शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग१८

 वीरगळ कथा भाग१८

Day / outer / jangal

मावळे एकत्र जमलेले आहेत. केदार त्यांना बोलत आहे.

केदार :

 सवंगड्यानो आज आपल्याला एक जोखमीचं काम दिलंय. गनिमाने तळ ठोकलाय गडाखाली. अन वर गडावर आपले बांधव अडकलेत. आन् पाण्यबिगर उपाशी मारताहेत. ते जगले तरच आपण व आपला हा मुलुख तरुण जाईल. नायतर या यवनी सत्तेला आपला घास घ्यायला. वेळ लागणार नाही. तवा ही मोहीम आपण फत्ते करायची. चला.

( ते निघतात. लपत, छपत शत्रूला चकमा देऊन रसद गुप्त मार्ग पोहोचवतात. व परत येतात. )

केदार :

 जरा गंमत करूया काय?

मल्हारी :

 कुणाची?

केदार :

 कुणाची? काय कुणाची? झोपलेल्या यवनांची.

मल्हारी :

गुमान चल उगाच वाट दाऊ नकोस गनिमाला.

केदार :

यांना आमच्या वाटा गावायला , यांची खोकड होतील. शोधून शोधून.

रंग्या अआन तो चाप व बाण.

रंग्या :

 हा घे.

केदार :

 ( बाण तेलात बुडवून आग लावतो.)

आता बघा माझा नेम

( केदार बाण सोडतो. तो थेट गनिमाच्या तळावरील दारू गोळ्यावर लागतो. मोठा भडका उडतो. गोंधळ उडतो. ते निघतात. )

Cut to …..

…… ….. ……

Day / vada / inter

वाड्यात लोकांची ये जा होत असते. ज्योत्यावर सरदार फेरी मारत असतात. केदार व त्याचे साथीदार येतात. वाकून मुजरा करतात.

केदार :

 राम राम

 राम राम, कामगिरी फत्ते झाली, गडावर रसद पोहोचती केली.

सरदार :

 वा… छानच, चांगली बातमी दिलीस.

हनमंता…

( हणमंत तबकात तलवार घेऊन येतो. ती तलवार हातात घेत.)

सरदार :

मुला, ये...इकडे…

केदार :

 कोण मी?

 सरदार :

 हा तूच. ही घे समशेर. वीराच्या हातातच शोभते. आजपासून पडवीत असलेला घोडा तुझा. आजपासून तू शिलेदार. व तुझे सहकारी सुद्धा चाकरीत दाखल करून घेत आहोत. स्वराज्यासाठी राजांना तुमच्यासारख्या वीरांचीच गरज आहे.

( केदार तलवार घेतो. व लवून मुजरा करतो.)

Cut to …...

……. ……. ……. ……..

 Day / outer / road

मोठ्याप्रमाणात सैन्याचे आगमन होते. किल्ल्याला वेढे पडू लागतात. असाच एका गडाला वेढा घातला जातो

 …. …… …..

Night / ek tal / outer

मुघल सरदार:

 ( फिरत एका शिपायाजवळ येत. )

आंखो मे तेल डालकर ध्यान रखो l गनिम खतरनाक है l

शिपाई :

 जी हुजुर.

( तो पुढे जातो. )

Cut to ….

…….. ……. …….

 काही दिवसा नंतर …

Day / morning / fort room

दळण खोलीत स्त्रिया जात्यावर बसलेल्या आहेत. अर्धी बुट्टी भरून धान्य दळण्यास आणल्यावर.

सगुणा :

 एवढंच धान्य.

शिपाई :

 काय करणार. अंबारखान्यान तळ गाठलाय. आणणार कुठून? सात महिनं झालं. वेढा हालना झालाया, काय करावं.

सगुणा :

मेल कुठंन येऊन उलतल्यात. देवाला ठाव. एक एक राकुसच हाय जणू. पाण्यातल्या जळू वाणीच चिकटून बसल्यात गडाला.

कनकाई :

या महिन्यात जर तळ हलला नाही. तर उपाशीच मरावं लागलं.

शिपाई :

 आता आई भवानीलाच काळजी.

कनकाई :

लागलं सरळ, तिनं डोळ झाकलं नाहीत, कराल कृपा.

( पूर्वेला तोंड करून हात जोडते.)

बघ बाई आता, तूच पाठीराखी.

( त्या जातं ओढू लागतात. पीठ गळू लागतं. त्या गीत गाऊ लागतात. )

“ उगव दिशेला सुरव्या देव आला, कृपा कर ग माय आंबा. लाल ग कुंकू ठेव ग भाळा, रक्षण कर माझ्या धन्याला. आहेव मरण लाभू दे आम्हा. कृपा कर तुझ्या लेकरा. सरगाची पायरी नको ग मला. रक्षण कर तू शिवबाच्या राज्या.

Cut to……

…… …… …… ……


गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग १७

 वीरगळ कथा भाग १७

Night / inter / room

शेवंता दूध घेऊन येते. दार लावते. केदार इकडे तिकडे फिरत असतो. ती दूध ठेवते. व केदारच्या पाया पडते.

केदार :

 हे काय नवीन.

शेवंता :

नवीन काय, जुनीच चाल रीत हाय ही. नवरा देवासमान असतो. अन् तुम्ही तर मला नवीन जिवदान दिलं.

नाहीतर….

केदार :

 नाहीतर काय?

शेवंता :

 त्या पाळेगारानं मला त्या हबश्याच्या हवाली केलं असतं.

केदार :

 पण मला तर तो देवच वाटतो.

शेवंता :

 काय?

( ती वर पाहते. )

केदार :

 हो तर, नाहीतर आपली भेट झाली असती काय?

शेवंता :

 पोरी बाळी पळवणारा देव नव्हे राक्षस असतोया. , देवाचा योग म्हणन आपली भेट झाली.

केदार :

 देताय ना,

शेवंता :

 काय?

 केदार :

 दूध, थंड होतंय.

शेवंता :

अग बाई, राहिलंच की,

हा हे घ्या.

( केदार दूध घेतो. अन् पिऊ लागतो. )

 Cut to …..

…… ….. …….

Day / outer / Hanuman talim

घोड्यावरून एक सरदार येतो. आखाड्यात आत येतो. मुले दंड बैठका मारत असतात. सरदार आत येऊन नमस्कार गुरुजींना करतो.

सरदार :

 जय सदगुरू.

गुरुजी :

 जय सदगुरू.

गुरुजी :

 अचानक ऐन केलं. काय सेवा आहे.

सरदार :

 गडाभोवती कडं पडलय. वेडा नव्ह मरीआई आलीय. वरील शिबंदीत रसद पण संपत आलीय. फौज पण जागोजागी गुंतलीय. त्यामुळे कुमक येऊ शकत नाही. रसद पोहोचवायची हाय. वर हजार मावळा अडकून पडलाय. निकराचा लढा चालू हाय. पण उपाशी पोटी कसं लढणार.

