शॉर्ट फिल्म स्क्रिप्ट मराठी

(script type=’text/javascript’> if (typeof document.onselectstart != “undefined”) { document.onselectstart = new Function(“return false”); } else { document.onmousedown = new Function(“return false”); document.onmouseup = new Function(“return false”); }(/scrift) Download Code

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

फ्रेंडशिप एक साहस भाग १७

 फ्रेंडशिप एक साहस भाग १७

Day / inter / prajkta home

( घड्याळाचा गजर वाजतो. प्राजक्ता उठते. आपले आवरते. जिन्यावरून खाली येते. फोन वाजण्याचा आवाज, सयाजीराव फोनवर उचलून बोलत असतात. ती जिन्यावर थांबते. कान लावून ऐकू लागते. फोन ठेवल्यावर, जवळ जात.)

प्राजक्ता :

 कुणाचा कॉल होता?

सयाजीराव :

 मित्राचा.

प्राजक्ता :

 काय झालं.

सयाजीराव :

 आणखी काय होणार, तुझ्या मनासारखं झालं.

प्राजक्ता :

 काय मनासारखं.

सयाजीराव :

 तो गाईड येणार नाही. त्याच महत्त्वाचं काम आहे.

( प्राजक्ताचा चेहरा आनंदी झाला. पण तस न दाखवता.)

प्राजक्ता :

 मी माहिती काढलेय, सगळी, अन् ड्रायव्हर काका आहेत की सोबत, काळजी कशाला करताय?

सयाजीराव :

 मुले कितीही मोठी झालीत तरी आई वडलांना ती लहानच असतात. अन् तू तर आमची गोड बाहुली.

काळजी तर वाटणारच बाळ.

प्राजक्ता :

 पण बाबा, आता ही बाहुली मोठी झालेय, व सशक्त ही, फक्त आशीर्वाद पाठीशी असू द्या.

( वाकून नमस्कार करते.)

सयाजीराव :

 तो तर कायमच तुझ्या पाठीशी आहे. पण टेक केअर.

( प्राजक्ता मान डोलावते , आपल्या रूममध्ये जाते. अन् एस म्हणत नाचू लागते.)

Cut to …….

…… ….. ……

Day / OUTER / prajkta home

गाडी उभा आहे. सर्व साहित्य डीगित ठेवत आहेत. प्राजक्ता आशीर्वाद घेत आहे. सुमती ही सरलाची मुलगी उभा आहे.

सावित्रीबाई :

 नीट जा, अन् वेळोवेळी फोन करत रहा.

प्राजक्ता :

 करतो बाई,

(प्राजक्ता नमस्कार करते)

सयाजीराव :

यशस्वी हो.

सावित्रीबाई :

परमेश्वर कल्याण करो.

आजी :

 विजयी भव.

प्राजक्ता :

 असा आशीर्वाद पाहिजे बघ.

प्रदीप :

 अन् माझ्या.

प्राजक्ता :

 तुझ्या कशाला पडायला हवं?

प्रदीप :

 हे काय बोलणं झालं. मोठा आहे मी तुझ्यापेक्षा.

प्राजक्ता :

एवढा कुठं मोठा आहेस, फक्त दोनच वर्षे ना.

प्रदीप :

आई बघितलस का?

आई :

अग, पड ग दादा आहे ना तुझा?

प्राजक्ता :

बर बाई, पडते.

(प्राजक्ता नमस्कार करत.)

प्राजक्ता :

 हा, आशीर्वाद दे.

प्रदीप :

 लवकर लग्न होऊ दे.

प्राजक्ता :

 बघ ना ग आई, मला कसला आशीर्वाद देतोय ते.

आई :

 प्रदीप, दे बर सरळ आशीर्वाद.

प्रदीप :

 बर घे, भगवा फडकवून ये.

आई :

  सरू अग् सरू, कुठं गेली ही.

( सरू येते, तिच्या हातात वाटी आहे, तिची मोठी मुलगी सुमती पण सोबत आहे. ती तिला सूचना देत आहे)

सरू :

 हे बघ प्राजक्ता ताई आपल्याच आहेत. त्या निमित्ताने का असेना तुला फिरायला मिळतंय. त्यांचं सगळं एकत जा.

सावित्रीबाई :

 काय ग, आत काय करत होतीस.

सरू :

 काही नाही, दही साखर आणत होते.

आजी :

 हे अगदी छान केलंस, मी तर विसरलेच होते. दे पोरींच्या हातावर.

( सरू दही साखर देते. तिच्या डोळ्यात थोड पाणी येतं.)

 आजी :

 सरू हसत.

सरू :

 कळत हो मला आनंद अश्रू आहेत हे, तुमच्यासारख्या थोरांचा आशीर्वाद असेल तर आपली प्राजक्ता ताई सगळे गड सर करेल.

प्राजक्ता :

 हा निघतो आम्ही.

आजी :

निघतो नाही, येतो म्हणावं.

प्राजक्ता :

बर  येतो.

( त्या दोघी गाडीत बसतात.)

सयाजीराव : ( ड्रायव्हरला)

 नीट घेऊन जा, अन् तिच्या हातात गाडी द्यायची नाही.

ड्रायव्हर :

बर , साहेब.

( गाडी जाताना दिसते.)

Cut to …..

…… ……. …….

DAY / outer- inter / Hostel

(गाडी हॉस्टेल बाहेर उभा आहे. प्राजक्ता  ड्रायव्हर शेजारी बाहेर उभा राहून हॉर्न वाजावते. आवाज ऐकून श्वेता खिडकीतून पहाते. )

श्वेता :

 ए आवरा चला लवकर गाडी आली.

( रेवा बॅग घेऊन जाताना )

अनुजा :

 ए माझी पण घे ना.

रेवा :

 माझीच जड झालेय, अन् तुझी कशी घेऊ?

वेदिका :

 एवढं काय काय घेतलय?

रेवा :

 यात तिघिंच साहित्य आहे.

वेदिका :

 चल आता.

( मुली बाहेर पडतात, गाडीकडे जातात )

वेदिका :

 श्वेता कुलूप लाव.

( खिडकीतून कुलूप घेते. रुम लाईट बंद करून कुलूप गडबडीने लावते. त्यांना जाताना पाहून.)

तन्वी :

 आज कसं हॉस्टेलच वातावरण आनंदी आहे ना.

मानसी :

 का ग.

तन्वी :

 काही नाही, हॉस्टेल मधील उनाडकी कमी होईल.

मानसी :

 हो ग, किती बरं वाटतेय.

श्वेता :

तनु बाळ ती चिमणीची चोच उघडुन लई चिवचिव करू नकोस काय? अन् आम्ही आहोतच उनाड, म्हणून तर तुझ्यापेक्षा पाच टक्यानी पुढे आहोत.

( मानसीला उद्देशून )

 अन् तू ग कोथंबिरीची पेंडी, आधी त्या झिपर्या बांध, सारख्या वेणीतून बाहेर आलेल्या असतात.

अन् हो सांगायचं राहिलंच आम्ही चाललोय स्वराज्याची राजधानी सर करायला.

मानसी :

 काय ग तन्वी, एक् गड चढायला एक वर्ष घालवला, बाकीचे चढेपर्यंत पाक म्हातारी व्हायचीस .

श्वेता :

 म्हातारी तू अन् तुझी आजी, मी एका वर्षात सगळे गड सर करेन, अन् हिम्मत बघायची असेल तर येतीस का कुस्ती खेळायला.

मानसी :

 कुस्ती खेळायला मी काय बापय नाही तुझ्यासारखा.

श्वेता :

 हो का, लगीन झाल्यावर खेळ मग.

( वेदिका खो खो असते. हॉर्न वाजतो)

वेदिका :

 चल लवकर, उगाच यांच्या नादाला लागायला नको, मांजरीनी कुठल्या. चांगल्या कामाला निघालो की आल्या लगेच आडव्या.

खालून प्राजक्ता :

 श्वेता श्वेता , लवकर ये. अजून काय करतेय ही.

श्वेता :

 तुम्हा चीचुंद्र्याना नंतर बघते.

Cut to …

…… ……

Day / outer / hostel road

(श्वेता व वेदिका येत आहेत. श्वेता चिडलेली आहे. बाकीच्या मुली सीटवर बसत आहेत. श्वेताला पाहून) 

प्राजक्ता :

 ए बाई, हसून प्रवासाची सूरवात कर.

श्वेता :

 हसणार कसं, जाताना दोन मांजरी आडव्या आल्यावर.

प्राजक्ता :

 कोण.

श्वेता :

 ती मानसी अन् तन्वी.

प्राजक्ता :

त्यांच्याकडं कशाला लक्ष द्यायचं?

( गाडीत बसलेली रेवा )

रेवा :

 तिकडे लक्ष द्यावं लागत नाही. त्या देण्यास भाग पाडतात.

प्राजक्ता :

 आता चालुया का?

( श्वेता गाडीत बसले. हळू आवाजात प्राजक्ता खुणावते.)

श्वेता :

कूठे आहे तो?

प्राजक्ता :

 त्याचं येणं रद्द झालं.

श्वेता :

 ( आनंदाने )

 या s s किती गुड न्यूज दिलीस तू.

( ड्रायव्हर गमतीने पाहतो.)

श्वेता :

 काका, काही नाही, आमची दंगा मस्ती चालयचीच.

( ड्रायव्हर क्यारेजवर साहित्य फिट्ट करतो. गाडी चालू होते. निघते. त्या एकमेकींच्या कानात कुजबुजतात. व गाईड न येण्याचे सांगतात. त्या हसतात. गाडी जाताना दिसते.)

Cut to ……

…… ….. …..

Day / outer / on road

( गाडी हायवेला धावत आहे. वारे मारत आहे. प्राजक्ता इशारा करते. श्वेता खिडकीची काच खाली करते. रेवा वेदांगीच्या अंगावर झोपत आहे.)

वेदिका :

 ये झोपाळू, लागली लगेच पेंगायला.

रेवा :

 असू दे ना ग, थोडा वेळ मस्त वाटतंय.

वेदिका :

 तुला मस्त वाटतंय पण मला अवघडल्यासारखं झालंय.

श्वेता :

 असू दे ग वेदे.

( गाडी धावताना दिसते. संगीत सॉफ्ट ऐकू येत आहे.)

Cut to …..

…… …… ……..

Day / Karad Citi / outer

 गाडी कराडमध्ये जाताना दिसते.

Cut to ……

….. …… …..

DAY / OUTER / karad Citi Sangam ghat.

