शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

Thursday, December 28, 2023

कळत नकळत जुळले हे बंध भाग २१

 

कळतं नकळत जुळले हे बंध भाग २१

दोन दिवसांनी inter outer अण्विका व संयोगिताच्या घरी.

अण्विका आवरत असते. आज वेदांगीचा साखरपुडा असतो. तो छोट्याशा स्वरूपात घ्यायचं ठरलेलं असत.

वेदांगी, फोन करते.

वेदांगी, काय ग कुठे आहेस. इकडे ये की लवकर. एवढा कार्यक्रम नीट पार पडू दे.

आण्विका, होईल नीट तू कशाला काळजी करतेस.

वेदांगी, ती संयोगिता पण कधी येते कुणास ठावूक. मगापासून फोन करतेय. उचलतच नाही.

आण्विका, मॅडम घेऊन येते मी.

वेदांगी, ये की लवकर.

आण्विका, अग, फोन ठवलास तर येईन ना . ठेव आधी.

ती फोन ठेवते.

वेदांगीच्या घरी लग्नाची गडबड चाललेली असते.

आण्विका छान साडी नेसते. व आपली स्कूटी घेऊन संयोगिताकडे निघते.

जाताना फोन करते. संयोगिताचा लहान मुलगा फोन उचलतो.

संयोगिताचा मुलगा,

हॅलो कोण बोलतंय.

आण्विका, कोण म्हणजे अनु मावशी.

जरा मम्मी कडे दे.

मुलगा, ती साडी नेसतेय.

मुलगा फोन देत, अनु मावशीचा आहे.

संयोगिता, (फोन कानाला लावत) काय ग.निघलीस

आण्विका, आवर लवकर. मी निघालेय.

संयोगिता, आवरते, ये लवकर.

अण्विका फोन ठेवते. व निघते.

 थोड्या वेळात ती संयोगिताच्या घरी पोहोचते.

 संयोगिता आपली स्कूटी काढते. आपल्या स्कुटीवर मुलग्याला व अण्विकाच्या स्कुटीवर मुलीला बसवून निघतात.

पुढे एका चौकात गेल्यावर संयोगिता अण्विकाला हाक मारत

संयोगिता , अनु जरा थांब.

आण्विका, (थांबून) का ग इथे काय काम आहे.

संयोगिता गाडी जवळ आणत, चल तिकडे कोर्नरला मागून.

त्या गाडी एका झाडाजवळ येतात. तिथे गाडी लावत.

संयोगिता, चल थोड नाष्टा पाणी करू.

आण्विका, अग तिकडे होईल की. सकाळपासून वेदिन पिडलय फोन करून करून.

संयोगिता, चल गप, लगीन घरात कधी लवकर काय भेटतय.

 वेळ लागतो जेवणावळीला.

त्या दोघी जवळील हॉटेल मध्ये जातात.

आण्विका, ( मागून जाताना) तुझं आपल कायतरी असतय. वेळ होईल ना.

संयोगिता, चल गप्प.

त्या होटेलात जातात. संयोगिता चार मिसळ पावची ऑर्डर देते.

संयोगिता, शुक शुक, ओ काका, चार मिसळ द्या.

काका, हा.

मिसळ थोड्या वेळात एक जण आणून ठेवतो.

संयोगिता, हा करा सुरू.

मिसळ खाताना,

संयोगिता, पिंटू, बबली यातलं एक अवाक्षर देखील घरी सांगायचं नाही.

ती दोघे, कळलं.

संयोगिता, कळलं ना नाहीतर रवी दादाच्या लग्नासारखे कराल.

बबली, नाही ग सांगत माहित आहे आम्हाला.

आण्विका, बबली काय झालं ग रवी मामाच्या लग्नाच्या दिवशी.

बबली, काय नाही ग, आम्हाला आईस्क्रीम हवं होत. व आईने दिलं. व हा चोमडा पिंट्या घरी सांगत गेला आजीला. आजी दोन दिवस उठता बसता टोमणे मारत होती आईला. काय तर म्हणे सूनच राज आलय. पुढे माझ्या पोराला बघतील की नाही, आम्ही कुत्र्यासारखे घर राखतो. ही बाहेर जाऊन चैनी करतात.

आण्विका मग काय झालं,

बबली, मग आईन मोठा आईस्क्रीमचा पॅक आणून दिला आजोबा अन् आजीला.

आण्विका, मग तर झाली ना शांत.

पिंटू बोलू लागला, शांत , कुठली शांत

पाच – सहा जणांच आईस्क्रीम दोघांनी हादडल व बसला घसा, बोलायचं येईना.

आण्विका, मग काय झालं.

पिंट्या, मग पुन्हा बाबांच्या शिव्या मामीला खाव्या लागल्या. तुला कळत की नाही. म्हातारपणी असल खायला देतात का? सरसर प्यायचं वय आहे त्यांचं. बिनडोक असल्यासारखं आइस्क्रीम काय देतेस खायला त्यांना.

आई म्हणाली की त्यांना हवं होत.

तेव्हा बाबा म्हणाले, ते काय पण मागतील, तुझी अक्कल काय गवत खायला गेलती काय.

आण्विका, मग तुम्ही काय ठरवलंय.

बबली, आम्ही ठरवलंय, मम्मीन दिलेलं खायचं, पण कुठेही काय खाल्ल म्हणून ओकायच नाही. व जर पोटात गुपित थांबेना झालं की शाळेला जाताना आम्हाला वाटेत एक भलं मोठ्ठं वडाच झाड लागत. त्याला जाऊन सांगायचं. ते काही कुणाला सांगणारच नाही. कारण ते बोलतच नाही ना.

आण्विका, वा शाब्बास, बरेच हुशार झालाय आईच्या तालमीत.

पिंटू, मग व्हायलाच पाहिजे, बाबांच्या मंडळाच्या तालमीत शरीर तंदुरुस्त होते. व ममीच्या तालमीत मेंदू तल्लख करायचा.

संयोगिता, बर चला आता अटपल असेल तर नाहीतर वेदी मावशी फोन सारखे करून कानाच्या पडद्यांना भगदाड पाडायची.

ते सगळे निघतात.

…… …… ……

Day outer inter वेदांगीच्या घरी

आण्विका व संयोगिता आपापल्या स्कूटी वरून वेदांगीच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचतात. तिथे आल्यावर.

 स्कुटी त्यानी पार्क केली.

आण्विकेस पाहून कालची मुले.

आकाश, अरे, ती आलेय. मस्त ड्रेस घातलाय.

राजेश, चल बघुया.

ती एका गॅलरीत येतात. वर पायऱ्या चढून येणाऱ्या आण्विका व संयोगिताकडे पाहत.

सुजित, काय मस्त दिसते राव.

संग्राम, मस्त आहे पण आपल्याला नाय भेटणार.

राजेश, तर काय.

आकाश, अरे, डॉक्टर आहे ना ती.

सुजित, हो यार, आपण बारावी पास. मव्हर पकडणार. अन् ही कोल्हापुरी मिरची. कसं जुळणार.

राजेश, वेदांगी अक्कान काय सांगितलय माहित आहे ना.

संग्राम, ती सांगते म्हणून काय झालं. प्रयत्न तरी करूया. कुणाला कटली तर काटली.

आकाश, तर काय, माव्हर पकडतो म्हणून काय झालं. आपण आपल्या एरियात दादा आहोत.

राजेश, चला मग प्रयत्न तरी करू.

सगळे, चला चला…

आण्विका व संयोगिता वर वेदांगीच्या घरात येतात.

तिचे बाबा शांत विचार करत असतात. कारण बरेच प्रयत्न करून देखील साखरपुड्याच्या कामाचे नियोजन लागत नसते. आचारी ऐनवेळी लेट झालेला असतो.

ते फोन करतात.

तेव्हा त्याची गाडी पंक्चर झालेली असते. हे कळतं.

आण्विका, (त्यांजवळ जात) काय काका शांत का?

काका, काय सांगू बाळ अजून कामाचे काही नियोजन लागेना झालेय. तीन तासांनी साखरपुडा आहे.

त्यांचे सगळे ऐकूण घेऊन

आण्विका, थांबा मी लावते.

आण्विका, संयो तू आतमध्ये जा. व वेदूला तयार कर जा. मी पाहते इकडे.

संयोगिता वेदुच्या रूममधे आपल्या मुलांना घेऊन जाते.

आण्विका, पाहुण्याच्या असणाऱ्या सर्व तरुण मुला मुलींना बोलावते. त्यांना वेगवेगळी कामे निवडून देते. कुणी रांगोळी काढायची, कुणी सतरंजी अंथरायची. यासाठी वरील टेरेसवर छोटं मंडप घालायला. गणपती मंडळातील मुलांना सांगते. काही मुलींना रांगोळी घालायला लावते.

तर वेदूच्या आई व आजीला साहित्याची जबाबदारी देते. शेजारील काकूंना वेगवेगळ्या जेवणातील घटक वाटून देवून त्याच्या मदतीला पाहुण्यातील इतर स्त्रियांना लावून देते.

वेदीच्या भावाला व पाहुण्यातील मुलांना राहिलेलं साहित्य आणायला लावून देते. थोड्याच वेळात जय्यत तयारी होते.

नवरदेव येतो. व साखरपुड्याचा विधी चालू होतो. त्यावेळी आण्विका वेदूचं आवरायला जाते.

संयोगिता तिथे तीच आवरत असते.

आण्विका, काय ग आवरलं की नाही.

संयोगिता, अग चाललय.

 आण्विका, आवर लवकर, तिकडे भट बोलावतोय.

संयोगिता, झालंच.

आण्विका, चला एक काम झालं.

संयोगिता कुठल ग.

आण्विका, कुठल म्हणजे बाईसाहेबांच्या लग्नाचं.

संयोगिता, आता तुझं बघायच राहिलय.

आण्विका, हे बघ आधी या बाईचं आवरुया मग बघू माझं काय करायचं ते.

वेदांगी, मला घालवायलाच बसलाय जणू. इतक्या लवकर कंटाळल्यासा,

आण्विका, आम्ही कुठे कंटाळलोय. तूच कंटाळलीस म्हणून हा खटाटोप चाललाय.

वेदांगी, ये गप कायपण बोलतेस. मला रडू येतय.

आण्विका, तू अन् रडणार, गप मगरीच रडू ते, बसत असशील रात्रभर नवऱ्याशी गप्पा मारत फोनवर.

वेदांगी, मग मारायला नकोत.

तू मारत असशील की

आण्विका, माझं अजून ठरलं नाही.

संयोगिता, काय ग कुणाशी प्रेमबिम आहे का?

आण्विका मोठे डोळे करून, जाऊ का मी घरी, काय वेदू,

वेदू, नको मी गप्प बसते.

संयोगिता, काय ग काय लपवत आहात.

वेदू, काही नाही ग.

इतक्यात बाहेरून मुलगी येते.

 ताई भटजी काका बोलवत आहेत.

संयोगिता, हा झालं आलोच.

अग, चला लवकर.

त्या दोघी वेदांगीला साखरपुडा चालू असलेल्या ठिकाणी नेवून सोडतात.

व त्या दोघी मंडपात एके जागी बाजूला थांबतात.

इतक्यात

संग्राम तिथे येतो, अण्विकेस,

हॅलो मिस,

आण्विका, काय.

संग्राम, काय नाही आपला फोन नंबर मिळेल का?

आण्विका, का कशाला,

संग्राम, (घाबरून) काही नाही. म्हटल डेकोरेशनच काम मस्त केलं तुम्ही एखादी ऑर्डर आली तर द्यायला बर.

आण्विका, मी डेकोरेशनच काम करत नाही. डॉक्टर आहे. चिरफाड करते. येतोस.

तो घाबरून जातो


संयोगिता, अग अस काय करतेस. तो सरळ सरळ विचारत होता.

आण्विका, ये बाई गप्प उगाच बाजू घेऊ नको. जेवढा वर आहे ना तो कोकणी, तेवढाच खाली आहे. काल तुला माहित नाही. एकावर एक चिठ्ठी देत होता. आपला फोन नंबर लिहून.

अन् खोटं वाटतंय तर तिकडे बघ लाईन कशी उभा आहे. गॉगल घालून.

संयोगिता, तिकडे पाहते. तिला शायनिंग मारताना चार पाच मुले दिसतात.

अग, खरंच की. ती हसू लागते.

व बघ एखादा पसंत पडतो का, कंपाऊंडर म्हणून ठेवून टाकू

आण्विका, तुझ्याच दुकानात ठेव जा.

संयोगिता, तो बघ दातक्या माव्हरा कसा दिसतोय.

आण्विका, मी जाऊ का इथून.

ती अण्विकेचा हात धरते.

आण्विका, इथे साहेब फोन उचलत माझा त्यामुळे टेन्शन आलंय अन् ही दाखवतीय मला फुलकोबी.

संयोगिता, काय म्हणालीस.

आण्विका, काही नाही, नशीब माझं म्हणाले.

संयोगिता, अग बस ग, बर सांग लग्नाचं काय ठरवलं आहेस.

आण्विका, काही नाही अजून.

संयोगिता, माझ्यापासून काही लपवू नकोस.

आण्विका, काही नाही ह. इंटरशिप झाल्यावर बघायचं आहे.

संयोगिता, कोण आहे का मनात.

आण्विका, आहे पण आणि नाही पण.

संयोगिता,आहे पण आणि नाही पण याचा अर्थ काय? सांग कोण असेल तर.

आण्विका, कळेल तुला, तुला चोरुन करणार नाही.

संयोगिता, हे बघ कोड्यात बोलू नको, मला कळेलच. सांग.

आण्विका, मॅडम आपण बोलू यावर पुन्हा कधीतरी. इथे साखरपुडा आटपूया.

 थोड्या वेळात साखर घातली जाते.

आण्विका कामाचा लेखाजोखा देवून जायच्या तयारीत असते.

वेदांगी, आज राहा की इकडे. (सारखी विनवणी असते.)

आण्विका, राहायचं येवढं बोलू नकोस बाई, लग्नाला वाटल्यास लवकर येते.

व बाय येते मी असे म्हणून ती निघते.

तिच्याबरोबर संयोगिता पण निघते.

वाटेत गाडीवर

संयोगिता आपली स्कूटी अण्विकाच्या स्कुटीजवळ आणत,

संयोगिता, का ग थांबायची होतीस.

आण्विका, ये बाई, तिथं कामापेक्षा नको तो त्रास होता. कुठ वॉशरूमला देखील जायची पंचायत होती. नुसती भुतावळ मग.

संयोगिता, मग करायचा त्यातला एक पसंत.

आण्विका, कशाला?

संयोगिता, कशाला म्हणजे लग्नाला, नेला असता की कोकणात एखाद्यानं म्हावर खायला.