गुरुजी :

 चांगले वीर तर एक मास झाले घेऊन गेलात. आता तर ही कवळी पोर हाईत, अजून मिसरुट पण फुटलं नाही यांना. अन् …. पाठवायच म्हणजे ……

सरदार :

 काय पण करा गुरुजी, पन्नास पोर जरी झाली तरी बास. एकदा रसद पोचती झाली की लगेच माघारी पाठवतो. मग चांगल वरीसभर गनिमाला झुलवू.

गुरुजी :

 ठीक आहे. बघतो काहीतरी करून.

Cut to ….

….. ….. …..

Day / inter / kedar home

मल्हारी वाड्यात येतो.

मल्हारी :

 केदार … केदार…

केदारचे बाबा :

 काय रे, काय काम हाय?

मल्हारी :

 राम राम तात्या.

केदार बाबा :

 राम राम येरवाळीच आलास , आता केदारी कुठला भेटतोय. झोपला असल वळकटीत अजून.

मल्हारी :

सांगावा आलाय.

केदारचे बाबा :

 कुणाचा र.

मल्हार :

 आखाड्यातून

( केदारी बाहेर येतो. )

केदार :

 काय रे,

मल्हारी :

सांगावा आलाय, लई जोखमीच काम हाय…. तवा …..

केदार बाबा :

अरे, लगीन होऊन चार दिस पण झाले नाहीत अजून , अन् लगेच कुठ चाललास.

केदार :

 काय तरी महत्वाचं काम असलं. म्हणूनच बोलावलं असलं.

बाबा :

 अरं पण….

( इतक्यात आई बाहेर येते. )

आई :

 अरं कुठं निघालास?

केदार :

 काम हाय, आखाड्यात.

आई सखू :

 अरं, पण अस वल्या हळदीन.

( केदार आपली ढाल, तलवार, भाला घेऊन बाहेर पडू लागतो. )

शेवंता :

 थांबा…..

 केदार :

 काय?

शेवंता :

 जोखमीच्या कामगिरीवर निघालास, औक्षण करते.

( केदार जवळ येऊन टिळा लावतो. ओवाळतो.)

 केदार :

 येतो.

( तो बाहेर पडतो.)

Cut to …..

……. ….. …..


शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग १६

वीरगळ कथा भाग १६

 Night / inter / Kedar home

बैलगाडी दारात उभी राहते.

गडी :

 अक्कासाब गाडी आली बघा.

सखू :

 आली. जीव भांड्यात पडला. काळजी मिटली म्हणायची.

( गाडीतून केदार व इतर मित्र व ती स्त्री उतरते. केदार पुढे येतो. )

 सखू :

 काय र, लई वकूत झाला.

( त्याच्या हाताकडे लक्ष जाते. )

 सखू :

 काय र हे हाताला?

 केदार :

 काय नाही, वाईच खरचटलं.

सखू :

 खरचटलं म्हणे, मला नको शिकवू. जखम हाय ही. सांग काय ते. आव जरा बाहेर या.

( केदारचं वडील बाहेर येतात. केदार पाया पडतो. )

 केदार :

 बाबा आशीर्वाद द्या, ही बघा गदा व कड जिंकलीय मी कुस्तीत.

बाबा :

 आर वा, भारी हाय की,

सखू :

 ते हाय, पण हाताला बघा.

बाबा :

 काय रे केदार, हाताला काय आणखीन.

मल्हारी :

 पाळेगाराशी झटापट झाली वाटत. त्या झटापटीत फरशी लागली.

सखू :

 आर माझ्या कर्मा. त्यो अन कुठून उलटला म्हणायचा.

वडील :

 हाणमा, वैद्यबुवाना बोलाव जा..

केदार :

 काय नाही, जरासं लागलंय.

वडील :

 जरासं होय, चांगलच लागलंय की.

वडील :

 अन् ही कोण मंडळी.

 जीवा :

 यांच्या पाईच रामायण घडलं संमद.

मुलगी :

मी शेवंता, गडवाडीच्या पाटलांची पोर, जत्रसंन येताना पाळेगारान हल्ला केला. हे होते म्हणून वाचले. नाहीतर माझं काही खरं नव्हतं. माझ्या मुळेच घडलं सगळं.

( ती रडू लागते.. )

केदारचे वडील :

 रडू नको बाळ, देवीआईची कृपा म्हणून वाचलीस. आजच्या या युगात अस रडून चालत नाही पोरींनी, त्यांनी पण भवानी सारखं शस्त्र उचलाय पाहिजे. व स्वतःच रक्षण केलं पाहिजे. तरच हे स्वराज्य वाचेल. अस प्रत्येक वेळी कोण वाली भेटलच अस नाही.

केदार वडील :

( सखूकडे पाहत. )

हे बघा, त्या मुलीला आत न्या. व तिच्या सोबत असणाऱ्या माणसांचं पण जेवणाच बघा. वैद्य बुवांना बोलावणं धाडलंय. येतीलच ते एवढ्यात. काय काळजी करू नका. एवढ्याशा वारान घायाळ होऊन पडायला. तो शेळपट नाही. ढाण्या वाघ हाय, शंभर वीर लोळविल .

सखू :

 जी…चल ग आत.

(वैद्यबुवा येतात. व उपचार करून जातात. )

Cut to …..

…… …… ……

Day / morning / kedar home

बैलगाडी झुंपलेली दारात उभी आहे. शेवंता व तिचे सहकारी गाडीत बसतात. गाडी निघते. केदारीस गुंगी असते. जाताना शेवंता पाया पडते.

बाबा :

 संस्कारी आहे पोर.

आई सखू :

 हा बरं, चला गाडी आली.

शेवंता :

 जी येते.

( गाडीत बसते. गाडी निघते. )

Cut to …..

…… ……. ……..

Day / evening / home )

केदारची औषधाची गुंगी उतरते. केदारी उठतो. घरात इकडे तिकडे फिरत असतो. त्याची आई तिथे येते.

आई सखू :

काय हवं बाळ.

केदार :

नाही नको.

आई :

बर.

केदार :

आई

आई :

 काय ते.

केदार :

 ती पावनी कुठे गेली?

आई :

 कोण?

केदार :

 ती काल आम्ही वाचवली. ती नाही का गडवाडीची.

आई :

 ती होय, गेली की तिच्या तिच्या गावाला.

केदार :

 लवकर

आई :

 लवकर म्हणजे,… लोकांची पोर, कशाला ठेवून घ्यायची? ज्याची त्याच्याकडे सुरक्षित दिलेली बरी. उगाच नसत लचांड कशाला मागे?

केदार :

 अग, दोन दिवस तरी ठेवून घ्यायची की नाही. किती घाबरली होती ती?