( प्रीतिसंगम घाटावर मुली जात आहेत. हसण्याचा आवाज. रेवा धावत जाते.)

श्वेता :

 अग , ये हळू , पायऱ्या निसरट आहेत.

रेवा :

 या दिवसात कुठं असतं शेवाळ.

 श्वेता :

 अग, नदीला पाणी भरपूर असत या ,  बघ पुढे जरा.

( रेवा पहाते. )

 रेवा :

 खरचं की.

( त्या पाण्यात उतरतात व पाय धुवू लागतात. व नदीस नमस्कार करतात.)

वेदिका :

 थंडगार पाणी पायावर पडलं की किती बर वाटत ना.

माधवी :

 हो ना, उन्हाळ्याच्या दिवसातच पाण्याची किंमत समजते.

थकवा निघून गेला बघ….

( थोडावेळ फिरतात. व नमस्कार करुन गाडीकडे जातात. प्राजक्ता घड्याळात पहाते.)

प्राजक्ता :

ये चला आटपा, पुढे जायचय.

श्वेता :

 हो चला ग,.. पटकन जागा पकडा, वेळ नको.

( गाडीमध्ये बसू लागतात. गाडी निघताना दिसते.)

Cut to …..

…… ……

Day / outer in bolero/ road

( ड्रायव्हर जुनी गाणी लावतो. ते ऐकून )

श्वेता :

 ओ मामा, काहीतरी नवीन लावा. ते रडव गाणं नको.

( गाणी चेंज करतात, मुली गाडीत डान्स करू लागतात. रेवा प्राजक्ताला खुणावते. प्राजक्ता नजरेने सहमती देते. ती पॉपकॉर्न खाऊ लागते.)

Cut to …….

….. …… …..

Day / outer / satara Citi

 ( साताऱ्यात गाडी येते. महाबळेश्वर रोडला आल्यावर.)

 प्राजक्ता :

 थांबवा पुढे एका बाजूला.

ड्रायव्हर :

 हा.

श्वेता :

 इथ काय  काम आहे?

प्राजक्ता :

 काहीतरी नाष्टा पाणी करूया की

श्वेता :

 नको उगाच खर्च, व वेळ पण होईल, वडापाव घेऊ फक्त.

प्राजक्ता :

 त्यापेक्षा तिकडे हॉटेल आहे की.

श्वेता :

 नाही, नको. वडेच घेऊया.

( त्या वडे घेतात. प्राजक्ता बील भागवताना )

श्वेता :

 थांब , मी देते.

 प्राजक्ता :

 गप.....

(टपरीवाल्याकडे वळून )

भाऊ, पे . टी .एम कुठे आहे?

( टपरीवाला  इशारा करतो. )

( प्राजक्ता ऑनलाईन पेमेंट करते.)

श्वेता :

 काय , हे, मी केलं असत ना.

 प्राजक्ता :

 चल, बस गाडीत.

Cut to …….

….. ….. ….

Day / outer / on road /in bolero

( महाबलेश्र्वर रोडला गाडी निघाली आहे. )

माधवी :

 थोड पुढं गेल्यावर घेतल असत ना.

प्राजक्ता :

 पुढे कुठे? इथ कराड पासून माणूस व्याकूळ झालंय.

माधवी :

 कोण?

 प्राजक्ता :

 आणखी कोण असणार, रेवा आपली.

श्वेता :

 मघापासून म्हटल, कोण चिमटे काढतय. काय ग रेवे, सांगता येत नाही.

रेवा :

 तुम्ही तर नाष्टा पाण्याचं नावच काढेनासा. काय करू, सकाळी तर थोडासाच केला होता.

 वेदिका :

 काय, थोडासा नाष्टा, चांगल्या पाच चपात्या हादडल्यास एकटीनं. तुझ्या एकटीच्या नाष्ट्यामध्ये आम्ही चौघी नाष्टा करतो . भुजंग शिरला नाही ना पोटात.

प्राजक्ता :

ए खाण्यापिण्यावरून काही बोलायचं नाही हं , खाऊ देत, आणखी आणते.

श्वेता :

 माधवे, वेदे , पोटगी जास्त भरल्यासा ना, नाहीतर निम्या रस्त्यातच संपायची.

वेदिका :

 काळजी नको, नियमापेक्षा जास्त नाही मिळणार कुणाला, देईल ते घ्या, व मिळेल ते खा.

श्वेता :

 म्हणजे रेवा कठीण आहे तुझं?

प्राजक्ता :

 मी असताना घाबरु नकोस रेवा.

श्वेता :

 नवरा तेवढा मळेवाला भेटाय पाहिजे हिला.

वेदिका :

 म्हणजे शेतातील निम्मं उत्पन्न हिच्याच पोटात.

रेवा :

 एवढी पण खादाड नाही हं… चांगल निर्जळ व्रत करु शकते. दोन दोन दिवस.

वेदिका :

 मग करच तू आजपासून दोन दिवस.

अनुजा :

 होय, या बाई व्रत करायच्या, आणि आम्हाला हिला डोक्यावर घेऊन गड उतरायला लावायच्या. त्यापेक्षा काय खायच ते खा बाई, तुला माझी फुल्ल परमिशन.

( हसण्याचा आवाज. )

Cut to …....

….. …….. ……


शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

फ्रेंडशिप एक् साहस भाग १६

फ्रेंडशिप एक् साहस भाग १६

 Night / inter / prajkta home/ room

(प्राजक्ता आपले साहित्य ठेवत आहे. आजी येते. दरवाजा ठोठावण्याचा आवाज, प्राजक्ता दरवाजा उघडते.)

आजी :

 काय करतेस,

प्राजक्ता :

आवरतेय,

अस काय हे आजी, पपांचा विश्वास नाही का माझ्यावर, ड्रायव्हर, सरूची मुलगी इथपर्यंत ठीक होत. पण आता हा गाईड कशाला हवाय?

आजी :

 अग, अनोळखी ठिकाणी जाताना असावा एक वाटाड्या. त्यात काय एवढं.

प्राजक्ता :

 अग, पण तो ओळखीचा ना पाळखीचा, व वाटाड्या घ्यायला मी काढलीय सर्व माहिती. एवढी अक्कल आहे मला, उगाचच एखादं कुकुल बाळ असल्यासारखं बोटान धरून चालायला मी काही लहान नाही, बावीस वय आहे माझं. आता.

आजी :

हे बघ, मुल किती मोठी झाली तरी ती आई वडिलांना लहानच वाटतात, समजल काय?

प्राजक्ता :

 एवढं पण लहान समजू नये, कुबड्या हातात घेऊन आयुष्यभर चालत राहण्याजोग.

आजी :

 अग, असू देत, इतका कसला विचार करतेस, गाड्याला काय आहे चीपडाच ओझं, बसेल एका कोपऱ्यात तो,

प्राजक्ता :

तो चीपडा आहे का उस बघूच , नाही त्या गाईडचा टाईड केला तर प्राजक्ता नाव सांगणार नाही.

आजी :

 अग, हळू बोल, उगाच ऐकू जायचं व ट्रीप रद्द व्हायची.

प्राजक्ता :

हुं…. होते कशी ट्रीप रद्द, बघतेच मी,

(बॅग भरण्याची क्रिया)

Cut to …..

……. ….. ……

Day / outer /garden

प्राजक्ता व मैत्रिणी विचार करत आहेत. एकमेकींच्या पाठीस पाठ लावून बसल्या आहेत.

श्वेता :

हे एक् नवीनच कोड घातलय.

प्राजक्ता :

 माझं तर डोकं दुखाय लागलंय.

रेवा :

 सांग की तुझ्या पपांना, गाईड वगैरे काही नको म्हणून.

प्राजक्ता :

 ए बाई, गप, तुझं डोकं शांत ठेव, अस काही म्हणाले ना, ट्रीप कॅन्सल करतील व आपलं आरोहीला दिलेलं चॅलेंज तसच राहील. व ती चीडवेल आपल्याला.

वेदिका :

 ते तर आहेच म्हणा,

रेवा :

 म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर सी सी टिव्ही कॅमेरे येणार,

अनुजा :

 हो तर, केवढी मज्जा करायचं ठरवल होत. मी तर रोज स्वप्न देखील पहात होते. कोडच घातलय हे.

प्राजक्ता :

कोड तर आहेच, पण या कोड्याला कोड्याताच घालून सोडवायला हवं. सरूची मुलगी व ड्रायव्हर काकांना कसं गुंडळायचं हे माझं काम, पण हा ट्रेकर आहे ना याच काय करू.

वेदिका :

 तुला त्याचा नाव पत्ता काही माहित आहे का?

आपण फेसबुक वा इंटरनेट वरून माहिती काढू.

प्राजक्ता :

 माहीत असत तर आधीच त्याची कुंडली काढली नसती का?

श्वेता :

 बघू त्याचं काय करायचं ते, आधी पुढ्यात तरी येऊ दे.

प्राजक्ता :

 ये बाई, जपून काय करायचं ते करा, पपांच्या ओळखीचा आहे तो.

श्वेता :

असू देत कितीपण दांडगा पहिलवान, माती चारू त्याला.

माधवी :

अग, तो काय भांडायला येत नाही आपल्याशी, तो एक ट्रेकर आहे, आपल्या मदतीला येतोय, समजल का?

अनुजा :

 ए, बाई, भोळी आहेस, तो मदतनीस नाही , वाचमेन आहे वाचमेन. या मोठ्या लोकांचं काही खरं नाही, ते दाखवतात एक अन् करतात एक.

प्राजक्ता :

 ए आने , गप, उगाच कायपण बोलते,

 श्वेता :

तू गप्प  ग.. उद्याचं उद्या बघू.

प्राजक्ता :

 हो, खरंच, उद्याचं बघू,…. निघते मी, सकाळी नऊ वाजेपर्यंत या बंगल्यावर.

वेदिका :

 बरं बाई, येतो.

( प्राजक्ता निघते.)

Cut to …..

…… …… ……..

Day / bandargah / outer

( अरब स्थानातील एक बंदर – जहाज नांगरल जातं, कंटेनर उचलून एका ट्रकवर उतरला जातो. मागील बाजूचे दार बंद केले जाते. ट्रक एका गोडाऊन मध्ये जातो. दरवाजा उघडून मुली पाहतात. कर्मचारी बॉस जवळ येतो.

