाथ है l

सहकारी :

 यह तो मुश्किल बात है l

सादिक :

 थोडी देर पहले वह किधर रुकने की बात कर रही थी l

अमजद :

 आ….. हा याद आया l वह पाचाड मे रुकने वाली है l

सादिक :

 हमे अब वही पर ही जुगाड करना होगा l

आसिफ :

रात को ही दबोच लेंगे l दूसरे दिन सब लोग शिवजयंती मे सब मशगुल होंगे. किसी को खबर लगने से पहले काम करेंगे l

अमजद :

शेरनी पिंजरे मे आने के बाद…..

सहकारी :

 भेज  देंग उसी रात समंदर पार….

सादिक :

 आखो मे तेल डालकर नजरे रखो l ये क्या, क्या करती है l कब यहा से निकलती है l सब कुछ देखना पडेगाव |

सभी ( एकसाथ ) :

 जी..

सादिक :

 लग जाओ काम पे l और रात को रहने का इंतजाम करो l

अमजद :

उसी लॉज मे रहे क्या ?

 सादिक :

 क्या जान पहचान करवानी है l अबे शक हो जायेगा l उधर देख l  सी सी टिव्ही ….

अमजद :

( कॅमेरा सी सी टिव्ही वर जातो. अमजद मान हलवतो.)

 हा …..

 सादिक :

  सामने के लॉज मे मेरे रहने का इंतजाम करो और…..

आसिफ :

 और क्या ?

 सादिक :

तुम लोग गाडी मे ही रुकना l और ध्यान देना l अगर काम ठीक नही हुवा तो ….

सहकारी :

 तो क्या …

सादिक :

 तुम लोगोका पार्सल मैं करुंगा l वो भी सिधे कब्रस्तानl

( सादिक लॉजकडे जातो. बाकीचे त्याकडे पाहात असतात.)

Cut to …..

… ….. …..

Night / inter / loj

( रुमची लाईट लागते. मुली आत येतात. )

अनुजा :

 खूप कंटाळा आला. चला झोपुया.

रेवा :

माझं तर अवघडून अंग दुखत आहे.

वेदिका :

 दोन सिटची जागा देऊन ही तुझं आपलं  बरं आहे की. अंग अवघडलं म्हणे.  झोप आता.

रेवा :

 आपल्याला कसं ऐसपैस लागतं.

वेदिका :

 दहा बाय दहाच्या रूममधे कशी रहाशील.

रेवा :

 त्यात काय ? इथे नाही का अडजेस्ट करत… तुम्हा संगे.

माधवी :

 ओ मॅडम , तू नाहीं करतं. आम्ही करतो स्वतःला,.. अडजेस्ट करते म्हणे.

( ड्रायव्हर  काका बाहेर जाऊ लागतो.)

 प्राजक्ता :

 काका कुठे निघालाय?

ड्रायव्हर :

 खाली गाडीत झोपतो.

प्राजक्ता :

 नको गाडीत, इथेच झोपा.

ड्रायव्हर :

 खाली गाडी बाहेर आहे.

प्राजक्ता :

 पार्किंग मध्ये आहे ना, उगाच कशाला. झोपा  इकडेच, भरपूर जागा आहे.

ड्रायव्हर :

 बर , आलो एक रपेट मारून गाडी जवळून.

प्राजक्ता :

 बरं ठिक आहे .

Cut to ….

 …. …. …..

Night /outer – inter skorpio / on road

(स्कॉर्पिओ बाहेर रोड साइडला उभा आहे. शेजारी कचराकुंडी आहे. डास फिरत आहेत. आसिफ, अमजद, व सहकाऱ्यांना चावत आहेत. त्यांचे लक्ष मुली राहिलेल्या रूमकडे आहे. रुमची लाईट बंद ..)

अमजद :

 लाईट बंद हो गई है l लगता है, सो गई l

चलो, हम भी सो जाते है l

आसिफ :

 मालूम है ना, बॉस ने क्या कहा है l

 अमजद :

 आबे वो सो गई, रातभर जग कर क्या करेंगे l और मच्छर भी यह पर है l

( एका हातावर  मच्छर मारतो.)

 साथीदार :

 तो क्या करे.

अमजद :

 बॉस को पूछ कर लॉज पर जाते है l

आसिफ :

 कॉल करके पूछ तो.

( फोन लावतो. बॉस घोरत असतो. उठतो.)

 अमजद :

 बॉस..

सादिक :

 क्या है l

अमजद:

बॉस वह सो गई है l लाईट बंद है l हम आ जाये क्या?

सादिक :

यहाँ क्या काम है l चूप चाप रहो वाहा पर…

अमजद :

 लेकीन यहा पर मच्छर काट रहे है l

सादिक :

 तो क्या होगा?

अमजद :

 डेंग्यू मलेरिया हुवा तो.

सादिक :

 आबे वहा डिग्गी मे ओडोमास है l लगा कर सो जा | इधर मत आना l

अमजद :

 लेकीन बॉस

सादिक :

 आबे एक रात की तो बात है l तेरा पुरा खून नहीं चुसेंग मच्छर….

 और चुसा भी तो पुण्य मिलेगा नेकी का तुम्हे, अब रख और नजर रख….

( साथीदार एकमेकाकडे पाहतात.)

साथीदार :

 क्या हूवा.

अमजद :

 बॉस ने कहा की ओडोमास लगाकर सो जा वही पर…..

आसिफ :

 अब क्या करे ….

अमजद :

 ओडोमास लगा , और दो पहरा…

Cut to ……

...... ..... ....

Day / morning / road

(टपरीवर चहा घेताना.)

प्राजक्ता :

 चहा घ्या.

( रेवा प्राजकतास इशारा करते.)

 प्राजक्ता :

 दोन बिस्कीट पुडे द्या.

श्वेता :

 रेवा एखाद्यावेळी बिस्कीट पाव नसेल तर कसे होईल तुझं.

रेवा :

 चहाच घ्यायचा नाही.

श्वेता :

 मग ठेव तो.

रेवा :

 मग नाष्टा मागव, चालेल मला.

अनुजा :

 ए खादाड गप्प, घे तो चहा….

उठसुठ काहीतरी खात अन् त्या पोम पॉम् टेडिशी खेळत असते.

( ब्लॅक स्कॉर्पिओ जाते.)

श्वेता :

 अग ही गाडी कालपासून इथे आहे. अन् त्यातले तिघे सारखं इकडे तिकडे फिरताहेत. काय शोधताहेत कुणास ठाऊक?

वेदिका :

 काय तरी करेनात का? चला आवरा पुढे जायचय.

( त्या गाडीत बसतात, गाडी निघते.)

Cut to …..

……

DAY / outer / on road

( स्कॉर्पिओतून कॉल करतात. बॉस अंघोळ करत असतो.)

अमजद :

 बॉस ओ जा रही है l

सादिक :

 जाणे दो l

अमजद :

 उनको पकडणा है ना l

सादिक :

 मालूम है ना, किधर जानेवली है l

अमजद :

मालूम था l तो हमको कायको रखा इधर रात को l

सादिक :

वाहा पे रखा इसलिये सुकून से सोया, वर्णा तुम्हारे खराटे रातभर कोण सूनता l अब आ जाओ इधर फ्रेश होकर आगे चलते है l

Cut to …….

…….. …..

Day / outer /road gova – Mumbai / mahad

 वाटेत घाटात गाडी थांबवून त्या थोडा आनंद घेतात. मोठ्यानं हूक्या घालतात.

 …… …… …

Evening / 4 .00 clock / pachad

( पाचाडला  मोकळ्या जागेवर ट्यांक बांधत आहेत. साहित्य शोधताना)

प्राजक्ता :

अंग, सगळं घेतल. पण शेगडी घेतली नाही.

श्वेता :

 ती कशाला हवी.

 प्राजक्ता :

 जेवणं करायला नको.

श्वेता :

 चूल पेटवायची.

प्राजक्ता :

 अंग लाकड नकोत त्यासाठी.

श्वेता :

 तिकडं बघ.

( रेवा व अनुजा रानातील लाकड आणताना दिसते. )

श्वेता :

 बायांनो बास करा. वर्षभर राहायचं नाहीये.

अनुजा :

 तू गप ग. ही काय जास्त वेळ जळायची नाहीत. नंतर काय अंधारातून उडकायच.

वेदिका :

 तर काय?

रेवा :

 आता बास झालं. आता पाण्याचं बघुया.

प्राजक्ता :

 गाडीत आहे ते प्यायला व जेवणाला पुरेल. पण खर्चाचं काय करायचं.

श्वेता :

 इथ वाड्यात आहे ना विहीर. तिथलं घेऊ.

माधवी :

 मोबाईल जरा व्यवस्थित युज करा. इथ चार्जिंग नाही.

प्राजक्ता :

 गाडीमध्ये आहे ना.

माधवी :

तरी पण…..

श्वेता :

बरोबर बोलतेय. आपण बाहेर आहोत. जपूनच राहायला हवं.

वेदिका :

अनुजा श्वेता , तुम्ही पाणी आणायला जा. प्राजक्ता व माधवी जेवणाचं साहित्य काढा. मी व रेवा टेंक उभा करतो.

Cut to …......

….. …… …….