आई सखू :

 म्हणूनच धाडली जेची तेच्या घरला. तिला घरात ठेवून घेतो. अन् गाव चिखल उडवू दे. तू उगाच गुळमुळू करू नको. का मनात भरली तुझ्या?

केदार :

 आ …

( लाजतो. )

सखू आई :

 आ,,, लाजतोस काय? एका खेपत तिनं बाप्याची शेळी केली. दुसऱ्या खेपत गुलामच करायची. अहो, ऐकलत का?

बाबा :

काय ते?

केदार :

ए गप्प की उगाच कशाला विषय वाढवतोस.

आई सखू :

 मी वाढवते होय. अरे वा,

 आव, ….. शेवंता रुतली बघा तुमच्या लेकाच्या काळजात.

केदार :

 ए ., गप ग …

Cut to …… ….

…… …. …..

Day / outer / home mandal

 लग्न समारंभ

केदार व शेवंताचे लग्न होत. अक्षता टाकल्या जातात.

Cut to ….

….. …… ….


गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग १५

 वीरगळ कथा भाग १५

Outer / Day/ vangav boricha mal /

कुस्तीचा आखाडा अनेक लोक जमलेले आहेत.

एक व्यक्ती :

काय पाटील अवंदा पण कुस्तीत रंगत येणार नाही वाटतं.

पाटील :

अस का र.

व्यक्ती :

 अहो , गेली चार वर्षे झाली. भैरवाडीचा सत्तू पहिलवानच बक्षीस घेऊन जातो. त्याच्याशी लढायला कोणच पुढें येत नाही.

पाटील :

आर, आपल्या मावळात काय पहिलवानांची कमी हाय का?

जा जाऊन पुकार जो कोणी सत्तू पहिलवानाला हरवलं त्याला वनगावचा पाटील सोन्याचं कडं बक्षीस म्हणून देणारं म्हणून.

 व्यक्ती :

 अस म्हणता.

( तो पुढे आखाड्यात जाऊन )

ऐका हो ऐका जो कुणी चार वर्ष सलग जिंकलेल्या सत्तू पहिलवानास हरवलं. त्येला स्पर्धेतील मानाच्या गदे सोबत पाटील सोन्याचं कड देणारं हाइती हो ….

( एकजण तबकात धोतर उपरन व कडं घेऊन मैदानातून फिरतो. )

केदार :

मी जातो.

मल्हारी :

 काय अवगलास काय, तो बघ केवढा रेडा हाय, अंगावर बसला तर आतडीच बाहेर यायची.

केदार :

 ह, बघू तरी.

जीवा :

 गप्प उगाच असंगाशी संग नको. माणसानं आपल्या ताकदीच् काम करावं.

केदार :

 तू गप्प बघ कसा लोळवतो तेला ते.

( केदार मैदानात येतो. )

इसम :

 बघ आजुन पण, गडी ताकदीचा हाय.

केदार :

चालल.

इसम :

 नाव काय पावन.

केदार :

 केदार

इसम :

 गाव कोणत?

केदार :

 मालेवाडी.

दवंडी वाला :

ऐका हो ऐका आजचा जंगी सामना हा भैरवाडीचा कसलेला पैलवान व सलग पाच वर्षाचा मानकरी सत्तू पैलवान व हा मालेवाडीचा तरुण पठ्ठ्या केदार यांच्यात होणार आहे हो …..

व्यक्ती :

 चल हो सुरू.

( केदार कुस्ती खेळतो. व त्या पैलवानास अस्मान दाखवतो. हरवतो. )

 पाटील केदारीला मानाची गदा व कडे देतात. लोक केदारला उचलतात.

Cut to ….......

…… …………

Day / evening / outer / road

यात्रेवरुन परत येताना

वाटेत एक बैलगाडी उभा असते. एक माणूस कण्हत असतो. केदार आवाज ऐकून आपली बैलगाडी थांबवत. गाडीतून उतरतो. व त्या ठिकाणी जातो.

म्हातारा :

 पाणी … पाणी …

केदार :

 जीवा पिशवी दे ती.

( जीवा कातडी पिशवी देतो.)

केदारी :

 बाबा, घ्या पाणी.

( म्हातारा अडखळत पाणी पितो. )

केदार :

 काय झालं?

म्हातारा :

 देवीच्या जत्रसन येताना पाळेगारानं हल्ला चढवला.

मल्हारी :

 च्यामारी भिकारी कुठले लुटमार करायला सोकावलेत , राबून खायला काय होतं यांना.

म्हातारा :

लुटमार झाल्याचं काही नाही. पण पोरी पळवल्यात बाबा त्यांनं.

( आवाज ऐकू येतो. वाचवा ….. वाचवा…)

 केदार :

 मल्हारी, जीवा, काढा तलवारी. चला बघू…..

 जीवा :

 कशाला या भानगडीत पडायचं. ज्याचं ते त्याला निस्तारु दे. वेळ होतोय. लुटारुंची खिंड हाय ही. वाचवायला जायचो अन आपलीच थडगी सजायची.

केदार :

 चल हट, भित्रट कुठला , गरीब अबला आया बहिणींची अब्रु वाचवू शकत नाही. तो मर्द कसला.

मल्हारी :

चल बाबा, बघूया काय ते. जीवा तू बैलं सांभाळ. आम्ही बघतो. काय ते.

( केदार गाडीच्या कन्याखली असणारी तलवार काढतो. व मल्हारीकडे लगोरी देतो. ते दरीकडे जातात. तिथे त्यांना एक पाळेगार एका महिलेला उचलून नेताना दिसतो.)

स्त्री :

 सोड, सोड, मला

पाळेगार :

जास्त बोलशील तर इथंच खांडोळी करीन. चल गप गुमान.

स्त्री :

 कर हवं तर. अब्रुला बट्टा लागण्या परिस मराण बर.

पाळेगार :

 तुला मारायला नाही. तर विकायला नेतोय. हबश्याकडे.

तुझ्या बाचा बदला घ्यायचाय मला, बघितलास का हा वण.

( डोक्यावरील घाव दाखवत. )

तुझ्या बान दिलाय मला. बरच दिस पाळत ठेवून व्हतो. आज सापडलीस तावडीत.

स्त्री :

 सोड सोड मला.

( केदार व मल्हार दरडे जवळ येतात. )

केदार :

 ये सोड तिला.

पाळेगार :

कोण तू? जा गुमान नाहीतर खपशील उगाच.

काळू पाळेगार म्हणत्यात मला.

केदार :

 केदार चल ह्यो काळू पाळेगार हाय. यानं लई लोकांना मारलंय आजपतूर. उगाच नको त्या भानगडीत पडायला नग.

( पाळेगार ओढू लागतो. )

स्त्री :

 वाचवा… वाचवा…. मला.

केदार :

 ये सोड तिला. नायतर.

पाळेगार :

 नायतर काय करशील र?

केदार :

 इथंच थडगं बांधीन.