कर्मचारी :

बॉस, यहा तो चार ही लडकिया है l उनमे से एक मर गई है l हमने तो पाच मंगवाई थी l

( बॉस फोन करतो, सादिक इकडे कॉल उचलतो)

सादिक :

( हसते हुवे)

देखो आगया फोन सेठ का? खुश हो गये होंगे l

सादिक :

( फोन कानाला लावत)

जी हुजूर अंगुर अच्छे है ना?

बॉस :

 अबे, भाड मे जाये तेरे अँगुर, मैने तुझे क्या कहा था l मुझे पांच लडकियां चाहिए l और तूने ये क्या भेजा l सिर्फ चार लडकिया, उनमे से एक मरी हुई l तेरे घर में कूछ खाणे को है के नही, पेठभर खिलाने को, जो लडकी मर गई l

सादिक :

सॉरी बॉस, जब हमने कंटेनर मे रखी थी l तब तो अच्छी थी, साहेब ,| ऐसे कैसे मर गई l और हमने तो पांच भेजी थी l एक कहा गई l

बॉस :

वो मुझे कुछ मालूम नही l अगर भेजी थी, तो उसे आसमान खा गया , या समिंदर निगल गया l देखं, मैने आगे से रुपये लिये है l मुझे जवाब देना पडता है l एक तो डिलिव्हरी लेट हुयी है l ओर वो भी इस तरह,

सादिक :

 माफ कर दो l बॉस, आगे से ऐसा नही होगा l

बॉस :

 आगे से कहा, अब का बोल, कान खोलकर सून लो, मुझे इक्कीस फरवरी तक, इन दो लडकियों के बदले चार लडकियां चाहिए l वर्णा तुम जाणते हो,

सादिक :

 लेकीन साहब इतनी जल्दी कैसे होगा l यहा पर पुलिस अलर्ट पर है l

बॉस :

 पुलिस को संभालना तेरा काम है l मेरा नही l समजे क्या?

( फोन ठेवला जातो. )

Cut to ......

..... ...... ......

सादिक :

 बॉस, बॉस……

(आसिफ सादिक के पास खडा है)

आसिफ :

 क्या हुवा l

सादिक :

भेजी हुइ लडकियो मे से एक गायब है l और एक मरी हूयी l कुछ खिलाना चाहिए था l तुम लोग को एक भी काम ठीक से करना नही आता l जाओ जावेद को बुलाओ l

( कामगार जातो, जावेदला बोलावून आणतो. सादिक जावेदला थप्पड मारतो.)

सादिक :

बता, उन लडकी मे से एक लडकी कहा है l

जावेद :

मै नहीं जाणता l मैने तो आपके सामने ही कंटेनर मे डाला था l और दरवाजा तो आसिफ ने लगाया था l

सादिक :

तो फिर वह लडकी किधर गई | समंदर खा गया, या उसे जहाज निगल गया l बताओ |

शहबाज :

 देखो भाई, यह बच्चे हमारे उसुल के पक्के है l लगता है, की बोट पर ही कोई खलबली हो गई l

सादिक :

 वो गई सो गई, लेकीन झमेला बडा गई l

शहबाज :

क्या हूवा l

सादिक :

बॉस ने उन दो लडकीयों के बदले चार लडकींया मागी है l अब क्या करे l वो भी इक्किस फरवरी तक….

 शहबाज :

 भाई इतने जल्दी झोल झाल करणा बडा मुश्किल है l क्यो की लडकिया गुम होणे के कारण कोकण पुलिस अलर्ट पर है l

सादिक :

कुछ भी करो l गोवा, गुजरात या घाट से लाव l लेकीन चार लडकिया चाहिए ही चाहिए l वर्णा…

शहबाज :

 वर्णा क्या?

सादिक :

 वर्णा हमारी मौत है l इस स्मगलिंग के धंदे मे आणे का रास्ता है l जाणे का नही मेरे भाई l

शहबाज :

 देखेंगे कूछ होता है क्या ?

सादिक :

 जाओ काम पर लग जाओ l अब तक जितना दिया l उसके दुगणी कींमत दुंगा l

शहबाज :

 जी, हूजूर

Cut to …......

 …….. …….

Cut to….


गुरुवार, ३१ जुलै, २०२५

फ्रेंडशिप एक् साहस भाग १५

फ्रेंडशिप एक् साहस भाग १५nishmarathishortfilmskrift1983.blogspot.com

 DAY/ INTER / HOSTEL ROOM

श्वेता :

 चला झाली एकदाची तयारी.

वेदिका :

 हो आता मोहीम फत्ते करायची.

श्वेता :

 करायची म्हणजे काय, करायचीच. त्या आरीला दाखवून द्यायचं.

वेदिका :

 पण ती डप्पर कूठे दिसत नाही.

माधवी :

 तिचा नंबर घेऊन, मी गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात उभं राहून फोटो काढून पाठवायचा, तिला व तिच्या त्या दोन कोंबड्यांना.

अनुजा :

 पण नंबर आहे का पाठवायला. बाई गेल्या गावाला.

रेवा :

तिच्या कोंबड्याना माहीत असेल ना?

अनुजा :

त्या सहज देतील असं वाटतंय.

श्वेता :

नंबर, नंबर मिळवनं माझ्या डाव्या हातचा खेळ आहे.

रेवा :

 हो का, ते कसं?

श्वेता :

( वेदिकाकडे पाहत)

वेदे सांग, ते कसं.

वेदिका :

 ऑल इंडिया रेडिओ.

अनुजा :

 आ s s , आ s s म्हणजे नंबर मिळाला तर….

( हसण्याचा आवाज.)

Cut to ……

…… …… …

NIGHT / INTER – OUTER / IN cantenar 11 o’ CLOCK

 (बाहेरील आवाजाने मुग्धास शुद्ध येते. बाकीच्या मुली गुंगीत आहेत. समुद्री लाटांचा आवाज. कंटेनरमध्ये माल भरण्याची क्रिया. कुलूप काढण्याचा आवाज. मुग्धा बेशुध्द होण्याचे नाटक करते. काही व्यक्ती आत येतात.)

इसम 1:

चलो, जलदी उठाव ऑर पार्सल वाली कंटेनर मे डाल. दो.

( कर्मचारी त्या मुलींना उचलून दुसऱ्या कंटेनर मध्ये टाकतात. त्यामधे पॅक केलेल्या पेट्या असतात. मध्यभागी लपवून पेट्या आडव्या लावतात.)

इसम 1:

हो गया क्या?

कर्मचारी :

 जी हूजुर.

( कंटेनर ट्रकवर टाकून बंदरावर नेतात. कागदपत्र पाहणी होते. कंटेनर बोटीवर चढवला जातो. शिपचा भोंगा वाजतो. बोट निघते.)

Cut to…..

……. …… …..

DAY / outer – INTER / boat

(समुद्री लाटांचा आवाज ऐकू येत आहे. मुग्धा उठते. अस्पष्ट उजेड एका होलातून येतोय. मुग्धा मुलींना शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करते. त्या बेशुध्द असतात. एक मुलगी मृत आढळते. बाजूला बसते. डोक्यास हात लावते. हालचाल करू लागते. पेट्या बाजूला सारते, एक पेटी खाली पडते. एक् पट्टी निघते. द्राक्षे खाली पडतात. ती भुकेली आहे. खाऊ लागते. पेट्या बाजूला सारते. दरवाजा पहाते. बाहेरून लॉक असते. उघडण्याचा प्रयत्न, छिद्रातून पहाते. बाहेर अस्पष्ट उजेड. एक बल्ब दिसतो. अंतर्वस्त्रात लपवलेली पट्टी काढते. थोडेसे कापते रक्त येते. दुर्लक्ष करून दरवाजाचे कडी बोल्ट काढण्याचा प्रयत्न , पट्टी घासू लागते. कडी निखळते. दार ढकलते. थोडे उघडते. दोन कंटेनर मध्ये असल्याने थोडे उघडते. इतर मुलींना उठवण्याचा प्रयत्न. असफल , आपणं निसटले पाहिजे हा विचार अर्धवट दरवाजातून बाहेर पडते, दोन्ही कंटेनर मध्ये पाय लावून वर चढण्याचा प्रयत्न, चढते. अंदाज घेत शीपच्य बाहेरच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी जाते. उजडू लागते. सगळीकडे पाणी दिसते. दूर बेट दिसते.)

Cut to....

….. ……. …

Day / outer / koknatil gav

मुग्धाला दिसू लागते.

In past....

( वडील काठी घेऊन आत येतात.)

वडील :

 कूठे लपलीय ती.

आई :

 माहित नाही. कशाला हवं मुलींना पोहणे घरात तर सगळ जीनं जाते त्यांच.

आजी :

घाट कोकणात जन्म घ्यायचा तर पोहायला आलच पाहिजे. तुझ्या अवशीच्या घोवान शिकवल नाय तूका, म्हणून माझी नात काय अडाणी राहूदे.

( आजी डोळ्याने इशारा करते)

वडील :

थांब दाखवतोच तिला आज पोहायला जात नाही कस बघतो.

( वडील आत जातात. कणगीच्या कोपऱ्यात लपलेल्या मुग्धाला ओढत आणतात. आई मध्ये पडते.)

वडील :

तू गप्प , बाजूला हो.

( बायकोस ढकलून मुग्धाला ओढत नेतात.)

मुग्धा :

 आई, आई

Cut to …..

……. ……

DAY/ outer/ vihirit

(मुग्धा चे पाठीला रस्सी बधली जाते. ती रडत आहे. तिला पाण्यात ढकलतात. पाण्यात पडण्याचा आवाज.)

Cut to……

…….. …… …….

(DAY/ morning / ship/ OUTER

 (मुग्धा आठवणीतून बाहेर येते. पाण्यात उडी मारत पोहू लागते. बेटावर पोहोचते. काठावर आडवी झोपलेल्या अवस्थेत. डोळ्यासमोर शिप दूर जाताना दिसते.)

Cut to …..

….. ….. …..

DAY/Inter /college cantine

श्याल्मली कुपेकर. टेबलवर बसली आहे.

(Oc)

( ही  श्याल्मली एक चालत फिरत वार्तापत्र, कॉलेज मधिल खडानखडा माहिती हवी असल्यास ती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्याल्मली, upsc ला जर एखादा पेपर कॉलेज जीवनावर टाकला तर शंभर पैकी शंभर मार्क मिळवेल. कॉलेज मधील सर्व लफडी एकवेळ प्राध्यापकांना कळणार नाहीत. मात्र श्याल्मलीला सर्व ठाऊक कॉलेजच्या विषयात एकवेळ कमी गुण मिळतील पण या बयेला कॉलेज मधील मुलांची हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स सर्व काही माहीत असतं. सायन्स म्हणजे तुम्हाला प्रयोगशाळा वाटली का ? छे  इथं सायन्स म्हणजे प्रेमप्रकरणे.)