आण्विका, इकडे मिळतात मासे. त्यासाठी कोकणात कशाला जायला हवे.

 संयोगिता, मग कोल्हापूर सोडत नाहीस म्हण.

आण्विका, ते बघू चल.

ती संयोगिताच्या दारात जाते. तिच्या मुलीला उतरते. इतक्यात मागून संयोगिता येते.

आण्विका, हा झालं, चल बाय मी निघते.

संयोगिता, अग, चहा तरी घेऊन जा.

आण्विका, बस पित तूच .

व ती सुसाट जाते.

संयोगिता, मॅडम काहीतर लपवत आहेत. ही अन् कुणाच्या जाळ्यात गावली. की हिने कुणाला ओढल बघायलाच पाहिजे.

Cut to …..

……. ……. ……. ……

,nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


Sunday, December 24, 2023

कळतं नकळत जुळले हे बंध भाग २०

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग २०

Day evening. वेदांगीच्या घरी. Inter

मुलांचा दंगा ऐकून वेदांगीने त्यांना गॅलरीतून पाहिले.

वेदांगी, काय रे आकाश काय चाललय.

चला वरती या काम आहे.

आकाश, ( मित्रांना) अरे दीदी न ऐकले वाटत. आता काय खर नाही.

सुयोग, तिला काय कळलं नाही. चल बघू दुसरच काम काहीतरी असेल.

बाकीचे, चल चल.

ती सगळी वरती येतात.

  वेदांगी, काय रे खाली काय चालल होत तुमचं.

आकाश, काय नाही ते.

वेदांगी, (फिरकी घेत) काय रे ती गेलेली मुलगी कशी आहे.

सुयोग, मस्तच.

बाकीचे डोळे मोठे करतात.

सुयोग, मस्त म्हणजे छान आहे.

वेदांगी, आवडली का?

सुयोग, हो तर.

वेदांगी, आवडली इथपर्यंत ठीक आहे. विचारलं नाहीस ना.

सुयोग, मी नाही पण.

वेदांगी, पण यान नंबर चित्तीवर लिहून पाठवला. (संग्रामकडे बोट दाखवत)

संग्राम घाबरून.

वेदांगी, काय रे काय चाललय.

संग्राम, काय नाही. फक्त नंबर पाठवला होता.

वेदांगी, ती कोण आहे ते माहीत आहे का?

सुजित, कोण आहे, क्याट्रर तर आहे. आली होती लग्नाचं नियोजन करायला.

वेदांगी, (त्याचा कान धरत) बाळा, ती क्याट्रर नाही. माझी मैत्रिण आहे. अन् ती एक सर्जन आहे.

राजेश, सर्जन म्हणजे.

वेदांग, सर्जन म्हणजे पोट फाडून आतील दुरुस्ती करेल तुझ्या.

आकाश, बापरे, नको रे बाबा.

संग्राम, ती डॉक्टर आहे.

वेदांगी, हो, अन् तिचा भाऊ कराटे चॅम्पियन आहे. ब्लॅक बेल्ट स्पेशल. त्याला कळलं तर तुमचं काही खर नाही बघ.

ती घाबरतात. त्यांना तिचा भाऊ त्यांची हाडे मोडत्याला दिसतो. तर ती त्यांना ऑपरेशन कक्षात झोपवून पोट फाडण्याचे लेजर घेतलेली दिसू लागते.

ती सर्व, बापरे.

इतक्यात वेदांगीच्या आजी, लेकाच्यास बारावी नाही सुटलं. अन् म्हावर पकडते. व डाक्टरची इच्छा करतय बायको म्हणून. जा माकडा ते टिपण घेऊन श्रीकांतसंगे .

कमवायची अक्कल नाही. अन् लग्नाची अपेक्षा करतय.

त्यातून आकाश धाडस करत.

आकाश, काही म्हण दीदी मला ती जाम आवडली. भले तिचा भाऊ मला मारो व हाडे मोडो. पण मी तिका प्रपोज करणार.

इतक्यात पलीकडील खोलीतून अकाशची आई, ए थोबडवेन तुका, जर पावण्याच्या गावात काही कल्ला केलास तर. दोन दिस राव अन् खा पी अन् गावची वाट धर. समजल का.. अन् काय आगळीक केलस इथ तर तूका मिरचीची धुरी देतय काय मी.

आकाश, ए आय तुका चांगली सून होवो की नको.

तसा आकाशचा बाप त्यास येवून म्हणलं, ए गढड्या तुझं स्टेटस काय, तीच काय? जा झंप्या काम कर. खादडोबा कुठला.

तुका सांगून ठेवतय म्या. उगाच पाहुण्यांच्या लग्नात बारा भानगडी करशील. दोन दिवस राहायचं खायचं प्यायच अन् गावाक सुटायच. समजल का.

आकाश, हो.

आकाशचा बाबा, जा त्या दादा सोबत जरा काम कर जा, दिदीच्या लग्नात तेवढीच मदत होईल.

तो तेथून जातो.

….. …… …….

Outer evening time.

गाडीवरून. जाताना

श्रीकांत, काय रे नाराज का आहेस.

आकाश, बाबा व आय रागावली.

श्रीकांत, का कशाबद्दल,

आकाश, त्या आलेल्या दीदींच्या फ्रेंडवर लाईन मारली म्हणून.

श्रीकांत, अरे, तिच्याकडे बघायची कुणाची हिम्मत होत नाही. अन् तू तिला प्रपोज करायला निघालास. मग काय.

आकाश, तू पण दादा.

श्रीकांत, हे बघ तिच्या वाटेला जाऊ नको. नाहीतर हातनाक मरशील.

आकाश, बर चल आता.

ती निघतात.

Cut to …...

…….. …. …..

आण्विकाच्या घरी. इंटर. Night १०.o’clock

हॉल मधील टीवी बंद करून ती आपल्या रूम मध्ये जाते. तिच्या मोबाईलची रिंग वाजते. अंथरूण नीट करत असते.

आण्विका मोबाईल उचलून पाहते. रेवा चे नाव पडलेले असते.

ती फोन उचलून

आण्विका, बोला मॅडम.

रेवती, काय अण्विका दिदी काय चाललय. कशी आहेस.

आण्विका, आहे बरी, चाललीय वेदांगीच्या लग्नाची तयारी.

 रेवती, तिच झाली , तुझं काय?

आण्विका, माझं काय असणार.

रेवती, साहेब मेसेज वगैरे करतात की नाही.

आण्विका, येतो की कधीतरी गुड नाईट शुभ सकाळचा मेसेज.

रेवती, का फोन करत नाही?

आण्विक, परवा केला होता. मी उचलला नाही.

रेवती, अग, घ्यायचा नाही का?

आण्विका, का घेऊ, एका शब्दाने सांगितल नाही, निघालोय नाहीतर पोहोचलोय ते. त्याला माझी परवा नाही तर मी तरी कशाला करू.

रेवती, परवा कशी नाही. इकडे स्वप्निलला फोन येतोय की.

फोन आला की मला चकवून बाहेर जाऊन बोलतात साहेब. पण मी सुद्धा वस्तादिन आहे. परवा चार्जिंगला लावून अंघोळीला गेल्यावर चेक केला फोन. तेव्हा ईशानचे मेसेज पाहिले. त्यामधे तुझीच जास्त चौकशी करत असल्याचे दिसून आले.

अन् हा रेडा आपला भाऊ असून आपल्याला काही सांगत नाही.

आण्विका, त्याच्याकडे चौकाशी करायला. मला फोन करता येत नाही.

रेवती, अग, अस कस म्हणतेस. त्याने केला होता व तू उचलला नाहीस. मग तो का करेल. व आता वेदांगीच्या लग्नात भेटलच की.

आण्विका, शंभर जनातील भेटन ते. त्यात कसली मज्जा, अण्विका काय कशी आहेस. याच्यावर साहेबांची गाडी गेली तर शपथ.

रेवती, अग, तो हळवा आहे. तो जास्त बोलका नाही.

आण्विका, अरे बाबा, म्हणजे आता पासूनच कड घ्यायला लागलीस काय दाजीची.

रेवती, ए काय पण होऊदे आपण तुझ्याच गोटात. पण दाजी तोच हवा.

आण्विका, बघुया पुढे कोण कोणाच्या गोटात ते.

रेवती, इथे काय लढाई करायची नाहीये. उगाच तानू नकोस. व जरा नंमत घ्याव माणसानं.

 आण्विका, बर, लग्नाला येणार आहेस काय.

रेवती,नाही मिळणार ग यायला. माझी एक एक्झाम आहे. स्वप्नील दादा येईल बघ.

आण्विका, मग स्वप्निलला सांग पोहोचल्यावर फोन कर म्हणून

रेवती, माझा फोन येईपर्यंत तो गरुड पोहोचला पण असेल. चल ठेवते.

आण्विका, बर ठीक आहे.गुड नाईट

रेवती, गुड नाईट स्वीट ड्रीम.

आण्विका, फोन ठेवते.

इतक्यात तिच्या मोबाईल वर गुड नाईट मेसेज येतो. तो ईशानचा असतो.

ती परत रिटर्न गुड नाईट मेसेज पाठवते. व ऑफलाईन जाते. व झोपी जाते.

…… …… …..



कळत नकळत जुळले हे बंध भाग १९

 

कळत नकळत जुळले हे बंध भाग १९

क्रमशः पुढे चालू .....

Day. Afternoon. वेदांगीच्या घरी. Inter

वेदांगीचे बाबा बाहेरून घरी लग्नपत्रिका घेऊन येतात.

घरातील सगळी मंडळी पत्रिका पाहू लागतात.

वेदांगीचा भाऊ, मस्त आहे. हे बघ दोघांचा फोटो पण छापलाय. मस्त आहे.

आई, बघू रे,

आजी, तारीख कधीची धरलीय.

बाबा, तेवीस जानेवारी.

आजी, दिवस चांगला आहे ना.

बाबा, अग ते सगळ पाहूनच ठरवलय.

आजी, लग्नं कुठे करणार आहेस.

बाबा, अग आपल्याकडेच घेतलय. हॉल बुक केलाय.

आई, पावण्या रावळ्यांना बोलवायला हवं.

बाबा, ते ठरलंय बोलवू आपण. फोन केले आहेत सगळ्यांना, दोन दिवसात हजर होतील सगळे.

आई, अगं बाई तयारीला लागायला हवहवं.

बाबा, वेदू तुझ्या मित्र मैत्रिणींना देखील सांग.

वेदांगी, हो बाबा मी आताच तयारीला लागते.

वेदांगी आपल्या रूम मध्ये जाते. व आपल्या मित्र मैत्रिणींची यादी बनवू लागते. ती कागदावर नावे लिहू लागते.

आण्विका, संयोगिता, सात्विक, बबलू, अशी यादी करत शेवटी तिच्या लक्षात ईशान येतो.

ईशानला बोलवू काय?

हो बोलवलेच पाहिजे. त्याशिवाय अणूच्या मनात काय चाललय हे कळणारच नाही. बोलावतेच. पण फोन कसा मिळणार. अनुला विचारू. नको. ती उगाच चिडायची. त्यापेक्षा संयोगिताकडे असेल.

चला संयोगितालाच फोन करते.

ती फोन घेऊन रिंग करू लागते.

Cut to….

….. …… ……

वेदांगीच्या घरी. पाहुण्यांची रेलचेल सुरू आहे.

सगळे कामात आहेत. जो तो कामाला लागलाय तिचे कोकणातले भाऊ व मामांची मुलेही आलेत.

वेदांगी आपली कपडे व दागिने पाहत असते. तिला काय घालू व काय नको असे झालेले असते. ती हताश होऊन.

वेदांगी, ( मनात) काय करू. कोणता घालू. काहीच सुचत नाही. त्यापेक्षा अण्विकाला बोलावते. तेच बरं होईल.

ती मोबाईल घेते व अण्विकाला फोन करते.

….. ….. ….

आण्विका आपल्या घरात आईला जेवणाचा डबा करून देण्यासाठी मदत करत असते.

वेदांगीचे फोन येतो.

आण्विका फोन उचलते.

आण्विका, बोला मॅडम काय सेवा करू.

वेदांगी, सेवा बिवा काय नको. तू कुठे आहेस. इकडे सगळा बोजवारा उडालाय. मला काही समजत नाहीये पहिली इकडे ये.

आण्विका, अग, येते थोड्या वेळाने.

वेदांगी, काही नको थोड्या वेळानं वगैरे. त्यापेक्षा अस कर. रहायलाच ये इकडे.

आण्विका, ए बाई राहायचं नाव काढू नकोस. आज जरा वेळ होईल. उद्या मात्र सकाळी सातला हजर होते.

वेदांगी, ते काय सांगू नको. ये लवकर.

आण्विका, अग, बाबांचा डबा करून देते. मग निघते की मी.

वेदांगी, लवकर ये बघू.

आण्विका, येते बाई. थोड्या वेळात हजर होते.

आण्विका फोन ठेवते.

आई, वेदूचा होता का फोन.

आण्विका, हो.

आई, मग जा तू. मी करते डबा.

आण्विका, थोडेच तर राहिलेय. ते करते अन् जाते.

आई, अग, तीच लग्न आहे ना. मग जा लवकर.

आण्विका, अग एवढ्या लवकर जाऊन काय करू. व वेळ झालाय डब्याला उगाच तुला ओरडा खावा लागेल.

बाबा बाहेर हॉल मध्ये आपले असतात.

बाबा, झाला काय डबा तयार. मला वेळ होतोय.

अनु, झाला झाला.

अनु डबा भरते. व बाबाना द्यायला जाते.

बाबा, (हसत डबा घेताना) काय अनु वेदूचं लग्न झाल्यात जमा हाय. तुझा काय विचार लग्नाचा.

आण्विका, घ्या डबा जावा उशीर होतोय. उगीच चेष्टा नको.

आण्विकाचे बाबा, चेष्टा नाही बाळ, आता तुझं ही बघायला हवं.

इतक्यात आई जेवणखोलितून तिथे येते.

आण्विका, थोडे दिवस थांबा. एवढी एंन्ट्रानशीप झाली की बघू.

बाबा, कोण बघून ठेवलास काय.

आण्विका, बागितल तर तुम्हाला सांगेन की.

बाबा, चालेल, पण विचार कर. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवा. तस तू खूप गोड अन् समजूतदार मुलगी आहेस. तुला नक्की एखादा राजकुमार भेटेल.

आण्विका, पुरे थट्टा मस्करी.

 जावा उशीर होतोय.