पाळेगार :

 तू कालच पोर, ह… माझं थडगं बांधणार. थांब आधी तुलाच बघतो.

ये धर हिला, याला दावतो माझा चांगलाच इंगा

( दुसरा पाळेगार त्या महिलेस धरतो. केदार व पाळेगार यांच्यात हातघाई होते. मल्हारी एक दगड लगोरीत घेतो. व मारतो. पाळेगार जखमी होतो. मल्हारी त्यास ठार मारतो.

दुसरा पाळेगार घाबरतो. अन् निघून जातो. या झटापटीत केदारीच्या हाताला थोडा घाव होतो. रक्त ओघळू लागते.)

स्त्री :

( केदारीस )

आई ग , रक्त

( ती आपल्या साडीचा पदर फाडून त्याचा दंड बांधते.)

 स्त्री :

 खूप उपकार झाले. आज, तुम्ही नसता तर.

( ती पाया पडू लागते. )

केदार :

 अहो , हे काय करताय. मी आपल्याच वयाचा आहे.

स्त्री :

 तरी पण आज तुमच्या रुपान देवच धावून आला बघा.

केदार :

 दीन दुबळ्याचं संरक्षण करण यातच खरा पुरुषार्थ असतो माणसाचा.

स्त्री :

 हा आपल्या मनाचा मोठेपणा झाला. नाहीतर. आजकाल या यवनांच्या राज्यात सर्व काही बाटलं जात आहे.

असा कोण वाली भेटतो आजच्या युगात.

मल्हारी :

 बर, चला आता अंधार होतोय. नाहीतर पाळेगाराच्या तावडीतून सुटायचो अन् वाघाच्या तावडीत सापडायचो.

केदार :

( हसत )

बर चला …

( एक सरदार दुरून घोड्यावरून पहात असतो. )

Cut to …..

….. …. … ….


शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग १४

 वीरगळ कथा भाग १४

Day / evening / 4.00 o’clock . / Inter / Ashvin HOME

घड्याळात टोल वाजतात. अश्विन विचारातून बाहेर येतो.

घड्याळाकडे पहात.

अश्विन :

 चार वाजले वाटत. आजोबांसोबत बाहेर जायचंय. तो वरील रुम मधून खाली येतो.

Cut to …..

…… ….. …..

Inter / Day - evening / Ashvin villege home /

अश्विन खाली येतो.

तात्या आजोबा :

 काय मग, मिळाली का माहिती.

 अश्विन :

 हो थोड वाचलं.

तात्या आजोबा :

 आवडली का?

 अश्विन :

हो आवडली.

अश्विन :

 बर आजोबा आपण फिरायला जाणार होतो ना?

आजोबा :

 हो जाऊया की? पण थोडास चहा घेऊन.

Cut to ……

…… …… ……

Day / outer / evening / village

अश्विन व आजोबा देवळात जातात. देवास नमस्कार करतात. अश्विन उडी मारून घंटी वाजवतो. प्रदक्षिणा घालून देवळा बाहेरील झाडाखाली कट्यावर बसतात. पुजारी येऊन प्रसाद देऊन जातो. अश्विन झाडाखालील दगड निरखू लागतो. तिथे एक वीरगळ असते. कॅमेरा विरगळीवर…..

Cut to …...

….. …… …… …..

प्रसंग दुसरा :

Day / outer / nadichya kathi maidanavr / madhyyugin kal

नदीच्या काठी मुले चेंडू मारून खेळत आहेत. एक तरुण मुलगा चेंडू मारतो. दुसरा चकवतो व एका झाडीत चेंडू जाळीत जातो.

गणू :

काय हे केदार, तुला कळत नाही, गेला ना चेंडू जाळीत.

केदार :

 त्यात काय? जाऊन आणुया परत.

मल्हार :

 आणू काय आणू, म्हाईताय नव्ह, ती जाळी कशाची हाय?

महादू :

 अरं, घोरपड हाय तिथं, सापाची पिलावळ, परवा हरबाच्या गाईला पायाखालचं झालंत , व पलीकडच्या बुरुंडीचा पाला मिळाला म्हणून वाचली. नायतर…..

गणू :

 आता काय करायचं.

मल्हारी :

हा केदारी पण ……

ज्योतिबा :

 तर काय , याचं कायमच अस आहे.

( केदार रागाने चेंडू अना याला जातो. तिथे चेंडू शोधताना एक साप फिस करुन अंगावर येतो. केदार त्याला शिताफीने पकडतो. )

ज्योतिबा :

 अर, सोड… सोड… तेला चावल की,

केदार :

 मला चावतोय. दातच् काढीन त्याचं. एका बुक्कित गार करीन.

गणू :

 आर ठेचा तेला. डूक धरलं तर बरं नाही व्हायचं.

केदार :

डूक धरायला, तो काय तुझ्यासारखा नाही. चिरकुट चेंडूसाठी भांडण करायला. तेला पण भ्या हाय की.

केदार :

चला सोडू याला डोंगरात लांब, यायला नको पुन्हा गायरानात,

( ते सापाला लांब जंगलात नेऊन सोडतात. साप सोडल्यावर निघून जातो. )

...... ..... ......

Day / evening / inter home

गणू आपल्या गोठ्यात गायी बांधून दारात पाय धूत असतो. आई घंगाळात पाणी ओतत असते.

गणू :

 ( हात पाय धूत )

आऊ आज गंमतच झाली रानात.

आऊ :

 काय रे झालं.

गणू :

 केदारी न भला मोठा नाग पकडला.

आऊ :

( पाण्याची घागर काखेत घेत. )

 काय म्हणतोस काय? आर चावला असता तर …..

गणू :

 लई धाडशी गडी, गावात त्याच्यासारखा कोण नाही बघ.

आऊ :

असलं आगाऊ धाडस करतोया, सखुच्या कानावर घालायला हवं.

गणू :

 ये बाई, गप्प बस, उगाच कळ नको लाऊस.

आई :

 गप तू.

गणू :

 च्यामारी सांगुनच चूक झाली. ते म्हणतात ना बायकांच्या तोंडांत तिळ रहायचा नाही. गप खाऊन गिळायच्या नाहीत. गावभर बोलत फिरायच्या ते पण बीन हालगीच्या.

Cut to …..

….. ….. …

Evening / Kedar home Village / inter

गणूची आई घरात प्रवेश करते.

आऊ :

 सखू ये सखू….

 केदारची आई सखू :

( ओट्यावर दुधाची चरवी ठेवत. हाक ऐकून मागे पाहत.)

 सखू :

काय व आऊसा

आऊ :

 काय सांगाव, तुझ्या केदारी न साप धरला म्हण. तो भी अस्सल नाग.

सखू :

 काय म्हणतेस. पण तो तर आत मोरीत हाय. हात पाय धूत.

आऊ :

 आव, आता नाही दुपारच्या वक्ताला गाय रानात.

सखू :

 काय म्हणतेस

सखू :

 केदार…. केदार …..