( श्वेता व वेदिका श्याल्मली जवळ येऊन बसुन तिला त्यांनी आणलेल्या डब्यातील बिर्याणी वाढत आहेत. ती दोन्ही हातानी ताव मारत. आहे.)

वेदिका :

 श्याल्मली ताई आणखी काय हवे का?

श्याल्मली :

ज्यादा काही नको, ज्यूस तेवढा मागवा. लिंबू सोडा, कसं आहे, की नाही, मला ना ॲसिडिटीचा त्रास आहे ना. एवढं सगळ खायचं म्हणजे पचवायला तरी हवच ना.

वेदिका :

 हो तर, किती मोठ्ठ काम आहे ना,

श्वेता :

 वेडे गप्प जरा, मी बोलू का?

 वेदिका :

 बोल की.

श्वेता :

 मी सांगितलेल्या कामाचं काय झालं. 

श्याल्मली :

 ते होय, झालं की, हे घ्या नंबर त्या तिघींचे.

( चिठ्ठी काढून देत.)

श्वेता :

 व्हॉट्स ॲप  आहेत ना.

श्याल्मली :

( जेवत )

एकशे एक टक्के

श्वेता :

झालं काम एखदास बरं, येऊ का आम्ही, तू खा आरामात.

( श्वेता वेदिकेला इशारा करते.)

श्याल्मली :

बिल तेवढं भरा नाहीतर जाल तशाच.

वेदिका :

त्याची काळजी नको, भरलय बिल, हे घे, पावती , जर तुझा विश्वास बसत नसेल तर .

( त्या जात असतात. श्याल्मली मागे ओरडुन.)

श्याल्मली :

अग, आणखी एक सांगायचं राहिलं.

श्वेता :

आणखी काय?

श्याल्मली :

आरोही बोहल्यावर चढतेय, पुढच्या महिन्यात एकवीस तारखेला.

वेदिका :

 खरचं, चढ म्हणावं, बोहल्यावर, अन् कर घराचं गोकुळं, व नवऱ्याला दे सांभाळायला पोर.

( त्या एकमेकींना टाळ्या देतात. अन् निघून जातात.)

……. …..

Day /Inter/ Hostel ROOM

( पंधरा तारीख मुली प्रवासाचे नियोजन करत आहेत.)

श्वेता :

गाडी ओके आहे ना.

प्राजक्ता :

 हो आहे ग.

श्वेता :

 कोणती गाडी,

 प्राजक्ता :

 जेवायला घेऊन गेलो होतो ना, ती गाडी.

श्वेता :

 ती गाडी होय.

प्राजक्ता :

 हो पण…..

माधवी :

 पण काय आणखीन.

प्राजक्ता :

आपल्यासोबत आणखीन तिघे आहेत.

श्वेता :

 आणखी कोण ?

प्राजक्ता :

ड्रायव्हर काका, कामवाल्या सरुची मुलगी, अन…

माधवी :

कोण ?

प्राजक्ता :

 एक् ट्रेकर, पपांच्या मित्राचा मुलगा.

श्वेता :

 तुझी ओळख आहे ना.

प्राजक्ता :

ड्रायव्हर व सरूची मुलगी. ती काय आपलीच माणसं, पण हा ट्रेकर कोण कसा आहे, काळा की गोरा माहीत नाही, त्याची हिस्ट्री काढायला हवी

 बर, वेळ होतोय निघते मी, बाय

सर्वजनी :

 बाय…..

( ती जाते.)

वेदिका :

हा आणखी कोण ट्रेकर, कशाला हवा होता.

माधवी:

 तर काय, मुलींमध्ये लुडबुड.

श्वेता :

अग तिच्या पप्पांनी निवडलाय म्हंटल्यावर चांगला असणार, बर बघू, अन् असला खोडकर, तर आपणं काय कमी आहोत काय, दाखवू आपला हिसका, डोळ पांढर करील त्यो.

वेदिका :

ते तर झालंच.

रेवा :

चला पसारा आटपा नाहीतर शिरसाठ बाई हॉस्टेल डोक्यावर घ्यायची.

श्वेता :

 चला आवरा, पटकन.

Cut to ……

…….. …….

DAY / inter/ evening / prajkta home

हॉल मध्ये टीव्ही चालू आहे. आजी, व आई टीव्ही पाहतेय. वडील येतात. बॅग सावित्रीबाई कडे देत.

सयाजीराव :

 अरे वा...., मालिका पाहताय, कन्या कुठे दिसत नाही.

सावित्रीबाई :

 गड सर करण्यासाठी नियोजन करताहेत. दोन दिवसांनी प्रस्थान करतील आपलं भगिनी मंडळ घेऊन.

सयाजीराव :

 एकदाची तयारी झाली म्हणायची. किती तारखेला जाणार.

सावित्रीबाई :

 सोळा तारखेस. पण

सयाजीराव :

 पण काय आणखीन.

सावित्रीबाई :

 मला तर काळजी वाटतेय. आपली नाजूक बावली कशी जाते याची. पाय दुखतील ना तिचे.

सयाजीराव :

काळजी कारण सोडा, आपणं काय आयुष्यभर तिच्या सोबत असणार नाहीये, अन् हा जो निर्णय घेतलेला आहे ना, तो तिचा स्वतःचा आहे. आपण लादलेला नाही.

सावित्रीबाई :

 मी जाऊ का सोबत.

आजी :

 तू जा म्हणजे झालं, त्यांचं एका दिवसाचं काम दोन दिवसावर नेशील.

सावित्रीबाई :

 एवढी काय म्हातारी नाही मी.

आजी :

 तुझी काळजी ओळखते मी, पण तिला स्वातंत्र्य नको का? उगाच तिच्या नियोजनावर पाणी पडायचं. व ड्रायव्हर व सरुची मुलगी आहे ना सोबत.

सावित्रीबाई :

 काकांना जमेल का या वयात. त्यापेक्षा प्रमोदला पाठवलं तर.

सयाजीराव :

त्याला पाठवा, म्हणजे त्या दोघांचं भांडणं सोडवायला आणखी दहाजण पाहिजेत. मी माझ्या मित्राच्या मुलाला बोलावलंय. त्याला ट्रेकिंगचा अनुभव आहे म्हणे.

सावित्री :

 त्याला, ही बया मानेल का?

सयाजीराव :

 त्यात काय, सर्व तिच ऐकायचं का?

( गाडी आल्याचा आवाज ,)

सावित्रीबाई :

 मॅडम आल्या वाटत.

(प्राजक्ता आत येते.)

सयाजीराव :

 प्राजक्ता , इकडे ये?

प्राजक्ता :

 काय पपा,

सयाजीराव :

कधी जाणार आहेस?

प्राजक्ता :

 सोळा तारखेला.

सयाजीराव :

 कोण कोण आहात?

प्राजक्ता :

( डायनिंग टेबलवरील फळ उडवत)

कोण कोण म्हणजे, आम्ही मैत्रिणी

सयाजीराव :

 त्यांच्या घरी माहीत आहे का?

प्राजक्ता :

 कल्पना नाही मला, तरी पण त्यांनी सांगितले असेल की,

सयाजीराव :

 म्हणजे नसणार, बर एक सांगू.

प्राजक्ता :

हा.

सयाजीराव :

ड्रायव्हर, व सरलाची मुलगी सुमा व सोबत एक ट्रेकर येईल.

गाडी उद्या क्लिनिंग करून चेक् करून मिळेल

प्राजक्ता :

 बाबा ,मला येते की चालवता, उगाचच आणखी एक गाईड कशाला? उगाच अडचण नुसती.

सयाजीराव :

 ते काही नाही, ह… आणखी एक सांगायचं म्हणजे जाऊन येईपर्यंत गाडी अजिबात हातात घ्यायची नाही, अन्यथा तुझी ही ट्रीप क्यांसल.

प्राजक्ता :

( नाराजीने)

 अस काय हे?

सयाजीराव :

तसच, जसं तुझं आम्ही ऐकतो, तसच तू ही आमचं ऐकायचं.

प्राजक्ता :

( नाराजीने)

बर

( प्राजक्ता रुमकडे जाते. ती गेल्यावर)

सावित्रीबाई :

देव पावला एकदाचा,

सयाजीराव :

 झालं ना, तुमच्या मनासारखं.

सावित्रीबाई :

 झालं, काळजी मिटली थोडीशी.

आजी :

 चला थोड टेंशन कमी झालं,

( वर उठत)

सयाजीराव :

तू आणि कुठे निघालीस?

आजी :

 जाऊन येते. जरा नातीला मदत करते. प्रवासाला चाललेय ना.

सयाजीराव :

मदतच कर, नाहीतर तू ही जाशील गड सर करायला.

आजी :

 मला काय कच्ची समजू नकोस, अजूनही बळ आहे पायात माझ्या.

सयाजीराव :

बर बाई, जा.

आजी :

 हा….

Cut to ……

……. ………. ……



शनिवार, २६ जुलै, २०२५

फ्रेंडशिप एक् साहस भाग १४

 फ्रेंडशिप एक् साहस भाग १४

Night / INTER / 8 .00p.m./ IN HOSTEL/ ROOM

(वेदिका लॅपटॉप घेऊन सर्च करत आहे. व नोंदी घेत आहे.)

रेवा :

काय वेदे काय करतेस.

वेदिका :

रिसर्च

रेवा :

 कसला रिसर्च.

वेदिका :

 रानभाज्यांची माहिती शोधतेय.

रेवा :

 त्या  कशाला हव्यात?

वेदिका :

 ट्रेकवर गेल्यावर माहिती घ्यायला.

व शिजवून खायला.

माधवी :

( अंथरुणावर उठत)

काय रानभाज्या खायच्या.

वेदिका :

 हो, त्यात काय एवढं?

माधवी :

 एवढं चालल्यावर त्या चिमुटभर भाज्यांची पोट तरी भरेल का? त्यापेक्षा जरा काहीतरी चटपटीत, झणझणीत हवं. चिकन मटन वगैरे.

वेदिका :

 मॅडम आपणं गड फिरायला निघालोय. पिकनिकला नाही.

व तुझं चिकण मटण टिकेल का दोन दिवस.

माधवी :

 हे बघ मिठात शिजवल की राहील ना.