आई, जावा काय जावा, खरंच सांगतात ते बाळ. तुझ्यासारखी मुलगी लाभन देखील भाग्यच आमचं. एवढं शिक्षण घेतलस. तरी देखील घरातील सर्व कामात मदत करतेस. ताईच लग्न. भावाच शिक्षण व इतर उलाढाल यातील ओढाताण समजून घेतलीस. एम बी बी एस होण्याची पात्रता असून देखील घरातील ओढाताण समजून घेऊन बी एच एम एस ला अडमिशण घेतलास. तिथे ही टोपच राहिलीस. मिळेल ते खाल्ल्यास दिलं ते कपडे घातलेस कोणता हट्ट नाही का अवांतर खर्च नाही. नाहीतर शेजारी पाजारील मुलींचे नखरे बघतोय आम्ही, साधं भांड घासत नाहीत. शिक्षण कमी घेतले पण थाट नवाबी असतात. अन् तू खूप वेगळी आहेस. येवढच नाही तर भावालाही योग्य लाईन गाठून दिलीस. तुझ कौतुक करावं तितकं थोडच. अहो, काल फोनवर सुधा कौतुक करत होती. काय काय मदत केलीस मावशीला.

आण्विका, पुरे कौतुक उगाच बैला सारखं फुगवू नका. जावा आता कामावर उशीर होईल.

बाबा हसतात व डबा घेऊन जातात.

आण्विका पसारा आवरन्यास आट येते.

आई, माझ्या लेकीला देवा चांगल स्थळ भेटू दे.

आण्विका मनात ईशानचा विचार करू लागते. तिला तो दिसू लागतो.

आण्विका, ( मनात) किती दिवस झाले. माझी आठवण येत नसेल का?

 इतक्यात आई आत येते.

आण्विकाला भांडी गोळा करताना पाहून.

आई, अग ठेव ते. मी करते.

ती जेवण वाढून घेते. व खाऊ लागते. इतक्यात पुन्हा तिला वेदांगीचा फोन येतो. तो आल्यावर अनु फोन उचलते.

वेदांगी, अग कुठे आहेस अजून.

आण्विका, अग, थोड्याच वेळात हजर होते. थोड जेवते मग निघते.

वेदांगी, ते जेवण बिवन राहु दे. थेट इकडे ये सरळ. इथे ये जेवायला.

की पाठवून देवू कुणाला.

आण्विका, ये बाई येतो मी.

वेदांगी, हे बघ अर्ध्यातासात आली नाहीस तर थेट मीच येईन बघ.

आण्विका, येतोय ठेव आता.

आण्विका जेवू लागते.

….. …… …..

 Day. Morning. आण्विका घरी. Inter outer

आण्विका जेवण करून आपल्या खोलीत जाते. एक गुलाबी कलरचा ड्रेस घालते. एक छानसा सेंट मारते. आपली पर्स घेते. व छानसा गॉगल घालते. व आईला

आण्विका, आई जाते मी?

आण्विका निघते. आपली स्कूटी घेऊन

….. ……. …

Day outer inter वेदांगी अपार्टमेंट.

आण्विका वेदांगीच्या घराच्या अपार्टमेंट मध्ये येते. ती पार्कींग एरियात गाडी लावत असते. त्यावेळी तिथे बाकीची पाहुण्याची मुले क्रिकेट खेळत असतात. ते बॉल मारतात. तो बॉल अण्विकाच्या दिशेने येतो. ती तो झेलते. तेव्हा ती पाहून.

राजेश, काय र सुया पावनी कोण म्हणायची.

सुयोग, कोण का असणा, भारी हाय दिसायला.

सुजित, पण आपल्या पावण्यात तरी नाही कोण असली.

आकाश, कोण का असणा मला जाम आवडली.

सुजित, (डोक्यात राजेशच्या टपली मारून) काय रे कळत नाही. येणाजाणारी मानस बघून तरी बॉल मारायचा.?

आण्विका, ए शहाण्या घे हा बॉल.

आण्विका बॉल फेकते

 व वेदांगीच प्लॉट कडे जाते.

सुयोग, गरमच आहे म्हणायची.

सुजित, गरम नाही. लवंगी मिरचीच आहे.

आण्विका वेदांगीच्या घरी येते. घरात आल्यावर वेदांगीची आई व इतर पाहुण्या काही ना काही कामे करत असतात.

आण्विका, काय काकू येवू का आत.

वेदांगीची आई, कोण अनु होय. ये की, काय ग, किती वेळ लावायचा? जा आत लवकर मॅडमनी घर डोक्यावर घेतलय.

आण्विका आतील खोलीत जाते.

आतील पसारा पाहून.

आण्विका, काय ग हे अस काय, केवढा पसारा केलास हा.

तुला पण कळतच नाही बघ.

वेदांगी, अग मला काही सुचेना झालंय.

आण्विका, थांब लावते नीट.

आण्विका, वेदांगीच्या घरी आलेल्या पाहुण्या मुलींना बोलावते.

इतक्यात त्यांची पाहुण्यातील आजी येते.

आजी, ( पसारा पाहून) तेवढच येतय तिला. तरी मी सांगत होते. रघुला, की जरा घरकामाची सवय लाव पोरीला, काय पसारा करून ठेवलाय बघ. आज इथे आई आवरते. उद्या लग्न झाल्यावर सांग नवऱ्याला आटपायला.

आण्विका, आजी शांत हो, होईल सर्व नीट. असे म्हणत तिने पाहुण्याच्या सर्व मुलींना बोलावून कामे लावायला सुरुवात केली. तिने आपल्या पर्स मधून चिठ्ठी काढली. व त्यांना कामे वाटून दिली. त्यापूर्वी प्रत्येकाची क्षमता पहिली.

आण्विका, तुमच्यातील कुणाला छान रांगोळी काढता येते.

एक दोघी हात वर करतात. त्याकडे कोण देत संध्याकाळी मेहंदी काढायची जबाबदारी ती देते.

 काहींना मसाले तयार करायला लावते. काहींना फुले देवून गजरा करायला बसवते. काहींना वस्तू आवरायला लावते. तर आजींना व वेदांगीच्या आईला आहेराची बांधाबांध करायला एका खोलित लावते. वेदांगीच्या भावाला बोलावून जेवणाचे टिपण काढून देते. व काही मुलाना घेऊन जाऊन बाजार करायला लावते. सर्व जोडणी लावून देते. तसेच सर्व कामे आटपून घेते.

व थोडा चहा करायला सांगून वेदांगीकडे जाते.

तिचे कपडे नीट ठेवले, दागदागिने नीट लोकरला ठेवून दिले. तसेच रहिवासी पाहुण्यांच्या जेवणाचे मेनू ठरवून तिने त्याचेही नियोजन लावले.

इतक्यात वेदांगीची आई चहा घेऊन. आली. तो चहा घेत. आण्विका वेदांगीला, काय मग झालं ना मनासारखं.

वेदांगी, हो झालं, आता तुझ्या मनासारखं व्हावं असं वाटतंय.

आण्विका, काय मनासारख.

वेदांगी, तुझ्या मनासारखा जोडीदार मिळाला की झालं.

आण्विका, हो का. आवरा आता.

….. ……. …

शेजारील खोलीत. Inter evening ४.०० o’clock

वेदांगीची गावाकडली आजी, पाहिलस कसं नियोजन केलं त्या पोरीने सगळ काम मार्गी लावल. अस पाहिजे पोरीच्या जातीला असा बारकावा यावा लागतो बघ. तू फक्त शाळा शिकवलेस. ही पोरगी कशी संस्कारी आहे बघ.

वेदांगीची ममी, आई ती मुलगी कोण आहे माहित आहे काय तुला. कितवी शिकलेय?

आजी, असेल दहावी बारावी झालेली.

वेदंगीची ममी, अग ती डॉक्टर आहे. वेदुची मैत्रीन.

आजी, काय डॉक्टर आहे. मला वाटलं असेल दहावी-बारावीला. पण काय नियोजन करते मस्त मला आवडल बाय. अन् एवढं व्यावहारिक बारकावा तिला जमतो म्हंटल्यावर खूप मुरलेली पोर आहे.

इतक्यात अण्विका घरी जायला निघते.

तिला वेदांगी, त्या पेक्षा इथे रहा की.

इतक्यात वेदूच्या पाहुण्यांची पोर बराच वेळ शायनिंग मारत असतात.

त्याकडे बोट करत

आण्विका, तिकडे बघ तुझी पाहुणे मंडळी. कशी शायनिंग मारतात.

इतक्यात आजी येते,

आण्विका, बर, चालते आता मी,

आजी, कशाला जातेस रहा की इथे.

आण्विका, नाही आजी, आई घरी एकटी आहे. व बाबा पण बाहेर गावी कंपनीच्या कामानिमित्त गेले आहेत. व भाऊ पण ग्यारेजवरून वेळाने येतो.

असे बोलून ती बाहेर निघते. आपल्या स्कूटी जवळ येते. तिला ह्यांडल जवळ एक चिठ्ठी दिसते. ती पाहते त्यावर एक नंबर असतो. व खाली लिहिलेल्या ओळी असतात.

तुम्ही मला आवडलात फोन करा, असा मजकूर असतो. आण्विका ती चिठ्ठी बाजूला फेकते. व निघते.

ती गेल्यावर

संग्राम, काय काम झालं नाही बुवा.

इतक्यात मागून सुयोग टपली मारून

आम्ही सकाळपासून तिला कटवण्याचा प्रयत्न करत आहोत. अन् तुझ काय चाललय,

संग्राम, हे बघ तिला मी पटवणार.

राजेश, आम्ही काय इथे माशा मारायला आलोय का.

ते भांडण करू लागतात.

आतून आजी, काय झालं यानले भांडण करायला.

तेव्हा तिचा आवाज ऐकूण सगळे पांगतात. निघून जातात.

…… …… …

क्रमशः पुढे........ ...... ......


Monday, December 18, 2023

कळतं नकळत जुळले हे बंध भाग १८

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग १८

क्रमशः पुढे चालू.....

Evening. ५.३०. P.m. outer inter.

आण्विका स्कूटी संयोगिताच्या दुकानाकडे वळवते. दुकानाच्या दारात जाते. तिथे पाटी लावलेली असते. त्यावर लिहिलेलं असत. अनुरूप कलेक्शन मागील बाजूस.

ती गाडी तिकडे नेते. दुकानाचे बोर्ड वाचत ती अनुरूप कलेक्शन जवळ येते. काऊंटरवर संयोगिताचा नवरा असतो. आण्विका दुकानात जाते.

आण्विका, काय दाजी कस काय चाललय?

संयोगिताचा नवरा, अरे, अण्विका बऱ्याच दिवसांनी ,

आण्विका, हो म्हटल बघू मैत्रिणीला आठवण येत नाही आमची, आपणच जाऊ मॅडम किती बिझी आहेत ते बघायला.

दाजी, काय करणार खरंच या पंधरा दिवसात अजिबात विश्रांती नीट भेटली नाही.

 (आपल्या मांडीवरील बाळाला,) जा आतमध्ये सांग जा की अनु मावशी आलेय म्हणून.

आण्विका, नको, मी जाते आत. ती कामात असेल.

आण्विका आतमध्ये गेल्यावर.

तिथे दोन - चार कामगार दिसले. त्यांना संयोगिता इंस्ट्रक्शन देत होती.

 आण्विका पाठीमागे उभा राहून.

मॅडम पटक्याचे व धोतराचे कापड मिळेल का?

संयोगिता, मागे वळून पाहते. तिला आश्चर्याचा धक्का बसतो.

ती आश्चर्याने, कोण आणू काय सरप्राइज मॅडम ना वेळ मिळाला म्हणायचा. कशी आहेस? अन् पटका धोतर कापड काय हे. कुणाला नेसवतेस, जिन्सचा जमाना आहे. समजल का. हल्ली म्हातारी माणसे पण जिन्स घालतात.

आण्विका, काय ग कधी गाळा बदललास. काही कळवल नाही.

संयोगिता, अग सगळ गडबडीत झालं बघ. अचानक जुन्या गाळेमालकाने भाड वाढवून मागितल. काय करणार. शेवटी हा गाळा बघितला. व ठरवून खरेदी केला. थोड लोन झालं. पण फिटेल आपोआप.

 आण्विका, मस्त आहे की ही जागा. व फ्रंटला पण.

इतक्यात एक कर्मचारी बाहेरील दालनातून आत येतो.

कर्मचारी, मॅडम एक कस्टमर आलेय. ते जरा बिल कमी करून मागत आहे. तुमच्या ओळखीने आलाय म्हणत आहे.

जरा बघा चला.

संयोगिता व अण्विका बाहेर येतात. एक उंच मुलगा उभा असतो.

संयोगिता, बोला सर काय हवंय.

तो मुलगा, म्याडम मला लग्नाचा पेहरावा घ्यायचा आहे.

संयोगिता, आधी कपडे तरी बघ मग बोलू.

तो मुलगा, मॅडम मला माझा मित्र ईशान पाटील याने हा पत्ता दिला होता. लग्न असल्याने लग्नाची कपडे खरेदी करायची होती.

तो लगेच फोन लावून संयोगिताकडे देतो.

 संयोगिता फोन घेते.

ईशान, हा हॅलो संयोगिता.

संयोगिता, हॅलो बोल की रे.

ईशान, तो आलेला माझा मित्र आहे. त्याला लग्नासाठी कपडे हवी आहेत. परिस्थिती बेताची आहे. जरा समजलं का?

संयोगिता, देते रे बाबा, बाकी काय चाललय तुझं, जॉबला लागलास , पार्टी कधी देणार?

ईशान, देवूया की. त्यात काय.

या इकडे सुट्टी घेऊन राधानगरीला कधीतरी.

इतक्यात अण्वीका कपडे पाहत असते. ती ईशानला थांब हं.

संयोगिता, (अण्विका) अनु तुला हवा असेल तर एखादा ड्रेस घे.

आण्विका, नको, ढीग पडलाय घरात.

संयोगिता, अग घे ग.

परत संयोगिता फोन कानाला लावते.

ईशान, कोणाशी बोलत होतीस.

संयोगिता, अरे आनुशी, म्हणजेच अण्विकेशी, ती आलेय भेटायला. म्हटल एखादा ड्रेस घे.

ईशान, काय अण्विका आहे. तिला फोन करायला सांग तिला.

संयोगिता, मी सांगू, नाही रे बाबा. मला फाडून खाईल ती.

ईशान, ए सांग की. मला बोलायचं आहे.

संयोगिता, बर सांगून बघते. पण तुला काय बोलायचं आहे तिच्याशी.

 ईशान, काही नाही मेडिकलची माहिती विचारायची आहे.

संयोगिता, बर सांगते.

ईशान, त्याची कपडे तेवढी त्याच्या बजेटमध्ये बसवून दे.

संयोगिता, बर देते बाबा.