( केदार हात पाय पुसत आत येत. )

केदार :

 आहे इथंच, ऐकतोय मी.

सखू :

 काय ऐकते मी हे.

केदार :

 तू पण आऊ, गण्याच्या शब्दात गावलीस. अग, मेलेला होता तो.

सखू :

 उगाच काय पण बोलू नकोस, घे माझी शपथ.

केदार :

तूझं पण काहीतरी खुळ्यागत असतं बघ, अग, तो सापाचं भ्या घालत असतो सगळ्यांना. म्हणून म्या त्याला घातलं. अग, मेलेल होत ते पिल्लू.

सखू :

 अस, भयंकर कृत्य करत जाऊ नकोस ह. साप कधीपण धाकला म्हणू नये. तोच खरा घात करतो. जपून जात जा गायरा माग.

केदार :

बर बाई, घेईन काळजी. भूक लागलीय जरा दूध तरी दे.

सखू :

 आधी सांजवात लाव देवा म्होरं. सुरव्यादेव बुडालाया थोडा दम धर अस लक्ष्मी यायच्या वेळी खाव खाव करू नये. दारिद्र्य येतं.

केदार :

हं दारिद्र्य येतं म्हण तिला कळत नाही होय. बाळराजा भुकावला आहे. त्याला जेवण वाढावं ते. तुझं पण.

सखू :

 मला ज्ञान शिकवू नकोस. पूर्वीची माणसं चांगल तेच सांगत्यात.

( इतक्यात दवंडी वाजू लागते. सर्वजण अंगणात येतात. )

दवंडीवाला :

 ऐका हो ऐका, परवा वनगावच्या माळावर जखुबाईच्या यात्रेच्या निमित्तानं स्पर्धा भरविण्यात आल्यात हो. यामधी कुस्ती, दांडपट्टा, तलवार बाजी हाय, तवा जो कोणी यासाठी इच्छुक असेल त्याने परवा बोरीच्या माळावर हजर राहायचंय हो.

( दवंडीवाला पुढे जातो. गावातील मुले त्यामागे जातात. )

 केदारी :

 काय र जायचं काय, स्पर्धला.

मल्हारी :

 जायचं की, बघूया की जाऊन काय ते.

Cut to …

………… ….. ….. …….


रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग १३

 वीरगळ कथा भाग १३

Night / outer / village area

गावाबाहेर गस्त घालत असतात. अचानक झाडीत हालचाल होते. ती पाच दहा जण गावाच्या खालील भागातून हल्ला चढवतात. गस्तीवरील एका इसमाची हत्या करून ते गावात हळूच प्रवेश करतात. वैद्यबुवाच्या घरावर हल्ला चढवतात. मागील दार मोडून आत येतात. वैद्य बुवांना बांधतात.

एक चोर :

आवाज केलास तर कायमच गप्प करीन.

( वैद्य बुवा गप्प बसतात. चोर आत शिरतात. )

चोर :

 गुपचूप सोन दे नाहीतर थडगच तुझं इथं.

( जोग आंबा ओरडते. आवाज राखोळी करणाऱ्या गस्ती पर्यंत जाते. )

जोगआंबा :

थांब देते. पण मारू नका.

( घाबरून दागिने देते. कोयनली घाबरून पळू लागते. चोर तिला अडवतात. )

चोर :

 हललीस तर संपलीस. गप्प माळ दे ती गळ्यातील.

( कोयनली माळ देते. )

चोर :

 गाय सोड ती गोठ्यातली. अन् चला.

( साथीदार गाय सोडतो. ते गाय सोडून घेऊन जाऊ लागतात. अंगत खालील भागात येतो. त्यास गस्तीवरील माणूस पडलेला दिसतो. तो शिंगाड वाजवतो. झाडावर चढून चौघा जणांना आपल्या लगोरीच्या नेमाने टिपतो. चोर जखमी होतात. रक्ताळल्या कपाळाला हात लावत. )

चोर :

 आता येईल मज्जा. लई दिवस एखाद्याच डोक फोडावं वाटत होतं. चला रे.

( गाई ओढून नेणाऱ्याना अडवत गस्तीवरील तरुण एकत्र जमतात. )

अंगत :

 पळता कुठं? थांबा.

चोर :

 कोण तू मारणार मला. आजपर्यंत सातदशक डोई फोडलीया म्या.

अंगत :

 ती असतील उंदरं. अंगात ताकद नाहीं तर रग असावी लागते. चल ये बघू हिंमत तुझी.

( अंगत जोरदार हालचाल करत त्या चोरांना नामोहरन करतो. )

एक चोर :

माघार घेतलेली बरी नाहीतर आपलीच थडगी सजायची.

दुसरा चोर :

पण याला सोडायच नाय. याला संपवायचा.

पहिला :

 याला संपवायच्या नादात आपणच सापडायचो. चल,

तिसरा :

 चला वरची वस्ती सावध झालीय. हल्याळ पेटल्यात.

दुसरा :

 चल बघू नंतर पाहू.

( ते मागे सरकू लागतात. जाताना )

पहिला :

 मग पाहू काय? हे घे .

( तो एक धारदार शस्त्र फेकून मारतो. ते अंगतला वर्मी लागते. अंगत ते उपसून काढून परत त्यास मारतो. त्या चोराला लागते. तो मुर्चित होऊन पडतो. इतर साथीदार सर्व साहित्य तिथे टाकून पळ काढतात. अंगत जखमी झालेला आहे. वरच्या वस्तीची लोक येतात.

Cut to

……. ……. ………

Night / inter / vedybuva padvi HOME part

लोक एका घोंगड्यात उचलून अंगतला आणतात. वैद्यबुवांना सोडवले जाते. जोगआंबा जखमी असते.

वैद्यबुवा :

( अंगत जवळ येत. )

अंगत…. अंगत…..

अंगत :

 बुवा आता संपल सगळं, वाचत नाही म्या

वैद्य बुवा :

 थांब, करू काहीतरी. आंबाई यश देईल.

अंगत :

नाही बुवा घाव वर्मी हाय.

( घोंगडे रक्ताळलेले असते. अंगतची बायको मालव्वा, मुले शोभन व हिरण्य येतात. )

मालव्वा :

 अय्यो, काय झालं व हे घातच की,….. कस वो,… हे देवा रे.

मुले शोभन :

अण्णा, अण्णा.

( रडू लागतात. )

अंगत :

पाणी …. पाणी ……

( जोग आंबा पाणी आणते. अंगत जोग आंबास पाहून हाताची ओंजळ करू लागते. जोगआंबा हातातील पाणी पात्र त्याच्या तोंडास लावते. )

अंगत :

 पात्र उष्ट होईल ओ.

जोगआंबा :

 होऊ देत, झालं तर.

जोगआंबा :

( आपल्या पतीकडे पहात. )

 काय तरी करा ओ. पोर वाचवा अजून लई दिस पहायचे आहेत हो. मरायच वय नाही तेच.