वेदिका :

मॅडम आपला खर्च यावर्षी इतका झालाय की घरच्यांना तुम्हाला पॉकेट मनी देखील देणं अवघड झालंय. अन् प्रवासाचा खर्च म्हणत असशील ना, तो प्राजक्ता करतेय. एखाद्याला लुटायचं म्हणजे किती? म्हणून मी व श्वेता ने ठरवलं आहे कि जेवणाच आपणं बघायचं.

रेवा :

 बरोबर आहे तुमचं, माझ्याकडे पण पाचं हजार फक्त आहेत. ते ही मला फॉर्म फी साठी हवेत.

वेदिका :

 हे बघ रेवा, फारतर पाचशे रुपये काढा. बाकीची जोडणी आम्ही लावतो.

अनुजा :

 तुम्ही जोडणी लावताय, खर, कशी लावणार.

वेदिका :

हे बघ इथून तांदूळ, चटणी, मीठ अन् थोडे कांदे,बटाटे, डाळ अन् बेसनाच पीठ घेऊ. तुझं मटण चिकन जमणार नाही. व जास्त वाटल तर फार तर पॅक बंद डब्यातून थोडे झिंगे, बांगडे घेऊ. तिथं जवळपास मिळाली तर अंडी …ते ही मिळाली तर घेऊ काय, जास्त अपेक्षा ठेवू नकोस. कळतंय ना.

माधवी :

मग तर मला पाळणा करूनच आता, इतकं रोज व्यायाम करते, किती ऊर्जा खर्च होते माझी, जरा पोटाला तरी घाला.

वेदिका :

ये तिथं जेवढं देऊ तेवढंच घ्यायचं काय?

रेवा :

 वेदे आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा उन्हाळा आहे. पावसाळा नाही, उगाच काय पण सांगू नकोस ह… गवत मिळेल तुला ते ही सुकलेले.

आम्ही काय म्हसी नाही आहोत. वैरण खायला. तुझी रानभाजी म्हणतेस ना बस उडकत रानात.

फेब्रुवारीत ...कोणती सापडते ती.

वेदिका :

 बर झालं आठवण केलीस ते, आता तुला गवताचेच पदार्थ घालणार. गवताची भाजी, गवताची आमटी..

रेवा :

 तुला गायर वाटलो का आम्ही,

 वेदिका :

 गायर कच्ची खातात. आपण तिखट मिठ लाऊन खाऊ.

रेवा :

 काय तुझ्या सुपीक डोक्यात नको नको त्या कल्पना येतात नाही.

एवढ्यावरच थांब, नाहीतर नऊवारी साडी नेसून अंबाडा बांधून तलवार कमरेला लावून गड चढायला लावाल.

वेदिका :

 आयड्या मस्त आहे.

रेवा :

 मला माहित आहे गम्मत करतेस तू.

प्राजक्ता तुझं हे नखरे चालूच देणार नाही.

वेदिका :

( अनुजाला डोळा मारत.)

खरचं साडी नेसून जाऊया काय?

रेवा :

अग बायाओ आवरा हिला. हीचं डोकं लई चाललय,

(त्या गुदगुल्या करू लागतात, हसू लागतात.)

Cut to …….

…… …

DAY / OUTER -INTER /HOSTEL

एक फोर व्हिलर हॉस्टेलच्या दारात येऊन थांबते. त्यातून तिघे उतरतात. कार्यालयात कमला शिरसाठ बसल्या आहेत.

 रवी :

 नमस्कार मॅडम.

मॅडम :

 नमस्कार आपली ओळख.

अरोहीचा मामा :

 काय मॅडम, ओळखल नाहीत काय, मी अरोहीचा मामा. न्यायला आलोय तिला.

मॅडम कमला शिरसाट :

( डोळ्यावर चष्मा नीट करत.)

मला जरा कमी दिसतंय हो. हा आलं लक्षात.

थांबा ह बोलावते.

( रिंग वाजते, शिपाई आत येतो.)

हे बघ त्या आरोही गोडांबेला बोलावं, सांग तिचा मामा आलाय म्हणून.

शिपाई :

 हा मॅडम.

Cut to…..

…… …….

(शिपाई व्हरांड्यातून जातो. रुमजवळ नोक करतो.)

शिपाई :

 आरोही गोडांबे तुझा मामा आलाय बघ, आवरायला सांगितलेय.

( आरोही घाबरून तन्वी मानसी या मैत्रिणी जवळ जात.)

आरोही :

 काय ग, आता काय करू, शेवटी नको तेच होतंय.मामा मला त्या मेव्हणीच्या पोराच्या गळ्यात माळ घालाय लावणार, आता माझं काही खरं नाही ग.. तन्वी.

मानसी :

 येवढं कशाला घाबरतेस, सांग जा स्पष्ट नाही म्हणून, मामाच आहे ना तुझा.

आरोही :

 कसं सांगू, एकतच नाही तो, घरी बघतेस ना कसं आहे ते. बाबा प्यारेलीस झालेले, आई तीही साधी. भाऊ तो पण लहान, सगळ मामावर अवलंबून, त्याच्यापुढे कुणाचच काही चालतं नाही ग.

तन्वी :

 राजेशला सांग मग,

आरोही :

 तो घाबरलाय, मागे मामाने त्याला चांगलाच दम भरलाय.

तो तरी काय करेल.

मानसी :

 कसलं डोंबलाच प्रेम करतोय. साधं धाडस नाही.

आरोही :

 तो एकटा काय करेल. माग त्यानं फक्त लग्नाचं विचारलं. तर मामानं व त्याच्या मित्रांनी हाड मोडली त्याची, साधं कोण वाचवायला आलं नाही.

मानसी :

 मग कर जा लग्न त्या आडदांड बिनडोकशी, दम नसेल तर प्रेम कशाला करायचं.

Cut to….

In Office

( अरोहीला यायला वेळ होतो, मामा रुमकडे जात आहे वाटेत इतर मुली कुजबुज करतं आहेत.)

एक् :

 कोण असेल ग?

दुसरी :

 आणखी कोण? त्या आरोहीचा मामा

एक :

 अग, दिसतोय कसा बघ, ती किती सालस, खरंच मामा का.

दुसरी :

 हो मामाच आहे, कसा दिसतोय बघ, लेडीज हॉस्टेल आहे, याचं भानच नाही, कसा घुसतोय बघ.

एक् :

 नाहीतर काय.

Cut to …….

…… …….

Inter/ Hostel / ROOM

(दरवाजा बाहेर उभा राहून )

आरोही मामा :

काय, निरोप मिळाला नाही का?

आरोही :

 ( घाबरलेली आहे , बॅग भरतेय. डोळ्यात पाणी आहे)

मिळाला , बॅग भरतेय.

मामा :

बोहल्यावर चढायला निघालेस, पुढील महिन्यात म्होतुर धरलाय. अन् रडतीस काय, पूस डोळे, अन् आवर झटकन, बास झालं शिक्षण.

आरोही :

 जी.

( मामाच्या मागे रवी उभा असतो. त्यास पाहून)

मामा :

 एवढी कसली घाई लागलेय रवी साहेब, थोडी कळं काढा. लग्ना आधी असं बायकोला भेटन बर नव्हे, बाईल वेडा म्हणतात.

रवी : ( लाजून हसत)

काय हे काका.

मामा :

 काय.. काय… पुढं आपलंच राज आहे.

( आरोही बॅग भरते, मैत्रिणीकडे पहात.)

आरोही :

 येते मी.

( रवी आत जातो, बॅग उचलून बाहेर पडतो. )

मामा :

 भलतीच घाई लागलेय , जरा आवरा स्वतः ला, चल आरोही, कसं हसत जायचं, कसं हसत….

 मामा : 

( तिरकस आरोहीच्या मैत्रिणीकडे पहात.)

मैत्रीणीना निरोप दिलास ना? नसेल तर मी देतो.

नमस्कार, पोरीनो, या आमच्या उंबरणीला पुढील महिन्यात एकवीस तारखेचा म्होतूर हाय, करवल्या पण हव्यात लग्नात, बरं या ह… राम राम 

( बाहेर निघतात. आरोही मागे जाताना सारखं मागे पहात आहे. मॅडमच्या केबिनजवळ आल्यावर.)

मामा :

नमस्कार मॅडम येतो, या हं पुढील महिन्यात उंबरनीला लग्नाला, आमंत्रण आताच देतो

मॅडम :

 हा

( हॉस्टेल बाहेर गाडीत बसतात, गाडी निघते.)

Cut to …..

……. ……. …..


शुक्रवार, २५ जुलै, २०२५

फ्रेंडशिप एक् साहस भाग १३

 फ्रेंडशिप एक् साहस भाग १३

Day / morning / outer

( सिटी वाजण्याचा आवाज )

प्राजक्ता व मैत्रिणी ग्राऊंडवर रपेट मारत आहेत. प्रशिक्षक रायबागकर त्यांकडून सराव करून घेत आहेत.

लाठी काठी चालवतानाचे दृश्य

Cut to….

दांडपट्टा शिकवतानाचे दृश्य

Cut to…

तलवारबाजी शिकवण्याचे दृश्य

Cut to…

सेल्फ डिफेन्स शिकवतानाचे दृश्य.

Cut to….

शपथ घेतानाच दृश्य.

आम्ही सरस्वती मातेला साक्ष ठेवून अशी शपथ घेतो की या विद्येचा वापर दीन दुबळ्या, निराश्रित व्यक्ती, निर्देश व्यक्ती तसेच निर्बल व्यक्तीवर करणार नाही. स्वतःचे संरक्षण, संकटात सापडलेल्या दुर्बल लोकांच्या मदतीसाठी व स्वतःच्या संरक्षणासाठी याचा वापर एक शस्त्र व शेल्फ डिफेन्स म्हणून करू.

Cut to…..

Day / Inter / prajkta home

(प्राजक्ता रायगड किल्ला इमेज व माहिती वाचत असते.)

(सयाजीराव खोकल्याचा आवाज काढतात. प्राजक्ता वर पहात)

प्राजक्ता :

आमची लाडू बाई कशात गुंग आहे.

प्राजक्ता :

काही नाही थोडी माहिती गोळा करतेय.

सयाजीराव :

कसली माहिती?

प्राजक्ता :

 रायगड किल्ल्याची.

सयाजीराव :

फिरायलाच जाणार ना. त्यासाठी एवढी उलाढाल. लहान मुले ते सहज चढतील.

प्राजक्ता :

 कोणतही कार्य लहान मोठे समजू नये, त्यात नियोजन असलेले बरे. असे विचार सांगतात.