Friday, August 8, 2025

फ्रेंडशिप एक् साहस भाग १८

 फ्रेंडशिप एक् साहस भाग १८

DAY / outer / samudr kinara godaun

समुद्राच्या लाटांचा आवाज, रात्रीचे आठ वाजलेत ट्रक गोडाऊन मध्ये येतो. बॉक्स उतरत आहेत. अमजद उतरून घेत आहे. सादिक आतील टेबलावर हिशेब लिहीत आहे. माल उतरला जातो. ड्रायव्हर सादिक जवळ येतो.

ड्रायव्हर :

 मालक हे घ्या, बघा माल व रशीद बरोबर आहे का?

सादिक :

 आसिफ कितने बॉक्स है l

आसिफ :

76 है साहब.

(सादिक अमजद कडे पाहतो.)

अमजद :

 हा उतने ही है l

सादिक :

 ( पावती पहातो.)

हा है l

 ड्रायव्हर :

 पोहोच, व ट्रान्स्फर बील द्या.

सादिक :

 जी हा, देता हू l

( सादिक रुपये व बील पेड शिक्का मारून देतो. व पोहोच देतो.

ड्रायव्हर :

( रशीद घेऊन )

 रामराम.

सादिक :

 खुदा हाफिस l

( गाडी निघते. व फोन वाजतो. रशिद उचलतो.)

बॉस :

 अबे, क्या हुआ डिलिव्हरी का?

सादिक :

 थोडा मुश्किल है l साहब.

बॉस :

  मुझे वो कूछ मालूम नही l अगले डिलिव्हरी के समय, अगर आंगुर के साथ लडकीयां नही मिली, तो याद रखना, तुझे कब्रिस्थान भेज दूंगा l रुपये लिये है l तो काम कर l

सादिक :

पर …..

 बॉस :

पर बीर कुछ नही l मुझे बहाने मत बाता l समज गया ना l रख फोन ऑर काम पर लग् जा l

( फोन ठेवल्यावर)

 अमजद :

क्या हुवा ?

 सादिक :

 कुछ भी करके लडकिया उठानी है l

 अमजद :

 लेकीन,  अब पुलिस अलर्ट पर है l

सादिक :

 वो मुझे मालूम नाही l अगर ये पार्सल नही भेजा l तो हमे पार्सल कर देंगे l

( वर बोट करून दाखवतो.)

आसिफ :

 कितने दिनो में चाहिये l

सादिक :

इक्कीस फरवरी  तक  l

अमजद :

 तब तक करेंगे कुछ जुगाड l मिल जायेंगी l

सादीक :

तो लगो काम पे l में इधर देखता हुं l

अमजद :

 जी.

Cut to …

……. …… …..

Night / outer / road

( अमजद व आसिफ काही सहकर्यांसमवेत इकडे तिकडे फिरत आहेत. पोलिस गाडी फिरत असते. अचानक एक साडी वाली दिसते. मागून जाऊन तिला उचलतात. व डिगित घालून निघतात.)

Cut to …

…… …… …

Night /outer/ road in gadi.

(आसिफ फोन करतो. सादिक उचलतो.)

आसिफ :

 साहब , बडा माल मिला है l

सादिक :

 कहा है l

आसिफ :

 गाडी मे ला रहे है l रास्ते मे है l

सादिक :

 कहा तक आया है l

आसिफ :

 शहर के बाहर समंदर के किनारे.

( आसिफ पत्ता सांगतो.) No OC)

सादिक :

 रुक् , मै आता हूं l

( गाडी थांबलेली आहे. सादिक  आपल्या गाडीवर बसून येतो.)

सादिक :

 दिखा कीधर है l

(आसिफ गाडीची डिगी उघडुन )

सादिक :

 आबे मुह क्यो बांधा है l पिछली बार एक मर गई थी l इस तरह मत बांध l मूह मत ढकणा था l

( उघडुन पाहतो. शॉक बसतो. मागे वळून आसिफच्या कानाखाली लावतो.)

सादिक :

 अबे , किसे उठा लाया है l इसका क्या आचार डालू l

( ते पाहतात, धक्का बसतो. तो एक हिजडा असतो.)

अमजद :

 इसका क्या करे l

सादिक :

आबे ले जाकर कही भी छोड दे इसे .

सादिक :

 अब , मुझे ही कुछ करना पडेगा l

( हातावर हात मारत l रागीट नजरेने l )

Cut to ..

…… ….. …

Day/ outer pratapgad road

(गाडी पोलादपूर रोडला असते. महाबळेश्वरपार केल्यावर.)

प्राजक्ता :

काका गाडी प्रतापगडला घ्या.

( ड्रायव्हर मान हलवतो. गाडी वळवली जाते. चाक वाजल्याचा आवाज. थोड्याच वेळात गाडी प्रताप गडाखाली असते. गाडी उभी आहे. एक शेल्फी घेतला जातो. प्राजक्ता सूचना देते.

प्राजक्ता :

 एनी वे गाईज आपणं आता प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा आहोत. इथून थोड्याच अंतरावर प्रतापगड आहे. आपण वेगानं जायचं व भवानी देवीच दर्शन घेऊन यायचंय, कारण इथे एक नियम आहे. की सूर्य मावळला की गडाचे दरवाजे बंद होतात. त्यामुळे त्या आधी आपणं मुख्य दरवाजाच्या बाहेर आलंच पाहिजेत.

( रनिंग करत सर्व जनी जातात. वेदिका वेगानं पळते. माधवी व सुमन वेगाने गोमुख दरवाजा पर्यंत जातात. पोचल्यावर दारमागे लपतात.)

माधवी व सुमन :

हे …जिंकलो

( पाठोपाठ श्वेता, प्राजक्ता पोहोचतात.)

श्वेता :

 खूप मज्जा आली.

वेदिका :

 मी पहिली आले, प्रथम पेढा.

श्वेता :

 बाकीच्यांनी रेडी व्हायच्या आधीच पळालीस, तिथे साधं गाडीचं दार सुद्धा लावलं नाहीस. अन् म्हणे पहिली आले.

प्राजक्ता :

 आज माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे.

अनुजा :

 हो तर….

( रेवा मागून येते.)

 रेवा :

 अग, थांबा तर… ती सुमन व माधवी कूठे दिसत नाहीत.

प्राजक्ता :

असतील मागे.

( दरवाजा मागून येत.)

 माधवी :

ओ मॅडम, मागे नाही पुढे…

माधवी :

मघाशी गाडीत चाललेली कुसर - पुसर ऐकली आम्ही. म्हणून तू सावध व्हायच्या आधी पळालो.

श्वेता :

 चला, जाऊन दर्शन घेऊया.

माधवी :

अग, तोफ बघ, केवडीशी आहे. मस्त आहे ना.

अनुजा :

 जर का कोणी शत्रू दरवाजातून आत आला की त्याला उडवायचा धडाम s s…… त्यासाठी असेल.

( ॲक्शन करत)

श्वेता :

ए अंगणवाडी गप, आम्ही काय मंदबुद्धी वाटलो काय?

चल पुढे…..

( देवपूजा साहित्य घेतात, दर्शन घेतात. तलवार पाहतात. शिवपुतळा पाहतात. नमन करतात.)

रेवा :

 ए ती बघ तलवार, आपणं सराव करतो तसीच आहे ना, वस्तादांसारखी. त्या टाईपच आहे, थोडीशी बदल.

प्राजक्ता :

 काही असो, आपणं टाईम टेबल प्रमाणे नियोजन केलं की सर्व नीट होतं ना.

श्वेता :

 हो ना,

श्वेता :

 हो ना….

प्राजक्ता :

 चला वेळ होतोय पुढे जायचं आहे.

सर्वजनी :

 एक् दोन तीन स्टार्ट…….

( त्या धावत गाडीपर्यंत जातात. गाडीत बसतात. गाडी निघते.)

Cut to …….

….. …… ….

Evening / outer in bolero / road ghat rod ambenali poladpur

रेवा :

 भारी वाटलं, दर्शन घेऊन.

श्वेता :

 एक वेगळीच स्फूर्ती मिळाली. नाही का?

अनुजा :

 अग, मघाशी ती तलवार पाहिलीस त्यावर स्टार डिझाईन होत्या.

प्राजक्ता :

 अग, डिझाईन नव्हे ती, चिन्ह आहेत. शंभर शत्रू मारले की एक् स्टार मिळायचा.

वेदिका :

 खरचं.

वेदिका :

 दरवाजा पाहिलास तो, कसं बांधकाम आहे मस्तच.

प्राजक्ता :

 गो मुख बांधणी म्हणतात त्याला.शत्रूचा तोफ , हत्ती मारा दरवाजावर होऊ नये म्हणून तशी बांधणी शिवकाळात केली गेली होती.

वेदिका :

तुला ग कसं माहीत हे सगळं. तू तर कधी गडावर कुठल्या गेली नाहीस.

प्राजक्ता :

 हे बघ, मी बिझनेसमनची मुलगी आहे. कोणतेही काम चौकशीपूर्ण करते. मी किल्ले पाहिले नसतील, पण त्यावरील बरीच पुस्तके वाचली आहेत. व यू ट्यूब व्हिडिओ देखील पाहिलेत.

अनुजा :

 या बाबत तुझा हातखंडा आहे. नाहीतर आम्ही, यापूर्वी नुसत् भांडत असू. अन् ही काय करते, अन् ती काय करते. नको त्या उचापतीच करत होतो.