संयोगिता, फोन ठेवते.

संयोगिता, थांबा,

सुहास ए सुहास,

सुहास हा कर्मचारी येतो.

संयोगिता, हे बघ यांचं बजेट बघ व त्यानुसार यांना कपडे दाखव. व ओळखीचे आहेत. किमान रेट , लाव.

आण्विका, बर जाते मी.

संयोगिता, अग थांब, जाशील एवढ्यात. एखादा ड्रेस तरी घे.

आण्विका, नाही, नको

संयोगिता, अग पैसे नको देवुस, व थांब जरा.

संयोगिता, (नवऱ्यास) अहो जरा लस्सी तरी मागवा.

संयोगिताचा नवरा लस्सी आणायला जातो.

आण्विका, कशाला उगाच दाजीना लावून दिलेस

संयोगिता, असूदे, बर तुला सांगायचं होत. ईशान न तुला फोन करायला सांगितलाय.

आण्विका, हो काय,

संयोगिता, त्याला कसल्या तरी औषधांची माहिती हवी आहे.

आण्विका, बर.

संयोगिता, फोन नंबर देवू.

आण्विका, नको, आहे माझ्याकडे.

संयोगिता, हे बघ जून भांडण विसर, तो चांगला मुलगा आहे. व कर मदत त्याला.

आण्विका, बर करते.

इतक्यात संयोगिताचा नवरा लस्सी घेऊन येतो. ती लस्सी ती सर्व घेतात.

आण्विका, ( मनात) इथल्या इथ दे म्हणायला येत नव्हत, म्हणे फोन कर, नोकरदार झाल्यापासून लई शेफारलाय.

थोड्या गप्पा मारून ती निघते.

संयोगिता, (मनात) अशी चिडली का? अन् ईशानच काय काम आहे हिच्याकडे. व हिच्याकडे त्याचा मोबाईल कसा. काय बाई कोडंच आहे. आणि भांडू नये म्हणजे झालं. नाहीतर माझं मधी ढोलग व्हायचं. पण काही का असेना, दोघांचा जोडा शोभून दिसेल. पण ही आग व पाण्याची जोडी कशी जुळणार?

चला आपल्या कामाला लागू. ती दुकानाच्या कामात लागते.

….. ….. …..

Day afternoon वेदांगीच्या घरी inter

वेदांगीच्या घरात पाहुणे आलेत लग्न ठरवायला. सगळे जमलेत.

वेदांग काका, काय मग आमची पोर पसंत हाय ना.

नवरीचे बाबा, हो, आम्हाला पसंत आहे. पण नवरदेवाला विचारा पसंत आहे का ते.

काय रे ऋषिकेश आहे का पसंत मुलगी.

ऋषिकेश, हो.

वेदूचे बाबा, आणखी काही बोलायचे असेल तर. बाजूला जाऊन बोलू शकता.

ऋषिकेश, नको, आहे पसंत मला, फोडा सुपारी.

सुपारी फोडली जाते. मानपान आहेर देवघेव केली जाते. साखरपुडा व लग्नाची तारीख ठरते.

Cut to….

….. …… ……



कळत नकळत जुळले हे बंध १७

 कळत नकळत जुळले हे बंध भाग १७

क्रमशः पुढे चालू.....

Night. ७.३०. Inter. कोल्हापूर अण्विका हाऊस.

आण्विका बाबा बरोबर गाडीवरून येते.

बंगला आवारात आल्यावर वरील गॅलरीत ताई व बाळ बसलेलं असत.

ती अण्विकास पाहून.

ताई, ते बघ कोण आलंय. मावशी खाऊ घेऊन आलेय हो. आता आपण खूप खूप खाऊ खायचा काय.

आण्विका घरात येते. फ्रेश होऊन आल्यावर.

आई, काय मावशीच घर सुटतं नाही होय. गेली स्वारी ते तळच ठोकून बसली.

अण्विका हसते.

ती आपली बॅग उघडते. व साहित्य काढून देते.

आई, काय काय दिलंय मावशीनं.

आण्विका, हे घे, ही मिठाई, आगळ व हे तुमचे मसाले.

आई, बर झालं, आगळ संपलच होत.

आण्विका, अन् हा बघ बाळासाठी ड्रेस दिलाय. अन् हे खेळणे.

ताई, (खेळणे उचलून) बघ आजीनं काय पाठवलंय.

ती बाळाला खेळवू लागते.

Cut to. ….

…. ….. …

ईशान ट्रेनिंगवरून थेट गावी जातो. तेथील घराचे बांधकाम पाहतो. कामावरील कंत्राटदारांचे बिल पेड करतो. व घराच्या बाकीच्या कामाची जोडणी लावतो.

Day. Inter. राधानगरी. जवळील एक खेडेगाव घर.

 जेवणखोलीत ईशानची आई जेवण वाढत असते.

आई, गावाकडलं घर गावाकडलं घर झालं एकदास बांधून. आता लग्नाचं तेवढं बघायला हवं.

बाबा, बघुया की.

ईशान, थांब जरा. आणि दोन चार महिने.

बाबा, का दोन चार महिन्यांनी काय म्होतूर आहे.

ईशान, तस नाही. जरा घराचं काम होऊ दे. मग बघू.

आई, तोपर्यंत बघून ठेवू एखादी.

ईशान, बघुया. आता जेवू.

आई, जेव की तुझा काय हात धरलाय की पाय.

ईशान रागाने बघतो. व जेवू लागतो.

…… …… …….

Day. Inter ऑफिस राधानगरी

ईशान ड्युटीवर हजर होतो.

कामावरील मधल्या सुट्टीत स्वप्नीलला फोन करतो.

 ईशान, हॅलो स्वप्नील,

स्वप्नील, हॅलो, बोल की, काय कसा आहेस. काय राव गेल्यापासून फोन नाही की काय नाही.

ईशान, अरे कसं करणार फोन खराब झाला होता. मगाशी मिळालाय रिपेरी करून.

बर तू कसा आहेस.

स्वप्नील, आहे मजेत.

ईशान, घरातील बाकी कसे आहेत.

स्वप्नील, घरातील इतर म्हणजे, नेमकी कोण पपा ,ममी की आणखी कोण?

ईशान, सर्वच रे.

स्वप्नील, इकडून गेल्यापासून स्वारी गायबच झाली.

ईशान, जरा घराच्या कामात गुंतलो होतो.

स्वप्नील, बर फोन सहज केला होता की आणखी काही काम. आ..

ईशान, तुझ्यापासून काय लपलय, कशी आहे अनू.

स्वप्नील, म्हणजे तुला माहित नाही.

ईशान, काय रे.

स्वप्नील, अरे तिच लग्न ठरलं की.

ईशान, काय, अस कस लगेच ठरलं.

स्वप्नील, बाकीची लग्न ठरतात तस.

ईशान, गप चेष्टा करू नकोस. सांग खर काय ते.

स्वप्नील, मग फोन कर व विचार की.

ईशान, ये प्लीज , असं काय बोलू नकोस.

स्वप्नील, का? काळीज दुखतय.

ईशान, अरे चेष्टा थांबवं व काय ते सांग.

स्वप्नील, मॅडम कोल्हापूरला गेल्यात. दोन दिवस झाले. इट्रनशीप आहे ना.

ईशान, कधी आली, मला काही बोलली नाही.

स्वप्नील, तू तिला मेसेज करत नाहीस, फोन करत नाहीस. कशी सांगेल तुला?

ईशान, अरे फोन बंद होता. आता कॉल करतो.

स्वप्नील, मग वाट कसली बघतोयस, कर.

ईशान, तू ठेवलास तर करेन ना.

स्वप्नील, बर ठेवतो.बाबा.

फोन ठेवल्यावर ईशान अण्विकास कॉल करतो.

फोनची रिंग वाजत असते. फोन रुमामधील बेड वर वाजत असतो. आण्विका बाल्कनीत उभा असते. फोनची रिंग ऐकून ती आत येते फोन पाहते.

त्यावर ईशानचे नाव पडलेलं असत.

आण्विका, (मनात) आता आठवण झाली होय स्वारींना. इतकी दिवस कुठे होता. उचलतच नाही. व ती फोन ठेवून देते.

रिंग वाजते. व बंद होते.

इकडे ईशान, मॅडम उचलत नाहीत वाटत. रागवलेल्या दिसतात.

बर मेसेज तरी करतो.

तो मेसेज पाठवतो. आण्विका मुद्दाम मेसेज पाहत नाही.

थोड्या वेळाने ती तेथून उठते. व गाडी घेऊन कॉलेजला निघते.

….. ……. ……. ……

Day outer. कोल्हापूर शहर १२.o’ clock

आण्विका स्कुटीवरून वेदांगीच्या घरी जाते. लग्नाच्या खरेदीची व इतर लगबग चालू असते.

बाहेर रोडवर उभा राहून ती हॉर्न वाजवते व वेदांगीला बोलावते. ती येते.

आण्विका, (हॉर्न वाजवून) वेदे, ये वेदे,

वेदांगी आवाज ऐकून बाहेर येते.

वेदांगी, थांब आले आले.

 वेदांगी बाहेर अण्विकाच्या गाडीजवळ येते.

आण्विका, काय झालं ना मनासारखं.

वेदांगी, झालं, आहे चांगल स्थळ.

आण्विका, तारीख फिक्स झाली.

वेदांगी, नाही अजून, गावाकडील पाहुणे आल्यावर जाणार आहेत.

आण्विका, इंटरशिपच कसं करणार.

वेदांगी, काल गेले होते कॉलेजवर तेव्हा प्राचार्यांशी बोलण झालय.

त्यांना कल्पना दिली आहे. तेव्हा त्यांनी पुण्याकडील रुग्णालय देण्याचं मान्य केलय. कागदपत्र पण सबमिट केलेत.

आण्विका, निकाल पाहिलास.

वेदांगी, ऑनलाईन पाहिलाय, झाले पास. तू मात्र बाजी मारलीय.

आण्विका,बर निघते मी तुझं झालं काम माझ पाहायला नको. का येतेस बरोबर.

वेदांगी येते की. थांब जरा. मला पण कंटाळा आलाय.

वेदांगी, घरात जाते. आईला

वेदांगी, मी जाऊ अनु बरोबर कॉलेजला.

आई, जा की, नाहीतर लग्न झाल्यावर कुठे फिरायला मिळणार आहे.

 वेदांगी आपली पर्स घेते. व अण्विका सोबत निघते.

….. …… …… …….

मेडिकल कॉलेज. Day. Inter २.०० o’ clock

आण्विका प्राचार्यांच्या केबिनकडे जाते.

आण्विका, मै आय कम इन सर.

प्राचार्य, कम इन.

आण्विका व वेदांगी दार उघडुन आत आल्यावर.

प्राचार्य, कोण अण्विका , अभिनंदन

आण्विका, थ्यांक्स सर.

प्राचार्य, कमाल केलीस. टॉपर आहेस तू. अन् वेदांगीला पण चांगले मार्क्स भेटलेत. तुझं ही अभिनंदन.

आण्विका, सर इंटरशिपच कसं करायचं.

प्राचार्य, सांगायचं म्हणजे पूर्वी लास्ट इअर परीक्षा झाली की आम्ही मुलांना त्यांच्या सोईने हॉस्पिटल निवडण्यास देत होतो. पण बरेचशे विद्यार्थी आप आपल्या परीने हॉस्पिटल निवडायचे. पण हल्ली सरकारी दवाखान्यात डॉक्टर कमी असलेने. व तिथे जास्त गरज असेल ने आपल्या जवळील दवाखाना निवडण्यास सांगितले आहे.

आण्विका, मग मला इथे कोल्हापूर व जवळील पी ए सी मिळेल ना.

प्राचार्य, हे बघ अनु, इंटरशिप म्हणजे उगाच टाईमपास नको. अन् सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांचे रेक्रूपमेंट कोल्हापूर आहे. व तू चांगल्या डॉक्टरांच्या सहवासात असावेस असे मला वाटते. यासाठी तुला दोन ठिकाणे दिली होती एक आजरा व दुसरे राधानगरी.

आण्विका, पण ती लांब आहेत.

प्राचार्य, हे बघ जरी लांब असली तरी तिथे चांगले सर्जन डॉक्टर आहेत. माझ्या ओळखीचे. व तू तिथे जावेस अस मला वाटते. त्यांच्या ज्ञानाचा फायदा तुला होईल. व लांबच म्हणत असशील तर राधानगरी घे. ते आजर्यापेक्षा जवळ आहे. व तुझ्या सोईचे पण. तिथल्या कॉटर मध्ये तुझ्या राहण्याची सोय पण होईल.

व त्या परिसरात अनेक वनौषधी असतात. त्याना बाबतच तुझं संशोधन देखील पूर्ण होईल.

वेदांगी, घे जा गप राधानगरी. कोल्हापूर काय सुटतं नाही होय.

आण्विका, चालेल सर.

प्राचार्य, हे लेटर घे. ऑफिस मधून सही शिक्का घे. अन् हा फोन नंबर तिथल्या डॉक्टरांचा आहे. संजय पाटील त्यांचं नाव. माझा रेफरन्स सांग.

आण्विका, चालेल सर.

प्राचार्य, काय वेदांगी लग्नची तयारी जोरात चालू असेल.

वेदांगी, चालू आहे.

प्राचार्य, पत्रिका छापल्या की नाहीत.

वेदांगी, तारीख आजुन फिक्स करायची आहे. दोन- चार दिवसात मिळेल.

प्राचार्य, तुला परवानगी दिलेय. पूण्याकडील तुझ्या सोईन मिळेल हॉस्पिटल.

आण्विका, लेटर घेते. व निरोप घेते.

बर, येते सर.

प्राचार्य, ते येणं जाणं तर आहेच. तुझ पण बघायला चालू आहे का? की काढू एखाद स्थळ.

आण्विका, नको सर, अजून वेळ आहे.

प्राचार्य, वेदांगीच चालू आहे. म्हणून म्हटल. तुला पण पहावा एखादा डॉक्टर.

आण्विका, करायच्या वेळी सांगेन सर.

प्राचार्य, अजून किती थांबणार?

आण्विका, फक्त काही महिने.

प्राचार्य, कोण पाहिलास काय?

आण्विका, म्हणायला गेलं तर हो, अन् नाही सुद्धा.

प्राचार्य, कोड्यात बोलायला तू काही ऐकायची नाहीस. बर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

आण्विका, हा थ्यांकयू सर.

प्राचार्य, वेदांगी तुला पण शुभेच्छा

वेदांगी, थ्याकयू सर.

त्या निघतात.

आण्विका ऑफिस मध्ये जाते. तेथील कारकुनाकडे लेटर देत.