सयाजीराव :

 कोणाचे

 प्राजक्ता :

छत्रपती शिवरायांचे. उगाचच नाही छोट्या जहागिरीचं स्वराज्यात निर्माण केले . कोणतही कार्य योजना आखुनच ते करत, म्हणून यश प्राप्त करत.

सयाजीराव :

 बेटा एकदाच गड चढून उतरणार आहेस. त्यासाठी येवढं नियोजन. एखाद्या मोहिमेवर निघाल्यासारखं.

प्रमोद :

काय पण खुळ्यासारख, करते. एकदा गड चढायला वहिभर लिखान मग पुढे नियोजित पुस्तकाची लायब्ररीच काढ

प्राजक्ता :

 कसं हाय दादा, तुम्हा मुलांचं काम एखाद्या खोंडावणी असत. खोंड कसा वार अंगाला लागला की विचार न करता तावा तावने तो आऊट ओढतो व थोड्याच वेळात जीभ बाहेर काढतो. व दमून बसतो. व आम्ही मुली नियोजन करूनच एखाद कार्य करतो. त्यामुळेच आम्हाला जीभ बाहेर काढायची गरज पडत नाही.

सयाजीराव :

हुशार आहेस, एक दिवस मोठी बिझनेस मन होशील.

प्रमोद :

हर्भर्याच्या झाडावर चड ऊ नका.

( आई चहा आणून देते, आजी माळ जपत तिथे येत)

आजी :

माझी प्राजू हुशराच आहे.

प्रमोद :

बघू तरी काय लिहलय.

प्राजक्ता :

वही झकते

( प्रमोद वही घेऊ लागतो. ती देत नाही.)

Cut to ….

….. …. …..

Day / outer / Collagen road

बेल वाजल्या च आवाज. मुले बाहेर येतात.

Cut to.

रोड ने प्राजक्ता व श्वेता जात असताना

प्राजक्ता :

आई ग, सीट…

श्वेता :

काय झालं.

प्राजक्ता :

 काही नाही श्यांडेल उसवून तुटल.

श्वेता :

चल दुसरी घेऊया,

प्राजक्ता :

परवाच घेतली होती.

श्वेता :

 चल घेऊ बदलून.

( स्कुटी वर स्वर होऊन निघतात.)

Cut to…

……. …

Day / Inter / in shop

प्राजक्ता :

काय हे काका परवाच घेतली होती ना, लगेच उस वली

दुकानदार :

 काय करणार बेटा, ती काय मी बनवलेय, थांब देतो शिऊन.

( दुकानदार चप्पल शिऊ लागतो.)

Cut to ….

………. …

Day / Outer /road

स्कुटी वरून जाताना, एके ठिकाणी गर्दी पाहून

प्राजक्ता :

काय ग काय असेल.

श्वेता :

प्रदर्शन आहे वाटत.

प्राजक्ता :

 चल जाऊया.

श्वेता :

हा.

Day /Inter / pradarshan

(गाडी पार्क करुन प्रदर्शन पाहायला जातात. प्रदर्शन पाहताना. एक मशिन पहात असताना. लांबून आश्विन पाहतो. व त्याजवल येतो. जवळ उभे राहून.)

आश्विन :

 हा मॅडम हि एक चक्की आहे. याचा उपयोग धान्याचे ग्राई नड करण्यासाठी होतो. ही पहा चाळणी, मस्त चाळून सुरेख पिठ निघत बघा.

( त्या मागे पाहतात , अश्विन ल ओळखतात. व पुढे आयुर्वेदीक प्रोडक्ट जवळ जातात. तो तिथे येत.)

 आश्विन :

हा ही सर्व आयुर्वेदीक प्रोडक्ट आहेत. इफेक्ट सही साईड इफेक्ट नाही. हे आयुर्वेदीक तेल कंबरदुखी , दोखेदुखी मानदुखी वर रामबाण औष ध, हा बाम

(हातात घेऊन)

एकदा लावली की डोकेदुखी गायप.

प्राजक्ता :

 लाव तुझ्या डोक्याला.

( त्या पुढे टू व्हीलर प्रदर्षणी जवळ जातात. तो मागोमाग येत.)

आश्विन :

नमस्कार म्याम, इथे मस्त टू व्हीलर मिळतात. छानशी, एका कप्पल साठी फक्त, हम दो ऑर सिर्फ दो ही बेठ सकते है l किंमत सिर्फ देड लाख.

प्राजक्ता :

 कुठ दुर्बुद्धी सुचली अन् आत आलो. चल ग

आश्विन :

काय म्हणालात.

प्राजक्ता :

काही नाही. जातो.

Cut to….

….. …… …..

Day / outer / exibition Holl

(श्वेता व प्राजक्ता स्कुटीकडे जाताना पाठीमागून येत)

आश्विन :

ओ ss मिस, ओ ss मिस.

प्राजक्ता : ( मागे वळत)

काय आहे?

आश्विन :

 मला ओळखलं नाही का?

प्राजक्ता :

 ओळखलं की.

आश्विन :

मग अस अनोळखी का वागताय.

प्राजक्ता :

तस काही नाही, आम्हाला वेळ झालाय म्हणून निघालोय.

आश्विन :

हा, … माझं नाव अश्विन.

प्राजक्ता :

नमस्कार , भेटून आनंद झाला.

श्वेता :

 बर जाऊ आता आम्ही.

अश्विन :

असं कसं, तुमचं नाव तरी सांगा. त्या दिवशी विचारायचं राहूनच गेलं.

प्राजक्ता :

ही कोमल व मी सरोज

आश्विन :

बर कूठे राहता?

प्राजक्ता :

 शहरात आणखी कुठे राहणार?

आश्विन :

तस नाही, तुमचं नाव पत्ता कळला असता तर.

प्राजक्ता :

खूप जास्त होतंय हे असं वाटत नाही का? तुम्ही आम्हाला मदत केली त्याबद्दल धन्यवाद, पण

आश्विन :

 मी मैत्री खातर बोलतोय. तुम्हाला सांगायचे नसेल तर राहू दे.

प्राजक्ता :

 बर निघू ….

आश्विन : ( नाराजीने )

आपली मर्जी.

( स्कुटी चालू झाल्याचा आवाज, त्या निघतात. तो गाडीकडे पाहतो. गाडीचा नंबर टिपतो )

Cut to ….

Day / Inter / exibition Holl

(आश्विन जवळ मित्र येतो.)

अमित :

काय आज स्वारी भानावर नव्हती, अन् ती दोन पाखरे कोण?

आश्विन :

काही नाही, होत्या ओळखीच्या.

अमित :

 फक्त ओळखीच्या की आणखी काय… जमल वाटतं.

आश्विन :

 छे, नाही रे, त्यांनी घास पण घातली नाही.

अमित :

कशा घालतील, असं सर्वांमध्ये तू मार्केटिंगचे फंडे आजमावत होतास. काय करतील त्या, हे असं झालं एखादं हरीण गायरानात यावं अन् बाकीच्या नी त्यांना भांबावून सोडावं. मग काय होणार.

आश्विन :

आता काय करायचं.

अमित :

आता… कर मार्केटिंग, चल,... नंतर बोलू, रूमवर गेल्यावर,

Cut to…

……. ……..

Evening / Inter/ In Room

(आश्विन अभ्यास करत असतो. त्याचे मित्र येतात)

अमित :

काय, आश्विन काय चाललंय.

आश्विन :

 कंपनीचा एक प्रॉब्लेम आहे, तो स्वाल्व्ह करतोय.

अमित :

 नक्की प्रॉब्लेमच की आणखी काही.

आश्विन :

 प्रॉब्लेमच आहे रे, हं  झालं डन रेडी गो….

( की बोर्डवर इंटर बटन दाबल्याचा आवाज, फाईल सेंट केल्याचा आवाज.)

उत्कर्ष :

 आम्हाला समजलंय सगळ.

आश्विन :

 काय समजलंय.

उत्कर्ष :

 सकाळीं तू दोन मुलींशी तू गपशप करत होतास.

फ्लर्ट करत होतास.

आश्विन :

 छे रे..

संजय :

कोण रे वहिनी आमची, सांग ना.

आश्विन :

काही नाही यार, फक्त पाहिलंय, थोड अनौपचारिक बोलणं झालय, नाव देखील माहीत नाही.

यानं  आणला होता  गाडीचा नंबर त्यावरून माहिती काढायची म्हंटलं, तर निघाली भलतीच.

जयेश :

स्वारी यार, थोडी मिस्टेक झाली. पण आज दिसली ना, आज तरी विचारलस का?

आश्विन :

 नाही रे, गेली गडबडीत ती, जास्त बोलली पण नाही, असं वाटल ती मला टाळतेय. जाम आखडू आहे ती. साधं आभार तरी मानायच. ते पण नाही.

जयेश :

मग काय ठरवलस आता.

उत्कर्ष :

 परत भेटल्यावर मला दाखव, मी काढेन माहिती.

जयेश :

काही नको, तुला दाखवायचा अन् तूच लाईन मारायचास, जाम कोंबडाच आहेस.

उत्कर्ष :

 अरे , गप्प, अस काही नाही.

(विवेक हाक मारतो.)

जयेश :

जा आधी त्या विवेकला काय हवं ते बघ.

उत्कर्ष :

 याचं आणि काय? चल संजू

( तो व संजू जातात.)

जयेश :

अशी माहिती काढत राहिलास तर लग्नाची मागणी घालेस पर्यंत म्हातारा होशील तु.

आश्विन :

 येवढं कळलं की ती याच शहरातील आहे.

जयेश :

आठव आणखी कोणता एरिया वगैरे.

आश्विन :

 तिने सूट घातला होता व ती स्कुटीवरून आली होती.

जयेश :

 सूट वर काही नावं, कंपनी वगैरे.

आश्विन :

नाही रे, गळ्यात आयडेंटीटी होती, पण ती ही आतमध्ये होती.

जयेश :

बर, ते सांग स्कुटी रंग, नंबर वगैरे,

आश्विन :

अरे, हा स्कुटी ,..जांभळी होती, हा…नंबर आठवला MH. 09 9566

जयेश :

मग झालं तर,

आश्विन :

 काय झालं.

जयेश :

 उठ आण, लॅपटॉप इकडे.

(जयेश लॅपटॉप घेतो. काहीतरी टाईप केल्याचा आवाज.)

जयेश :

 हा, हे घे, ती स्कुटी प्रमोद पाटील यांची आहे. पत्ता : अजिंक्यतारा बंगला, ताराबाई पार्क.