रेवा :

 खरचं वाचन केलं पाहिजे, ज्ञान वाढतं, व उपयोगी पण असत.

माधवी :

 हो यार. …..

प्राजक्ता :

 सुमन तू गप्प का? तुला नाही का आवड वाचनाची.

सुमती :

 आहे की, खूप आहे.

श्वेता :

 बायाओ वाचनावर एवढं बोलताय, तस् करतं पण जा. नाहीतर आज बोलायचं व उद्या आहेच. ये रे माझ्या मागल्या सारखं……

( वेदिका फोनवर चॅटिंग करत असते.)

श्वेता :

 ये एडपट ठेव मोबाईल

वेदिका :

 अग, थांब ग जरा एवढा मेसेज पाठवते.

( गाडी धावताना दिसते. )

Cut to …..

……. ……. ……

Night /outer / poladpur gova – Mumbai road

गाडी एका टपरी शेजारी थांबते. गिऱ्हाईक पाहून  टपरीवाला चहा घुसळू लागतो. प्राजक्ता, श्वेता गाडीतून उतरतात.)

श्वेता :

 ये उतरा ग, थोडा चहा घेऊया.

( मुली आळस झाडत उठून उतरतात.)

रेवा :

 किती वाजलेत?

वेदिका :

 सात

( टपरीवर जात.)

श्वेता :

 आठ, चहा द्या.

( चहा घेत.)

प्राजक्ता :

 अहो काका, इथं राहण्याची सोय कुठे?

टपरीवाला :

 पुढे जवळच लोज आहे.

प्राजक्ता :

 साधी की सुटेबल.

टपरीवाला :

 ते काय मला कळणार, जाऊन बघा, आवडली तर रहा.

किती दिवस राहणार?

 श्वेता :

 आजची रात्र फक्त.

टपरीवाला :

  एकच वस्ती राहणार, मग उगाच खर्च कशाला वाढवता? घ्या जावा एखादी साधी बाधी,

( प्राजक्ता बिल पेड करू लागते. वेदिका तिला अडवते. व बील पेड करते. एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ येते. त्यातून आसिफ, सादिक, अमजद खाली उतरतात. व चहा घ्यायला जातात. मुलींना पाहतात. निरीक्षण करतात. सादिक मुलींकडे पहात अमजदला इशारा करतो.)

श्वेता :

 जेवणाची सोय कुठे ?

 टपरी वाला :

 तिथंच थोडया अंतरावर आहे. एक हॉटेल. तिथे मिळेल छानसं

( गाडीत बसतात, गाडी निघते. )

Cut to …..

…… … …..

Night / outer – inter / poladpur rod – loj

( गाडी पुढे जाते. एका लॉज जवळ थांबते. श्वेता व प्राजक्ता आत जातात. व लगेच येतात.)

वेदिका :

 काय झालं ?

प्राजक्ता :

 चला काका, गाडी पार्क करा आत. इथे आज मुक्काम करायचा.

( गाडी आत येते. )

 श्वेता :

 चला उतरा गं, साहित्य घ्या आपापल. वेडे माझी बॅग पण घे.

वेदिका :

 कूठे आहे?

 श्वेता :

पुढल्या बाजूला आहे. ड्रायव्हर सीट जवळ.

( मुली उतरतात. साहित्य घेऊन लोजमध्ये जातात, जिनाचढून रुम मध्ये जातात. ड्रायव्हर गाडीवर फडके मारतो. गाडी टायर वगैरे चेक करतो. बाहेर रोडला ब्लॅक स्कॉर्पिओ थांबते.)

अमजद :

बॉस माल बहुत ही अच्छा है l उठा ले क्या?

आसिफ :

यही पर ही सारा झोल करते है l ता की पार्सल जलद पहुंच सके l

सादिक :

 आबे चूप ,…. बकबक मत कर. गाडी पर झेंडा दिखाना |

अमजद :

 परसो, शिवजयंती है ना l

साथीदार :

याने यह लडकीया रायगड जाणेवाली है l

अमजद :

 वो क्या करणे जाएगी l उनका वहा क्या काम है l

सादिक :

 अबे, गाधे, गाडी देखी नाही तुने, कोल्हापूर की है l m h.09, इधर क्या जलसा मनाने आयेंगी l

आसिफ :

 तो क्या छोड दे उन्हे?

सादिक :

ऐसे कैसे छोड दे l देखते है , क्या होता है l अगर चान्स मिला तो उठा लेंगे l स्वराज्य की हुरे अरब सेठ मजेसे चखेंगे l

 अमजद :

 लेकीन यहा तक आई है l तो तयारी वाली होंगी हुजुर l

सादिक :

 अरे, गधे, औरत तो औरत होती है l रिबन बांधणे से शेरनी नहीं बनती l इनका जोश सिर्फ शिव जयंती और गुढी पाडवा के दिन ही होता है l बाकी दिन कूछ नहीं l

आसिफ :

 हात पैर चलाने वाली हुंई तो l

सादिक :

  तो क्या? जाल मे फसकर मछली भी थोडी देर फड फडाती है l ये क्या चीज है l इनको फडफडाये बिना पकडणे का इलाज है, मेरे पास l

( बॉटल उठाकर दिखाता है l)

साथीदार :

 बॉस आपं तो पुरी तयारी से आये है l

सादिक :

यू ही नहीं इतना मुलुख संभालता हुं l इस दवा से वह इधर इस तरह बेहोश हो जाएगी l और उठेंगी अरब के मिनार देखकर l

( हसण्याचा आवाज )

 सादिक :

 आबे हस मत, जा लग जा काम पे l जा निगराणी कर् l क्या क्या कर रही है वो l

Cut to ……….

……. ….. …….


Monday, August 4, 2025

फ्रेंडशिप एक साहस भाग १७

 फ्रेंडशिप एक साहस भाग १७

Day / inter / prajkta home

( घड्याळाचा गजर वाजतो. प्राजक्ता उठते. आपले आवरते. जिन्यावरून खाली येते. फोन वाजण्याचा आवाज, सयाजीराव फोनवर उचलून बोलत असतात. ती जिन्यावर थांबते. कान लावून ऐकू लागते. फोन ठेवल्यावर, जवळ जात.)

प्राजक्ता :

 कुणाचा कॉल होता?

सयाजीराव :

 मित्राचा.

प्राजक्ता :

 काय झालं.

सयाजीराव :

 आणखी काय होणार, तुझ्या मनासारखं झालं.

प्राजक्ता :

 काय मनासारखं.

सयाजीराव :

 तो गाईड येणार नाही. त्याच महत्त्वाचं काम आहे.

( प्राजक्ताचा चेहरा आनंदी झाला. पण तस न दाखवता.)

प्राजक्ता :

 मी माहिती काढलेय, सगळी, अन् ड्रायव्हर काका आहेत की सोबत, काळजी कशाला करताय?

सयाजीराव :

 मुले कितीही मोठी झालीत तरी आई वडलांना ती लहानच असतात. अन् तू तर आमची गोड बाहुली.

काळजी तर वाटणारच बाळ.

प्राजक्ता :

 पण बाबा, आता ही बाहुली मोठी झालेय, व सशक्त ही, फक्त आशीर्वाद पाठीशी असू द्या.

( वाकून नमस्कार करते.)

सयाजीराव :

 तो तर कायमच तुझ्या पाठीशी आहे. पण टेक केअर.

( प्राजक्ता मान डोलावते , आपल्या रूममध्ये जाते. अन् एस म्हणत नाचू लागते.)

Cut to …….

…… ….. ……

Day / OUTER / prajkta home

गाडी उभा आहे. सर्व साहित्य डीगित ठेवत आहेत. प्राजक्ता आशीर्वाद घेत आहे. सुमती ही सरलाची मुलगी उभा आहे.

सावित्रीबाई :

 नीट जा, अन् वेळोवेळी फोन करत रहा.

प्राजक्ता :

 करतो बाई,

(प्राजक्ता नमस्कार करते)

सयाजीराव :

यशस्वी हो.

सावित्रीबाई :

परमेश्वर कल्याण करो.

आजी :

 विजयी भव.

प्राजक्ता :

 असा आशीर्वाद पाहिजे बघ.

प्रदीप :

 अन् माझ्या.

प्राजक्ता :

 तुझ्या कशाला पडायला हवं?

प्रदीप :

 हे काय बोलणं झालं. मोठा आहे मी तुझ्यापेक्षा.

प्राजक्ता :

एवढा कुठं मोठा आहेस, फक्त दोनच वर्षे ना.

प्रदीप :

आई बघितलस का?

आई :

अग, पड ग दादा आहे ना तुझा?

प्राजक्ता :

बर बाई, पडते.

(प्राजक्ता नमस्कार करत.)

प्राजक्ता :

 हा, आशीर्वाद दे.

प्रदीप :

 लवकर लग्न होऊ दे.

प्राजक्ता :

 बघ ना ग आई, मला कसला आशीर्वाद देतोय ते.

आई :

 प्रदीप, दे बर सरळ आशीर्वाद.

प्रदीप :

 बर घे, भगवा फडकवून ये.

आई :

  सरू अग् सरू, कुठं गेली ही.