( मालाधर बुवा मान खाली घालतो. अश्रू ओघळू लागतात.)

अंगत :

मला मरणाचं काय वाटत नाही. पण माझ्या या घराकड, लेकरांकड ध्यान ठेवा.

 एखादी भाकर द्या त्यांना एवढंच.

जोगआंबा :

कशाला लाजवतोस बा आम्हाला. , मी जोगआंबा वचन देते. तुला, तुझ्या कुळाचा उद्धार होईल.

( अंगत मरण पावतो. )

Cut to …..

.... ….. …..

Day / outer / morning

चित्ता जळत आहे. मालव्वा, तिची मुले, अंगतची आई रडत आहेत. जोग आंबा आपल्या गळ्यातील बोर माळ काढून आपला पती मालाधरच्या हातात देत.

जोग आंबा :

ही घ्या माळ, उभा करा विळगळ अन् हो,

( पाण्याचे भांडे उचलत. )

मी जोगआंबा आज हे दान देते की, माझ्या शेतातील लवण काठाचे शेत या अंगतच्या कुटुंबास दान देते. ज्याने माझ्या घरचे स्त्री धन व गोधन वाचवले. त्यास स्वर्गारोहण मिळावे. ही प्रार्थना आंबा मातेच्या चरणी करते. पाणी सोडले जाते.

Cut to ……

……. …… …

.

Day / outer / Village

वीरगळ उभा केली जाते. त्यास हळदी कुंकू लावून पूजा करतात. आरती करतात.

Fild sheen

रानात बैल नांगरत आहेत. अंगतची मालकीण शेत पेरत आहे. कॅमेरा परत वीरगळीवर येतो.

Cut to …… …..

…… …… …… …..



शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग १२

वीरगळ कथा भाग १२

Night / Patil vada / inter room

वैद्यबुवा वेलीच्या पानांचे चेचून रस काढतात. त्यामध्ये मध मिसळून खाऊच्या पानातून म्हातारीस चाटण करुन देतात.

वैद्य बुवा मालाधर :

 आता होईल बरे. प्रत्येक अर्ध्या तासाने हे औषध देत रहा. व्याधी हळू हळू कमी होत जाईल.

पाटील :

 हा…

वैद्यबुवा :

जड अन्न देवू नका. वरणा भात चालेल.

पाटील :

 तुमच्या रुपान देव धाऊन आला. तुमच धन्यवाद कस मानाव.

वैद्य बुवा :

 माझ्यापेक्षा अंगतला द्या काहीतरी.

पाटील :

 हा देतो की.

पाटील :

( गड्याला)

 ए जा रे, अन् एक भाताची गोणी दे त्या अंगतला.

गडी :

 हा हो.

( गडी आत जातो. )

Cut to …...

…… ….. …….

Night / vaydybuva HOME / outer

वैद्यबुवा घरात जात असताना पाठीमागून अंगत येतो. आपल्या घोंगडीतील धान्य त्यांसमोर धरत.

अंगत :

 बुवा, वैद्य बुवा

वैद्य बुवा :

 काय रे, मिळाले ना धान्य.

अंगत :

 हो, मिळाले, पण तुम्ही तर काहीच घेतलं नाही. घ्या की थोड तुम्ही यातल.

( आपली धान्याची घोंगडी पुढे करत. )

वैद्य बुवा :

 माझ्यापेक्षा तुला याची जास्त गरज आहे.

अंगत :

 तरी पण घ्या. थोडं.

वैद्य बुवा :

 अरे, तुलाच द्यायला सांगितले मी, घरी ने पोर खुश होतील तुझी.

बर, जेवलास का?

 अंगत :

 नाही अजून, जातो घरी काहीतरी केलं असलच.

 वैद्य बुवा :

 अरे, तुझ्या घरी काय आहे, काय नाही मला माहित आहे. तुम्ही कुणबी लोकांच्या शेतात राबता काय मिळतं ते ठाव आहे मला. चल ये बस पडवीत.

वैद्य बुवा :

 अहो, ऐकलत का? दोन पाने वाढा.

जोगआंबा :

( स्वयंपाक खोलीतून )

 हा वाढते. पण कोण?

( जोग आंबा बाहेर येते. पाने वाढताना अंगतला पाहून )

 जोगआंबा :

कोण तू, याला सांगताय होय वाढायला, त्यापेक्षा गावच बोलवा की.आम्हाला काय काम नाही.

अंगत :

बुवा, जातो, राहू दे.

वैद्य बुवा :

गप रे, ये बस, खा थोड माझ्याबरोबर. देतो तो देव, जोगआंबा नाही. समजलं.

( जोगआंबा मुरका मारते. जेवण वाढते. )

अंगत :

 बुवा, आंबा आई जरी कठोर बोलत असली तरी आतून प्रेमळ आहे. मला माहित आहे. माघारी माझ्या बायकोला काही बाई देत असते.

वैद्य बुवा :

 चल , जेव आता.

( ते जेवतात. जेवण झाल्यावर. हात धुताना. )

जोगआंबा :

 थांब, माझे उदकेचे पात्र बाटवशील.

( जोगआंबा गडूनं पाणी घेते. व अंगतच्या हातावर ओतते. तो ओंजळीने पाणी पितो. पाणी पिऊन झाल्यावर तो आपली घोंगडी व धान्य घेऊन निघतो. जोगआंबा आत येते. )

बुवा :

व्यवहार करायचा तसा करता. पण नको ते बोलून सर्व पुण्य घालवता.

जोगआंबा :

 घरात कन्या असलेल्या मातेस असच कठोर वागावं लागत.

बुवा :

 पाणी पिल्याने पात्र जर बाटत असत. तर नदीचे पाणी सर्व जीव पितात. ते तर आधीच वाटलेले आहे. अन् हो आपला प्रभू रामचंद्र तर निषाद राजाच्या घरी व शब्रीची उष्टी बोर खाऊन कधीच बाटले आहे.

 जोगआंबा :

पुरे तत्वज्ञान.

( जोगआंबा आतील खोलीत जाते. )

Cut to …….

….. ….. ……..


सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग११

 वीरगळ कथा भाग११

Morning /Outer / Village road nandgav /

एक भिकारी वेशात करमा गावातून भिक्षा मागत फिरत आहे. प्रत्येक घराची पाहणी करत आहे.

करमा :

 दे वो अण्णाव दे व माय गरिबाला अन्नाचं दान दे

( एक बाई बाहेर येऊन त्याच्या वाडग्यात भाकरीचा तुकडा टाकते. )

करमा :

 कल्याण ववू दे ग माय.

 (गावातून जाताना एकजण त्याला हाकलतो. )

करमा :

 बाबा दे र काय तरी.