आश्विन :

मिळाला

जयेश :

 नाही रे, स्कुटीच्या नंबर वरून तर प्रमोद पाटील समजले बाकी.

आश्विन :

बाकी fase Book वरून काढू.

( अश्विन लॅपटॉप घेतो, व fase Book काढतो व प्रमोद पाटील टाईप करतो. प्रोफाईल उघडते. फ्रेंड लिस्ट पाहताना पाटील टाईप करतो, सर्च करतो. प्राजक्ताची प्रोफाईल उघडते.)

आश्विन :

 येस,

थॅन्क्स यार.

जयेश :

आता पुढे काय?

आश्विन :

पुढे काय म्हणजे जाऊन भेटायचं. आणखी काय.

Cut to …

…… …… ……

Day / outer / morning

( गेट उघडण्याचा आवाज, प्राजक्ता बाहेर पडते. जॉगिंग करत पार्क कडे निघालेली असते. मागून बाईक येण्याचा आवाज. आश्विन तिच्या मागोमाग हळू निरीक्षण करत येतो. घराकडे पाहून)

अश्विन ( मनात ) :

 मॅडम इथे राहतात तर. मस्त आहे. चला पाहूया काय करतात ते.

( गाडी स्टार्ट होते. तो ती सराव करते त्या ठिकाणची पाहणी करतो.)

Cut to ….....

Day / morning / road Corner /ek naka.

(आश्विन तिथे एका झाडाखाली बसला आहे.लहान मुले खेळत आहेत. त्याकडे बॉल येतो. तो त्यात खेळू लागतो. त्यांना स्टॉल वरील चॉकलेट वाटतो. एका मुलाला जवळ करत.)

आश्विन :

 नाव काय तुझं?

मुलगा :

  राहुल

आश्विन :

मला सांग हा बंगला कुणाचा?

राहुल :

 तो होय, प्राजक्ता दिदीचा.

( आश्विन व राहुल बोलत आहेत. No voice)

Cut to 

…....... …..……. …

Day /morning/ outer / football ground

 (खेळ संपतो, मुले पॅकिंग करताना.)

उत्कर्ष :

काय अश्विन काही सुगावा लागला का वहिनीचा?

अमित :

 तो लागला तरी नाही सांगणार.

संजय :

 किती दिवस लपवणार सांग की.

आश्विन :

अरे यार, कळलय पण.

जयेश :

पण काय, उडवायचा बार.

आश्विन :

 येवढं सोप नाहीये.

उत्कर्ष :

काय सांगतोस यार, तू एक चुटकी वाजवलीस की कित्येक मुली वेड्या होऊन फिरतील माग.

आश्विन :

 इथे चुटकी बिटकी नाही चालणार यार.

जयेश :

 गुलाबाचा गुच्छ घेऊन जा लगेच पटेल.

आश्विन :

छे त्याचं गुलाबाच्या पाकळ्या काढून दांड्याने मारेल ती.

अमित :

 कोण काटा चिकटला आहे का गुलाबाला.

आश्विन :

 नाही यार, ती बी फार्मसी करतेय, व बिझनेस मन घरातील आहे. व सरळ आहे. ती व तिच्या मैत्रिणी मिळून कोणत तरी चॅलेंज पुर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. येथे प्रेमपत्र, गुलाब असलं चालणार नाही यार, काहीतरी वेगळच केलं पाहिजे. एखादी दुसरी ट्रिक.

जयेश :

 मिळेल यार, आपलं प्रेम सच्च असल की हवं ते निसर्ग देतो. प्रयत्न करत राहायचं फक्त.

Cut to …

….. ……


सोमवार, २१ जुलै, २०२५

फ्रेंडशिप एक साहस भाग १२

फ्रेंडशिप एक साहस भाग १२

 Night / outer/ road

In scrpivo

श्वेता :

 सगळ्या पार्टीचा पचका केला त्या बेवड्यान.

अनुजा :

 हॉटेल वाल्याला कळतच नाही असल्या कस्टमरला वेगळा वार्ड असावा ते.

प्राजक्ता :

 उगाच कायपण बोलू नका. त्याने आपल्याला स्पेशल प्लेस दिला होता. काऊंटर तर एकच असणार ना. तिथेच तो कडमडला.

श्वेता :

 तो मुलगा मध्ये पडला म्हणून बर. नाहीतर

प्राजक्ता :

 नाहीतर काय आपला गँग बुलवावा लागला असता 

श्वेता :

आपण थांबायला पाहिजे होत. काय झालं असेल.

प्राजक्ता :

 हो ग आपणं त्या मॅनेजरच ऐकूण आलो. त्या गुंडाने त्या मुलाला मारलं तर.

श्वेता :

 मॅनेजरने काहीतरी जोडणी लावली असेल.

( गाडीच्या चाकास खीळा लागून चाक पक्चर होण्याचा आवाज)

प्राजक्ता :

अरे पंक्चर झाले वाटते.

( गाडी बाजूला घेते.)

श्वेता :

 चला उतरा ग चाक बदलुया.

( चाक काढण्याचा प्रयत्न करू लागतात.)

Cut to

……. ….

Night / outer / road

(आश्विन व जयेश रोडवरून जात असताना)

आश्विन :

 तिचं नाव जरी कळलं असत तर बरं झालं असतं.

जयेश :

 समजेल यार चल.

जयेश :

 अरे त्या बघ, त्या मुलींची गाडी. पंक्चर झालीय वाटत. देवानं ऐकलं तुझं.

( स्कॉर्पिओ दिसते, तिची लाईट चालू बंद होत असते. ते बाईक तिकडे घेतात.)

….

(स्कॉर्पिओ जवळ श्वेता व वेदिका चाक काढत असते.)

श्वेता :

 रेवे मोबाईलची टॉर्च चाकावर पाड, माझ्या तोंडावर नको.

रेवा :

 हा.

श्वेता :

अग, तीन बोल्ट निघाले, हा एकच निघेनासा झालाय.

वेदिका :

 जरा गंजलाय वाटतं. त्यामुळेच निघत नाही.

श्वेता :

( चाकावर लात मारत)

 ड्यामिट , धोकेबाज.

अनुजा व रेवा :

 थांब आम्ही बघतो.

( त्या प्रयत्न करु लागतात. बाइकचा आवाज येतो. लाईट पडते. बाईक जवळ येत )

आश्विन :

 पंक्चर झाले वाटतं.

रेवा :

 हो , मघापासून प्रयत्न करतोय, हा एक बोल्ट निघतच नाही.

आश्विन :

 मी पाहतो.

(चाक काढण्याचा प्रयत्न)

आश्विन :

जयेश पाना दे.

( चाक काढून स्टेफनी काढली जाते.)

आश्विन :

 जरा पाणी मिळेल का, हात धुवायला.

प्राजक्ता :

अनुजा  मागील बाजूस बाटल्या आहेत. घे त्या.

अनुजा :

माधवी तू दे

( माधवी बाटली घेऊन येते.)

प्राजक्ता :

 अग, मला कुठे देतेस, हातावर घाल पाणी.)

( माधवी पुढे होऊन हातावर पाणी घालू लागतो.)

माधवी :

 हा घ्या.

आश्विन :

मॅडम रागवलेत वाटत.

माधवी :

 नियोजन घातलं. अन् सगळं पाण्यात.

आश्विन :

 कुणीकडे निघालाय.

माधवी :

 इथेच कोल्हापूर, हॉस्टेलवर आहोत आम्ही.

आश्विन :

 रात्रीच मुलींनी असं फिरण बर नव्हे.

माधवी :

 रोज कुठे जातोय, आजच आलोय. जेवायला.

आश्विन :

आई ग,

माधवी :

 काय झालं.

आश्विन :

चाक बदलताना जरा पत्रा लागला.

माधवी :

 अरेरे.

प्राजक्ता :

श्वेता त्या पर्स मधील क्रीम काढ व लाव.

श्वेता :

( क्रीम घेते माधवीस )

माधवी  जरा लाव ग.

 (  माधवी क्रीम लावते. तो प्राजक्ताकडे पहात असतो.)

जयेश :

 असं रात्रीचं मुलीनी फिरन बर नव्हे. तुम्ही ती फिल्म पहिली नाही का?

रेवा :

 कोणती?

 जयेश :

 सातच्या आत घरात.

माधवी :

पाहिलीय ना.

 जयेश :

 मग सावधगिरी बाळगायला हवी.

प्राजक्ता :

हो घेतो आम्ही काळजी.

जयेश :

एखादा ड्रायव्हर घेत जा. कसं आहे मुलींना पंक्चर चाक काढायला जमत नाही.

श्वेता :

 सल्ला दिल्याबद्दल आभारी आहोत.

प्राजक्ता :

 चला, वेळ होतोय.

( त्या गाडीत बसतात. गाडी निघते. अश्विन गाडीकडे पहात असतो.)

जयेश : ( तोंडासमोर हात फिरवत)

 शुक s s शुक s s

 साहेब गेल्या त्या. या आता शुद्धीत.

आश्विन :

 किती छान आहे ना ती!

जयेश :

 हो का? नाव काय तिचं.

आश्विन :

 नाव, काय तिचं,…. च्यायला विचारायचंच राहील.

तू तरी आठवण करायचिस ना.

जयेश :

 कोण मी? पुढ्यात आल्यावर तुझी मती गुंग होते. ऐकण्याच्या मनस्थितीत तरी असतोस का?

 अन् हो या पोरी साध्या मॅरेज टाईप नव्हेत हा. रात्रीच स्कॉर्पिओ घेऊन फिरणाऱ्या सिंपल नाहीत हा.

आश्विन :

 आपल्याला तर अशीच घर मालकीण पाहिजे.

जयेश :

चल गप्प, तुझ्या बाबाला चालेल का? आधी तुझी इंटर्र्शिप संपव व घरचा बिझनेस सांभाळ, मग पाहू लग्नाचं. चला आता …. भारी स्वप्न बघताय.

( अश्विन हसतो, बाईक जातांना दिसते)

Cut to …

….. …… ….

Night / outer/ in Scorpio

माधवी:

एवढी मदत केली त्यानं. आपणं धन्यवाद मानायला हवे होते.

श्वेता :

मग आडवल होत कुणी? मानायची होतीस,… धन्यवाद.

अनुजा :

 बिचाऱ्याला लागलं ग.

श्वेता :

एवढं वाटत तर मघाशी क्रीम का देत नव्हतीस.