( सरू येते, तिच्या हातात वाटी आहे, तिची मोठी मुलगी सुमती पण सोबत आहे. ती तिला सूचना देत आहे)

सरू :

 हे बघ प्राजक्ता ताई आपल्याच आहेत. त्या निमित्ताने का असेना तुला फिरायला मिळतंय. त्यांचं सगळं एकत जा.

सावित्रीबाई :

 काय ग, आत काय करत होतीस.

सरू :

 काही नाही, दही साखर आणत होते.

आजी :

 हे अगदी छान केलंस, मी तर विसरलेच होते. दे पोरींच्या हातावर.

( सरू दही साखर देते. तिच्या डोळ्यात थोड पाणी येतं.)

 आजी :

 सरू हसत.

सरू :

 कळत हो मला आनंद अश्रू आहेत हे, तुमच्यासारख्या थोरांचा आशीर्वाद असेल तर आपली प्राजक्ता ताई सगळे गड सर करेल.

प्राजक्ता :

 हा निघतो आम्ही.

आजी :

निघतो नाही, येतो म्हणावं.

प्राजक्ता :

बर  येतो.

( त्या दोघी गाडीत बसतात.)

सयाजीराव : ( ड्रायव्हरला)

 नीट घेऊन जा, अन् तिच्या हातात गाडी द्यायची नाही.

ड्रायव्हर :

बर , साहेब.

( गाडी जाताना दिसते.)

Cut to …..

…… ……. …….

DAY / outer- inter / Hostel

(गाडी हॉस्टेल बाहेर उभा आहे. प्राजक्ता  ड्रायव्हर शेजारी बाहेर उभा राहून हॉर्न वाजावते. आवाज ऐकून श्वेता खिडकीतून पहाते. )

श्वेता :

 ए आवरा चला लवकर गाडी आली.

( रेवा बॅग घेऊन जाताना )

अनुजा :

 ए माझी पण घे ना.

रेवा :

 माझीच जड झालेय, अन् तुझी कशी घेऊ?

वेदिका :

 एवढं काय काय घेतलय?

रेवा :

 यात तिघिंच साहित्य आहे.

वेदिका :

 चल आता.

( मुली बाहेर पडतात, गाडीकडे जातात )

वेदिका :

 श्वेता कुलूप लाव.

( खिडकीतून कुलूप घेते. रुम लाईट बंद करून कुलूप गडबडीने लावते. त्यांना जाताना पाहून.)

तन्वी :

 आज कसं हॉस्टेलच वातावरण आनंदी आहे ना.

मानसी :

 का ग.

तन्वी :

 काही नाही, हॉस्टेल मधील उनाडकी कमी होईल.

मानसी :

 हो ग, किती बरं वाटतेय.

श्वेता :

तनु बाळ ती चिमणीची चोच उघडुन लई चिवचिव करू नकोस काय? अन् आम्ही आहोतच उनाड, म्हणून तर तुझ्यापेक्षा पाच टक्यानी पुढे आहोत.

( मानसीला उद्देशून )

 अन् तू ग कोथंबिरीची पेंडी, आधी त्या झिपर्या बांध, सारख्या वेणीतून बाहेर आलेल्या असतात.

अन् हो सांगायचं राहिलंच आम्ही चाललोय स्वराज्याची राजधानी सर करायला.

मानसी :

 काय ग तन्वी, एक् गड चढायला एक वर्ष घालवला, बाकीचे चढेपर्यंत पाक म्हातारी व्हायचीस .

श्वेता :

 म्हातारी तू अन् तुझी आजी, मी एका वर्षात सगळे गड सर करेन, अन् हिम्मत बघायची असेल तर येतीस का कुस्ती खेळायला.

मानसी :

 कुस्ती खेळायला मी काय बापय नाही तुझ्यासारखा.

श्वेता :

 हो का, लगीन झाल्यावर खेळ मग.

( वेदिका खो खो असते. हॉर्न वाजतो)

वेदिका :

 चल लवकर, उगाच यांच्या नादाला लागायला नको, मांजरीनी कुठल्या. चांगल्या कामाला निघालो की आल्या लगेच आडव्या.

खालून प्राजक्ता :

 श्वेता श्वेता , लवकर ये. अजून काय करतेय ही.

श्वेता :

 तुम्हा चीचुंद्र्याना नंतर बघते.

Cut to …

…… ……

Day / outer / hostel road

(श्वेता व वेदिका येत आहेत. श्वेता चिडलेली आहे. बाकीच्या मुली सीटवर बसत आहेत. श्वेताला पाहून) 

प्राजक्ता :

 ए बाई, हसून प्रवासाची सूरवात कर.

श्वेता :

 हसणार कसं, जाताना दोन मांजरी आडव्या आल्यावर.

प्राजक्ता :

 कोण.

श्वेता :

 ती मानसी अन् तन्वी.

प्राजक्ता :

त्यांच्याकडं कशाला लक्ष द्यायचं?

( गाडीत बसलेली रेवा )

रेवा :

 तिकडे लक्ष द्यावं लागत नाही. त्या देण्यास भाग पाडतात.

प्राजक्ता :

 आता चालुया का?

( श्वेता गाडीत बसले. हळू आवाजात प्राजक्ता खुणावते.)

श्वेता :

कूठे आहे तो?

प्राजक्ता :

 त्याचं येणं रद्द झालं.

श्वेता :

 ( आनंदाने )

 या s s किती गुड न्यूज दिलीस तू.

( ड्रायव्हर गमतीने पाहतो.)

श्वेता :

 काका, काही नाही, आमची दंगा मस्ती चालयचीच.

( ड्रायव्हर क्यारेजवर साहित्य फिट्ट करतो. गाडी चालू होते. निघते. त्या एकमेकींच्या कानात कुजबुजतात. व गाईड न येण्याचे सांगतात. त्या हसतात. गाडी जाताना दिसते.)

Cut to ……

…… ….. …..

Day / outer / on road

( गाडी हायवेला धावत आहे. वारे मारत आहे. प्राजक्ता इशारा करते. श्वेता खिडकीची काच खाली करते. रेवा वेदांगीच्या अंगावर झोपत आहे.)

वेदिका :

 ये झोपाळू, लागली लगेच पेंगायला.

रेवा :

 असू दे ना ग, थोडा वेळ मस्त वाटतंय.

वेदिका :

 तुला मस्त वाटतंय पण मला अवघडल्यासारखं झालंय.

श्वेता :

 असू दे ग वेदे.

( गाडी धावताना दिसते. संगीत सॉफ्ट ऐकू येत आहे.)

Cut to …..

…… …… ……..

Day / Karad Citi / outer

 गाडी कराडमध्ये जाताना दिसते.

Cut to ……

….. …… …..

DAY / OUTER / karad Citi Sangam ghat.

( प्रीतिसंगम घाटावर मुली जात आहेत. हसण्याचा आवाज. रेवा धावत जाते.)

श्वेता :

 अग , ये हळू , पायऱ्या निसरट आहेत.

रेवा :

 या दिवसात कुठं असतं शेवाळ.

 श्वेता :

 अग, नदीला पाणी भरपूर असत या ,  बघ पुढे जरा.

( रेवा पहाते. )

 रेवा :

 खरचं की.

( त्या पाण्यात उतरतात व पाय धुवू लागतात. व नदीस नमस्कार करतात.)

वेदिका :

 थंडगार पाणी पायावर पडलं की किती बर वाटत ना.

माधवी :

 हो ना, उन्हाळ्याच्या दिवसातच पाण्याची किंमत समजते.

थकवा निघून गेला बघ….

( थोडावेळ फिरतात. व नमस्कार करुन गाडीकडे जातात. प्राजक्ता घड्याळात पहाते.)

प्राजक्ता :

ये चला आटपा, पुढे जायचय.

श्वेता :

 हो चला ग,.. पटकन जागा पकडा, वेळ नको.

( गाडीमध्ये बसू लागतात. गाडी निघताना दिसते.)

Cut to …..

…… ……

Day / outer in bolero/ road

( ड्रायव्हर जुनी गाणी लावतो. ते ऐकून )

श्वेता :

 ओ मामा, काहीतरी नवीन लावा. ते रडव गाणं नको.

( गाणी चेंज करतात, मुली गाडीत डान्स करू लागतात. रेवा प्राजक्ताला खुणावते. प्राजक्ता नजरेने सहमती देते. ती पॉपकॉर्न खाऊ लागते.)

Cut to …….

….. …… …..

Day / outer / satara Citi

 ( साताऱ्यात गाडी येते. महाबळेश्वर रोडला आल्यावर.)

 प्राजक्ता :

 थांबवा पुढे एका बाजूला.

ड्रायव्हर :

 हा.

श्वेता :

 इथ काय  काम आहे?

प्राजक्ता :

 काहीतरी नाष्टा पाणी करूया की

श्वेता :

 नको उगाच खर्च, व वेळ पण होईल, वडापाव घेऊ फक्त.

प्राजक्ता :

 त्यापेक्षा तिकडे हॉटेल आहे की.

श्वेता :

 नाही, नको. वडेच घेऊया.

( त्या वडे घेतात. प्राजक्ता बील भागवताना )

श्वेता :

 थांब , मी देते.

 प्राजक्ता :

 गप.....

(टपरीवाल्याकडे वळून )

भाऊ, पे . टी .एम कुठे आहे?

( टपरीवाला  इशारा करतो. )

( प्राजक्ता ऑनलाईन पेमेंट करते.)