आण्विका, यावर कॉलेजचा सही शिक्का द्या.

तो क्लार्क घेतो. सही शिक्का देतो.

त्या बाहेर येतात.

बाहेर आल्यावर.

Outer. कॉलेज रोड. Evening. ४,०० o’clock

वेदांगी, काय ग अस काय सांगितलस सरांना.

आण्विका, काय.

वेदांगी, म्हणायला गेलं तर हो अन् नाही सुद्धा.

 अण्विका, ते मजेत म्हटल.

वेदांगी, काय प्रेमात वगैरे नाही ना पडलीस.

आण्विका, काय सांगू तुला.

वेदांग, म्हणजे पडलीस म्हणायची.

कोण ते तरी सांग.

आण्विका, नाही नको, तू रागवशील.

वेदांगी, नाही रागावणार.

आण्विका, तुझ व त्याच भांडण झालंय.

वेदांगी, कोण सांग की कोड्यात नको बोलू.

आण्विका, मोबाईल वर डी पी दाखवत.

हा बघ.

वेदांगी, बारकाईने पाहत.

याला बघितलय कुठेतरी.

कोण बर.

आण्विका, बघ कोण ते.

वेदांगी, अग, हा तर ईशान आहे ना.

आण्विका, हो.

वेदांगी, बापरे मला धक्काच बसला बाई ग तू याच्या प्रेमात पडलीस.

आण्विका, हो,

वेदांगी, अग तो किती वांड आहे माहित आहे ना.

आण्विका, हो,

वेदांगी, अग तुझं अन् त्याच जमेल का?

आण्विका, न जमायला काय झालं. जमवून घेतल तर जमेल.

वेदांगा, फिरकी तर घेत नाहीस ना.

आण्विका, नाही ग. पण कुणाला सांगू नकोस. अजून काही स्वारींनी कबूल केलेले नाही.

वेदांगी, एकतर्फी नाही ना.

आण्विका, नाही.

वेदांगी, तुझ बोलण एक कोडंच आहे बाई. होय पण, नाही पण, कबूल करायला नाही अजून, काय समजत नाही.

आण्विका, गप तू चल.

 त्या दोघी निघतात.

…. …… …… ….. …..

वेदांगीला घरी ड्रॉप करून अण्विकाच्या घरी निघाली. जाताना तिच्या लक्षात संयोगिताला भेटायला जायचे आठवले.

ती तिकडे गाडी वळवते.

…… …… …

क्रमशः पुढे.....

कळत नकळत जुळले हे बंध १६

कळत नकळत जुळले हे बंध १६

क्रमशः पुढे चालू.......

  Morning. Outer. अलिबाग ते कार्ला ७.३०

काका एक गाडी ठरवून आणतात.

गाडी येते. सगळे गाडीमध्ये बसतात.

गाडीमध्ये बसताना. एक शेजारी.

काकांना,

शेजारी, काय आज दौरा कुणाक होव.

काका, कारल्याक जातंय. पावणीक देवीच दर्शन घडवाक.

गाडी निघते.

पायथ्याला मंदिरा जवळ पार्किंग ठिकाणी गाडी लावून ती वरती चालून जातात.

वाटेत जाताना.

आण्विका, खूप चढायला लागेल का?

रेवती, चल काही नाही वाटत, बोलत बोलत कधी पोहोचू कळतच नाही.

आण्विका, इथ लेणी पण आहेत ना.

रेवती, हो. मस्त कात्याळ खोदून केलेली.

आण्विका, मी पाहिल्यात पण टिव्ही वर.

रेवती, मग आज प्रत्यक्ष पाहा.

बाजूने कोळी स्त्रिया जाताना पाहून.

आण्विका, इकडे सगळ्या स्त्रियांना गजर्याची आवड आहे ना.

रेवती, तुला हवा का. घेऊ

आण्विका, नको.

इतक्यात मागून मावशी व काका हाक मारतात.

आण्विका, अग बोलण्याच्या नादात आपण पुढे आलो. मावशी हाक मारतेय. थांब जरा.

रेवती, आई बाबांना सांग उचलून घ्यायला.

आण्विका, ए लब्बाड, काय पण बोलतेस.

रेवती, थोडी गम्मत केली.

त्या थांबतात.

मावशी व काका जवळ येतात.

मावशी, काय ग पायांना भिंगरी बांधल्यासारख काय पळताय. आम्ही मागे आहोत हे विसरलात की काय.

रेवती, सॉरी ग, बोलण्याच्या नादात पुढे आलो.

मावशी, बर हे घे. ओटीच सामान.

त्या घेतात.

थोड्या वेळाने त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. व बाहेर येतात. तेथील बाजूच्या दुकानातून काही वस्तू घेतात. व

रेवती, चल लेणी पाहूया.

त्या लेणी पाहू लागतात.

आण्विका, किती सुरेख कोरीव काम आहे ना.

रेवती, हा, फक्त छन्नी व हातोड्याने बनवलेले.

आण्विका, आपल्या कोल्हापूरचं मंदिर देखील असच सुंदर आहे ना.

रेवती, हो. कठीण अग्निजन्य खडकात खोदेल्या गेलेल्या लेण्यातील बारकावा बघ.

आण्विका, हो, थांब मी जरा फोटो घेते.

आण्विका वेगवेगळे फोटो घेते.

खूप वेळ त्या निरीक्षण करतात.

इतक्यात मावशी हाक मारते

अग चला लवकर वेळ होतोय. निघुया आता.

त्या खाली उतरून एके ठिकाणी भोजन करतात. पुढे एका ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर मौज करतात.

काका, चला आता, आज हॉटेलला ट्रीट माझ्याकडून.

रेवती, काय, वाव चला मग.

ती जाऊन जेवण करतात.

जेवण करताना,

रेवती, काय मग मॅडम आज सुट्टी वाटतंय. कीचनला.

मावशी, गप ग, सुट्टी कुठली. सकाळी आणलेलं जेवण घरीच केलं होत ना.

रेवती, तरी पण हाफ डे सुट्टी आहेच ना.

मावशी, गप जेव, अनु कसं वाटल आज.

आण्विका, मस्त.

मावशी, अजून आहे भरपूर पाहण्यासारख पण खूप वेळ झाला ना.

आण्विका, अग एका दिवसात भरपूर पाहिलं आणखी काय.

रेवती, उद्या जाऊया का?

आण्विका, नको बाई, बस झालं फिरणं .

रेवती, एका माणसाचं काम हल्क झाल. काही म्हण.

आण्विका, कोणाचं.

रेवती, आईच ,जेवण आज करावं लागणार नाही.

मावशी, जेवण करावं लागणार नाही म्हणे. भांडी काय तुझं भूत घासणार आहे. ती किचन कट्यावर ठेवलेली.

रेवती, तरी पण जेवण करावं लागणार नाही ना.

मावशी, आज नसले तरी उद्या आहेच की.

रेवती, ते काय ठरलेलंच आहे की.

त्यात काय एवढं. पण आम्हाला सुट्टी कधी भेटणार.

मावशी, तर रोज घरातील सार काम तूच करतेस. तसंच बोलतेस.

रेवती, काम नव्हे ग, पोटाला आराम म्हणते.

आण्विका, मग धर उपवास.

रेवती, उपवास, अन् मी छे त्यापेक्षा पोटभर खायचा ठेवा. तो जमेल बघ.

मावशी, चल, खादाड कुठली.

सर्व हसतात. व निघतात.

…… ……. ……. ..

Night. रेवती रूम. Inter

आण्विका, आपली बॅग नीट लावत असते. रेवती तिथे येते.

रेवती, काय अनु दीदी काय करतेस.

आण्विका, बॅग भरतेय.

रेवती, कशाला.

आण्विका, कशाला म्हणजे, जायला नको आता गावी.

रेवती, राहा की आणखी काही दिवस. सुट्टी आहे ना.

आण्विका, नाही, मगाशी बाबांचा फोन आला होता. यायला सांगितलय.

रेवती, अग अस काय हे?

आण्विका, अग झालं की खूप दिवस येवून, आता जायला हवं. माझ्या इंटरशिपची तयारी करायला हवी. तसेच ताई अजून दोन-चार दिवस आहे. तिच्यासोबत पण थोडावेळ घालवता येईल.

रेवती, ताई सोबत की साहेबांसोबत.

आण्विका, नाही, साधा मेसेज पण केला नाही बघ त्यानं.

रेवती, गडबडीत विसरला असेल.

आण्विका, गडबडीत विसरला असेल म्हणे. साधा एक मेसेज सुद्धा पाठवला नाही.

रेवती, (अनुला नाराज पाहून) अग कुठल्यातरी कामात अडकला असेल. करेल आज नाहीतर उद्या.

इतक्यात मावशी काही कोकणी मसाले, अगळ व मिठाई घेऊन येते.

मावशी, अनु हे पण भर.

आण्विका, मावशी काय हे. खूप ओझं होईल. कशाला. तिकडे असत ना.

मावशी, गप्प भर ताईला आवडेल. अन् हे घे. बाळाचा ड्रेस. व खेळणे माझ्याकडून.

आण्विका, अग तुम्ही मला डॉक्टरची हमाल करून ठेवलंय बघ.

रेवती, कधी जाणार आहेस .

आण्विका, उद्या सकाळी. वेदांगीचे पपा आलेत ना. त्यांच्या पाहुण्यांकडे बाकीची बोलणी करून घ्यायला. आपल्या सासुरवाडीला आलेत ते. त्यांसोबत जाणार आहे.

रेवती, वेदांगी ताईच लग्न ठरल.

आण्विका, हो, ठरल्यात जमा आहे. नव्हरा चांगला आहे म्हणे. पुण्यातच त्याच स्वतःच हॉस्पिटल आहे. जुन्नरला. बाकी आपण माहिती काढली ना.

रेवती, म्हणजे मॅडमच फिक्स झालं. आता तुझं बघायचं.

आण्विका, माझं एक कोडंच आहे बघ.

रेवती, का ग. ईशान आहे ना.

आण्विका, अग असून काय उपयोग मागणी काय मी घालायची?

रेवती, त्यात काय घालायची. आजकाल चालत.

आण्विका, मला ते बर वाटत नाही. एवढं साधं कळत नाही का त्याला, समोरच्या माणसाच्या मनातील भावना.

रेवती, तस बघायला गेलं तर माझच चुकल. मी नको काढायला हवा होता तुझ्या लग्नाचा विषय.

आण्विका, अग तुझं काय चुकलं नाही ग. तू तर प्रामाणिक प्रयत्न केला होतास.

रेवती, मी बोलू का त्याच्याशी. सांगतो त्याला तुझ्याविषयी.

आण्विका, काही नको, आता मी काही त्याला प्रपोज करणार नाही. जोपर्यंत तो मला लग्नासाठी मागणी घालत नाही.

रेवती, अस का?

आण्विका, हो तसच आहे ते. नाहीतर सगळी मला अगोचर म्हणतील.

रेवती, अग पण.

आण्विका, पण बिन काही नाही. चल मावशीला मदत करायला.

त्या दोघी बॅग आवरून जातात.

…. …… ….. …..

Next day. Morning. ८.०० o’clock inter.

वेदांगीचे पपा येणार असतात. मावशी लवकर उठून स्वयंपाक करते. आण्विका आपल आवरते.

वेदूचे पपा येतात.

काका, राम राम या तुमचीच वाट पाहत होतो.

रेवा, अनु पाणी आणा,

आण्विका, पाणी घेऊन येते.

चहा पान होते.

मावशी, जेवणाला पाने वाढते.

जेवण करताना.

काका, प्रवास कसा झाला.

वेदूचे बाबा, झाला नीट परवाच आलो होतो. जरा लग्न म्हंटल्यावर पाहुणे रावळे आले. त्याचं मन पण व रितभात करायला हवी. आमचा गोतावळा सगळा इकडं म्हंटल्यावर

काका, एकदाच लग्न ठरलं म्हणायचं.

वेदुचे बाबा, हो, आणखी किती दिवस ठेवायचं, पोरीची जात. आजकाल कायकाय एकताय बघताय ना.

काका, तरीपण आपल्या मुली मात्र आज्ञेच्या बाहेर नाहीत हा.

वेदूचे बाबा, ते तर झालेच.

बर आठवलं. सगळ्यांना निमंत्रण देतो. लग्नाला यायचं. काय. त्या निमित्ताने गाठी भेटी होतील.

काका, येवू आम्ही.

मावशी, थोडीशी आमटी वाढू.

वेदूचे बाबा, नको अहो, ताटात खूप वाढलय. आणखी कशाला. पुरे पुरे.

मावशी, एवढ्या लांब प्रवासाला जायचं म्हंटल्यावर घ्या थोड.

मावशी आग्रहाने वाढते.

जेवण आटोपल्यावर.

निघताना.

आण्विका आपली बॅग घेत असते.

मावशी, सार नीट घेतलस ना.

आण्विका, हो.

काका, चार दिवसासाठी आली अन् वेड लावून गेली पोर.

आण्विका, नमस्कार करते.

काका मावशी आशीर्वाद देतात.

काका, तुला पण वेदू सारखा नव्हरा मिळावा. तुझ्या मनाजोगा.

आण्विका, कायतरीच काका.

रेवती, परत कधी येणार?

आण्विका, त्यापेक्षा तूच ये. कोल्हापूरला.

काका, रेवा, स्वप्नील दोघे सोडून या जावा.

ते दोघे, बर बाबा.

रेवा व स्वप्नील गाडी काढतात व अण्विका व वेदूच्या बाबांना सोडायला जातात.

जाताना मावशी, पोहोचल्यावर फोन कर.

अण्विका, हा करते.

…….. ……. ……

Evening. ७.०० o’clock outer.

कोल्हापूर बसस्थानक.

आण्विका व वेदूचे बाबा गाडीतून उतरतात. वेदूचे बाबा फोन लावून अण्विकाच्या बाबांना बोलावतात. व आपल्या मुलग्यालाही

अण्विकाचे बाबा आल्यावर

बाबा, काय प्रवास कसा झाला.

आण्विका, मस्त.

बाबा, काय झालं गेलेलं काम.

वेदूचे बाबा, हो झालं.

बाबा, तारीख ठरवली की नाही.

वेदूचे बाबा, नाही अजून दोन-चार दिवसात नक्की करू.

बाबा, न्यायला कोण आले नाही? सोडून येवू का?

वेदूचे बाबा, नको फोन केलाय श्रीकांतला येईल एवढ्यात.

हा बघा आला.

श्रीकांत वेदूचा भाऊ गाडीवरून येतो.

ते निघतात.

….. ….. ….. …… ….

क्रमशः पुढे .......

कळतं नकळत जुळले हे बंध भाग १५

 कळतं नकळत जुळले हे बंध भाग १५

क्रमशः पुढे चालू .......