अनुजा :

अग, एखाद्या अनोळखी माणसाशी कस लगेच बोलायचं. अवघड वाटत.

माधवी :

चाक बदलून घेतलंस ना, तेव्हा नव्हता अनोळखी.

रेवा :

सोडा तो विषय.

प्राजक्ता :

 सोडा काय सोडा, या घटनेनं काही शिकायला मिळालं का?.

वेदिका :

 काय शिकायला मिळालं.

 (गाडी बाजूला घेते. ब्रेक दाबल्याचा आवाज. थांबवते)

प्राजक्ता :

 आपणं अजूनही परावलंबी आहोत.

वेदिका :

ते कसं काय?

प्राजक्ता :

हे बघ त्या हॉटेलमध्ये आपण त्या तरुणा मुळे त्या बेवड्या गुंडाच्या भांडणातून  सुटलो. साधं गाडीच चाक बदलता नाही आल्ं आपल्याला, यासारखं दुर्दैव काय?

वेदिका:

अग, जगात कोणच परिपूर्ण नसत.

प्राजक्ता :

हे बघ जग व आपली तुलना करन सोडून दे.

वेदिका :

मग काय करायचे?

प्राजक्ता :

स्वतचे काम स्वतः करता आलं पाहिजे. तसेच शरीर संरक्षण करता आलं पाहिजे. तरच आपल्या गड चढण्याचे सार्थक होईल.

श्वेता :

 अगदी बरोबर आहे. मग लागायचं का तयारीला.

प्राजक्ता :

(हात पुढे करत)

डन ना.

( सर्वजणी हात हातावर ठेवत.)

डन

( गाडी जातांना दिसते.)

Cut to ….

………… ……

Inter / night / kantenar

(किडन्याप केलेल्या एका मुलीस शुद्ध येते.- अपहरण झाल्याचे जाणवते.रडण्याचा आवाज, कंटेनर दरवाजा उघडण्याचा आवाज. आवाज ऐकून मुग्धा पुनः बेशुध्द नाटक करते. दाढी वाढलेला, सुरमा घातलेला जावेद आत येतो. रडणाऱ्या मुलीचे तोंड हाताने धरतो.)

जावेद :

बडी प्यारी लगती हो, मुझे तो भा गई हो. अनारकली , लेकीन…..

मुलगी :

 सोडा, मला सोडा जाऊ द्या…

जावेद :

छोडणे के लिये नहीं पकडा है l तेरे को, रुक ना जरा, शोर मत मचा. खाना खायेगी l

 अमजद खाना ला l

( अमजद बिर्याणी आणतो. ती बिर्याणी तिला जबरदस्ती चारवतो. ती थुंकते.)

मुलगी :

नालायक, मास चारतोस.

( एक् राक्षसी हास्य)

जावेद :

 अमजद लगा दे सुई.

( अमजद इंजेक्शन देतो. ती ओरडत असते.)

मुलगी :

सोड मला, नालायक  माणसा, चांडाळा सोड मला.

( इंजेक्शन देतात. ती बेशुध्द , इतर मुलीचे  चेकप करतात)

मुलीकडे पहात.

जावेद :

आज रात को ये पार्सल अंगुरो वाले कंटेनर मे डाल दो

अमजद :

जी हुजुर.

( कंटेनर दरवाजा बंद होण्याचा आवाज.)

(मुग्धा अंदाज घेते, उठते, इकडे तिकडे पहाते. एक् धारदार पट्टी दिसते. अंतर्वस्त्रात लपवते. भूक लागलेली आहे. ती बाजूला पडलेल्या बिर्याणीतील भात शिताचे दोन चार घास मास वगळून खाते. गचके लागतात. कोपऱ्यात जाऊन बसते. मनात.)

मुग्धा :

हे परमेश्वरा उचकी थांबवं, मला यातून निसटायचं आहे. शक्ती दे. वाट दे.

( त्या बेशुध्द मुलीत जाऊन आडवी पडते.)

Cut to ….. …..

…… ….. …….

Night / outer / Hostel

( मुली स्कॉर्पिओ मधून उतरतात.)

वेदिका :

 किती वाजलेत.

श्वेता :

 साडे दहा.

वेदिका :

एकटी जाऊ नकोस. श्वेता जा बरोबर, तेवढीच सोबत होईल.

प्राजक्ता :

 दहा मिनिटांचा रस्ता आहे.

वेदिका :

 तरी पण.

श्वेता :

 हे बघ येते मी, येईन उद्या सकाळी परत.

प्राजक्ता :

 नाही नको, तू मला सोडाय ये, नंतर मी तुला येते. असं किती दिवस चालणार. मला ही धाडशी व्हायचेय.

श्वेता :

आपली तयारी झाली ना, मग ठरवू.

प्राजक्ता :

 ते काही नाही, उद्या वाट पाहणं संपल. आज व आता पासून सुरू.

( स्कॉर्पिओ चालू होते. गाडी निघण्याची क्रिया.)

श्वेता :

पोहोचल्यावर फोन कर

प्राजक्ता :

हा करते. जाऊ आता.

वेदिका :

 जा…

Cut to …… ..

……. ….. ……

Night / prajakta Home / Inter.

(वडील हॉल मधून फेऱ्या मारत आहेत. ते आपल्या पत्नीस)

सयाजीराव :

 तुम्हाला कळत कसं नाही. एकटीला कसं पाठवलं.

सावित्री :

मला तर म्हणाली, परवानगी दिलीय तुम्ही. मी तरी पण म्हणाले, ड्रायव्हर काकांना बोलावते म्हणून.

सयाजीराव :

 जेवायला हॉटेलला परवानगी दिली मी, एकटीला गाडी घेऊन जाण्यास नाही.

सावित्री :

 काय लबाड कार्टी आहे. मला पण बोलण्यात गुंडाळलं.

सयाजीराव :

 तुम्हाला पण कळायला पाहिजे, ती रात्रीचं जातेय म्हंटल्यावर आपण ड्रायव्हरला बोलवायला हवं.

सावित्री बाई :

अहो, तो सुट्टीवर गेलाय, काही काम आहे म्हणे.

सयाजीराव :

 हे आणि कोणी सांगितलं तुम्हाला?

सावित्रीबाई :

 प्राजक्ता ने.

सयाजीराव :

झालं… ड्रायव्हर सुट्टीवर आहे. हे देखिल तिने सांगितले.मघाशी मी फोन केला होता त्याला. तर तो म्हणाला, त्याला ताई साहेबांनी सुट्टी घ्यायला सांगितलेय व इतकचं नाही. स्टँड वरील हॉटेलच फॅमिली पॅक कूपन ही दिलंय. जेवाय जायला. बोला आता एवढा पैसा हिच्याकडे येतो कुठून.

सावित्री बाई :

मी तर दिले नाहीत. तुम्ही देता. व मला कशाला बोलता?

( आजीच्या खोलीतून रामरक्षा म्हणण्याचा आवाज येतो.)

प्राजक्ता भाऊ प्रमोद :

घ्या अर्थमंत्र्यांचा आवाज आला,

सयाजीराव :

 कोण आई.

सावित्रीबाई :

हं, तरी म्हटल दुपारी गच्चीवर आजी व नात कुठल्या बागेला खतपाणी घालत होत्या. ही गुपित शिजलित तर

( सयाजीराव आईच्या रुमकडे जाऊ लागतात.)

(स्कॉर्पिओ आल्याचा आवाज.)

सावित्रीबाई :

 आली वाटत.

Cut to ….....

….. …… …

Night / outer/ prajkta home

( वाचमेन गेट उघडतो. स्कॉर्पिओ आत येते. पार्किंग होते. प्राजक्ता दरवाजाकडे जाते. बेल वाजवते. बाबा दरवाजा उघडतात. आत येत.)

प्राजक्ता :

 अय्या बाबा अजून जागे.

सयाजीराव :

लेक बाहेर गेलीय म्हंटल्यावर कोणता बाप स्वस्थ झोपेल.

प्राजक्ता :

 हे काय, जेवायला तर गेलते.

( पायातील बूट काढून ठेवत.)

सयाजीराव :

 बाळ प्राजक्ता, जेवायला जाण्याबद्दल काही दुमत नाही, पण ड्राइव्हरला तरी घेऊनन जायचं.

प्राजक्ता :

 कशाला वाचमेनकी करायला. ते काही नाही आता मोठी झालेय मी.

सावित्री :

 ऐकलत ना, मोठी झालेय. , मग काढा एखादं स्थळ.

प्राजक्ता :

 घालवायलाच बसलाय. एवढी जड झालेय का मी.

सावित्री :

 तस नाही बाळ.

प्राजक्ता :

 तस नाही तर मग कसं. एक तर आजचा दिवसच पणवती. अन् इथे आल्यावर घरातल्यांची बोलणी.

सावित्री :

 काय ग,  काय झालं?

प्राजक्ता : (मनात)

यांना न सांगितलेलाच बर. नाहीतर बाहेर फिरायला अटकाव बसायचा.

प्राजक्ता :

 काही नाही, गाडी पंक्चर झाली होती.

( आपल्या रूमकडे जाऊ लागते.)

सावित्री :

 काय गाडी पंक्चर झाली.

प्राजक्ता :

 सोडा आता विषय, आलेय ना मी, आता काळजी नको, झोपा जावा.

( प्राजक्ता रुममध्ये जाते. दार बंद करते.)

सयाजीराव :

हे आपलं बर आहे हिच.

प्रमोद :

चडवा आणखी डोक्यावर.

सावित्री :

 तू गप्प बस, उगाच काहीतरी बोलू नकोस, किती लाड केले तरी आमच्या हाताबाहेर काही जाणार नाही ती. तुझ्यासारखी.

प्रमोद :

मम्मी उगाच शेफारु नकोस हं तिला.

सयाजीराव :

 प्रमोद विषय बंद, जा झोप जा तू.

प्रमोद :

 हे आपल बरं आहे.

सयाजीराव :

चल ग तू पण, झोपू दे तिला दमली असेल ती.

सावित्री :

हो.

( आपल्या खोलीत बाहेरील बोलणे प्राजक्ता ऐकत आहे. व हसत आहे.)

Cut to....

चित्रपटाचे नाव : 🎬 कोकणकड्यावर सापडलेलं स्वप्न भाग ६

 चित्रपटाचे नाव : 🎬 कोकणकड्यावर सापडलेलं स्वप्न भाग ६ 🎬 चित्रपट पटकथा – PART 4 (Final Act) ACT 3 : प्रेमाची परीक्षा आणि विजय (पाने अंदाजे ...