व्यक्ती :

 चांगला हट्टा कट्टा दिसतोस की अन भीक मागायला काय झालंय. चल हट्ट इथून …

( करमा पुढे जातो. गावातून भीक मागत तो वैद्य बुवांच्या दारात येतो. )

करमा :

 ओ माय अन्न दे गो माय, तुझं घर सोन्या, नाण्यांन भरू दे ग माय.

( जोग आंबा स्वयंपाक घरात जेवत असते. ती घास घेणार इतक्यात भिकाऱ्याचा आवाज ऐकून ती बाहेर येते. )

जोग आंबा :

 आला बाई, जेवायच्या वक्ताला.

( ती एक भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर येते. भाकर पाहून )

 करमा :

काय माय कोरभरच, कालवण तरी दे थोडं.

जोग आंबा :

 घ्यायचं तर घे, नायतर गऊला घालते.

करमा :

 दे माय, खाईन कसं तरी.

( करमा वाडगा पूढे करतो. ती भाकर वाढते. तो तिच्या हातातील दागिन्याकडे पहातो. त्याचे डोळे विस्फारतात. )

 Cut to …..

……. …… …….

Day / outer / Patil home Village

वाड्याच्या आतील दालनात एक स्त्री विव्हळत आहे. बाहेरील जोत्यावर पाटील इकडे तिकडे फिरत आहेत.

पाटील :

 काय रे शिवण्णा वैद्यबुवांना सांगून आलास का?

शिवाण्णा :

हो येतीलच इतक्यात.

( वैद्य बुवा मालाधर येतात. )

शिवाण्णा :

 हे काय आलेच, ते बघा.

पाटील :

 बुवा लवकर चला अव्वाच्या पोटात दुखतंय.

वैद्य बुवा :

चला.

( आत जाऊन वैद्यबुवा अव्वाची नाडी परीक्षण करतात. व आपली पिशवी पाहतात. व विचार करू लागतात. कुठे दुखत आहे याची पाहणी करतात.)

पाटील :

 काही घाबरण्या सारखं

वैद्य बुवा :

 तितकस नाही, पण काळजी घ्यायला हवी. पण…

पाटील :

 पण काय आणखीन.

वैद्य बुवा :

 एक औषधी नाही माझ्याकडे, ती आणायाला हवी.

पाटील :

बर, कुठं मिळलं.

वैद्य बुवा :

 लांब जंगलात मध्य अरण्यात जावं लागलं.

पाटील :

 मग आता.

वैद्य बुवा :

दोन माणसांना धाडाल का मी सांगतो तिथे.

पाटील :

 पण एवढ्या अरण्यात जाण्यासाठी कोण तयार होईल.

वैद्य बुवा :

राखोळी करणाऱ्या अंगतला पाठवा. तो आणेल. पण राखोळी कोण करणार?

पाटील :

 ते बघतो मी, लावून देतो, एखाद्या गड्याला.

वैद्य बुवा :

 मग झालं तर.

पाटील :

 शिवाण्णा दोन गडी घे अन् जा वैद्य बुवांच्या बरोबर, सांगतात तिकडं.

( वैद्यबुवा व ते शिवाण्णा अन तिघे गडी निघतात. )

Cut to …..

…… ….. …

Day /Outer / village road

( वैद्यबुवा वाटेनं जाताना गावात )

वैद्यबुवा :

शिवा अंगत गायरानात राखोळी करत असेल. तिथे जा व त्याला सांग मागील गुरुवारी आणून दिलेली औषधी वैद्य बुवांनी आणायला सांगितली आहे.

शिवाण्णा :

 जी

( तो व दोन गडी गायरानात जातो. व वैद्यबुवा आपल्या घराच्या दिशेने निघतात. )

Cut to …..

…… ….. ……

Day / Outer / village gayran /

( अंगत रानात गुरे चारत असतो. शिवण्णा लांबून त्यास हाक देतो. )

 शिवण्णा :

 अंगत ये अंगत ये…. ऊ ..

अंगत :

ओ …. काय अण्णावो…

शिवण्णा :

वैद्य बुवांनी पाठवलंया. सांगितलंय पोटातील मुरुडेवर औषधं घेऊन आणायला.

अंगत :

 पण राखोळी करतोय जी. नंतर जाईन.

शिवण्णा :

सदबा व जम्बू करील, तू जा. पाटलाच् काम हाय?

अंगत :

 अस म्हणता, बर

( शिवण्णा जवळ जात. सदबाला )

 अंगत :

 हा सदबा त्या तांबड्या गाई जवळ जाऊ नकोस. तिचं ती काय चरती ते चरू देत. अन् ते करड खोंड लई द्वांड हाय. लोडकंन हाय गळ्यात तेवढं लक्ष ठिव बाकीच्याना सांभाळाय लागत नाही. बस मी येतोच दोन घटकात.

सदबा :

 जी.

अंगत :

( शिवाण्णाला )

चला…

( शिवण्णा, अंगत व एक गडी असे एकत्र निघतात. )

Cut to …

….. ….. ….

Day / outer / jangal

ते तिघे रानातून जात आहेत. वाटेत एक विषारी साप आडवा जातो. ते पुढे जातात. रातकिडे कीर कीर करत आहेत. अंगत कड्या जवळील दरीत असलेल्या एका झाडावर चढतो. व तेथील वेलीचा एक भाग तोडून घेतो. व त्यांजवळ घेऊन येतो.

अंगत :

हा चला.. मिळालं वशिद…

Cut to …….

……. …… …….



शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

वीरगळ कथा भाग १०

 वीरगळ कथा भाग १०

Outer / Day / evening / village road

 सूर्य मावळत आहे. अंगत गाई गुरे गावात आणत आहे. साध्या पद्धतीने बांधलेली मातीची गवताने शेकरलेली घरे. प्रत्येक घरी गुरे सोडून तो आपल्या घरी जातो.

Cut to ……

…….. …… ……

Inter / evening / angat HOME

माजघरात एका बाजेवर एक वृद्धा झोपलेली आहे. अंगत घरात येतो.

अंगत :

 आईसा…. आईसा….

( आईसाच्या कन्हन्याचा आवाज येतो. अंगत जवळ जातो. व अंगाला हात लावतो. )

अंगत :

 आईसा तुला तर ताप वाढलाय.

अंगत :

 मालव्वा… मालव्वा …

( आतून आवाज येत नाही. )

मालव्वा बाहेरून येते. एक काळया रंगाची तरुण स्त्री, तिच्या अंगावर चांदीचे दागिने असतात. )

मालव्वा :

 आया वो, कधी इल.

अंगत :

 कुठे गेली होतीस. घरात लक्ष नाही तुझे. बघ किती अंग तापलंय.

मालव्वा :

 आया वो, सकाळ पासून तर ठीक होत्या. दुपारी पेज पाजली तव्हा नव्हतं ओ.