श्वेता :

 काय , हे, मी केलं असत ना.

 प्राजक्ता :

 चल, बस गाडीत.

Cut to …….

….. ….. ….

Day / outer / on road /in bolero

( महाबलेश्र्वर रोडला गाडी निघाली आहे. )

माधवी :

 थोड पुढं गेल्यावर घेतल असत ना.

प्राजक्ता :

 पुढे कुठे? इथ कराड पासून माणूस व्याकूळ झालंय.

माधवी :

 कोण?

 प्राजक्ता :

 आणखी कोण असणार, रेवा आपली.

श्वेता :

 मघापासून म्हटल, कोण चिमटे काढतय. काय ग रेवे, सांगता येत नाही.

रेवा :

 तुम्ही तर नाष्टा पाण्याचं नावच काढेनासा. काय करू, सकाळी तर थोडासाच केला होता.

 वेदिका :

 काय, थोडासा नाष्टा, चांगल्या पाच चपात्या हादडल्यास एकटीनं. तुझ्या एकटीच्या नाष्ट्यामध्ये आम्ही चौघी नाष्टा करतो . भुजंग शिरला नाही ना पोटात.

प्राजक्ता :

ए खाण्यापिण्यावरून काही बोलायचं नाही हं , खाऊ देत, आणखी आणते.

श्वेता :

 माधवे, वेदे , पोटगी जास्त भरल्यासा ना, नाहीतर निम्या रस्त्यातच संपायची.

वेदिका :

 काळजी नको, नियमापेक्षा जास्त नाही मिळणार कुणाला, देईल ते घ्या, व मिळेल ते खा.

श्वेता :

 म्हणजे रेवा कठीण आहे तुझं?

प्राजक्ता :

 मी असताना घाबरु नकोस रेवा.

श्वेता :

 नवरा तेवढा मळेवाला भेटाय पाहिजे हिला.

वेदिका :

 म्हणजे शेतातील निम्मं उत्पन्न हिच्याच पोटात.

रेवा :

 एवढी पण खादाड नाही हं… चांगल निर्जळ व्रत करु शकते. दोन दोन दिवस.

वेदिका :

 मग करच तू आजपासून दोन दिवस.

अनुजा :

 होय, या बाई व्रत करायच्या, आणि आम्हाला हिला डोक्यावर घेऊन गड उतरायला लावायच्या. त्यापेक्षा काय खायच ते खा बाई, तुला माझी फुल्ल परमिशन.

( हसण्याचा आवाज. )

Cut to …....

….. …….. ……


Saturday, August 2, 2025

फ्रेंडशिप एक् साहस भाग १६

फ्रेंडशिप एक् साहस भाग १६

 Night / inter / prajkta home/ room

(प्राजक्ता आपले साहित्य ठेवत आहे. आजी येते. दरवाजा ठोठावण्याचा आवाज, प्राजक्ता दरवाजा उघडते.)

आजी :

 काय करतेस,

प्राजक्ता :

आवरतेय,

अस काय हे आजी, पपांचा विश्वास नाही का माझ्यावर, ड्रायव्हर, सरूची मुलगी इथपर्यंत ठीक होत. पण आता हा गाईड कशाला हवाय?

आजी :

 अग, अनोळखी ठिकाणी जाताना असावा एक वाटाड्या. त्यात काय एवढं.

प्राजक्ता :

 अग, पण तो ओळखीचा ना पाळखीचा, व वाटाड्या घ्यायला मी काढलीय सर्व माहिती. एवढी अक्कल आहे मला, उगाचच एखादं कुकुल बाळ असल्यासारखं बोटान धरून चालायला मी काही लहान नाही, बावीस वय आहे माझं. आता.

आजी :

हे बघ, मुल किती मोठी झाली तरी ती आई वडिलांना लहानच वाटतात, समजल काय?

प्राजक्ता :

 एवढं पण लहान समजू नये, कुबड्या हातात घेऊन आयुष्यभर चालत राहण्याजोग.

आजी :

 अग, असू देत, इतका कसला विचार करतेस, गाड्याला काय आहे चीपडाच ओझं, बसेल एका कोपऱ्यात तो,

प्राजक्ता :

तो चीपडा आहे का उस बघूच , नाही त्या गाईडचा टाईड केला तर प्राजक्ता नाव सांगणार नाही.

आजी :

 अग, हळू बोल, उगाच ऐकू जायचं व ट्रीप रद्द व्हायची.

प्राजक्ता :

हुं…. होते कशी ट्रीप रद्द, बघतेच मी,

(बॅग भरण्याची क्रिया)

Cut to …..

……. ….. ……

Day / outer /garden

प्राजक्ता व मैत्रिणी विचार करत आहेत. एकमेकींच्या पाठीस पाठ लावून बसल्या आहेत.

श्वेता :

हे एक् नवीनच कोड घातलय.

प्राजक्ता :

 माझं तर डोकं दुखाय लागलंय.

रेवा :

 सांग की तुझ्या पपांना, गाईड वगैरे काही नको म्हणून.

प्राजक्ता :

 ए बाई, गप, तुझं डोकं शांत ठेव, अस काही म्हणाले ना, ट्रीप कॅन्सल करतील व आपलं आरोहीला दिलेलं चॅलेंज तसच राहील. व ती चीडवेल आपल्याला.

वेदिका :

 ते तर आहेच म्हणा,

रेवा :

 म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर सी सी टिव्ही कॅमेरे येणार,

अनुजा :

 हो तर, केवढी मज्जा करायचं ठरवल होत. मी तर रोज स्वप्न देखील पहात होते. कोडच घातलय हे.

प्राजक्ता :

कोड तर आहेच, पण या कोड्याला कोड्याताच घालून सोडवायला हवं. सरूची मुलगी व ड्रायव्हर काकांना कसं गुंडळायचं हे माझं काम, पण हा ट्रेकर आहे ना याच काय करू.

वेदिका :

 तुला त्याचा नाव पत्ता काही माहित आहे का?

आपण फेसबुक वा इंटरनेट वरून माहिती काढू.

प्राजक्ता :

 माहीत असत तर आधीच त्याची कुंडली काढली नसती का?

श्वेता :

 बघू त्याचं काय करायचं ते, आधी पुढ्यात तरी येऊ दे.

प्राजक्ता :

 ये बाई, जपून काय करायचं ते करा, पपांच्या ओळखीचा आहे तो.

श्वेता :

असू देत कितीपण दांडगा पहिलवान, माती चारू त्याला.

माधवी :

अग, तो काय भांडायला येत नाही आपल्याशी, तो एक ट्रेकर आहे, आपल्या मदतीला येतोय, समजल का?

अनुजा :

 ए, बाई, भोळी आहेस, तो मदतनीस नाही , वाचमेन आहे वाचमेन. या मोठ्या लोकांचं काही खरं नाही, ते दाखवतात एक अन् करतात एक.

प्राजक्ता :

 ए आने , गप, उगाच कायपण बोलते,

 श्वेता :

तू गप्प  ग.. उद्याचं उद्या बघू.

प्राजक्ता :

 हो, खरंच, उद्याचं बघू,…. निघते मी, सकाळी नऊ वाजेपर्यंत या बंगल्यावर.

वेदिका :

 बरं बाई, येतो.

( प्राजक्ता निघते.)

Cut to …..

…… …… ……..

Day / bandargah / outer

( अरब स्थानातील एक बंदर – जहाज नांगरल जातं, कंटेनर उचलून एका ट्रकवर उतरला जातो. मागील बाजूचे दार बंद केले जाते. ट्रक एका गोडाऊन मध्ये जातो. दरवाजा उघडून मुली पाहतात. कर्मचारी बॉस जवळ येतो.

कर्मचारी :

बॉस, यहा तो चार ही लडकिया है l उनमे से एक मर गई है l हमने तो पाच मंगवाई थी l

( बॉस फोन करतो, सादिक इकडे कॉल उचलतो)

सादिक :

( हसते हुवे)

देखो आगया फोन सेठ का? खुश हो गये होंगे l

सादिक :

( फोन कानाला लावत)

जी हुजूर अंगुर अच्छे है ना?

बॉस :

 अबे, भाड मे जाये तेरे अँगुर, मैने तुझे क्या कहा था l मुझे पांच लडकियां चाहिए l और तूने ये क्या भेजा l सिर्फ चार लडकिया, उनमे से एक मरी हुई l तेरे घर में कूछ खाणे को है के नही, पेठभर खिलाने को, जो लडकी मर गई l

सादिक :

सॉरी बॉस, जब हमने कंटेनर मे रखी थी l तब तो अच्छी थी, साहेब ,| ऐसे कैसे मर गई l और हमने तो पांच भेजी थी l एक कहा गई l

बॉस :

वो मुझे कुछ मालूम नही l अगर भेजी थी, तो उसे आसमान खा गया , या समिंदर निगल गया l देखं, मैने आगे से रुपये लिये है l मुझे जवाब देना पडता है l एक तो डिलिव्हरी लेट हुयी है l ओर वो भी इस तरह,

सादिक :

 माफ कर दो l बॉस, आगे से ऐसा नही होगा l

बॉस :

 आगे से कहा, अब का बोल, कान खोलकर सून लो, मुझे इक्कीस फरवरी तक, इन दो लडकियों के बदले चार लडकियां चाहिए l वर्णा तुम जाणते हो,

सादिक :

 लेकीन साहब इतनी जल्दी कैसे होगा l यहा पर पुलिस अलर्ट पर है l

बॉस :

 पुलिस को संभालना तेरा काम है l मेरा नही l समजे क्या?