Night. १०.३०. O’ clock. Inter

ईशान अंथरुणावर झोपलेला असतो. मोबाईलवर व्हॉट्स ॲप मेसेज व डी पी पाहत असतो. आण्विकाचा मेसेज आलाय का ते पाहतो. मेसेज नसतो तिची डी पी पाहतो.

ईशान, ( मनात) खूप सुंदर दिसतेस. अस वाटत कुठेतरी लांब जाव जिथं फक्त तू अन् मी, व हा निसर्ग. एकत्र बसून खूप गप्पा माराव्यात अस वाटत. आपली भेट झाली तेव्हा अस बोलण झालच नाही. कळत नाही का तुला माझ्या मनातल. घरातील लोकांना सांग की. कशाला स्थळे पाहता. मी माझ्या मनातील राजकुमार कधीच शोधलाय. सांगशील ना.

तिच्या स्वप्नात ईशान तसाच झोपी जातो.

…… …….. ……. ..

दोन दिवस झाल्यावर

निरोप समारंभ कार्यक्रम असतो.

ईशान स्वप्नीलला सुद्धा बोलवतो. त्या दिवशी स्नेह भोजन असते. स्वतः पैसे त्याच्या जेवणाचेचे देतो.

त्या दिवशी.

Afternoon. २.०० o’clock. Outer.

स्नेहभोजन पार्टी वेळी. स्वप्नील येतो.

बाहेर ईशान वाट पाहत असतो.

स्वप्नील , काय मला कशाला बोलवलेस. पार्टी तर ऑफिसची आहे ना.

ईशान, काही नाही रे, आज रात्री निघणार आहे ना. म्हटल भेटू. पुन्हा तू काय लवकर भेटणार आहेस.

स्वप्नील, अरे पण ही ऑफिस पार्टी आहे.

ईशान, त्यात काय? मी परवानगी घेतलीये. व बिल पण पेड केलय. काळजी नको.

ते दोघे एका ठिकाणी टेबलावर जाऊन बसतात. त्याजवळ रवी देखील येतो. मस्त म्युझिक चालू आहे सॉफ्ट

जेवण करत

स्वप्नील, किती वाजता जाणार आहेस.

ईशान, आज रात्रीच निघणार आहे.

स्वप्नील, लगेच, जरा एक दिवस थांबला असतास तर.

ईशान, घरचं काम चालू आहे. दोन दिवस सुट्टी भेटतेय तेवढ्यात जरा बिले भागवून घ्यायचं म्हणतोय. शिवाय बाबांना ही लोड पडतोय.

स्वप्नील, पुन्हा कधी भेटणार?

ईशान, कोल्हापूरला आलास की ये भेटायला.

स्वप्नील लग्नाचं काय ठरवलस.

ईशान, तुला तर सर्व माहीत आहे. तूच सांग की मार्ग.

स्वप्नील, मग मी तुला दाजी म्हटलं तर चालेल का?

ईशानला ठसका लागतो. स्वप्नील पाणी देत.

स्वप्नील, अहो हळू हळू.

रवी, ठसका जोराचा लागला. म्हणजे फिक्स झालं म्हणायचं.

ईशान, पाणी पितो. हसतच.

मी आहे रे तयार पण तुझी बहिण तयार होईल का?

स्वप्नील, होणार की, मी मोठा सापच सोडलाय पायात. सरळ थाप मारली, की तुझं लग्न ठरतय म्हणून.

ईशान, अस का सांगितलस. काय वाटेल अनुला.

स्वप्नील, काय वाटणार, लग्नाचा विषय तुझा काढल्यापासून वातावरण तापलंय. रेवा तर चांगलीच भांडत होती. माझ्याशी.

पण अनु दीदी नाराज झाली.

ईशान, मी सांगू का फोन करून तिला माझं लग्न नाही जमलेय ते.

स्वप्नील, नको, गप्प बस. मी सांगितलेय तू जातोयेस म्हणून. उगाच फोन करून टाटा बाय बाय करू नकोस.

वातावरण गरमच राहू दे.

अन् एवढं भेटाव वाटतंय अर्धांगीला तर कोल्हापुरातच भेटा की साहेब.

ईशान, स्वप्न्या तू तर डायरेक्टच बोलतोस बघ.

स्वप्नील, मला उगीच बहिर्जी नाईक म्हणत नाहीत. तुला काय वाटल तुला सहज पसंत केलेय मी , त्या दिवशी ट्रीपलाच तुला व अणू दीदीला बारकाईने न्याहाळल होत. ज्यावेळी रेवाने अनु दिदीच्या लग्नाचा विषय काढला. तेव्हाची तुझी रियाक्शन मी पाहिली , व तुझ्या चेहऱ्यावरून मी समजल की तुझं अनुताई वर प्रेम आहे ते.

वैदेहीच्या स्थळाची चौकशी केली, त्यावेळी तुझीपण माहिती दुसरीकडून काढली. तुझं शिक्षण, गाव, तुझ्या मामाच गाव. नोकरी कुठे कशी लागली. नोकरीच्या ठिकाणाहून तसेच सध्या अलिबाग मध्ये कुठे काय काय करतोस इथपर्यंत बायोडेटा गोळा केला. व अण्विका दीदी साठी वरसंशोधन केलं.

समजल का?

ईशान, बापरे, तू तर भलताच पुढचा आहेस रे.

स्वप्नील, मग असणारच आजकाल मऊ राहून कस चालेल. अक्टीव्ह असावे. माणसानं.

 ईशान, एकदा फोन करून सांगू का? निघतोय म्हणून.

स्वप्नील, नको, आजिबात नको. जरा तिला पण ओढ वाटू दे.

ईशान, तू भाऊच आहेस ना तिचा. तिच्या बाजून व्हायचं सोडून मला सपोर्ट करतोयस.

स्वप्नील, हो, तिच्या भविष्यासाठी मी हे करतोय. एखाद्या नशिल्या, नर्शेसी लफड असलेल्या डॉक्टरशी लग्न होण्यापेक्षा तुझ्याशी लग्न व्हावं हे बरं.

ईशान, अरे पण तिच क्षेत्र वेगळ, माझं वेगळं ती तयार होईल का?

स्वप्नील, होईल काय व्हायलाच पाहिजे.

ईशान, मग पार्टी तुला माझ्याकडुन.

स्वप्नील, पार्टी वगैरे काही नको. तेवढं लग्नात कान पिळीचा मान तेवढा दे.

रवी, तो तर तुला दिलाच पाहिजे. याला माझा फुल्ल पाठींबा आहे.

ईशान, देईन की?.

ते हसू लागतात.

…… …… . ……..

Evening. ४.०० o’clock. Inter outer.

स्वप्नील ईशान सोबत त्याच्या रूमवर जातो.

ईशान आपली पॅकिंग करतो. व आपल्या रुमची चावी रिशेप्सनिस्टकडे जमा करतो. रवी देखील त्याच्याशी हितगुज साधतो.

ईशान, बर आहे या कधीही आमच्या कोल्हापूरला.

रवी, हो नक्की सर. पण त्याआधी तुम्ही या आमच्याकडे एकदा नाशिककडे, तुम्ही इथे पाहुणचार केला. आता आम्हालाही संधी द्या.

ईशान, नक्की येऊ. बाकी आपल्याला भेटून आनंद झाला.

स्वप्नील आपल्या गाडीवरून ईशानला सोडायला जातो.

पुण्याला जाणारी बस लागलेली असते.

ईशान बस मध्ये सीट पकडतो.

ईशान, (स्वप्निलला) एकदा फोन करू का?

स्वप्नील, नको,

ईशान, प्लिज,

स्वप्नील, जरा धीर धरा साहेब. नाहीतर मॅडम लईच वर चढतील वर आकाशात. जरा वाट पाहा. वाट पाहण्यात पण एक मज्जा असते. समजल काय.

ईशान, मी गेलो म्हणून सांग.

स्वप्नील, सांगतो की.

थोड्याच वेळात कंडेक्टर येतो. बेल वाजवतो. लगेच ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. स्वप्नील निरोप देतो. गाडी निघते.

….. …… …… ……..

Night. ८.०० o’clock. Inter

स्वप्नील घराकडे येतो. गाडी लावून किल्ली हातात फिरवत आत येतो. आई रात्रीच जेवण टेबलवर ठेवत असते. स्वप्नीलला पाहताच.

अण्विका मावशी, काय रे कुठे होतास सकाळपासून.

स्वप्नील, होतो एका कामात.

मावशी, अरे सकाळ पासून काही जेवला नाहीस. किती वाट बघायची.

स्वप्नील, फोन केला होता की बाबांना. बाहेर जेवणार आहे म्हणून,

मावशी, मग कुठला निरोप मिळतो. बर, ये जेवायला मी पाने वाढते.

स्वप्नील, नको खूप जेवलो दुपारी.

मावशी, कुणाच्या लग्नाचं आमंत्रण होत काय?

स्वप्नील, नाही ग, ईशान सोबत होतो. त्याने दिले जेवण.

(आण्विका दीदी कडे पाहत. ती टेबलवर जेवण लावत असते.)

तो गेला आज कोल्हापूरला त्याच ट्रेनिंग संपल.

आण्विका, काय गेला? कधी ? किती वाजता?

स्वप्नील, आत्ताच थोड्या वेळापूर्वी. पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये मी बसवून आलोय.

आण्विका, (रागावलेली, मनात) साधं कळवावा सुधा वाटल नाही.

ती आत जाते.

आण्विका, (बडबडत) स्वतला काय समजतो कुणास ठावूक. निघतोय म्हणून तरी सांगायचं. एवढी कसली आलेय घमेंड.

रेवती, अग काय झालं. अशी काय बडबडतीयस.

आण्विका, हो बडबडतेय , खुळ लागलंय मला.

रेवती, काय झालं ते तरी सांग. आण्विका, स्वप्नील ईशानला पोहोचवून आलाय. त्याने साधं फोन करून कळवल देखील नाही मला, जातो म्हणून.

रेवती, अग, गडबडीत राहिलं असेल कळवायचं, त्यात काय एवढं चिढायच. तू स्वप्नील दादाकडे लक्ष नको देवूस. त्याला एखादी गोष्ट फुगवून सांगायची भारी हौस.

जाऊन देवू का रट्टा एक तेला.

आण्विका, तिला थांबवते.

आण्विका, जाऊ दे गेला तर. मी किती झुराव. याला जरासुद्धा कळकळ नाही. किती दिवस झाले एक मेसेज सरळ नाही. माझ तर डोकं दुखायला लागलंय. मी जरा बाहेर फिरून येवू का?

रेवती, आता नको, चल जेवू व मग जावू.

आण्विका, भूक नाही मला.

रेवती, ये उगाच नखरे नकोत. तुला माहिती झालंय ना. की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ते. मग जेव व चल बाहेर बोलू.

आण्विका, ठीक आहे.

त्या दोघी जेवायला जातात.

….

Night. ९.०० o’clock. Outer.

आण्विका व रेवती जवळील लहान बागेत गेल्या.

तिथे एका बाकावर बसून.

रेवती, अनुताई इतकं वाहवून कसं चालेल. मला समजावणारी तू. आज एवढी इमोशनल कशी झालीस.

आण्विका, अग तुझ जे होत ते आकर्षण, अग खेळण्या बागडण्याच्या वयात एक आकर्षण म्हणून तू प्रेमात पडली होतीस. ज्यावयात कोणतीही माणसे पारखण्याची कल्पना सुद्धा आपण करत नाही. माझं तस नाही. मी त्याला अगदी जवळून पाहिलंय. व माझ्यासाठी तोच योग्य जोडीदार आहे.

रेवती, हे बघ थोडी कड काढ. होईल सर्व नीट.

आण्विका, अग काय नीट होईल. सध्या मेसेज देखील करत नाही. व फोन सुद्धा.

रेवती, तू तरी कुठे केलास मेसेज व कॉल

आण्विका, का ? त्याला काय झालंय करायला. मी का झुरावं.

रेवती, मग कशाला त्रास करून घेतेस. त्याला काय टिकली लावलेय. त्यापेक्षा बघू दुसरा एखादा डॉक्टर.

आण्विका, नाही .. नको. बघते मी किती दिवस ताठतोय.

रेवती, अग पण स्वप्नील दादा म्हणत होता ना. की त्याला स्थळ आलय म्हणून.

आण्विका, बघतेच मी कोण अन् कशी लग्न करते त्याच्याशी.

रेवती, बर ते बघू नंतर आपण उद्या एकविरेला जाऊया का?

आण्विका, जाऊया.

रेवती, तेवढच तुला बरं वाटेल.

आण्विका, स्वप्नील येणार आहे ना.

रेवती, मघाशी फोन वर बोलत होता. रत्नागिरीला जाणार आहे म्हणून.

त्याची डाक्युमेंट्रीची ट्रिप आहे.

आण्विका, बर, जाऊया आपण.

रेवती, चला मग आता घरी मॅडम.

….. ……. ………. ….

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com


Saturday, December 2, 2023

कळत नकळत जुळले हे बंध भाग १४

 

कळत नकळत जुळले हे बंध भाग १४

क्रमशः पुढे चालू ......

Evening. आण्विका मावशी हाऊस. Inter. ५.३०

स्वप्नील ईशानला सोडून घरी येतो. फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो. तिथे जवळ रेवा मुव्ही पाहत बसली होती. स्वप्नील आल्याचे पाहून ती तोंड वाकडे करत टिव्ही वरील मुव्हीचा आवाज वाढवते.

आण्विका स्वप्नीलसाठी चहा करून घेऊन येते.

आण्विका चहा घेऊन आल्याचे रेवतीस आवडत नाही.

ती अण्विकेस,

रेवती, कर सेवा, आयुष्य सेवा करतच जाणार तुझं.

स्वप्नील, तू का जळतेस. तसं पाहायला गेलं तर तूच आणून द्यायला हवंस.

रेवती, ए जा तुझी सेवा करायला मी काही तुझी बायको नाही.

स्वप्नील, अनुताई तस पाहता तूच माझी बहिण वाटतेस. नाहीतर हिच्या पोटात थोडीशी पण माया नाही. सारखी चिडून असते माझ्यावर.

रेवती, ए लई मोठे बोलू नकोस. लई बहिण म्हणतोस ना मग आल्यापासून किती वेळा तिला फिरायला घेऊन गेलास. परवाची ट्रिप पण तिच्या मुळेच केलीस. तिला एकदा तरी परिसराचे दर्शन घडवले का? तुझ्याच मस्तीत असतोस. (रेवती दात ओठ खात म्हणाली.)

स्वप्नील, उद्या जाऊया की आपण. बाबांना सुट्टी घ्यायला सांगू. वाटल तर.