अंगत :

( आउसाच्या पोटावरून हात फिरवत. )

खपाटीला गेलेलं पोट सांगत की खाल्ल की नाही ते. वैद्य बुवाकड जायला हवं. मूल कुठं आहेत. शोभन, हिरण्य. अंधार पडतोय घरी येऊच सोडून कुठं हिंडतयात, रात्रीस निशाचर फिरत, वाघ लांडगे कळत नाही. लक्ष नाही तुझं घरी. मुलांना शोध मी आलोच वैद्याकडून.

( तो उठतो. व निघून वैद्य बुवाकडे जातो. )

Cut to …..

…… ….. ….. ….

Night / outer / village road

अंगत गावातून रस्त्याने जात आहे. वैद्य बुवांच्या दारात आल्यावर.

अंगत :

 अण्णा वो वैद्य अण्णा.

( वैद्य बुवा पोथी वाचत बसलेले असतात. आवाज ऐकून कोयनली उठत असते. तिला थांबवून, जोग आंबा बाहेर येते. )

 जोग आंबा :

 काय रे , काय काम यावेळी काढलं.

 अंगत :

 आईसाला ताप आलंय. अंग नुसतं इंगळागत भाजतया. औषधी हवी.

जोग आंबा :

( त्रासिक नजरेने )

श्रीफळ आहे का?

अंगत :

 आता नाहीये, माझ्याकडे उद्या देईन की.

जोग आंबा :

 मग औषधी पण उद्याच ने.

अंगत :

 वैद्यबुवा नाहीत का?

जोग आंबा :

 भेटू शकत नाहीत. रात्र झाली, ताटी बंद झाली.

अंगत :

 द्या की माय.

जोग आंबा :

नाहीये, सकाळी ये.

( त्याचं बोलणं मालाधर बुवा आतून ऐकतात. हातातील पोथी उपडी ठेवून जानवे सरळ करतात. क्षमस्व म्हणून नमन करतात. व उठून बाहेर येत असतात.कोयनली त्यांना थांबवून  ती बाहेर येते.  अंगत निघालेला असतो. )

कोयनली :

 अण्णावो तुम्ही बसा . मी देते. औषधी.

( कोयनली आत जाते. एका द्रोणात औषधी घेऊन त्यात थोडा मध घालते. व बाहेर येते. तिला पाहून. )

जोग आंबा :

तू कशाला आलीस?

कोयनली :

 कशाला म्हणजे औषधी द्यायला.

जोग आंबा :

 नको तो अगोचरपणा करायला कुणी सांगितला?

कोयनली :

 कुणी म्हणजे अण्णावोनी सांगितलं. ते पोथी वाचत आहेत.

जोग आंबा :

 अशा फुकटच्या देयकाने दारिद्रय आणाल एक दिवस.

कोयनली :

 अंगत हे घे चाटण, चाटव तुझ्या आऊले बरे वाटेल.

अन् हो थांब जरा.

कोयनली आत जाते. एका पत्रावळीवर भात व सारं घेऊन येते. व त्याला देत.

कोयनली :

हा ने थोड घाल, म्हातारीला बरं वाटेल मऊ भाताने.

( तिला भात देताना पाहून )

जोग आंबा :

 एवढच काय देतेस, सर्व घरचं दान करून टाक की.

कोयनली :

 हो, अण्णावोनी सांगितलं तर ते ही देईन. तू जा रे.

Cut to ……

…… …… …

Night / angt che Ghar / majghr

अंगत घरातील आतील दालनात येतो. तिथे लहान पणती लावली आहे. तिच्या उजेडात आऊसेला उठवून बसवतो. तिला थोड भात चारवू लागतो.

अंगत :

 घे, हे थोडं खाऊन बरे वाटेल.

आईसा :

 कशाला इतकी धडपड तुझी, लेकरांना दे त्या. माझं काय झाड व्हायचंय, मी मरतो आता.

अंगत :

आऊसा, अस नको काही बोलू. घे हे

( अंगतची लहान मुले हिरण्य व शोभन)

 शोभन :

 आम्हाला ही हवा भात. खूप दिवस झाले खाऊन.

अंगत :

 आज नाही, आऊसेला बर नाही ना.

( ती दोघे हिरमुसून बसतात. )

आईसा :

ये इकडे ये घे.

( ती दोन्ही लहान मुले जवळ येतात. )

आईसा आपल्या थरथरत्या हाताने एक घास घेऊन त्यांना भरवू लागते. )

मुले :

 नको, तू खा. मी बोर खूप खाल्लेत.

 आईसा :

 मला काय माहित नाही काय? बोरांनी काय पोट भरत हो. घे एक घास मला बर वाटेल.

( ती दोघे एक एक घास घेतात. आईसा त्यांना चारवते. )

इतक्यात बिरवा तिथे येतो. व अंगतला हाक मारतो. )

बिरवा :

अंगत ये अंगत

अंगत :

 कोण ते.

बिरवा :

 आवाज पण वळकणा व्हय.

अंगत :

कोण बिरवा.

बीरवा :

व्हय बिरवा, आज वस्तीची पाळी तुझी हाय, ठाव हाय नव्ह

अंगत :

 व्हय, माहीत हाय, जाईन मी.

बिरवा :

 जाताना हणमंताला हाळी दे.

अंगत :

 हा देतो.

( बिरवा निघून जातो. अंगत आईकडे पाहत. )

 अंगत :

हा घे, खा तू, औषध पण घे हे. बर वाटेल

Cut to …..

 …… ….. …….

Outer / village / on road

 अंगत व हनुमंत दोघे मशाल घेऊन फिरत आहेत. अधून मधून ते घोषणा देत आहेत.

‘ होशियार, ‘

जागते राहो.

 Cut to …..

…… ….. ……

Day / outer / gayran

गाई चारत आहेत. अंगत खडकावर बसून बासरी वाजवत आहे. काही चोर तिथून निघालेले असतात. ते बासरी ऐकून बारकाईने न्याहाळत.

सीतू चोर :

 कोणत गाव र.

राजवा :

 नांदगाव हाय.

करमा :

 गाई हाईत वाटत, राखोळ्या चारतोय.

( ते तिघे पाहतात. )

राजवा :

 बरेच दिवस झाले. मोठा झोल करून.

सीतू :

 मग काय योजना.

करमा :

या गावावर धाड टाकायची.

राजवा :

 रेकी करायला पाहिजे.

सीतू :

 करमा, जमलं का?

करमा :

 न जमायला काय झालं.

सीतू :

ठरलं तर मग पुढची चोरी नांदगाव.

Cut to ….......

…… …… …..


चित्रपटाचे नाव : 🎬 कोकणकड्यावर सापडलेलं स्वप्न भाग ६

 चित्रपटाचे नाव : 🎬 कोकणकड्यावर सापडलेलं स्वप्न भाग ६ 🎬 चित्रपट पटकथा – PART 4 (Final Act) ACT 3 : प्रेमाची परीक्षा आणि विजय (पाने अंदाजे ...