( फोन ठेवला जातो. )

Cut to ......

..... ...... ......

सादिक :

 बॉस, बॉस……

(आसिफ सादिक के पास खडा है)

आसिफ :

 क्या हुवा l

सादिक :

भेजी हुइ लडकियो मे से एक गायब है l और एक मरी हूयी l कुछ खिलाना चाहिए था l तुम लोग को एक भी काम ठीक से करना नही आता l जाओ जावेद को बुलाओ l

( कामगार जातो, जावेदला बोलावून आणतो. सादिक जावेदला थप्पड मारतो.)

सादिक :

बता, उन लडकी मे से एक लडकी कहा है l

जावेद :

मै नहीं जाणता l मैने तो आपके सामने ही कंटेनर मे डाला था l और दरवाजा तो आसिफ ने लगाया था l

सादिक :

तो फिर वह लडकी किधर गई | समंदर खा गया, या उसे जहाज निगल गया l बताओ |

शहबाज :

 देखो भाई, यह बच्चे हमारे उसुल के पक्के है l लगता है, की बोट पर ही कोई खलबली हो गई l

सादिक :

 वो गई सो गई, लेकीन झमेला बडा गई l

शहबाज :

क्या हूवा l

सादिक :

बॉस ने उन दो लडकीयों के बदले चार लडकींया मागी है l अब क्या करे l वो भी इक्किस फरवरी तक….

 शहबाज :

 भाई इतने जल्दी झोल झाल करणा बडा मुश्किल है l क्यो की लडकिया गुम होणे के कारण कोकण पुलिस अलर्ट पर है l

सादिक :

कुछ भी करो l गोवा, गुजरात या घाट से लाव l लेकीन चार लडकिया चाहिए ही चाहिए l वर्णा…

शहबाज :

 वर्णा क्या?

सादिक :

 वर्णा हमारी मौत है l इस स्मगलिंग के धंदे मे आणे का रास्ता है l जाणे का नही मेरे भाई l

शहबाज :

 देखेंगे कूछ होता है क्या ?

सादिक :

 जाओ काम पर लग जाओ l अब तक जितना दिया l उसके दुगणी कींमत दुंगा l

शहबाज :

 जी, हूजूर

Cut to …......

 …….. …….

Cut to….


Thursday, July 31, 2025

फ्रेंडशिप एक् साहस भाग १५

फ्रेंडशिप एक् साहस भाग १५nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com

 DAY/ INTER / HOSTEL ROOM

श्वेता :

 चला झाली एकदाची तयारी.

वेदिका :

 हो आता मोहीम फत्ते करायची.

श्वेता :

 करायची म्हणजे काय, करायचीच. त्या आरीला दाखवून द्यायचं.

वेदिका :

 पण ती डप्पर कूठे दिसत नाही.

माधवी :

 तिचा नंबर घेऊन, मी गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात उभं राहून फोटो काढून पाठवायचा, तिला व तिच्या त्या दोन कोंबड्यांना.

अनुजा :

 पण नंबर आहे का पाठवायला. बाई गेल्या गावाला.

रेवा :

तिच्या कोंबड्याना माहीत असेल ना?

अनुजा :

त्या सहज देतील असं वाटतंय.

श्वेता :

नंबर, नंबर मिळवनं माझ्या डाव्या हातचा खेळ आहे.

रेवा :

 हो का, ते कसं?

श्वेता :

( वेदिकाकडे पाहत)

वेदे सांग, ते कसं.

वेदिका :

 ऑल इंडिया रेडिओ.

अनुजा :

 आ s s , आ s s म्हणजे नंबर मिळाला तर….

( हसण्याचा आवाज.)

Cut to ……

…… …… …

NIGHT / INTER – OUTER / IN cantenar 11 o’ CLOCK

 (बाहेरील आवाजाने मुग्धास शुद्ध येते. बाकीच्या मुली गुंगीत आहेत. समुद्री लाटांचा आवाज. कंटेनरमध्ये माल भरण्याची क्रिया. कुलूप काढण्याचा आवाज. मुग्धा बेशुध्द होण्याचे नाटक करते. काही व्यक्ती आत येतात.)

इसम 1:

चलो, जलदी उठाव ऑर पार्सल वाली कंटेनर मे डाल. दो.

( कर्मचारी त्या मुलींना उचलून दुसऱ्या कंटेनर मध्ये टाकतात. त्यामधे पॅक केलेल्या पेट्या असतात. मध्यभागी लपवून पेट्या आडव्या लावतात.)

इसम 1:

हो गया क्या?

कर्मचारी :

 जी हूजुर.

( कंटेनर ट्रकवर टाकून बंदरावर नेतात. कागदपत्र पाहणी होते. कंटेनर बोटीवर चढवला जातो. शिपचा भोंगा वाजतो. बोट निघते.)

Cut to…..

……. …… …..

DAY / outer – INTER / boat

(समुद्री लाटांचा आवाज ऐकू येत आहे. मुग्धा उठते. अस्पष्ट उजेड एका होलातून येतोय. मुग्धा मुलींना शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करते. त्या बेशुध्द असतात. एक मुलगी मृत आढळते. बाजूला बसते. डोक्यास हात लावते. हालचाल करू लागते. पेट्या बाजूला सारते, एक पेटी खाली पडते. एक् पट्टी निघते. द्राक्षे खाली पडतात. ती भुकेली आहे. खाऊ लागते. पेट्या बाजूला सारते. दरवाजा पहाते. बाहेरून लॉक असते. उघडण्याचा प्रयत्न, छिद्रातून पहाते. बाहेर अस्पष्ट उजेड. एक बल्ब दिसतो. अंतर्वस्त्रात लपवलेली पट्टी काढते. थोडेसे कापते रक्त येते. दुर्लक्ष करून दरवाजाचे कडी बोल्ट काढण्याचा प्रयत्न , पट्टी घासू लागते. कडी निखळते. दार ढकलते. थोडे उघडते. दोन कंटेनर मध्ये असल्याने थोडे उघडते. इतर मुलींना उठवण्याचा प्रयत्न. असफल , आपणं निसटले पाहिजे हा विचार अर्धवट दरवाजातून बाहेर पडते, दोन्ही कंटेनर मध्ये पाय लावून वर चढण्याचा प्रयत्न, चढते. अंदाज घेत शीपच्य बाहेरच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी जाते. उजडू लागते. सगळीकडे पाणी दिसते. दूर बेट दिसते.)

Cut to....

….. ……. …

Day / outer / koknatil gav

मुग्धाला दिसू लागते.

In past....

( वडील काठी घेऊन आत येतात.)

वडील :

 कूठे लपलीय ती.

आई :

 माहित नाही. कशाला हवं मुलींना पोहणे घरात तर सगळ जीनं जाते त्यांच.

आजी :

घाट कोकणात जन्म घ्यायचा तर पोहायला आलच पाहिजे. तुझ्या अवशीच्या घोवान शिकवल नाय तूका, म्हणून माझी नात काय अडाणी राहूदे.

( आजी डोळ्याने इशारा करते)

वडील :

थांब दाखवतोच तिला आज पोहायला जात नाही कस बघतो.

( वडील आत जातात. कणगीच्या कोपऱ्यात लपलेल्या मुग्धाला ओढत आणतात. आई मध्ये पडते.)

वडील :

तू गप्प , बाजूला हो.

( बायकोस ढकलून मुग्धाला ओढत नेतात.)

मुग्धा :

 आई, आई

Cut to …..

……. ……

DAY/ outer/ vihirit

(मुग्धा चे पाठीला रस्सी बधली जाते. ती रडत आहे. तिला पाण्यात ढकलतात. पाण्यात पडण्याचा आवाज.)

Cut to……

…….. …… …….

(DAY/ morning / ship/ OUTER

 (मुग्धा आठवणीतून बाहेर येते. पाण्यात उडी मारत पोहू लागते. बेटावर पोहोचते. काठावर आडवी झोपलेल्या अवस्थेत. डोळ्यासमोर शिप दूर जाताना दिसते.)

Cut to …..

….. ….. …..

DAY/Inter /college cantine

श्याल्मली कुपेकर. टेबलवर बसली आहे.

(Oc)

( ही  श्याल्मली एक चालत फिरत वार्तापत्र, कॉलेज मधिल खडानखडा माहिती हवी असल्यास ती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्याल्मली, upsc ला जर एखादा पेपर कॉलेज जीवनावर टाकला तर शंभर पैकी शंभर मार्क मिळवेल. कॉलेज मधील सर्व लफडी एकवेळ प्राध्यापकांना कळणार नाहीत. मात्र श्याल्मलीला सर्व ठाऊक कॉलेजच्या विषयात एकवेळ कमी गुण मिळतील पण या बयेला कॉलेज मधील मुलांची हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स सर्व काही माहीत असतं. सायन्स म्हणजे तुम्हाला प्रयोगशाळा वाटली का ? छे  इथं सायन्स म्हणजे प्रेमप्रकरणे.)

( श्वेता व वेदिका श्याल्मली जवळ येऊन बसुन तिला त्यांनी आणलेल्या डब्यातील बिर्याणी वाढत आहेत. ती दोन्ही हातानी ताव मारत. आहे.)