रेवती, आता बाई या गाढवाला कसं समजावू, सोड बाबा विषय.

आण्विका, रेवा शांत बस, आत जा व मावशीला स्वयंपाकात मदत कर जा.

तेवढ्यात काका येतात. आण्विका त्यांना पण चहा आणून देते.

काका स्वप्नील शेजारी बसत.

काका, स्वप्नील केव्हा आलास?

मुड ऑफ का?

स्वप्नील, आलो थोडा वेळ झाला. ती आहे ना रेवा. ती सारखी भांडते. त्यामूळे मूळ हाफ झालाय.

काका, अस का म्हणतोस. काय केलं तिने.

स्वप्नील, बघ ना बाबा, आल्यापासून रेवा भांडतेय. की त्यांना नेलं नाही म्हणून. तुम्हीच सांगा बाबा टू व्हीलर वरून दोघेच जाऊ शकतो ना. तिघे जण येवढ्या लांब योग्य आहे का?

रेवती, त्याचे बोलणे ऐकून बाहेर येते. व बाबांना बोलते.

रेवती, तस नाही बाबा. आपल्या घरात एक पाहुणी आलेय. तिला तरी एखादेवेळी फिरवायला घेऊन जायचं.

 व याच काही ऐकु नका बाबा, घरात दुसरी गाडी होती की.

स्वप्नील, तुझी स्कूटी, हि झुरळा सारखी गाडी चालवतेस तू रे रे. संध्याकाळ लागेल पोहोचायला.

रेवती, साहेब गेल्यावर्षी या झुरळा सारख्या गाडीनेच मारला होता नंबर, पहिला. कारल्याचा पोहोचून.

काका, दोघे, गप्प बसा बघू आधी.

तस पाहायला गेलं. तर अणू इथे आल्यापासून एकदाही बाहेर तू तिला फिरून अलिबाग व इतर ठिकाणे दाखवली नाहीस. उलट तिच्यामुळे तू फिरायला गेलास. हे बरोबर आहे की नाही.

स्वप्नील, हो आहे.

काका, मग उद्या तिला जा घेऊन कार्ल्याला. तिला पण एकवीरा दर्शन घडव.

रेवा, त्याची काही गरज नाही. मी आणेन तिला फिरवून.

स्वप्नील, बघा, आता काय म्हणतेय ती.

रेवती, मग काय म्हणू. जाणार आम्ही उद्या. बाबा तेवढं तेलाचं बघा.

काका, हा देतो मी.

काका, (स्वप्नीलला)

काय रे दाखवलास काय कारल्याची लेणी ईशानला.

स्वप्नील, हो दाखवली की. मस्त मज्जा आली. खूप फिरलो.

काका, काय मग काय म्हणतोय.

स्वप्नील, ( अण्विकास पाहून) दोन दिवस राहिलेलं ट्रेनिंग करून निघतोय. म्हणे. त्याच्या घरचे लग्नाचं बघताहेत म्हणत होता.

काका, व म्हणजे बोहल्यावर चढायची तयारी चाललेय म्हण.

स्वप्नील, हो तर.

काका, खूप चांगला मुलगा आहे. एवढा हुशार व चांगला नोकरदार पण, मला तर त्याचा स्वभाव जाम आवडला.

स्वप्नील, मघाशी फोन आला होता त्याच्या घरून, त्याला स्थळ आलय म्हणे. बायोडेटा पण पाठवलाय त्यांनी.

काका, काय मग बार उडणार तर.

स्वप्नील, मग काय. मी पाहिलीय मुलगी. मस्त आहे. बी ए सी झालीय. त्याच्या गावाकडीलच आहे त्याचा, राधानगरी साईडची.

स्वप्नीलचे बोलणे ऐकून रेवा व अण्विका एकमेकींकडे पाहू लागल्या.

रेवती, मग काय स्वारी खुशीतच असेल.

स्वप्नील, हो तर, आम्ही साकडं पण घातलं देवीला जमू दे म्हणून.

रेवती, तू काय वरदावडा आहेस का?

स्वप्नील, हो आहेच मी, त्याच्या सारख्या मित्रासाठी मी काय पाहिजे ते करीन. तुझं काय जातंय.

आण्विकास वाईट वाटत होत. पण न दाखवत ती कपबशा उचलते. व आतील जेवण खोलीत नेवून ठेवते.

तिला रडू येत होते. आपल्या भावना दाबून ती बाथरूम मध्ये गेली. व तोंडावर पाणी मारून ते पुसत ती रेवाच्या रुममध्ये आली.

रेवा तिच्या मागे आली.

तिजोरीच्या आरशात पाहून ती पावडर, तेल लावू लागली.

ती रेवाच्या रूमकडे जाताना तिच्या चेहऱ्यावर असणारे भाव स्वप्नीलने ओळखले. तो खूश झाला. त्याने ओळखले तिचे ईशानवर प्रेम आहे.

तो मनात, अस आहे होय. म्हणजे डॉक्टर मॅडम प्रेमात पडल्यात म्हणायच्या.

…… …..

Inter,. Evening. ६.३०. O’clock

अनु तोंड पुसते. डोळे पुसते. व आरशात पाहून पावडर लावत असते.

रेवा मागून येते.

रेवती, काय झालं नाराज व्हायला.

आण्विका, डोळ्यातून अश्रू ओघळत उभा आहे.

रेवती, गप तो पतंग उडवतोय. उगाच.

आण्विका, तो उगाच कशाला उडवेल पतंग,

रेवती, अग, तुला एवढं साधं कळत नाही. कालच्या चॅटिंगमध्ये त्याने कबूल केलंय की तू आवडतेस. व लगेच तो बोहल्यावर उभा राहील कसा? या स्वप्न्याला शंका आलेली दिसतेय. अंदाज काढत असेल मला. अन् जर का त्यानं लग्न दुसरीकडे करायचा प्रयत्न केला. तर राडा घालू लग्नात.

आण्विका, झालं ते वांग भजन पुरे. त्याला माझी परवाच नाही ये. मग मी का झुराव. सध्या मॅसेजचा साधा रिप्लाय देत नाही.

रेवती, अग कामात आहे तो. उगाच काहीतरी, वेड्यासारखं करू नकोस.

इतक्यात मावशी, हाक मारतो.

रेवा, अनु .

रेवती, आले थांब.

रेवती, (अनुला) डोळे पुस आधी.

आण्विका, डोळे पुसते.

आण्विका, (मनात) आता मी प्रथम मेसेज करणारच नाही. जोपर्यंत त्याचा येत नाही. तोपर्यंत.

Cut to…..

……. …….. …….. ….

क्रमशः पुढे.......

कळतं नकळत जुळले हे बंध भाग १३

 

कळतं नकळत जुळले हे बंध भाग १३

क्रमशः पुढे चालू......

Night. १०.३० clock. ईशान आपल्या राहिलेल्या रूम मध्ये. Inter

ईशान अंथरुणावर पहुडला आहे. डोळे मिटल्यावर त्याच्या समोर अण्विका चेहरा दिसतो.

तो आपल्या मनात,

ईशान, (मनात) काय करू. विचारू का तिला. कसे विचारू. ती काय म्हणेल? माझ्याबाबत तिला काय वाटत असेल. आज किती गोड दिसत होती. मला सारखं जेवताना फिरून फिरून वाढत होती. तिला पण मी आवडत असेल. एखाद्या बायको सारख वाढत होती. फोन करू का तिला. नको आज दमली असेल बिचारी. सकाळपासून माझ्यासाठी सारा खटाटोप करत होती. काय करू. काही सुचत नाही. तो मोबाईल मधील तिच्या फोटोची एक पापी घेतो.

अन् झोपी जातो.

…… ….. ……..

Morning. आण्विका मावशी घर. ५.३० inter.

आण्विका सकाळी लवकर उठून जेवण खोलीत आंबोळ्या करत आहे. तसेच तिने नारळाची चटणी, व बटाटे भाजी सुद्धा करत आहे. मावशी उठून जेवण खोलीत येते.

मावशी, अग मी करते.

आण्विका, नको, करते मी. रोज किती करतेस. एक दिवस आराम कर.

मावशी, खरंच अनु एवढी मोठी डॉक्टर झालीस खरं साधाभोळा स्वभाव आहे बघ तुझा. अन् रेवा बघ अजून झोपलीय.

आतून रेवती, जागी आहे मी मॅडम सकाळी सकाळी कौतुक नको.

मावशी, मांजरीन ऐकलं वाटत. अगदी सापाच्या कानाची आहे बघ.

रेवती, (आतील खोलीतून) वाघासारख्या नख्या पण आहेत. बघणार आहेस.

मावशी, झोप गप्प.

मावशी, काय म्हण धिरडी भारी बनवतेस अनु.

ज्या मुलीला हा स्वयंपाक जमला तिला सगळ आलं बघ.

इतक्यात स्वप्नील आपल आवरून येतो. अनु त्याला चहा देते.

आण्विका डब्बा भरत असते.

स्वप्नील, अनुची तयारी बघून.

रेवा काय डाराडुर पंढरपूर असेल.

आतल्या खोलीतून रेवती,

ऐ बैला तुझा नेवेद्य करायला आज काय बैलपोळा नाही. त्या अनुदीदीला कळतच नाही. जा कर जा बाहेर नाष्टा. तुला करून घालते. स्वप्न बघ. जा बायको करून आण जा, अन् करायला सांग तिला.

स्वप्नील, माझी बायको आल्यावर तू असशील नव्हऱ्याची धूणी धूत.

आण्विका डब्बा भरून देते.

आण्विका, नीट जा रे.

स्वप्नील, थँक्स दिदी. बरं निघतो मी बाय.

स्वप्नील ईशानला कॉल करतो. व आवरण्यास सांगून निघतो.

…… …… …..

Morning. कार्ला रोड. गाडीवर ईशान व स्वप्नील. Outer

स्वप्नील ईशानकडे जातो. त्याला पीक करून ते दोघे निघतात.

स्वप्नील, यार मला गाडी मारायचा कंटाळा आलाय.

ईशान, चल मी घेतो.

ईशान गाडी घेतो व चालवू लागतो.

त्याची गाडी चालवणे पाहून.

स्वप्नील, साहेब अत्यंत ट्रेण्ड आहात.

ईशान, अरे मी पाहिलं रायडिंग करत होतो.

सकाळच किती मस्त वाटतंय. नाही.

ईशान, हो .

थोड्याच वेळात ती कार्ला येथील पायथा मंदिरापाशी येवून पोहोचतात.

ईशान, चल नाष्टा करूया. कुठेतरी.

स्वप्नील , आणलाय मी घरून. डिकीत आहे.

ईशान, एवढ्या लवकर.

स्वप्नील, हो. पण थोड्या वेळानं करू वरती जाऊन.

आता इथ थोडासा चहा घेऊ.

ईशान, हा चल.

ते दोघे चहा घेतात.

व पायऱ्या चढू लागतात.

थोड्याच वेळात मंदिरात जातात. देवीच दर्शन घेतात.

ईशान, देवीसमोर, हे कारल्याचे देवी आई माझं अण्विकावर खूप प्रेम आहे. तिच्याही मनात माझ्याविषयी प्रेम निर्माण कर. व माझ्याशी तीचं लग्न होऊ दे.

तो नमस्कार करतो.

ईशान बाहेर येतो. तेथील लेणी ती पाहू लागतात. एके ठिकाणी लेणी पाहून झाल्यावर ती दोघे डब्बा खाण्यासाठी बसतात.

स्वप्नील डबा उघडतो.

ईशान, एवढ्या सकाळी नाष्टा रेडी. कोणी केला?

स्वप्नील, तुझ्या फ्रेंडन.

ईशान, कोणी.

स्वप्नील, अनुदिदीन.

ईशान, कोणी अण्विकाने. काय दिलंय.

स्वप्नील मस्त आंबोळ्या व चटणी भाजी दिलीय.

ईशान, एवढ्या लवकर केला तीन.

स्वप्नील, ट्रेण्ड आहेत डॉक्टर मॅडम.

मला वाईट वाटत मात्र.

ईशान, का रे.

स्वप्नील, काल रेवा म्हणत होती. अनुदिदिला घेऊन जा. त्यांना पण यायचं होत. कारल्याला.

ईशान, मग आणायचं होतास ना.

स्वप्नील, तू आपण जाऊन येवूया अस म्हणालास. व टू व्हीलर वरून दोघेच जाऊ शकतात ना.

ईशान, अरे आणखी एखादी टू व्हीलर घेतली असती.

स्वप्नील, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. मला वाटल तुला उगीच मुलींची लुडबुड वाटेल.

ईशान, काय हे मग मी मिनी ट्रिप काढली असती का? तस त्या नाराज झाल्या असतील.

स्वप्नील, रेवाने तर खूप वाद घातला. व सकाळी नाष्टा देणार नाही इथपर्यंत म्हणाली.

ईशान, मग.

स्वप्नील, अनुदिदिनं नाष्टा करून दिला.

 ईशान, खूप चांगली आहे. रे अनु.

स्वप्नील, हो ती सर्वांची काळजी घेते.

ईशान, आणायला पाहिजे होत त्यांना. आता मी काय दोन दिवसांनी जाणार. पुन्हा भेट होईल नाही होईल.

स्वप्नील, अस काय म्हणतोस. कोल्हापुरात तर राहता ना दोघे.

ईशान, तस नाही रे.

स्वप्नील, मग लग्न कर जा तिच्याशी.

स्वप्नीलचे बोलण ईशानच्या काळजाला भिडले. तो थोडा स्तब्ध राहिला.

ईशान, मी आहे तयार, पण ती , तिच्या अपेक्षा जास्त आहेत. तिला डॉक्टर हवाय. तिला स्थळे येत आहेत. तशी ती मला दारात तरी उभा करून घेईल काय.

स्वप्नील, ये गप्प, तू काय वाईट आहेस. मी काल पारखलय. तुला व तिला. मला तू दाजी म्हणून आवडलास. आता बघ तुझं मत काय. व मला जाणून घ्यायचंय तुझ्या मनात काय आहे. आता तिच्या मनातील जाणून घेतो.

ईशान, तिला सांगू नकोस लगेच. ती रागवेल.

स्वप्नील, नाही सांगत.

ईशान, तुला दाजी म्हणून आवडून काय करायचे. तुझ्या बहिणीला आवडायला हवं.

स्वप्नील, ये लई हवेत बाण सोडू नको. तू जर आवडत नसतास तर एवढं जेवणाचा उठारेटा केला नसता. व आता दिलेली ही शिदोरी पण सांगते. तू किती खास आहेस ते. बोलून तरी बघ.