वेदिका :

 श्याल्मली ताई आणखी काय हवे का?

श्याल्मली :

ज्यादा काही नको, ज्यूस तेवढा मागवा. लिंबू सोडा, कसं आहे, की नाही, मला ना ॲसिडिटीचा त्रास आहे ना. एवढं सगळ खायचं म्हणजे पचवायला तरी हवच ना.

वेदिका :

 हो तर, किती मोठ्ठ काम आहे ना,

श्वेता :

 वेडे गप्प जरा, मी बोलू का?

 वेदिका :

 बोल की.

श्वेता :

 मी सांगितलेल्या कामाचं काय झालं. 

श्याल्मली :

 ते होय, झालं की, हे घ्या नंबर त्या तिघींचे.

( चिठ्ठी काढून देत.)

श्वेता :

 व्हॉट्स ॲप  आहेत ना.

श्याल्मली :

( जेवत )

एकशे एक टक्के

श्वेता :

झालं काम एखदास बरं, येऊ का आम्ही, तू खा आरामात.

( श्वेता वेदिकेला इशारा करते.)

श्याल्मली :

बिल तेवढं भरा नाहीतर जाल तशाच.

वेदिका :

त्याची काळजी नको, भरलय बिल, हे घे, पावती , जर तुझा विश्वास बसत नसेल तर .

( त्या जात असतात. श्याल्मली मागे ओरडुन.)

श्याल्मली :

अग, आणखी एक सांगायचं राहिलं.

श्वेता :

आणखी काय?

श्याल्मली :

आरोही बोहल्यावर चढतेय, पुढच्या महिन्यात एकवीस तारखेला.

वेदिका :

 खरचं, चढ म्हणावं, बोहल्यावर, अन् कर घराचं गोकुळं, व नवऱ्याला दे सांभाळायला पोर.

( त्या एकमेकींना टाळ्या देतात. अन् निघून जातात.)

……. …..

Day /Inter/ Hostel ROOM

( पंधरा तारीख मुली प्रवासाचे नियोजन करत आहेत.)

श्वेता :

गाडी ओके आहे ना.

प्राजक्ता :

 हो आहे ग.

श्वेता :

 कोणती गाडी,

 प्राजक्ता :

 जेवायला घेऊन गेलो होतो ना, ती गाडी.

श्वेता :

 ती गाडी होय.

प्राजक्ता :

 हो पण…..

माधवी :

 पण काय आणखीन.

प्राजक्ता :

आपल्यासोबत आणखीन तिघे आहेत.

श्वेता :

 आणखी कोण ?

प्राजक्ता :

ड्रायव्हर काका, कामवाल्या सरुची मुलगी, अन…

माधवी :

कोण ?

प्राजक्ता :

 एक् ट्रेकर, पपांच्या मित्राचा मुलगा.

श्वेता :

 तुझी ओळख आहे ना.

प्राजक्ता :

ड्रायव्हर व सरूची मुलगी. ती काय आपलीच माणसं, पण हा ट्रेकर कोण कसा आहे, काळा की गोरा माहीत नाही, त्याची हिस्ट्री काढायला हवी

 बर, वेळ होतोय निघते मी, बाय

सर्वजनी :

 बाय…..

( ती जाते.)

वेदिका :

हा आणखी कोण ट्रेकर, कशाला हवा होता.

माधवी:

 तर काय, मुलींमध्ये लुडबुड.

श्वेता :

अग तिच्या पप्पांनी निवडलाय म्हंटल्यावर चांगला असणार, बर बघू, अन् असला खोडकर, तर आपणं काय कमी आहोत काय, दाखवू आपला हिसका, डोळ पांढर करील त्यो.

वेदिका :

ते तर झालंच.

रेवा :

चला पसारा आटपा नाहीतर शिरसाठ बाई हॉस्टेल डोक्यावर घ्यायची.

श्वेता :

 चला आवरा, पटकन.

Cut to ……

…….. …….

DAY / inter/ evening / prajkta home

हॉल मध्ये टीव्ही चालू आहे. आजी, व आई टीव्ही पाहतेय. वडील येतात. बॅग सावित्रीबाई कडे देत.

सयाजीराव :

 अरे वा...., मालिका पाहताय, कन्या कुठे दिसत नाही.

सावित्रीबाई :

 गड सर करण्यासाठी नियोजन करताहेत. दोन दिवसांनी प्रस्थान करतील आपलं भगिनी मंडळ घेऊन.

सयाजीराव :

 एकदाची तयारी झाली म्हणायची. किती तारखेला जाणार.

सावित्रीबाई :

 सोळा तारखेस. पण

सयाजीराव :

 पण काय आणखीन.

सावित्रीबाई :

 मला तर काळजी वाटतेय. आपली नाजूक बावली कशी जाते याची. पाय दुखतील ना तिचे.

सयाजीराव :

काळजी कारण सोडा, आपणं काय आयुष्यभर तिच्या सोबत असणार नाहीये, अन् हा जो निर्णय घेतलेला आहे ना, तो तिचा स्वतःचा आहे. आपण लादलेला नाही.

सावित्रीबाई :

 मी जाऊ का सोबत.

आजी :

 तू जा म्हणजे झालं, त्यांचं एका दिवसाचं काम दोन दिवसावर नेशील.

सावित्रीबाई :

 एवढी काय म्हातारी नाही मी.

आजी :

 तुझी काळजी ओळखते मी, पण तिला स्वातंत्र्य नको का? उगाच तिच्या नियोजनावर पाणी पडायचं. व ड्रायव्हर व सरुची मुलगी आहे ना सोबत.

सावित्रीबाई :

 काकांना जमेल का या वयात. त्यापेक्षा प्रमोदला पाठवलं तर.

सयाजीराव :

त्याला पाठवा, म्हणजे त्या दोघांचं भांडणं सोडवायला आणखी दहाजण पाहिजेत. मी माझ्या मित्राच्या मुलाला बोलावलंय. त्याला ट्रेकिंगचा अनुभव आहे म्हणे.

सावित्री :

 त्याला, ही बया मानेल का?

सयाजीराव :

 त्यात काय, सर्व तिच ऐकायचं का?

( गाडी आल्याचा आवाज ,)

सावित्रीबाई :

 मॅडम आल्या वाटत.

(प्राजक्ता आत येते.)

सयाजीराव :

 प्राजक्ता , इकडे ये?

प्राजक्ता :

 काय पपा,

सयाजीराव :

कधी जाणार आहेस?

प्राजक्ता :

 सोळा तारखेला.

सयाजीराव :

 कोण कोण आहात?

प्राजक्ता :

( डायनिंग टेबलवरील फळ उडवत)

कोण कोण म्हणजे, आम्ही मैत्रिणी

सयाजीराव :

 त्यांच्या घरी माहीत आहे का?

प्राजक्ता :

 कल्पना नाही मला, तरी पण त्यांनी सांगितले असेल की,

सयाजीराव :

 म्हणजे नसणार, बर एक सांगू.

प्राजक्ता :

हा.

सयाजीराव :

ड्रायव्हर, व सरलाची मुलगी सुमा व सोबत एक ट्रेकर येईल.

गाडी उद्या क्लिनिंग करून चेक् करून मिळेल

प्राजक्ता :

 बाबा ,मला येते की चालवता, उगाचच आणखी एक गाईड कशाला? उगाच अडचण नुसती.

सयाजीराव :

 ते काही नाही, ह… आणखी एक सांगायचं म्हणजे जाऊन येईपर्यंत गाडी अजिबात हातात घ्यायची नाही, अन्यथा तुझी ही ट्रीप क्यांसल.

प्राजक्ता :

( नाराजीने)

 अस काय हे?

सयाजीराव :

तसच, जसं तुझं आम्ही ऐकतो, तसच तू ही आमचं ऐकायचं.

प्राजक्ता :

( नाराजीने)

बर

( प्राजक्ता रुमकडे जाते. ती गेल्यावर)

सावित्रीबाई :

देव पावला एकदाचा,

सयाजीराव :

 झालं ना, तुमच्या मनासारखं.

सावित्रीबाई :

 झालं, काळजी मिटली थोडीशी.

आजी :

 चला थोड टेंशन कमी झालं,

( वर उठत)

सयाजीराव :

तू आणि कुठे निघालीस?

आजी :

 जाऊन येते. जरा नातीला मदत करते. प्रवासाला चाललेय ना.

सयाजीराव :

मदतच कर, नाहीतर तू ही जाशील गड सर करायला.

आजी :

 मला काय कच्ची समजू नकोस, अजूनही बळ आहे पायात माझ्या.

सयाजीराव :

बर बाई, जा.

आजी :

 हा….

Cut to ……

……. ………. ……



Saturday, July 26, 2025

फ्रेंडशिप एक् साहस भाग १४

 फ्रेंडशिप एक् साहस भाग १४

Night / INTER / 8 .00p.m./ IN HOSTEL/ ROOM

(वेदिका लॅपटॉप घेऊन सर्च करत आहे. व नोंदी घेत आहे.)

रेवा :

काय वेदे काय करतेस.

वेदिका :

रिसर्च

रेवा :

 कसला रिसर्च.

वेदिका :

 रानभाज्यांची माहिती शोधतेय.