ईशान, चालेल बघेन. कोल्हापूरला गेल्यावर. विचारेन तिला.

स्वप्नील, मग ये लग्नात लाडू खायला तिच्या. त्यापेक्षा मी विचारू का?

ईशान, नको. मी विचारेन योग्य वेळ आल्यावर.

खर सांगू तुला, मी तिच्याशी विवाह करून सुखी संसाराची स्वप्ने बघतोय.

स्वप्नील, तुझी स्वप्न स्वप्नच राहायचीत.

ईशान, अरे काही विचारायला गेलं. तिच्याशी की माझा काही ना काही घोळ होतोच. ती दूर जाऊ नये म्हणून भीती वाटते.

स्वप्नील, भ्यायच काय त्यात. एक तर हो म्हणेल नाहितर नाही.

ईशान, पाहतो कोल्हापूरला गेल्यावर.

स्वप्नील,  काय करायचे ते लवकर कर. चल आता थोडी लेणी पाहूया.

ते निघतात.

ते दोघे उरलेली लेणी पाहतात व   निघतात

….. …… …… ….. …..

Day. मावशी हाऊस. अलिबाग, inter

रेवती व अण्विका घरात आहेत.

रेवती बसलेली आहे.

आण्विका खोलीत फेऱ्या मारत आहे.

रेवती, फेऱ्या मारून काय होणार आहे.

आण्विका, मग काय करू. फोन करू का. कुठे आहेत ते. जाणून घेण्यासाठी.

रेवती, काही नको, उगाच लहान मुलाची विचारपूस केल्यासारख.

आण्विका, मग काय करू?

रेवती, पुस्तक वाच त्यापेक्षा.

आण्विका, बस वाचत तू.

असे म्हणून ती अंथरुणावर पहुडते.

….. …… ….. …… …..


क्रमशः पुढे......


कळत नकळत जुळले हे बंध भाग १२

 

कळत नकळत जुळले हे बंध भाग १२

क्रमशः पुढे चालू.......

Next day. Morning. ८.३० o’ clock inter


सकाळी सगळीकडे लगबग चालू आहे. जो तो कामात आहे.

रेवती घरातील स्वच्छता करत असते. स्वप्नील देखील मदत करत असतो. आण्विका जेवणखोलीत मावशीला मदत करत असतो.

काका बाहेरून येतात. स्वप्नील व रेवाला काम करताना पाहून

काका, अग सुधा बघ जरा बाहेर सुर्य आज पश्चिमेला उगवला आहे काय.

रेवती, बाबा सूर्य पूर्वेलाच उगवतो हा.

काका, नाही आज चक्क झाडू तुझ्या हातात. व स्वप्नील पण मदतीला आहे.

रेवती, अनुताईचा मित्र जेवायला येणार आहे ना, मग पसारा नको घरभर.

काका, जेवायला येणार आहे . की बघायला.

स्वप्नील, जेवयलाच येणार आहे. उगाच तुमचे पतंग उडवू नका. येणाऱ्या माणसाला घर चांगल दिसावं म्हणून चाललय.

काका, अस आहे होय. मग चालू राहू दे तुमचं काम,

काका आत येतात.

मावशी, काय हे, किती वेळ जेवण करायचं खोळंबलेय. बर, कोथिंबीर आणली आहे ना.

काका, हो मॅडम सगळ आणलय. तुम्ही जे जे सांगितलं होते ते.

काका, काय अनु जेवण मस्त बनव कोल्हापूर स्टाईलन .

आण्विका, हसते, तुमच्या मनासारखं होईल.

…. ….. ….. ….. …..

Morning. १०’ o’ clock. Outer, inter.

स्वप्नील आपले आवरून गाडी घेऊन जातो. व ईशानला घेऊन येतो.

ईशान व स्वप्नील घरात आल्यावर.

अनु पाणी आणून देते. ईशान पाणी घेतो. व सोफासेटवर बसतो.

काका, या साहेब बसा. काय कसं काय चाललय ट्रेनिंग.

ईशान, छान.

आण्विका पाने वाढते.

सगळे जेवायला बसतात.

मावशी व अणू जेवायला वाढू लागतात.

मावशी, बघ जेवण कसं झालंय. तिखट मिठ कसं आहे ते.

स्वप्नील, मस्त झालय.

मावशी, पाहुण्यांना विचार कसं झालय.

ईशान, सांगायचं म्हणजे अप्रतिम झालंय जेवण.

मावशी, अणूने केलय आमच्या.

ईशान, काय खरंच, डॉक्टर मॅडम ना जेवण पण बनवता येत.

स्वप्नील, मग मस्त करते जेवण.

ईशान, मला माहित नव्हतं.

रेवती, सुगरण आहे. सुगरण.

आण्विका, गप, उगाच हरभर्याच्या झाडावर चढवू नको.

सगळे हसतात.

….. ….. ……. ….

जेवण झाल्यावर. काका व ईशान बाहेर सोफासेटवर बोलत बसतात.

काका, काय अनु मित्राची ओळख तरी करून दे.

आण्विका, तुम्हीच घ्या की करून.

काका, बर.

ईशान, मी ईशान ईशान पाटील. मूळचा मी राधानगरीकडील एका खेड्यातील. पण लहानपणा पासून कोल्हापूर मध्ये आहे. तिथंच शिक्षण झालं. पुढे स्पर्धापरीक्षा दिली. व आज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून जॉईन होऊन मला दीड वर्ष झालेत.

काका, हा, मग छान आहे की. बर घरी कोण कोण असत.

ईशान, आई बाबा, व एक बहिण आहे.

काका, आम्ही पण तिकडीलच आहोत. गडहिंग्लजकडील. नोकरीमुळे इकडे. आणखी आहे पाच सहा वर्ष सर्व्हिस नंतर आपल्या गावी जायचं.

बर अनुशी ओळख कशी?

ईशान, मी व अणू दोघे क्लासमेंट आहोत.

काका, हा.

स्वप्नील, ट्रेनिंग झालं पूर्ण.

ईशान, आहे थोड. दोन दिवस विश्रांती नंतर दोन दिवस आहे.

स्वप्नील, मग त्यांनतर काय.

ईशान, जायचं कोल्हापूरला आपल्या ड्युटी वर.

काका, तुला बुद्धिबळ येत.

ईशान, माझा आवडता खेळ आहे.

काका, मग चल खेळूया.

ते बुद्धिबळ खेळू लागतात.

डाव रंगात येतो. शेवटी डाव अनिर्णयित होतो.

काका, मस्त वाटल खेळून

ईशान, हो मला ही.

आण्विका तिथे जवळच येवून बसलेली असते. पण ईशान जास्त खेळातच रंगलेला असतो. तो जास्त बोलायचं टाळतो तिच्याशी.

संध्याकाळ होऊ लागते.

ईशान, बराच वेळ झाला जायला हवं.

काका, काही काम आहे का?

ईशान, नाही आज उद्या सुट्टी आहे.

काका, मग थांब इथच खूप दिवसांनी असा खेळकर जोडीदार भेटला. रात्रीच जेवण पण इथच कर.

आण्विका, मधून मधून त्याच्याशी बोलायची. तेव्हा तो खाली पाहूनच उत्तर देत असे.

…… ……..

Night. आण्विका मावशी घर. Inter.

रात्रीच्या जेवणानंतर. ईशान निघताना.

काका, मस्त वाटल. आणखी किती दिवस आहेस. येत जा.

ईशान, आहे अजून चार दिवस मग निघणार.

बरं स्वप्नील उद्या काय करतोस तु.

स्वप्नील, का रे काही काम होत.

ईशान, काही नाही. उद्या जरा फ्री असशील तर कारल्याला जाऊन येवू.

स्वप्नील, चालेल की.

ईशान अण्विकाकडे एक नजर प्रेम पूर्ण नजरेनं टाकत.

बर, येतो मी

आण्विका, काळजी घे.

ईशान, ठीक आहे.

आण्विका, आणखी किती दिवस आहेस.

ईशान, आहे चार दिवस. मग निघणार .

ईशान बाय करतो. स्वप्नील त्याला सोडायला जातो.

……. ……. ……. ……

Night. अलिबाग अण्विका मावशी घर, inter.

स्वप्नील ईशानला सोडून येतो. आण्विका, व रेवती वाट पाहत असतात.

स्वप्नील गाडी पार्क करून घरी आल्यावर. काका जेवून बाहेर फिरायला गेलेत. मावशी जेवण खोलीतील पसारा आवरत आहे.

स्वप्नील येताच. रेवती इशारा करते. अनुला

आण्विका, काय सोडलास ना नीट.

स्वप्नील, हो. झोपलाही असेल.

आण्विका, बर काय म्हणाला, काही बोलला का.

स्वप्नील, कशाबद्दल.

आण्विका, हेच जेवण कसं झालं. घर वगैरे.

स्वप्नील, मस्त होते म्हणाला. बर आईला सांग. उद्या सकाळी लवकर नाष्टा कर . मी व ईशान जरा जाऊन येणार आहे. बाहेर कारल्याच्या एकविरेला.

रेवती, आम्ही पण आलो असतो ना.

स्वप्नील, तुम्ही नंतर जावा. फॅमिलीसोबत परवा बाबा आईला घेऊन.

रेवती, अनुला तरी सोबत घेऊन जा.

स्वप्नील, आम्ही टू व्हीलर वरून जाणार आहोत.

तिब्बल सीट कसे जाणार. प्रॉब्लेम येईल की.

रेवती, मग रद्द कर जाणे.

स्वप्नील, ते काही नाही. तो दोन दिवस आहे. माझ्याकडे त्याने एकच इच्छा मागितली आहे. परवा ट्रिपच्या वेळी एक रुपयाही मला खर्च करु दिला नाही. व माझा आता तो बेस्ट फ्रेंड झालाय त्याची एवढी इच्छा पूर्ण करायला नको मला. ते काही नाही. मी जाणार.

रेवती, अनुला न्यायचं नसेल तर उद्या नाष्टा विसर. जा बाहेर काहीतरी खा जा. खरच जरा तुझे पैसे.

ईशान, खर्चेन, खाऊ काहीतरी बाहेर.

आण्विका, रेवा गप्प,

(स्वप्नीलला)हे बघ तू जा उद्या मी करेन नाष्टा तयार. उगाच मावशीला त्रास नको.

स्वप्नील आपल्या खोलीत जातो. अनु मावशीकडे जाते.

आण्विका, मावशी तांदळाचे पिठ आहे.

मावशी, आहे की कट्यावर कडेच्या पितळी डब्यात.

मावशी, का ग, कशाला पाहिजे?

आण्विका, काही नाही. स्वप्नील व ईशान उद्या बाहेर जात आहेत. त्यांना नाष्टा द्यायला.

मावशी, करते की मी.

आण्विका, नको, करते. मी.

आण्विका किचन मध्ये जाते. व अंबोळीच पीठ भिजत घालते.

…… ……. …….. ……

Night. रेवती खोली. १०.३०. Inter.

आण्विका पाण्याची बॉटल ठेवते. व अंथरुणावर बसत.

रेवती, तू अस का केलंस गेलो असतो ना आपण दोघी स्कूटीने.

आण्विका, अग त्यांनी आपल्याला या अस देखील म्हंटल नाही. व येणार का अस देखील विचारलं नाही. मग कसं जायचं बोलवायच्या आधी.

रेवा, मी बोलू का स्वप्नीलला.

आण्विका, नको, आधीच आपण माझ्या लग्नाच्या वावड्या उठवल्या. त्यामुळे तो नाराज झाला. म्हणूनच तो आज माझ्याशी फ्रि बोलला नाही.

रेवती, सॉरी दीदी.

आण्विका, त्यात स्वारी काय म्हणायचं. तू एक प्रयत्न केला होतास ना. व आपल्याला कळलय. की त्याला मी आवडते. आणखी काय हवंय.

रेवती, पण मला वाटत तू जावस तिकडे.

आण्विका, नको, आपण परवा जाऊ काका मावशी सोबत.

रेवती, काय काका मावशी करतेस. तुझं वय नाही हे काका मावशी सोबत फिरायचे.

आण्विका, गप, बघू हा गुंता कसा सोडवायचा ते. अन् बरेच दिवस झाले. आता जायचं म्हणते. एन्ट्रानशीप साठी मला सरकारी दवाखाना निवडायचा आहे.

 काल वेदुचा फोन आला होता. की तो मुलगा बघून गेलाय म्हणून. तिचे पालक येणार आहेत. बाकीचं ठरवायला. तेव्हा मी म्हणते जाते त्यांच्या बरोबर.

रेवती, वेदु ताईला पसंत आहे ना स्थळ.

आण्विका, हो, तस त्याचे पाहुणे संबंधच पाहायचे होते. तसा तो पुण्यात असतो. त्याची माहिती स्वप्नीलने काढलीय. मी सेंड केली होती. चांगल स्थळ आहे. त्याचे आईवडील असतात जुन्नरला तिथे त्यांची थोडी शेतीवाडी आहे म्हणे. त्यांचे काका ती पाहतात. उगाच हातचं कशाला सोडायचं अस त्यांचं मत आहे.

व मलाही वाटत आता आणखी किती पालकांना त्रास द्यायचा. ते सांगतील तिथं लग्न केलेलं बर. वय पण झालंय लग्नाचं.

रेवती, ते तीच जमल, तुझं काय?

आण्विका, बघू काय महाभारत होतंय ते. माणूस जाम तापलाय ग. कसं व्हायचं माझं. दुसरीकडे कुठे बोहल्यावर चढायचा नाही ना.

रेवती, हा, बघते मी कसा चढतो ते. लग्ना आधी काडीमोड घ्यायला लावीन.

आण्विका, ये बाई आणखी काही घोळ करू नकोस.

रेवती, घोळ नाही ग होणार, बघूच कसा सरकतो मोती कलवाच्या तावडीतून. प्रेमात पडलेला माणूस दुसरीकडे जात नाही.

आण्विका, बघ बाई, नाहीतर कोण तरी यायची अन् कालव फोडून घेऊन जायची मोती.

रेवती, हे बघ कालव मोती सोड. पुन्हा कशी भेटणार. तो निघाला दोन दिवसांनी.

आण्विका, आई अंबाबाईलाच ठावं.

रेवती, मग आता काय करायचं.

आण्विका, बघू, उद्या उठून नाष्टा करायचा आहे.

 चल आता वेळ झालीय झोप .

लाईट बंद होते.

…… …… …… …….

nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com

क्रमशः पुढे......


वीरगळ कथा भाग१९

वीरगळ कथा भाग१९  Day / morning / gad केदार व सहकारी बसले आहेत. काही पहारा देत आहेत.  कनकाई भाकरी अन् थोड तिळकूट देते. प्रत्येकास अर्धी भा...