रेवा :

 त्या  कशाला हव्यात?

वेदिका :

 ट्रेकवर गेल्यावर माहिती घ्यायला.

व शिजवून खायला.

माधवी :

( अंथरुणावर उठत)

काय रानभाज्या खायच्या.

वेदिका :

 हो, त्यात काय एवढं?

माधवी :

 एवढं चालल्यावर त्या चिमुटभर भाज्यांची पोट तरी भरेल का? त्यापेक्षा जरा काहीतरी चटपटीत, झणझणीत हवं. चिकन मटन वगैरे.

वेदिका :

 मॅडम आपणं गड फिरायला निघालोय. पिकनिकला नाही.

व तुझं चिकण मटण टिकेल का दोन दिवस.

माधवी :

 हे बघ मिठात शिजवल की राहील ना.

वेदिका :

मॅडम आपला खर्च यावर्षी इतका झालाय की घरच्यांना तुम्हाला पॉकेट मनी देखील देणं अवघड झालंय. अन् प्रवासाचा खर्च म्हणत असशील ना, तो प्राजक्ता करतेय. एखाद्याला लुटायचं म्हणजे किती? म्हणून मी व श्वेता ने ठरवलं आहे कि जेवणाच आपणं बघायचं.

रेवा :

 बरोबर आहे तुमचं, माझ्याकडे पण पाचं हजार फक्त आहेत. ते ही मला फॉर्म फी साठी हवेत.

वेदिका :

 हे बघ रेवा, फारतर पाचशे रुपये काढा. बाकीची जोडणी आम्ही लावतो.

अनुजा :

 तुम्ही जोडणी लावताय, खर, कशी लावणार.

वेदिका :

हे बघ इथून तांदूळ, चटणी, मीठ अन् थोडे कांदे,बटाटे, डाळ अन् बेसनाच पीठ घेऊ. तुझं मटण चिकन जमणार नाही. व जास्त वाटल तर फार तर पॅक बंद डब्यातून थोडे झिंगे, बांगडे घेऊ. तिथं जवळपास मिळाली तर अंडी …ते ही मिळाली तर घेऊ काय, जास्त अपेक्षा ठेवू नकोस. कळतंय ना.

माधवी :

मग तर मला पाळणा करूनच आता, इतकं रोज व्यायाम करते, किती ऊर्जा खर्च होते माझी, जरा पोटाला तरी घाला.

वेदिका :

ये तिथं जेवढं देऊ तेवढंच घ्यायचं काय?

रेवा :

 वेदे आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा उन्हाळा आहे. पावसाळा नाही, उगाच काय पण सांगू नकोस ह… गवत मिळेल तुला ते ही सुकलेले.

आम्ही काय म्हसी नाही आहोत. वैरण खायला. तुझी रानभाजी म्हणतेस ना बस उडकत रानात.

फेब्रुवारीत ...कोणती सापडते ती.

वेदिका :

 बर झालं आठवण केलीस ते, आता तुला गवताचेच पदार्थ घालणार. गवताची भाजी, गवताची आमटी..

रेवा :

 तुला गायर वाटलो का आम्ही,

 वेदिका :

 गायर कच्ची खातात. आपण तिखट मिठ लाऊन खाऊ.

रेवा :

 काय तुझ्या सुपीक डोक्यात नको नको त्या कल्पना येतात नाही.

एवढ्यावरच थांब, नाहीतर नऊवारी साडी नेसून अंबाडा बांधून तलवार कमरेला लावून गड चढायला लावाल.

वेदिका :

 आयड्या मस्त आहे.

रेवा :

 मला माहित आहे गम्मत करतेस तू.

प्राजक्ता तुझं हे नखरे चालूच देणार नाही.

वेदिका :

( अनुजाला डोळा मारत.)

खरचं साडी नेसून जाऊया काय?

रेवा :

अग बायाओ आवरा हिला. हीचं डोकं लई चाललय,

(त्या गुदगुल्या करू लागतात, हसू लागतात.)

Cut to …….

…… …

DAY / OUTER -INTER /HOSTEL

एक फोर व्हिलर हॉस्टेलच्या दारात येऊन थांबते. त्यातून तिघे उतरतात. कार्यालयात कमला शिरसाठ बसल्या आहेत.

 रवी :

 नमस्कार मॅडम.

मॅडम :

 नमस्कार आपली ओळख.

अरोहीचा मामा :

 काय मॅडम, ओळखल नाहीत काय, मी अरोहीचा मामा. न्यायला आलोय तिला.

मॅडम कमला शिरसाट :

( डोळ्यावर चष्मा नीट करत.)

मला जरा कमी दिसतंय हो. हा आलं लक्षात.

थांबा ह बोलावते.

( रिंग वाजते, शिपाई आत येतो.)

हे बघ त्या आरोही गोडांबेला बोलावं, सांग तिचा मामा आलाय म्हणून.

शिपाई :

 हा मॅडम.

Cut to…..

…… …….

(शिपाई व्हरांड्यातून जातो. रुमजवळ नोक करतो.)

शिपाई :

 आरोही गोडांबे तुझा मामा आलाय बघ, आवरायला सांगितलेय.

( आरोही घाबरून तन्वी मानसी या मैत्रिणी जवळ जात.)

आरोही :

 काय ग, आता काय करू, शेवटी नको तेच होतंय.मामा मला त्या मेव्हणीच्या पोराच्या गळ्यात माळ घालाय लावणार, आता माझं काही खरं नाही ग.. तन्वी.

मानसी :

 येवढं कशाला घाबरतेस, सांग जा स्पष्ट नाही म्हणून, मामाच आहे ना तुझा.

आरोही :

 कसं सांगू, एकतच नाही तो, घरी बघतेस ना कसं आहे ते. बाबा प्यारेलीस झालेले, आई तीही साधी. भाऊ तो पण लहान, सगळ मामावर अवलंबून, त्याच्यापुढे कुणाचच काही चालतं नाही ग.

तन्वी :

 राजेशला सांग मग,

आरोही :

 तो घाबरलाय, मागे मामाने त्याला चांगलाच दम भरलाय.

तो तरी काय करेल.

मानसी :

 कसलं डोंबलाच प्रेम करतोय. साधं धाडस नाही.

आरोही :

 तो एकटा काय करेल. माग त्यानं फक्त लग्नाचं विचारलं. तर मामानं व त्याच्या मित्रांनी हाड मोडली त्याची, साधं कोण वाचवायला आलं नाही.

मानसी :

 मग कर जा लग्न त्या आडदांड बिनडोकशी, दम नसेल तर प्रेम कशाला करायचं.

Cut to….

In Office

( अरोहीला यायला वेळ होतो, मामा रुमकडे जात आहे वाटेत इतर मुली कुजबुज करतं आहेत.)

एक् :

 कोण असेल ग?

दुसरी :

 आणखी कोण? त्या आरोहीचा मामा

एक :

 अग, दिसतोय कसा बघ, ती किती सालस, खरंच मामा का.

दुसरी :

 हो मामाच आहे, कसा दिसतोय बघ, लेडीज हॉस्टेल आहे, याचं भानच नाही, कसा घुसतोय बघ.

एक् :

 नाहीतर काय.

Cut to …….

…… …….

Inter/ Hostel / ROOM

(दरवाजा बाहेर उभा राहून )

आरोही मामा :

काय, निरोप मिळाला नाही का?

आरोही :

 ( घाबरलेली आहे , बॅग भरतेय. डोळ्यात पाणी आहे)

मिळाला , बॅग भरतेय.

मामा :

बोहल्यावर चढायला निघालेस, पुढील महिन्यात म्होतुर धरलाय. अन् रडतीस काय, पूस डोळे, अन् आवर झटकन, बास झालं शिक्षण.

आरोही :

 जी.

( मामाच्या मागे रवी उभा असतो. त्यास पाहून)

मामा :

 एवढी कसली घाई लागलेय रवी साहेब, थोडी कळं काढा. लग्ना आधी असं बायकोला भेटन बर नव्हे, बाईल वेडा म्हणतात.

रवी : ( लाजून हसत)

काय हे काका.

मामा :

 काय.. काय… पुढं आपलंच राज आहे.

( आरोही बॅग भरते, मैत्रिणीकडे पहात.)

आरोही :

 येते मी.

( रवी आत जातो, बॅग उचलून बाहेर पडतो. )

मामा :

 भलतीच घाई लागलेय , जरा आवरा स्वतः ला, चल आरोही, कसं हसत जायचं, कसं हसत….

 मामा : 

( तिरकस आरोहीच्या मैत्रिणीकडे पहात.)

मैत्रीणीना निरोप दिलास ना? नसेल तर मी देतो.

नमस्कार, पोरीनो, या आमच्या उंबरणीला पुढील महिन्यात एकवीस तारखेचा म्होतूर हाय, करवल्या पण हव्यात लग्नात, बरं या ह… राम राम 

( बाहेर निघतात. आरोही मागे जाताना सारखं मागे पहात आहे. मॅडमच्या केबिनजवळ आल्यावर.)

मामा :

नमस्कार मॅडम येतो, या हं पुढील महिन्यात उंबरनीला लग्नाला, आमंत्रण आताच देतो

मॅडम :

 हा

( हॉस्टेल बाहेर गाडीत बसतात, गाडी निघते.)

Cut to …..

……. ……. …..


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...